Maharashtra

Thane

CC/09/502

RACHANA J. KATARE - Complainant(s)

Versus

SHREEJI COMUTERS - Opp.Party(s)

01 Jul 2010

ORDER


.CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
Complaint Case No. CC/09/502
1. RACHANA J. KATAREMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. SHREEJI COMUTERSMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 01 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

तक्रार क्रमांक – 502/2009

तक्रार दाखल दिनांक – 13/09/2009

निकालपञ दिनांक – 01/07/2010

कालावधी - वर्ष 10 महिने 28 दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर

कु. रचना जयवंत कटारे

गणपत मिस्‍त्री चाळ, चिंदानंद भुवनबिल्‍डींग

समारे, पाटकर शा‍ळेजवळ, जुना आयरे रोड,

डोंबिवली(पुर्व), जि- ठाणे. .. तक्रारदार

विरूध्‍द

    मे. श्रीजी कॉम्‍प्‍युटर्स तर्फे प्रोप्रायटर

    शॉप नं.2, प्‍लॉट नं. X-15/J फेज- 2

    एम.आय.डी.सी. डोंबिवली(पु), ता.कल्‍याण,

    जि - ठाणे. .. सामनेवाला

     

समक्ष - मा. श्रीमती. शशिकला श. पाटील – अध्‍यक्षा

मा. श्रीमती भावना पिसाळ - सदस्‍या

मा. श्री. पी. एन. शिरसाट - सदस्‍य

उपस्थितीः- .‍क तर्फे वकिल श्री. प्रकाश पवार

वि.प स्‍वतः

आदेश

(पारित दिः 01/07/2010 )

मा.श्री.पी.एन.शिरसाट – सदस्‍य यांचे आदेशानुसार

1. तक्रारकर्तीने हि तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 12 अन्‍वये दाखल केली असुन त्‍यातील कथन संक्षिप्‍तपणे खालीलप्रमाणेः-

तक्रारकर्तीने दि.14/07/2008 रोजी विरुध्‍द पक्षकाराकडुन एल.सी.डी कॉम्‍प्‍युटर रु.29,500/- एवढया किंमतीस बिल क्रमांक 3476 नुसार खरेदी केला. परंतु दि.11/08/2008 रोजी तो बिघडला त्‍याची तक्रार केली. त्‍यानुसार विरुध्‍द पक्षकाराने कॉम्‍प्‍युटर इंजिनियरला तक्रारकर्त्‍याकडे पाठवुन दुरूस्‍त केला. काही दिवस चांगला चालला व नंतर पुन्‍हा ब‍िघडला. विरुध्‍द पक्षकाराला कॉम्‍प्‍युटर मध्‍ये नेमका कोठे दोष आहे हे समजत नसल्‍यामुळे पिसी फॉरमॅट मारावा लागेल असे सांगितले. त्‍या गोष्‍टीस तक्रारकर्तीचा विरोध असुनही तसेच कॉम्‍प्‍युटर वारंटी कालावधीमध्‍ये असुनही ''पिसी फॉरमॅट'' मारण्‍यासाठी रु.350/- तक्रारदाराकडे मागणी केली. तक्रारकर्तीच्‍या परवानगीशिवाय पीसी फॉरमॅट मारल्‍यामुळे कॉम्‍प्‍युटर वरील डेटा (महत्‍वाची माहिती) नष्‍ट झाली. नेमका कोठे दोष आहे हे समजले नाही. कॉम्‍प्‍युटर नादुरुस्‍त राहिल्‍यामुळे तक्रारकर्तीला मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झाला व होत आहे. तक्रारीच्‍या परिमार्ज‍नास्‍तव तक्रारकर्तीने दि.01/07/2009 रोजी कायदेशीर नोटिस पाठविली.


 

.. 2 ..

परंतु विरुध्‍द पक्षकाराने तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. म्‍हणुन तक्रारकर्तीने हि तक्रार दाखल केली असुन त्‍यामध्‍ये असे कथन केले की तक्रार हि स्‍थळ व आर्थिक कार्यक्षेत्राच्‍या सिमेत आहे. तक्रारकर्तीने खालील प्रार्थना केली आहे.

1. विरुध्‍द पक्षकाराने नादुरुस्‍त कॉम्‍प्‍युटर बदलुन नविन कॉम्‍प्‍युटर द्यावा. अथवा 2.कॉम्‍प्‍युटरची किंमत रु.29,500/- द्यावी व त्‍या रकमेवर द.सा..शे 20% दराने व्‍याज द्यावे.

3. विरुध्‍द पक्षकाराने मानसिक त्रासाबद्दल तक्रारदारास रु.65,000/- नुकसान भरपाई द्यावी.

4. विरुध्‍द पक्षकाराने रु.5,000/- न्‍यायिक खर्च द्यावा.


 

2. वरील तक्रारीची नोटीस विरुध्‍द पक्षकारास प्राप्‍त झाली त्‍याचा अहवाल निशाणी 4 वर तक्रारकर्तीने दाखल केला. तक्रारकर्तीने वकिलाचे वकिलपत्र निशाणी 5 वर दाखल केला.‍ निशाणी 6 वर नोटिस प्राप्‍त झाली असा अहवाल दाखल केला निशाणी 7 वर लेखी जबाब देण्‍यास वेळ मिळण्‍याचा विनंती अर्ज दाखल. निशाणी 8 वर मेमो ऑफ अड्रेस दाखल. निशाणी 9 वर लेखी जबाब दाखल. निशाणी 10 वर पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र दाखल. निशाणी 13 वर लेखी युक्‍तीवाद दाखल (न्‍यायिक निवाडयासह) विरुध्‍द पक्षकाराने लेखी युक्‍तीवाद निशाणी 14 वर दाखल केल्‍याने आता अन्‍य काहीही सादर करावयाचे नाही अशी पुरसीस दाखल. निशाणी 15 वर तक्रारदाराने सर्व पुराव्‍याचे कागदपत्रे, लेखी युक्‍तीवाद दाखल केल्‍याने आता अन्‍य काहीही सादर करावयाचे नाही अशी पुरसीस दाखल.


 

3. विरुध्‍द पक्षकाराने दाखल केलेल्‍या लेखी जबाब व लेखी युक्‍तीवाद यातील कथन खालील प्रमाणेः-

विरुध्‍द पक्षकाराने तक्रारकर्तीस टॅक्‍स इनव्‍हॉईस 3476 प्रमाणे सुटे भाग (12) कॉम्‍पुटरचे साधारणपणे रु.29,500/- एवढया किंमतीचे दिनांक14/07/2008 रोजी पुरविले आहेत. तथापी (एल.सी.डी कॉम्‍प्‍युटर) पुरविला नाही. तक्रार खोटी आहे. तक्रार बनावट, तथ्‍यहिन व फायदा मिळण्‍याच्‍या दृष्‍ट हेतुने प्रेरीत होऊन तक्रार दाखल केली आहे. विरुध्‍द पक्षकाराने कोणताही कॉम्प्‍युटर इंजिनिअर कॉम्‍प्‍युटर दुरूस्‍त करण्‍यासाठी पाठविला नाही तक्रारकर्तीने बनावट तक्रार दाखल करुन पैसे उकळण्‍यासाठी तक्रार दाखल केली आहे. कॉम्‍प्‍युटर उत्‍पादकाचे वतिने 12 वस्‍तु खरेदी केल्‍या त्‍यासाठी वारंटी दिली आहे. ''मदर बोर्ड'' संबंधी तक्रारकर्ती कोणतीही माहीती देऊ इच्छित नाही. तकारीला कोणतेही कारण घडले नाही. विरुध्‍द पक्षकाराने सेवेमध्‍ये कोणतीही त्रृटी, न्‍युनता किंवा बेजबाबदारपणा केला नाही. विरुध्‍द पक्षकाराने तक्रारकर्तीची प्रार्थना मान्‍य नाही. तक्रार रद्द बातल ठरवावी व त्‍याची रक्‍कम विरुध्‍द पक्षकारास अदा करावी.


 


 

.. 3 ..

4. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत कॉम्‍प्‍युटर विकत घेतल्‍याचे बिल व मदरबोर्ड विरुध्‍द पक्षकाराने ठेवुन घेतल्‍याची पावती. वकिलामार्फत पाठविलेली नोटिस, प्रत्‍युत्‍तर प्रतिज्ञापत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केले. तसेच विरुध्‍द पक्षकार यांनी लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र व लेखी युक्‍तीवाद केले. वरील सर्व कागदपत्रांचा सुक्ष्‍मरितीने अवलोकन व पडताळणी केली असता न्‍यायिक प्रक्रियेसाठी एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो येणेप्रमाणे-

)विरुध्‍द पक्षकाराने सेवेमध्‍ये त्रृटी, न्‍युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदारा सिध्‍द करु शकले काय? उत्‍तर – होय.

कारण मिमांसा

) स्‍पष्टिकरणाचा मुद्दा - तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षकाराकडुन दिनां‍क 14/07/2008 रोजी टॅक्‍स इन्‍हॉइस कम चलान क्रमांक 3476 नुसार कॉम्‍प्‍युटर 12 सुटेभाग रु.29,500/- खरेदी केले. त्‍या व्‍यवहारानुसार उभय पक्षकारामध्‍ये प्रिव्‍हीटी ऑफ कॉन्‍ट्रक्‍ट होता व आहे. आर्थिक व्‍यवहार घडला असल्‍यामुळे कन्सिडरेशनही झाले होते व आहे. त्‍या अर्थि कॉम्‍प्‍युटरची समाधानकारकपणे दुरूस्‍ती करणे अथवा दुरूस्‍ती योग्‍य होत नसल्‍यास बदली करुन नविन कॉम्‍प्‍युटर परत करणे न्‍यायोचित व विधियुक्‍त आहे.

सदर प्रकरण दि.21/11/2009 रोजी ठाणे मंचात लोक न्‍यायालयामध्‍ये ठेवण्‍यात आले होते. परंतु उभय पक्षकारामध्‍ये तडजोड होऊ शकली नाही. कारणाचा उहापोह करण्‍यात आला नाही.

या तक्रारीसोबत तक्रारदाराने खालील न्‍यायिक निवाडा दाखल केला आहे तो निवाडा या तक्रारीसंबंधात तंतोतंत लागु होतो. तो खालीलप्रमाणेः-

III(1996)CPJ 246 Consumer Disputes Redressal Commission, Calcutta in SC Case no.400/0 of 1995 decided on 16/07/1995. Consumer Protection Act 1986 - section 2(1)(g) Deficiency in service – Computer – Complainant purchased computer from Opposite Party – Oppoisite Party failed to maintain computer in workable condition – Opposite party took computer for repairs. Records destroyed – complaint - whether there is deficiency in service? - Yes.

वरील न्‍यायिक निवाडयानुसार व प्रिव्हिटी ऑफ कॉन्‍ट्रक्‍टनुसार तक्रारकर्तीच्‍या कॉम्‍प्‍युटरमधील दोषासंबंधी दुरुस्‍ती करणे व योग्‍य दुरूस्‍ती होत नसल्‍यास नविन कॉम्‍प्‍युटर बदली करुन देणे विरुध्‍द पक्षकाराचे न्‍यायोचित व विधियुक्‍त कर्तव्‍य आहे. तसेच नैसर्गिक न्‍यायाच्‍या दृष्टिनेही त्‍याचे कर्तव्‍य आहे.

) स्‍पष्टिकरणाचा मुद्दाः- कॉम्‍प्‍युटरमधील दोष योग्‍य वेळी दुरूस्‍ती केला असता तर तक्रारदारास मानसिक, शारिरी‍क व आर्थिक त्रास झाला नसता. कॉम्‍प्‍युटरमधील दोष दुरुस्‍तीसाठी तक्रारकर्तीस अनेक तक्रारी कराव्‍या लागल्‍या. तरीही दुरूस्‍ती केली नाही म्‍हणुन वकिलामार्फत नोटिस पाठवुन मंचामध्‍ये तक्रार दाखल करावी लागली. त्‍याप्रित्‍यर्थ जो मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झाला त्‍याचे परिमार्जन करणे विरुध्‍द पक्षकाराचे न्‍यायोचित व विधियुक्‍त कर्तव्‍य आहे. तक्रारकर्तीने मानसिक नुकसानीपोटी रु.65,000/- मागणी प्रस्‍तुत केली आहे परंतु त्‍यासंबंधी कोणताही सबळ पुरावा, आर्थिक लेखा जोखा,

.. 4 ..

विवरणपत्र, कॅश मेमो किंवा कोणतेही बिल दाखल केले नसल्‍यामुळे तेवढी रक्‍कम मान्‍य करता येणार नाही. तथापी रु.5,000/- मागणी मान्‍य करणे योग्‍य होईल असे या मंचास वाटते त्‍या प्रित्‍यर्थ हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

    1. तक्रार क्र. 502/2009 हि अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

    2.विरुध्‍द पक्षकाराने तक्रारकर्तीस नादुरूस्‍त कॉम्‍प्‍युटर समाधानकारपणे दुरूस्‍त करावी अन्‍यथा नव‍िन कॉम्‍प्‍युटर द्यावा व जुना कॉम्‍प्‍युटर परत घ्यावा.

    3.विरुध्‍द पक्षकाराने तक्रारकर्तीस रु.3,000/-(रु.तीन हजार फक्‍त) मा‍नसिक नुकसानीपोटी भरपाई द्यावी.

    4.विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदारास रु.5,000/-(रु.पाच हजार फक्‍त) न्‍यायिक खर्च द्यावा.

    5.वरील आदेशाची तामिली सही शिक्‍कयाची प्रत मिळाल्‍या तारखेपासुन 30 दिवसाचे आत परस्‍पर करावी.

    6.वरील आदेशाची सांक्षांकित प्रत उभय पक्षकारास त्‍वरीत द्यावी.

दिनांक – 01/07/2010

ठिकाण -ठाणे


 

     

(श्री.पी.एन.शिरसाट ) (सौ.भावना पिसाळ ) (सौ.शशिकला श.पाटील)

    सदस्‍य सदस्‍या अध्‍यक्षा

    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे