जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.242/2008. प्रकरण दाखल दिनांक – 08/07/2008. प्रकरण निकाल दिनांक – 11/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते अध्यक्ष (प्र). मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. श्री.अजित पि.सुरेशराव मोरे, अर्जदार. वय वर्षे 18, व्यवसाय शिक्षण, रा.सोमेश कॉलनी, विश्रामगृहा जवळ,नांदेड. विरुध्द. 1. प्राचार्य, गैरअर्जदार. तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनियरींग, तुळजापुर ता.तुळजापुर जि.उस्मानाबाद. 2. संचालक, तांत्रिक शिक्षण,महाराष्ट्र राज्य,03 महापालिका मार्ग, मेट्रो सिनेमा समोर, धोबी तलाव, पो.बॉ.नं.1967, मुंबई. अर्जदारा तर्फे. - अड.सी.बी.फटाले. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.सतीश सामते,अध्यक्ष प्र.) अर्जदार यांनी प्रवेश प्रक्रीया नियमाप्रमाणे दि.22/08/2007 रोजी अभियांत्रिकी महविद्यालय तुळजापुर यांच्याकडे नियमानुसार फिस भरुन प्रवेश घेतला होता व गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे दि.20/08/2007 रोजी फिसची रक्कम भरली होती. अर्जदार यांनी त्यानंतर त्यांचा प्रवेश रद्य करण्यासाठी शासनाच्या प्रवेश नियमा पुस्तकातील नियम क्र. 7.9 नुसार अर्जदाराचा प्रवेश रद्य झाल्याने भरलेली फिस पैकी प्रक्रिया शुल्क रद्य करुन उर्वरित फिसची रक्कम त्यास मिळावी यासाठी तक्रार दाखल केली होती व नोंदणी नंतर गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्या आधी मंचाने प्राथमिक मुद्या उपस्थित करुन या मंचास कार्यक्षेत्र येते काय? यासाठी अर्जदार यांना संधी दिली. परंतु अर्जदार यांनी या संधीचा फायदा न घेता युक्तीवाद केला नाही. मंचाने स्वतः मेरीटवर सर्व कागदपत्र तपासुन पाहील्यानंतर असे निदर्शनास आले की, अर्जदार यांनी गैरअर्जदार नं. 2 यांच्याकडे म्हणजे औरंगाबाद यांच्याकडे नगदी रक्कम भरुन तात्पुरता प्रवेश घेतला याचा पुरावा म्हणुन त्यांनी पत्र जोडले आहे व यानंतरही अर्जदाराची प्रवेश प्रक्रिया श्री.तुळजाभवानी अभियांत्रिकी कॉलेज तुळजापुर यांच्याकडे झालेला आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 (17) नुसार कॉज ऑफ अक्शन ही तुळजापुर येथे झाल्याने, केवळ अर्जदार हे नांदेड येथील रहिवाशी आहेत म्हणुन नांदेड मंचास कार्यक्षेत्र येणार नाही. यावर Territorial Jurisdiction या मुद्यावर जेथे कॉज ऑफ अक्शन घडली आहे कींवा गैरअर्जदार जेथे कार्यरत आहेत अशाच ठिकाणी तक्रार दाखल करता येते. यावर नॅशनल कमीशन न्यु.दिल्ली 2008 सी.पी.आर 253, (एन.सी) या केसचा आधार घेऊन या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार यांना आपली तक्रार उस्मानाबाद ग्राहक मंचात दाखल करता येईल. सबब अर्जदार यांना या मंचात प्रकरण दाखल करण्यास कार्यक्षेत्र येणार नाही. या प्राथमीक मुद्यावर आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज कार्यक्षेत्राच्या मुद्यावर खारीज करण्यात येतो. 2. अर्जदार हे योग्य ते कार्यक्षेत्र असलेल्या म्हणजे ग्राहक मंच,उस्मानाबाद येथे आपली तक्रार दाखल करु शकतात. (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीशसामते) सदस्या अध्यक्ष (प्र) |