Maharashtra

Ratnagiri

CC/6/2023

Anant Urf Bapu Balkrushana Jadhav - Complainant(s)

Versus

Shree Swami Samarth For Propraiter - Opp.Party(s)

A. V. Bhese & A. A. Bhese

06 Aug 2024

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, RATNAGIRI
Collector Office Compound, Ratnagiri
Phone No.02352 223745
 
Complaint Case No. CC/6/2023
( Date of Filing : 30 Jan 2023 )
 
1. Anant Urf Bapu Balkrushana Jadhav
At.Satvali Road,Lanja, Tal.Lanja
Ratnagiri
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shree Swami Samarth For Propraiter
At.Near Hotel Meghamalhar, TRP,
Ratnagiri
Maharashtra
2. Bridgestone India Pvt.Ltd.
Plot No.A43,Phase-II, MIDC Chakan, Village Sawardari, Tal.Khed Dist.Pune-410 501
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ARUN R GAIKWAD PRESIDENT
 HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE MEMBER
 HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 06 Aug 2024
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(दि.06-08-2024)

 

व्‍दाराः- मा. श्रीम. अमृता नि.भोसले, सदस्या.

 

1.    तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रार अर्ज हा सामनेवाला यांनी तक्रारदाराला उत्पादित दोष असलेले टायर्स बदलून न देऊन तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केलेने सामनेवाला विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम 35 अन्वये दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-

 

      तक्रारदार हे तक्रारीत नमुद पत्त्यावर कायमचे रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचेकडे वेगवेगळया कंपनीच्या चारचाकी गाडया आहेत. तक्रारदार यांचेकडे टोयोटो कंपनीची इनोव्हा ही गाडी आहे. त्यामुळे नवीन टायर चाळीस ते पंचेचाळीस हजार कि.मी. जातात याची तक्रारदारास माहिती होती. तसेच टोयोटो इनोव्हा या गाडीचे टायर वेळेवर व्हिल बॅलन्सींग व अलाईमेंट केल्यावर साठ ते सत्तर हजार कि.मी. जातात असे टोयोटो कंपनी सांगते. सामनेवाला क्र.1 यांचेकडे सामनेवाला क्र.2 यांची डिलरशिप असलेमुळे व व्हिल बॅलन्सींग व अलाईमेंट करणेमध्ये सामनेवाला क्र.1 यांचा हातखंडा असलेने तक्रारदाराच्या इनोव्हा गाडीसाठी सामनेवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.2 कंपनीचे दोन नवीन टायर्स जुलै-2000 मध्ये व जानेवारी-2021 मध्ये दोन नवीन टायर्स असे एकूण चार टायर्स सामनेवाला क्र.2 कंपनीचे तक्रारदार यांनी खरेदी केले. त्यावेळी सामनेवाला क्र.1 यांनी सदर टायर्स पन्नास हजार कि.मी. चालतील असे तक्रारदारास सांगितले. सामनेवाला यांनी टायर्स खरेदी केल्यावर दिलेल्या बीलावर वॉरंटीचा कोणताही उल्लेख नाही, किंवा जी.एस.टी नंबर नाही तसेच बीलावरील पत्ता व ते काम करीत असलेला पत्ता वेगवेगळा आहे. तक्रारदार हे गाडीचे व्हिल बॅलसिंग व अलाईनमेंट दर पाच हजार कि.मी.ला करुन घेतात. तरी देखील सदर नवीन टायर्स अठरा हजार कि.मी. नंतर पूर्णपणे झिजले. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांचेकडे चौकशी केली असता सामनेवाला क्र.1 यांनी बॅलसिंग अलाईनमेंट वेळेवर व व्यवस्थित झालेले आहे. त्यामुळे उत्पादित दोषामुळे टायर खराब झालेले आहे, सामनेवाला क्र.2 यांचेशी चर्चा करुन सांगतो असे तक्रारदारास सांगितले. परंतु नंतर सामनेवाला क्र.1 यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास त्याच कंपनीची व त्याच स्पेसिफीकेशनचे नवीन टायर्स दयावेत किेंवा सदर टायर्स बदलून देणे शक्य नसेल तर नवीन टायर्स निम्या किंमतीत तक्रारदारास दयावेत असा आदेश करण्यात यावा. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- सामनेवालाकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.

           

2.         तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारीसोबत नि.6 कडील कागदयादीने एकूण 8 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये सामनेवाला क्र.1 यांचेकडून टायर्स विकत घेतल्याच्या पावत्या, दि.26/07/2020, दि.23/01/2021, दि.05/04/2021, दि.08/10/2021, दि.02/05/2022  रोजी व्हिल बॅलन्सींग व अलाईमेंट केल्याचा रिपोर्ट, सामनेवाला क्र.3 ची ऑनलाईन वॉरंटीची पॉलीसी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.18 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.20 कडे श्री रोहन राजेंद्र जाधव यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.21कडे श्री रोहन राजेंद्र जाधव यांचे मुंबई विदयापिठाचे ग्रेड कार्ड, उदयम रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट दाखल केले आहे. नि.22कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.29 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.

 

3.    सामनेवाला क्र.1  हे प्रस्तुत कामी हजर झाले असून त्यांनी नि.16 कडे त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. सामनेवाला त्यांचे म्हणणेमध्ये पुढे कथन करतात, टायर्सचे आयुष्य हे गाडी चालविणा-याचे ड्रायव्हींग स्कील, गाडीचे सस्पेंशन आणि मुख्य म्हणजे रस्त्याची परिस्थिती यावर अवलंबुन असते. गाडी एक व्यक्ती सोडून इतर व्यक्तीं यांनी केलेल्या फास्ट ड्राईव्हींगमुळेसुध्दा टायर्सची झिज होते. तसेच गाडीचे सस्पेंशन योग्य दर्जाचे नसले तरीसुध्दा ते टायर्सवर परिणाम करु शकतात. तक्रारदार राहात असलेल्या साटवली रोड ता.लांजा जि.रत्नागिरी येथून नेहमी ये-जा करतेवेळी महामार्गाच्या जागोजागी खडी, ग्रीड, दगडमाती ओतलेल्या आणि काम चालू असणा-या रस्त्यावरुन जावे लागले असणार आहे अशा परिस्थितीत सामनेवाला क्र.1 हे तक्रारदारास कोणतीही नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्या व्हील अलायमेंट रिपोर्टमधील तांत्रिक बाबी पाहता सदरचे अलायमेंट व गाडीचे टायर्स यांची स्थिती योग्यच होती हे लक्षात येते. तक्रारदाराची गाडी बेदरकारीने व बेपरवाईने रॅश ड्रायव्हींग केल्याने टायर खराब झालेले आहेत. जेव्हा तक्रारदार यांनी टायर्सबाबत सामनेवालाकडे तक्रार केली तेव्हा सदर सामनेवाला यांनी तक्रारदारास सदरच्या टायर्स सामनेवाला क्र.2 कंपनीकडे इन्स्पेक्शनसाठी पाठवावे लागतील व तपासणीअंती मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट असलेबाबतचा कंपनीच्या लॅबव्दारे तसा रिपोर्ट मिळाल्यानंतरच सदर टायर्स संदर्भात कंपनीकडे मागणी करता येऊ शकते. तसा रिपोर्ट मिळणे अत्यावश्यक आहे त्याशिवाय मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट आहे असे सांगता येत नाही आणि झीज ही मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट नाही. टायरमध्ये काही डिफेक्ट असता तर त्यावेळी तक्रारदार यांनी व्हील अलाईमेंट केली त्यावेळी लक्षात आला असता शिवाय तक्रारदाराने वॉरंटी पिरियडनंतर सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. टायरमध्ये मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट असेल तरच तो बदलून मिळेल असे पावतीवरही नमुद आहे. मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट होण्यासाठीची आवश्यक पूर्तता तक्रारदाराने केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करण्यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी केली आहे.

 

4.    सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.25 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.26 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.30 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.   

 

5.    सामनेवाला क्र.2 यांनी सदर कामी हजर होऊन नि.13कडे त्यांचे लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणेनुसार सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 यांचे टायर्सचे अधिकृत वितरक नाहीत. त्यामुळे तक्रारदाराच्या खराब झालेल्या टायर्सबाबत सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना काहीही कळविले नाही किंवा तपासणीसाठी सदर खराब टायर्स पाठविलेले नाहीत त्यामुळे तक्रारदार टायर्समध्ये उत्पादित दोष होता असे म्हणू शकत नाही. तक्रारदाराने सदरच्या टायर्सची सरकारी एजन्सीकडून उत्पादित दोष असलेबाबतची तपासणीही करुन घेतलेली नाही.  सदर कंपनीच्या प्रत्येक उत्पादित केलेल्या टायरवर  Tyre  Size & Pattern And Serial No & DOT Code  नमुद असतात. उदा. Tyre  Size & Pattern195/60R16, Serial No & DOT Code : W9WVDLN2422  यातील Serial No & DOT Code मधील शेवटची 2422 ही चार डिजीट म्हणजे week-24 of year-2022 असे असते. परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या दि.26/07/2020 व 23/01/2021 रोजीच्या इन्व्हॉईसवर Tyre  Size & Pattern 205/65R15  असे नमुद आहे. परंतु Serial No & DOT Code नमुद केलेला नाही. त्यामुळे सदर कंपनीच्या नियमाप्रमाणे –

Tyres & Tubes shall be covered under Warranty for manufacturing defects only for a period of 5 years from date of manufacturing; or 3 years from date of purcahsess; or till the exposure of tread wear indicators, whichever is earlier, irrespective of kilometre covered.

            असे असताना तक्रारदाराने त्याचे टायर्समध्ये उत्पादित दोष असलेबाबतचा कोणताही तपासणी अहवाल याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे सदरची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र.2 यांनी केली आहे.

 

6.    सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे म्हणणेसोबत नि.14 कडील कागदयादीने एकूण 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये टायर वॉरंटी पॉलिसीची प्रत, क्लेम इन्स्पेक्शन रिपोर्टची सॅम्पल प्रत,Damange Mechanism from Indian Tyre Technical Advisory Committee (ITTAC) Consumer Guide Manual ची प्रत, ब्रिजस्टोन टेक्निकल सर्व्हीस मॅन्यूअल, बोर्ड रिझोल्युशनची प्रत, अधिकारपत्राची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.27 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.28 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.31 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तसेच नि.32 कडे दोन न्यायनिवाडे दाखल केले आहेत.

 

7.    वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे व लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.

 

­. क्र.

                मुद्दे

उत्तरे

1

तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय  ?

आहे.

2

सामनेवाला यांनी तक्रारदारास टायर्स बदलून न देऊन किंवा नवीन टायर्स निम्म्या किंमतीत न देऊन सेवेत त्रुटी केली आहे काय?

नाही.

3

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

-वि वे

8.         मुद्दा क्रमांकः 1 – तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी नि.6 कडील 6/1 व 6/2 कडील सामनेवाला क्र.1 यांचे पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.2 या कंपनीचे चार टायर्स एकूण रक्कम रु.26,000/- ला खरेदी केलेचे दिसून येते. सदरची बाब सामनेवाला यांनी मान्य केलेली असून उभयतांमध्ये त्याबाबत कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला क्र.1 व 2 हे सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.

 

9.    मुद्दा क्रमांकः 2 – तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारदाराच्या इनोव्हा या गाडीसाठी एकूण चार टायर्स खरेदी केलेले होते. सदरचे टायर्स खरेदी केल्यानंतर तक्रारदार यांची इनोव्हा गाडीचे रनिंग 18000 कि.मी. झालेनंतर सदर टायर्सची झिज झाली. तक्रारदार यांनी सदरची बाब सामनेवाला क्र.1 यांचे निदर्शनास आणून दिली असता सामनेवाला क्र.1 यांनी व्हिल बॅलेंनिसंग व अलाईनमेंट केलेले असलेने सदर टायरमधील उत्पादित दोषामुळे झिजले असतील असे सांगितले असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे.  परंतु सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना तसे काही सांगितलेचे नाकारले आहे. सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणेनुसार टायर्सचे आयुष्य हे गाडी चालविणा-याचे ड्रायव्हींग स्कील, गाडीचे सस्पेंशन आणि मुख्य म्हणजे रस्त्याची परिस्थिती यावर अवलंबुन असते. तक्रारदार यांची गाडी एक व्यक्ती सोडून इतर व्यक्तीं यांनी केलेल्या फास्ट ड्राईव्हींगमुळेसुध्दा गाडीची झिज होते. तसेच गाडीचे सस्पेंशन योग्य दर्जाचे नसले तरीसुध्दा ते टायर्सवर परिणाम करु शकतात असे कथन केले आहे. तर सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराने झिजलेले टायर इन्स्पेक्शनसाठी सामनेवाला क्र.2 यांचेकडे सामनेवाला क्र.1 मार्फत पाठविले नाही किंवा एखादया सरकारी एजन्सीकडून सदर झिजलेल्या टायरची तपासणी करुन घेतलेली नाही असे कथन केले आहे.

 

10.   तक्रारदार यांनी नि.20 कडे श्री रोहन राजेंद्र जाधव यांचे पुराव्याचे ॲफिडेव्हीट दाखल केले असून सदर श्री रोहन जाधव यांनी बी.ई. ऑटोमोबाईलचे शिक्षण घेतले असून त्यांनी तक्रारदाराचे गाडीचे व्हिल बॅलन्सींग व अलाईनमेंट रिपोर्ट पाहून तक्रारदाराचे टायर फॉल्टी असलेचे कथन केले आहे. सदर श्री रोहन जाधव यांचे नि.21 सोबत जोडलेले बी ई. चे सर्टीफिकेट पाहिले असता श्री रोहन जाधव यांचे इंजिनिअरींग सन-2021 मध्ये झालेचे दिसून येते तसेच उदयम रजिस्ट्रेशन सर्टीफिकेटचे अवलोकन करता सदरचे सर्टीफिकेट दि.19/10/2021 रोजीचे दिसून येते व त्यांचे शॉप विठ्रठल ऑटो स्पेअर्स सर्व्हीसेस ॲन्ड ॲक्सेसरीजचे असलेचे दिसून येते. परंतु त्यांना टायर्सच्याबाबतीत अनुभव असलेचा कोणताही पुरावा याकामी दाखल केलेला नाही.

 

11.   तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सामनेवाला क्र.2 यांचेकडील वॉरंटी पॉलिसी दाखल केलेली आहे त्यामध्ये अ.क्र.4 मध्ये –Tyres & Tubes shall be covered under Warrnaty for manufacturing defects only for a period of 5 years from date of manufacturing; or 3 years from date of purchases, or till the exposure of tread wear indicators, whichever is earlier, irrespective of kilometre covered. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये कथन केले आहे की, तक्रारदाराने दाखल केलेल्या टायर्स खरेदीच्या पावत्यांमध्ये फक्त Tyre  Size & Pattern चा उल्लेख दिसून येतो परंतु टायर्सच्या Serial No & DOT Code चा उल्लेख कुठेही दिसून येत नाही. मुख्यता टायर्सच्या Serial No & DOT Code वरुन टायर्सचे उत्पादित वर्ष व आठवडा कळून येते. तसेच तक्रारदाराने त्यांचे गाडीला नवीन टायर्स घातलेनंतर जवळजवळ 18000 कि.मी. गाडी रनींग केलेचे मान्य केले आहे.

 

12.   तक्रारदाराने टायर्सची झिज झालेनंतर ते टायर्स सामनेवाला क्र.2 कंपनीकडे पाठवून कंपनीच्या लॅबमधून तपासून घेणे गरजेचे होते किंवा सरकारी मान्यताप्राप्त एजन्सीकडून तक्रारदाराने सदरचे झिजलेले टायर्स हे उत्पादित दोषामुळेच झीजलेले आहे हे शाबीत करणे गरजेचे होते. परंतु तक्रारदाराने तसे काहीही केलेले नाही. मूळात सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 यांचे अधिकृत वितरक नाहीत. सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणेनुसार टायरमध्ये उत्पादित दोष असेल तर फक्त टायरची झिज होत नाही. त्यासाठी सामनेवाला क्र.2 यांनी खालील न्यायनिवाडे दाखल केलेले आहेत.

1. IN THE NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION NEW DELHI-Revision Petition Nos. 3845]  3846/2006 Decided on 16.12.2010 –Suresh Chand Jain Vs Service Engineer and Sales Supervisor, M.R.F. Ltd. And Ors

 

            The cut in the tyres may be due to negligent driving or otherwise but certainly cannot be said to be a manufacturing defect. Onus to prove that there was a manufacturing defect in the tyres was on the Petitioner which he failed to discharge by leading any cogent evidence. The Petitioner did not produce any expert evidence to either show the nature of defect of proof of manufacturing defect. The Petitioner has failed to prove that the tyres purchased by hum suffered from any manufacturing defect. We agree with the view taken by the Fora below that the Petitioner had failed to prove the allegations made by him in the complaints

 

2.STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION PUNJAB, CHANDIGARH- First Appeal No. 1352 of 2014 Decided on 09.12.2015- Bridgestone India Private Ltd., Vs 1.Rahil Bansal s/o Rakesh Kumar Bansal 2. Hindustan Tyres

 

            Complainant did not examine any technical expert for proving that fact. As the complainant was alleging the manufacturing defect in the tyre, so the District Forum was to follow the procedure as laid down in Section 13(1)(c)  of the Act, as such, a  defect could not have been determined without proper test of the tyre. Opposite party No.1 did file an application under that Section for sending the tyre to the approved laboratory but the same was opposed tooth and nail by the complainant; which was self-damaging and suicidal.

     

13.   वरील न्यायनिवाडयाचा व सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून घेतलेले सामनेवाला क्र.2 कंपनीचे टायर्सची झीज ही उत्पादित दोष असलेबाबतचा सरकारमान्य तज्ञांचा अहवाल अथवा कोणताही पुरावा याकामी तक्रारदाराने दाखल केलेला नाही किंवा सरकार मान्यताप्राप्त एजन्सीकडून तक्रारदाराने खरेदी केलेले टायर्स तपासणी करुन घेतलेचा कोणताही अहवाल याकामी दाखल केलेला नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1यांचेकडून तक्रारदाराने खरेदी केलेले सामनेवाला क्र.2 कंपनीचे टायर्समध्ये उत्पादित दोष असलेचे तक्रारदार सिध्द करु शकलेले नाहीत. सबब सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास खराब टायर्स विक्री करुन सदोष सेवा दिलेची बाब तक्रारदार शाबीत करु शकलेले नाहीत. म्हणून मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग नकारार्थी देत आहे.

 

14.   मुद्दा क्रमांकः 3 –सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुत कामी हे आयोग खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.

आदेश

 

1)    तक्रारदाराचात तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.

 

2)    खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.     

 

3)    आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.

 
 
[HON'BLE MR. ARUN R GAIKWAD]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.