// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 300/2014
दाखल दिनांक : 31/12/2014
निर्णय दिनांक : 07/04/2015
श्री. एम. डब्ल्यु. देशमुख
वय 61 वर्षे धंदा – सेवानिवृत्त
रा. विलास कॉलणी, व्ही.एम.व्ही. रोड,
अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- श्रीसुर्या इन्व्हेस्टमेंटस् अॅण्ड फायनान्सीअल सर्व्हीसेस
तर्फे प्रोप्रा. समीर जोशी (एच.यु.एफ - कारटा)
पत्ता प्लॉट नं. 90 विद्याविहार कॉलनी,
प्रताप नगर, नागपुर – 440 025
दुसरा पत्ता
समीर जोशी
रा. जोशी वाडी,
न्यु कर्व्हे मोडल हायस्कुल जवळ,
- शंतनु वासुदेवराव कु-हेकर
रा. छत्रीतलाव रोड, जयंत कॉलणी,
अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
ग्राहक तक्रार क्रमांकः 300/2014
..2..
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. पुरोहीत
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे : एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 07/04/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 हे लोकांकडून चांगले व्याज दर देण्याचे आमीष दाखवून ठेवी स्विकारण्याचा व्यवसाय करतो व त्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे अधिकृत एजंट आहे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी अमरावती येथे सोबत घेवून लोकांना विरुध्दपक्ष क्र. 1 कडे रक्कम ठेवी मध्ये ठेवण्यास प्रवृत्त केले होते.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याने दिᷦ. २०.१.२०१३ रोजी रु. २,००,०००/- हे २४ महिने कालावधीसाठी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे मुदत ठेवीत जमा केले होते. ज्याबद्दल विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी त्रैमासीक रु. २५,०००/- व्याज देण्याचे कबुल केले होते, तसेच वचनचिठ्ठी सुध्दा करुन दिᷦली होती. 24 महिन्याच्या कालावधीत
ग्राहक तक्रार क्रमांकः 300/2014
..3..
विरुध्दपक्षाने एकंदर रु. ३,७५,०००/- तक्रारदारास देण्याचे कबुल केले होते. व्याजाबद्दल विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी कॅश व्हाऊचर दिले होते परंतु त्यात नमुद असलेली रक्कम विरुध्दपक्षाने दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि. 25.11.2014 रोजी विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठवून मुदत ठेवीतील रक्कम व्याजासह परत मागितली परंतु त्याची पुर्तता विरुध्दपक्षाने केलेली नाही त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी केली तसेच तक्रारदारास त्याने मुदत ठेवीत जमा केलेल्या रक्कमेचा उपयोग करण्यापासुन वंचित ठेवले यासाठी त्यास मानसिक त्रास झाला. मुदत ठेवीतील रक्कम व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी विनंती केल्याप्रमाणे हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
4. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 विरुध्द दि. २३.२.२०१५ च्या निशाणी 1 वरील आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात आला.
5. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. पुरोहीत यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराने दाखल केलेले दस्त विचारात घेतले.
6. विरुध्दपक्षाने तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबी हया नाकारल्या नाही. त्या बाबीला अनुरुप असे दस्त तक्रारदाराने
ग्राहक तक्रार क्रमांकः 300/2014
..4..
निशाणी 2 सोबत दाखल केलेले आहे. ज्यात विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी करुन दिलेली वचनचिठ्ठी आहे. तसेच दि. २५.११.२०१४ रोजी विरुध्दपक्षाने पाठविलेली नोटीस तक्रारदाराने दाखल केली. हे दस्त विरुध्दपक्षाने नाकारले नाही. मागणी करुनही तक्रारदाराची रक्कम विरुध्दपक्षाने परत केलेली नसून कबुल केल्या नंतर सुध्दा त्रैमासीक व्याज हे तक्रारदाराला दिलेले नाही. यावरुन विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढण्यात येतो.
7. विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे एजंट म्हणून काम करीत होते याबद्दल कोणताही समाधानकारक पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही किंवा मुदत ठेव रक्कम जमा करण्याच्या व्यवहाराशी विरुध्दपक्ष क्र. 2 चा संबंध कसा येतो ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही. तक्रारदाराने दाखल केलेले दस्त व तक्रार अर्जात नमूद केलेल्या बाबी हया विरुध्दपक्षाने नाकारल्या नाही त्यामुळे वर नमुद कारणावरुन त्या स्विकृत करणे योग्य असल्याने तक्रार अर्ज हा खालील आदेशा प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष 2 विरुध्द अर्ज नामंजूर करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्रमांकः 300/2014
..5..
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदार यांना रु. ३,७५,०००/- व रु. २,००,०००/- वर दि. १०.३.२०१५ पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 60 दिवसाचे आत परत करावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारीचा खर्च रु. 1,000/- द्यावे.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 07/04/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष