// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 55/2015
दाखल दिनांक : 09/03/2015
निर्णय दिनांक : 17/10/2015
सौ. स्मिता उमाशंकर मोकसदार
वय 52 वर्षे, धंदा – घरकाम
रा. शिवशक्ती कॉलनी,
अमरावती ता.जि. अमरावती : तक्रारकर्ती
// विरुध्द //
- श्रीसुर्या इन्व्हेस्टमेंटस्
तर्फे प्रोप्रा. समीर जोशी (एच.यु.एफ)
पत्ता श्रीसुर्या इन्व्हेस्टमेंट प्लॉट नं. 90
विद्याविहार कॉलनी, प्रताप नगर, नागपुर – 440 025
- शंतनु वासुदेव कु-हेकर,
एजंट श्रीसुर्या इन्व्हेस्टमेंट
रा. व्यंकटेश कॉलनी,
शंकर नगर जवळअमरावती:विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. रोडगे
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे : एकतर्फा आदेश
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 17/10/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 55/2015
..2..
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 साठी काम करतात. विरुध्दपक्ष क्र. 2 ने विरुध्दपक्ष क्र. 1 चे गुंतवणुक योजने बाबत तक्रारदाराला माहिती दिली त्यावरुन तक्रारदाराने दि. २७.७.२०११ रोजी रु. २,००,०००/-, दि. २६.११.२०१२ रोजी रु. २,००,०००/- व दि. ३१.३.२०१३ रोजी रु. १,००,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे जमा ठेवले (Deposit) त्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराला त्या त्या तारखेला वचन चिठ्ठी करुन दिली व त्याबद्दल कॅश व्हाऊचर दिले होते. मुदत अंती दि. २७.७.२०११ च्या वचनचिठ्ठी प्रमाणे रु. ४,००,०००/-, दि. २६.११.२०१२ च्या वचनचिठ्ठी प्रमाणे रु. ४,००,०००/- व दि. ३१.३.२०१३ च्या वचनचिठ्ठी प्रमाणे रु. २,००,०००/- देण्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी कबुल केले. दि. २७.७.२०१३ रोजी तक्रारदार विरुध्दपक्षाच्या कार्यालयात गेला असतांना ते कार्यालय बंद असल्याचे आढळले व त्यामतुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दिलेले कॅश व्हाऊचरचे रोखीकरण झाले नाही. त्यानंतर दि. ९.९.२०१४ रोजी तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांना नोटीस पाठवून रक्कमेची मागणी केली परंतु विरुध्दपक्षाने त्याची पुर्तता केली नाही. तक्रारदाराकडून
ग्राहक तक्रार क्रमांकः 55/2015
..3..
ठेवी स्विकारुन त्यावर व्याज देण्याचे विरुध्दपक्षाने कबुल करुनही ते वचन पाळले नाही त्यामुळे त्यांनी सेवेत त्रुटी केली त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे तिने हा तक्रार अर्ज दाखल करुन विनंती केल्या प्रमाणे आदेश व्हावा अशी विनंती केली.
3. विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द दि. १३.८.२०१५ चे आदेशानुसार प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले. विरुध्दपक्ष क्र. 2 हजर होऊन त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने दि. १६.५.२०१५ च्या आदेशानुसार प्रकरण त्यांच्या विरुध्द जबाबा शिवाय चालविण्यात आला.
4. तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. रोडगे यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदार हिने तिची केस शाबीत करण्यासाठी विरुध्दपक्षाने करुन दिलेले दि. २७.७.२०११, २६.११.२०१२, व ३१.३.२०१३ च्या वचनचिठ्ठी दाखल केल्या तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी जे कॅश व्हाऊचर दिले होते ते देखील दाखल केले. या वचनचिठ्ठी नुसार विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे तक्रारदाराने दि. २७.७.२०११ रोजी रु. २,००,०००/-, दि. २६.११.२०१२ रोजी रु. २,००,०००/- व दि. ३१.३.२०१३ रोजी रु. १,००,०००/- जमा केल्याचे दिसते. तक्रारदाराच्या कथना प्रमाणे त्या त्या तारखेला अनुक्रमे
ग्राहक तक्रार क्रमांकः 55/2015
..4..
रु. ४,००,०००/-, रु. ४,००,०००/-, व रु. २,००,०००/- देण्याचे विरुध्दपक्ष यांनी त्यात नमूद केले आहे. परंतु वचन चिठ्ठी पाहिली असता ही रक्कम त्या त्या तारखेला देण्याचे त्यात नमूद नाही. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी दिलेले कॅश व्हाऊचर त्या त्या तारखेला विरुध्दपक्ष क्र. 1 कडे जमा केल्या बाबत स्पष्ट कथन केले नाही.
5. तक्रारदाराने दाखल केलेले दस्त पाहता तिने विरुध्दपक्ष क्र. 1 ने करुन दिलेली वचनचिठ्ठी प्रमाणे एकूण रु. ५,००,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 कडे जमा केले आहे त्यावर आज पर्यंत विरुध्दपक्ष क्र. 1 ने कॅश व्हाऊचर देवूनही ती रक्कम किंवा व्याज न देता तक्रारदाराची रक्कम ही स्वतः वापरली. विरुध्दपक्ष क्र. 1 यांची ही कृती सेवेतील त्रुटी ठरते. कारण नोटीस देवूनही त्यांनी तक्रारदार हिची ठेव रक्कम परत केली नाही. तक्रारदाराने जरी विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द हा तक्रार अर्ज दाखल करुन विरुध्दपक्ष क्र. 1 सोबत त्यांनीही मागणी प्रमाणे रक्कम द्यावी अशी विनंती केली असली तरी विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द तक्रारदाराने कोणताही ठोस पुरावा दाखल केला नाही. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रारदारांचा अर्ज मंजूर करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्रमांकः 55/2015
..5..
- विरुध्दपक्ष 2 विरुध्द अर्ज नामंजूर करण्यात येतो.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदार यांना दि. २७.७.२०११ रोजी रु. २,००,०००/-, दि. २६.११.२०१२ रोजी रु. २,००,०००/- व दि. ३१.३.२०१३ रोजी रु. १,००,०००/- यावरु त्या त्या तारखेपासुन द.सा.द.शे. 10 टक्के व्याजासह या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 45 दिवसाचे आत परत करावे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार यांना रु. 10,000/- व तक्रारीचा खर्च रु. 3,000/- द्यावे.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 17/10/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष