Maharashtra

Pune

CC/09/479

V.P.More - Complainant(s)

Versus

Shree Sharada Sahakari Bank Ltd. - Opp.Party(s)

17 Apr 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/09/479
 
1. V.P.More
169 Dhingra Niwas,St. Road Dapodi,Pune
...........Complainant(s)
Versus
1. Shree Sharada Sahakari Bank Ltd.
47/1/A, Plot No. 11, Parvati Plaza, Taware Colony,Pune
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

आदेश

                        पारीत दिनांकः- 17/04/2012

                    (द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्‍यक्ष)

                

1]    तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दि. 22 सप्टे. 2009 मध्ये मंचामध्ये दाखल केलेली आहे.  तक्रारीची पाहणी केली असता असे निदर्शनास येते की, दि. 2 जून 2010 रोजी मंचाच्या पूर्वाधिकार्‍यांनी प्रस्तुतची तक्रार गुणावगुणांवर (On merit) खारीज केलेली होती.  त्यानंतर त्याच दिवशी, म्हणजे दि. 2/6/2010 रोजी तक्रारदार विलंबाने मंचामध्ये वकीलामार्फत उपस्थित झाले व त्यांनी प्रस्तुतची तक्रार ‘Dismiss in default’ झाल्यामुळे पुन्हा बोर्डावर घेण्यात यावी (Restore) असा अर्ज दाखल केला.  मंचाने या अर्जावर जाबदेणारांचे म्हणणे दाखल करण्यासाठी जाबदेणारांना नोटीस काढण्याचे आदेश दिले.  त्यानंतर दि. 24/9/2010 रोजी तक्रारदार गैरहजर असल्यामुळे मंचाने जाबदेणार यांचे म्हणणे ऐकुण तक्रारदारास पुन्हा रिस्टोरेशनचा अर्ज दाखल करण्याची मुभा देऊन त्यांचा दि. 2/6/2010 रोजीचा अर्ज निकाली काढला.  त्यानंतर तक्रारदारांनी मंचामध्ये RA-20/2010 या क्रमांकाने रिस्टोरेशनचा अर्ज दाखल दाखल केला व मंचाने तो अर्ज मंजूर करुन तक्रार रिस्टोर केली.  त्यानंतर मंचाने प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये पुढील तारीख सुनावणीसाठी नेमली, परंतु तक्रारदार व त्यांचे वकील दि. 12/10/2011, 23/11/2011, 24/1/2012, 3/4/2012 व आज रोजी मंचासमोर सतत गैरहजर राहिले. 

 

2]    वरील सर्व वस्तुस्थिती पहाता, हे दिसून येते की, मंचातील पूर्वाधिकार्‍यांनी दि. 2/6/2010 रोजी प्रस्तुतची तक्रार गुणावगुणांवर (On merit) खारीज केलेली होती, परंतु ती ‘Dismiss in default’ झाली आहे असे गृहित धरुन पुढील सर्व घटना घडत गेल्या.  त्यामुळे मंचाचा दि. 2/6/2010 रोजीचा आदेश तसेच तक्रारदारांची सततची अनुपस्थिती लक्षात घेता, मंच प्रस्तुतची तक्रार नामंजूर करते.  तक्रारीच्या खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.   

 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.