// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक :247/2014
दाखल दिनांक : 20/11/2014
निर्णय दिनांक : 05/03/2015
सौ. संध्या गोरखनाथ नाईक
वय 52 वर्षे, धंदा - घरकाम
रा. पो. मार्डी ता. तिवसा
जि. अमरावती : तक्रारकर्ती
// विरुध्द //
- श्री. साई कृषि केंद्र
रा. पो. मार्डी ता. तिवसा
जि. अमरावती
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाबिज
तर्फे मॅनेजर
महाबिज भवन, क्रिशी नगर, अकोला : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. बेले
विरुध्दपक्ष 1 तर्फे : अॅड. वानखडे
विरुध्दपक्ष 2 तर्फे : अॅड. ठाकरे
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..2..
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 05/03/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्य
1. तक्रारकर्ताने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सदरील तक्रार दाखल केली.
2. तक्रारदाराचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, तक्रारदार
यांचेकडे ०.८६ आर भुमापन क्र. १० भो. वर्ग १ मौजा चकतापुर येथे शेती असुन त्यातील उत्पन्नावर त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो व रु. १,००,०००/- चे उत्पन्न मिळते.
3. तक्रारदाराने दि. १३.६.२०१४ रोजी सोयाबीन महाबीज कंपनी लॉट क्र. ४०१४ वजन ३० किलो 2 नग, प्रतिनग रु. २,३८०/- प्रमाणे एकुण रु. ४,७६०/- चे बियाणे विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विकत घेतले. तक्रारदाराने त्याच्या शेताची योग्य अशी मशागत करुन, समाधानकारक पाऊस पडल्यानंतर दि. १२.७.२०१४ रोजी शेतात वरील सोयाबीन बियाण्याची पेरणी केली. परंतु सदर बियाण्याची उगवण क्षमता अतिशय कमी असल्यामुळे, उगवण
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..3..
झाले नाही. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडे तक्रार अर्ज केला असता सदर तक्रारीनुसार विरुध्दपक्ष क्र. 2 चे कर्मचा-यांनी तक्रारदाराच्या शेतावर दि. २८.७.२०१४ रोजी पाहणी केली असता अहवाल तयार केला. सदर अहवाला प्रमाणे पेरलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवण 11 टक्के झाली व त्यावर उपस्थितांच्या सहया आहेत.
4. वरील प्रमाणे तक्रारदाराच्या शेतात, बियाण्याची उगवण न झाल्यामुळे, तक्रारदाराचे जवळपास रु. १,००,०००/- चे नुकसान झाले व तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. हयासाठी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 हे संयुक्तरित्या जबाबदार आहेत. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडे वेळोवेळी जाऊन, नुकसान भरपाई साठी विनंती केली पण त्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. अशा प्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार वि. मंचात दाखल करुन विनंती केली की, तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी आर्थिक नुकसान
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..4..
भरपाई रु. १,००,०००/- व त्यावर द.सा.द.शे. 8 टक्के दराने व्याजासह विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून मिळण्यात यावे. तक्रारदाराने निशाणी 2 प्रमाणे दस्त 1 ते 7 दाखल केले आहेत.
5. विरुध्दपक्ष क्र. 1 ने निशाणी 16 प्रमाणे तक्रारदाराच्या मुळ अर्जावर प्राथमिक आक्षेप नोंदवून, नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 1 हे विरुध्दपक्ष क्र. 2 चे डिलर व डिस्ट्रीब्युटर आहेत. कोणताही कोर्टात दावा विरुध्दपक्ष क्र. 1 किंवा 2 विरुध्द टाकण्याच्या अगोदर त्यांना कायदेशीर नोटीस देणे जरुरीचे होते. परंतु तक्रारदाराने तशी नोटीस विरुध्दपक्षाला न दिल्यामुळे तक्रारदाराची विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदाराने वि. मंचाकडून काही महत्वाचे कागदपत्र व सत्य परिस्थिती लपवुन ठेवलेल्या आहेत. हया कारणास्तव पण सदर तक्रार खर्चासह रद्द होण्यास पात्र आहे.
6. विरुध्दपक्ष क्र. 2 ने त्यांचा लेखी जबाब निशाणी 20 ला दाखल करुन तक्रारीतील परिच्छेद 1 ते 11
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..5..
मधील सर्व म्हणणे नाकबुल करुन अतिरिक्त जबाबात नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 2 ने निर्गमीत केलेले सदर बियाणे बाजारात विकणे पुर्वी महाराष्ट्र राज्य बिज प्रमाणिकरण यंत्रणे मार्फत तपासुन घेतले व तसा मुक्तता अहवाल प्राप्त झाला. सदर बियाण्याचे लॉट नं. वेगवेगळे असुन इतर शेतक-यांच्या शेतात पेरले असता त्यांना 70 ते 72 टक्के उगवण झाल्याचे आढळुन आले म्हणून तक्रारदाराचे म्हणण्या प्रमाणे सदर बियाणे सदोष असल्याचे मान्य नाही.
7. तक्रारदाराने त्यांचे शेतात पेरणी करतांना जी काळजी घेणे आवश्यक होती, अशा शासन निर्णयाचे सुचनांचे तक्रारदाराने पालन केले नाही. बियाणे पेरतांना थायरम/ट्रायकोडर्म औषधाची प्रक्रिया इत्यादी, सदर बियाण्यावर तक्रारदाराने सुचने प्रमाणे पालन केले नाही म्हणून तक्रारदाराचे बियाणे सदोष असल्याचे आरोप खोटे व चुकीचे आहेत, म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द होणेस पात्र आहे. विरुध्दपक्षाने निशाणी 21 प्रमाणे दस्त 1 ते 9 सादर केले.
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..6..
8. विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांचा लेखी जबाब निशाणी 22 ला दाखल करुन, विरुध्दपक्ष क्र. 2 प्रमाणेच प्राथमिक आक्षेप नोंदवून, तक्रारदाराने “Suppression of Material Fact” व कायदेशीर नोटीस न दिल्यामुळे सदर तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. तक्रारीतील परिच्छेद 1 ते 9 मधील सर्व म्हणणे नाकबुल करुन अतिरिक्त जबाबात नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 1 हे चिल्लर विक्रेता व अधिकृत परवानाधारक आहेत. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ला कोणतेही कारण नसतांना, बेकायदेशीर रित्या पक्ष केले. तसेच तक्रारदाराच्या शेतातील बियाण्याचे शासनाच्या अधिका-या मार्फत गुण नियंत्रण केले नाही. त्यामुळे तक्रारदाराला कोणतीही नुकसान भरपाई मागण्याचा कायदेशीर हक्क नसुन, तक्रारदाराचा अर्ज रु. ५०,०००/- इतक्या खर्चासह रद्द करण्याची विनंती वि. मंचाकडे केली. विरुध्दपक्ष 1 ने निशाणी 23 प्रमाणे दस्त 1 ते 2 दाखल केले आहेत.
9. तक्रारदाराने निशाणी 24 प्रमाणे प्रतिउत्तर दाखल करुन, विरुध्दपक्ष 1 व 2 चे म्हणण्याप्रमाणे सत्य
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..7..
परिस्थिती व महत्वाची माहिती लपवुन ठेवल्याचे नाकारले. तसेच तक्रारदाराला सी.पी.सी. कलम 80 प्रमाणे नोटीस देण्याचे बंधनकारक नसल्याचे नमुद करुन, आनंद कृषि केंद्र बडनेरा यांना पार्टी करण्याचे आवश्यक नसल्याचे म्हटले व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चे प्राथमिक आक्षेप व अतिरिक्त जबाबातील म्हणणे नाकबुल करुन, तक्रारदाराच्या शेतातील दि. २८.७.२०१४ रोजी शासकीय अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन तसा अहवाला दिला व सदर अहवालाप्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विकत घेतलेले सोयाबीन बियाणे हे दोषयुक्त असल्यामुळे ते उगवले नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 हे दोघेही जबाबदार असुन तक्रारदार हा त्याच्या प्रार्थने प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
10. वरील प्रमाणे तक्रारदाराचा अर्ज व सादर केलेले दस्त, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा लेखी जबाब व सादर केलेले दस्त, उभय पक्षकारांच्या वकीलांचा लेखी व तोंडी युक्तीवाद, यावरुन वि. मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतलीत.
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..8..
मुद्दे उत्तर
- विरुध्दपक्ष 1 व 2 यांना सी.पी.सी.
कलम 80 अंतर्गत नोटीस देणे
तक्रारदारावर बंधनकारक आहे का ? ... नाही
- तक्रारदाराने विरुध्दपक्ष 1 कडून,
विरुध्दपक्ष 2 ने निर्मीत केलेले बियाणे
सदोष होते, हे तक्रारदाराने
सिध्द केले का ? ... होय
- तक्रारदार हा आर्थिक नुकसान भरपाई
तसेच शारिरीक मानसिक त्रासापोटी झालेली
नुकसान भरपाई मिळण्यास पात्र
आहे का ? ... होय
- आदेश .. अंतीम आदेशा प्रमाणे
कारणे व निष्कर्ष ः-
12. तक्रारदारातर्फे अॅड. बेले यांनी त्यांच्या लेखी युक्तीवादात तक्रारदाराच्या मुळ अर्जातील व प्रतिउत्तरा मधील
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..9..
वक्तव्याचा पुर्नरुच्चार करुन म्हटले की, विरुध्दपक्ष 2 च्या लॉट क्र. ४०१४ चे दोन बॅग विकत घेऊन, त्यांच्या शेतात पेरणी केली. तसेच तक्रारदार हया स्वतः शेतकरी असुन, त्यांना शेतीचा पुर्णपणे अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात पेरणी योग्य पाऊस झाल्यावर व शेताची योग्य मशागत करुनच व शासनाच्या सर्व सुचनांचे पालन केल्या नंतरच पेरणी केली व त्यानुसार पेरणी प्रमाणपत्र सादर केले. परंतु विरुध्दपक्षाकडून घेतलेल्या बियाण्याची उगवण शक्ती कमी असल्यामुळे व कृषि अधिका-यांच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालाप्रमाणे तक्रारदाराला जे आर्थिक नुकसान झाले, त्याची जबाबदारी विरुध्दपक्ष 1 व 2 यांची आहे हयासाठी त्यांनी खालील निकालाचा आधार घेतला. . M/s National Seeds Corp. Ltd. //Vs// M. Madhusudan Reddy & Others 2013 (3) CPR 589 (SC). तसेच तक्रारदाराकडे असलेले उपलब्ध खाली बॅग हे लॉट क्र. व बिलावरील लॉट क्रमाकांची संख्या बरोबर जुळते. अशा प्रकारे विरुध्दपक्ष 1 व 2 यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन दोषयुक्त सेवा प्रदान
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..10..
केल्या म्हणून तक्रारदार हया प्रार्थनेतील विनंती प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
13. विरुध्दपक्ष 1 तर्फे अॅड. श्री. वानखडे यांनी लेखी युक्तीवादात त्यांच्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नउल्लेख करुन कथन केले की, ते फक्त अधिकृत व चिल्लर विक्रेता आहेत. त्यामुळे विरुध्दपक्ष 1 यांना विनाकारण पक्ष केले आहे. तसेच तक्रारदाराने त्यांच्या अर्जातील दिलेली सर्व माहिती पुर्णपणे बनावट व काल्पनिक कथन केली आहे व महत्वाचे दस्तावेज दाखल केले नाही, म्हणून तक्रारदाराचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली.
14. विरुध्दपक्ष 2 तर्फे अॅड. श्री. ठाकरे यांनी तोंडी युक्तीवादात कथन केले की, तक्रारदाराने लॉट क्र. ३८०६ व ४०१४ लॉटचे बियाणे घेतले. परंतु कोणते बियाणे शेताच्या कोणत्या भागात पेरले याचा उल्लेख नसुन, तक्रारदाराने दाखल केलेल्या पेरे पत्रकामध्ये त्यांचे शेत पडीत असल्याचा उल्लेख आहे. तसेच शासकीय अधिका-यांचा अहवाल हा परिपूर्ण नसुन, शेतात न
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..11..
जाता कार्यालयातच तयार केला व त्यावर सर्वांनी सहया केल्या व अशा प्रकारे सदर अहवाल हा बनावट व खोटा आहे व बियाणे महामंडळ प्रतिनिधी श्री. राठोड यांना सदर अहवाल मान्य नसल्याचा शेरा आहे, म्हणून तक्रारदाराचा अर्ज रद्द होणेस पात्र आहे.
15. तक्रारदाराचे अॅड. श्री. बेले यांनी विरुध्दपक्ष 2 च्या युक्तीवादावर आक्षेप नोंदवून, सदर अहवाल हा योग्य असुन, बियाण्याची उगवण 11 टक्केच झाल्याचा अभिप्राय कमिटीच्या सदस्यांचा आहे व त्याप्रमाणे तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे.
16. मुद्दा क्र. 1 चा विचार करता, तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करण्यापूर्वी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ला नोटीस देणे बंधनकाकरक असल्याचे विरुध्दपक्षाचे म्हणणे आहे. परंतु तक्रारदाराने सदर तक्रार वि. मंचात दाखल केल्या नंतर विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ला पुर्णपणे अधिकार देऊन, त्यांची बाजु मांडण्यासाठी पुर्णपणे स्वातंत्र देऊन पुरेसा वेळ पण देण्यात आला. तसेच
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..12..
तक्रारदाराने कोणती सत्य परिस्थिती लपवुन ठेवली ? हयाचा स्पष्ट उल्लेख विरुध्दपक्षाने केला नाही. त्यामुळे तक्रारदाराने तक्रार दाखल करण्यापुर्वी विरुध्दपक्षाला नोटीस देणे हे बंधनकारक नाही, हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असून मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
17. मुद्दा क्र. 2 चा विचार करता तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी निर्मीत बियाणे दस्त 2/2 प्रमाणे १३-१३-३८०६, ४०१४ हया लॉट चे ३० किलोच्या २ बॅग विकत घेतल्याचे दिसुन येते व दस्त क्र. 2/4 प्रमाणे तक्रारदाराने दाखल केलेल्या दस्ताप्रमाणे सदर बियाणे बॅगचे लेबल, सर्टीफाईड सीडचा टॅग, यावरुन पण तक्रारदाराने सदर लॉटचे बियाणे विकत घेतल्याचे सिध्द होते व दस्त 2/7 वरील कृषि अधिका-याच्या अहवालानुसार तक्रारदाराने त्याच्या ०.८० आर म्हणजे २ एकर शेतात त्याच लॉटचे बियाणे पेरल्याचे दिसुन येते.
18. दस्त 2/7 अहवालाचे अवलोकन केले असता, एकंदर ६ लोकांच्या समितीने तक्रारदाराच्या शेताची दि. २८.७.२०१४ रोजी
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..13..
पाहणी करुन अहवाल सादर केला. अहवालाप्रमाणे सदर लॉटचे बियाणे शेतक-याने पेरणी केल्यानंतर फक्त 11 टक्के उगवण होऊन, 2 एकर शेतात 2 बॅग पेरल्याचे म्हटले व प्रति एकर रु. ४,८००/- नुकसान होऊन एकंदर रु. ९,६००/- चे नुकसान झाल्याचा अभिप्राय दिला. वरील अहवाल बनावट व अपुर्ण असुन तो कार्यालयात बसुन बनविल्याचे विरुध्दपक्ष क्र. 2 च्या वकीलांनी म्हटले आहे. परंतु त्यासाठी कोणताही संयुक्तीक असा पुरावा त्यांनी सादर केला नाही. सदर अहवालावर एकंदर 6 सदस्यांच्या सहया असुन, महाबिजचे प्रतिनिधी श्री. राठोड यांच्या शिवाय त्यावर कोणीही आक्षेप नोंदविला नाही.
19. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे लेखी जबाबात नमुद केले की, तक्रारदार शेतक-याने पेरणीची योग्य अशी पध्दत न वापरता, कमी पर्जन्यमानात पेरणी केल्याचे म्हटले. परंतु त्यासाठी कोणताही योग्य असा पुरावा जोडला नाही. उलट विरुध्दपक्ष क्र. 2 ने सादर केलेल्या निशाणी 21/9 हया पर्जन्यमान अहवालानुसार दि. १२.७.२०१४ च्या पुर्वी म्हणजे पेरणी अगोदर
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..14..
सरासरी १३८.२२ मि.मी. पाऊस पडल्याचे दिसुन येते व सदर पर्जन्यमान शिफारसीनुसार योग्य असल्याचे दिसुन येते. तसेच तक्रारदार हया स्वतः शेतकरी असल्यामुळे, त्यांना शेतीचा दीर्घकाळ अनुभव असल्याचे त्यांच्या वकीलांचे म्हणणे आहे व तसे गृहीत धरायला हरकत नाही. त्यामुळे तक्रारदाराने बियाणे हाताळतांना किंवा पेरणी करतांना, योग्य ती काळजी घेतली नाही हया विधानाशी वि. मंच सहमती दर्शवीत नाही. तसेच पेरणी अहवाल निशाणी 2/6 नुसार तक्रारदाराने ०.८० आर क्षेत्रात सोयाबीन पेरले व शेत सद्यास्थितीत पडीत आहे असे नमुद केले. याचा अर्थ सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर उगवले नाही व शेत सद्या पडीत आहे, असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही. म्हणून कृषि समितीचा अहवाल योग्य असुन तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 1 मार्फत विरुध्दपक्ष क्र. 2 निर्मीत बियाणे सदोष होते, हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असुन व खालील निकालांच्या M/s National Seeds Corp. Ltd. //Vs// M. Madhusudan Reddy &
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..15..
Others 2013 (3) CPR 589 (SC). आधारावर मुद्दा क्र. 2 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
20. मुद्दा क्र. 3 चा विचार करता विरुध्दपक्षाने दस्त 21/3 नुसार मुक्तता अहवालानुसार सदर लॉटची उगवण शक्ती 73 टक्के असल्याचे नमुद आहे. परंतु कृषि तज्ञांच्या अहवालानुसार 11 टक्के उगवणे याचा अर्थ (73 - 11) = 62 टक्के उगवण शक्तीचे नुकसान झाले. तक्रारदाराच्या शेतात प्रति एकर 6 क्विंटल उत्पादन गृहीत धरले असता, 2 एकरात 12 क्विंटल उत्पादन अपेक्षीत होते. परंतु शेतक-याचे 62 टक्के नुकसान म्हणजे जवळपास 7.5 क्विंटल कमी उत्पादन झाले. तक्रारदाराने दाखल केलेल्या निशाणी 2/5 प्रमाणे बाजार भाव प्रति क्विंटल रु. ३,९५०/- गृहीत धरला तर एकंदर रु. (३,९५० x ७.५) = रु. २८,६२५/- चे नुकसान होऊ शकते व तक्रारदाराचे एकंदर अंदाजीत आर्थिक नुकसान खालील प्रमाणे होऊ शकते.
1. कमी उगवण शक्तीमुळे रु. २८,६२५-००
2. बियाणे खर्च रु. ४,७६०-००
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..16..
3. पेरणी खर्च 2 एकराचा रु. ५,०००-००
एकूण आर्थिक नुकसान रु. ३८,४००-००
देणे न्यायोचित राहील असे वि. मंचाचे एकमत असून मुद्दा क्र. 3 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते व खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराला बियाणे विकत घेतल्याचा खर्च रु. ४,७६०/- अदा करावा.
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराला आर्थिक नुकसान रक्कम रु. ३३,६४०/- अदा करावे.
ग्राहक तक्रार क्रमांक : 247/2014
..17..
- तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रु. १०,०००/- व तक्रार खर्च रु. २,०००/- असे एकूण रु. १२,०००/- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तरित्या तक्रारदाराला अदा करावे.
- वरील आदेशाचे पालन, निकालाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे, अन्यता वरील आदेश क्र. 2 व 3 वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 10 टक्के दराने तक्रारदार हा व्याज वसुल करण्यास पात्र राहील.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 05/03/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष