Maharashtra

Jalgaon

CC/08/1833

Dharmendra Gokuldas Bharote - Complainant(s)

Versus

Shree Merchant co.op society - Opp.Party(s)

Adv.Chordiya

12 Aug 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/1833
 
1. Dharmendra Gokuldas Bharote
Parola
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Shree Merchant co.op society
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      निशाणी
 
 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                        तक्रार क्रमांक 1833/2008
                  तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः – 12/01/2009
                  सा.वा. यांना नोटीस लागल्‍याची तारीखः- 02/03/2009
                  तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-  12/08/2009
 
 
1.     श्री.धर्मेंद्र गोकुळदास भारोटे,
उ.व. 43 वर्षे, धंदाः नौकरी,
2.    सौ.ज्‍योती धर्मेंद्र भारोटे,
      वरील दोघे रा.रथ गल्‍ली, पारोळा,
ता.पारोळा, जि.जळगांव.                       ..........      तक्रारदार
            विरुध्‍द
1.     श्री.मर्चंट नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.पारोळा,
गुजराथी गल्‍ली, पारोळा, ता.पारोळा, जि.जळगांव.
(तर्फे व साठी नोटीस प्रशासक यांचेवर बजाविण्‍यात यावी)
प्रशासक- श्रीमती ए.बी.साळवे, रा.सहा.निबंधक सह.संस्‍था,पारोळा,
हायवे नवनाथ मंदीरासमोर, पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
2.    माजी प्रशासक श्री मर्चंट नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.पारोळा,
श्री.बी.आर.पाटील, रा.मु.पो.विचखेडे, ता.पारोळा,जि.जळगांव.
3.    व्‍यवस्‍थापक, श्री मर्चंट नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.पारोळा,
श्री.नामदेव डोंगर अहिरे, रा.तलाव गल्‍ली, मिनाताई ठाकरे कॉम्‍प्‍लेक्‍सजवळ,
पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
4.    चेअरमन, श्री मर्चंट नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.पारोळा,
      श्री.मंगेश सुधाकर तांबे, रा.मोरफळ गल्‍ली, मोठे महादेव मंदीराकडे,पारोळा,
ता.पारोळा,जि.जळगांव.
5.    व्‍हा.चेअरमन, श्री मर्चंट नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.पारोळा,
      श्री.प्रकाश बाबुराव शिंपी, रा.पारोळा, गावहोळी चौक, औतारगल्‍ली,
ता.पारोळा,जि.जळगांव.
6.    श्री.विलास एकनाथ वाणी,
      रा.बाजारपेठ, श्रीकृष्‍ण गुजराथी मंदीरासमोर, पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
7.    श्री.दिलीप बाजीराव पाटील, रा.तलाव गल्‍ली, पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
8.    श्री.सुनील साहेबराव पाटील, रा.मोरफळ गल्‍ली, मोठे महादेव मंदीराकडे,
पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
9.    श्री.पुंडलीक रामा पाटील, रा.तलाव गल्‍ली, श्री.व्‍यंकटेश पतसंस्‍थेजवळ,पारोळा,
ता.पारोळा,जि.जळगांव.
10.   श्री.डॉ.पंकज भानुदास पाटील, रा.भा.रा.पाटील कॉलनी, पारोळा,
ता.पारोळा,जि.जळगांव.
11.    श्री.किशोर मगनलाल पटेल, रा.रथगल्‍ली, पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
12.   श्री.दिलीप दशरथ सोनार, रा.डी.डी.नगर, पारोळा,
      ना.शि.मंडळाचे हायस्‍कूल मागे, पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
13.   श्री.भिमराव सखाराम जावळे, रा.सिध्‍दार्थ नगर, झपाटभवानी चौक,
पारोळा, ता.पारोळा, जि.जळगांव.
14.   श्री.नंदकिशोर बाबुराव बागुल, रा.विद्यानगर, पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
15.   श्री.प्रमोद विठठ्लशेठ कासार, रा.बाजारपेठ, पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
16.   सौ.सुलोचनाबाई गजानन वाणी, रा.गजानन कॉलनी, पारोळा, ता.पारोळा,जि.जळगांव.
17.   सौ.सुमती बाळकृष्‍ण वाणी, रा.डी.डी.नगर, पारोळा,
ता.पारोळा,जि.जळगांव.                              ......... सामनेवाला
                       
न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
 
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 12/08/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच सदस्‍य श्री.चंद्रकांत मोहन येशीराव यांचेकडून   )
 
            तक्रारदारा तर्फे श्री.अमित जी.चोरडीया वकील हजर
            सामनेवाला क्रं.3 ते 6,8,9,10,12 ते 17 तर्फे श्री.अविनाश त्रंबक निकुंभ
            वकील हजर.
            सामनेवाला क्रमांक 11 तर्फे श्री.उज्‍वल बी.मिसर वकील हजर (नो-से)
            सामनेवाला क्र. 1,2,4,5,व 7 एकतर्फा.
 
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्‍त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे.    वेगवेगळया प्रकारच्‍या व्‍याजावर  ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत.  तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-
           

अ.क्र.
पावती / खाते क्रमांक     
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
11135
26/12/2006
18567/-
06/10/2007
2
11136
26/12/2006
18567/-
06/10/2007
3
11137
26/12/2006
18567/-
06/10/2007
4
11138
26/12/2006
18567/-
06/10/2007
5
11139
26/12/2006
18567/-
06/10/2007
6
11140
26/12/2006
18567/-
06/10/2007
7
11141
26/12/2006
18567/-
06/10/2007
8
11142
26/12/2006
18567/-
06/10/2007
9
11143
26/12/2006
18567/-
06/10/2007
10
11144
26/12/2006
12,078/-
06/10/2007
11
बचत खाते क्र.3120
 
1,124/-
 
12
7450
06/06/2006
4,000/-
06/07/2007
13
9211
26/11/2006
15,691/-
11/01/2007
14
9212
26/11/2006
10,461/-
11/01/2007
15
9213
26/11/2006
10,461/-
11/01/2007
16
8996
27/10/2006
17,024/-
27/01/2007
17
8997
27/10/2006
17,024/-
27/01/2007
18
8998
27/10/2006
17,024/-
27/01/2007
19
8999
27/10/2006
18,045/-
27/01/2007
20
9000
27/10/2006
17,024/-
27/01/2007
21
9001
27/10/2006
17,024/-
27/01/2007
22
8995
30/10/2006
10,000/-
30/01/2007
23
9059
04/11/2006
16,464/-
04/02/2007
24
9060
04/11/2006
16,464/-
04/02/2007
25
7365
25/04/2006
16,611/-
25/05/2007
26
7366
25/04/2006
15,744/-
25/05/2007
27
7367
25/04/2006
15,744/-
25/05/2007
28
7368
25/04/2006
15,744/-
25/05/2007

 
                  तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपलेली असल्‍याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने, तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यास शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्‍हणून तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी व त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.        
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या. सामनेवाला क्रमांक 1,2,4,5,व 7  यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश केला.   तसेच सामनेवाला क्र.11 हे वकीलामार्फत हजर झाले तथापी वेळोवेळी मुदती घेऊनही लेखी म्‍हणणे सादर न केल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द नो-से आदेश पारीत करण्‍यात आले.
            3.    सामनेवाला क्रमांक 3 ते 6,8,9,10,12 ते 17 यांनी प्रस्‍तुत प्रकरणी लेखी म्‍हणणे सादर केलेले असुन तक्रार अर्जातील संपुर्ण मजकुर खोटा व लबाडीचा असुन तो मान्‍य नसल्‍याचे प्रतिपादन केले आहे. तक्रारदाराने सदरची गुंतवणूक व्‍यवसाईक हेतु ठेवुन केलेली होती.    मुदत ठेव नफेखोरीच्‍या हेतुने ठेवलेली असल्‍याने सदरील तक्रार प्रथमदर्शनी रद्य होणेस पात्र आहे.   सामनेवाला संचालक मंडळाची वाढीव मुदत दि.11/06/2007 पर्यंत होती तथापी संचालक मंडळाने दि.4/5/2007 रोजी ठराव क्र. 4 नुसार संचालक मंडळाने राजीनामा दिल्‍यानुसार संस्‍थेवर प्रशासकाची नियुक्‍ती करण्‍याचा ठराव मंजुर करण्‍यात आला.   त्‍यानुसार दि.23/5/2007 पासुन प्रशासकाची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.   सध्‍या व्‍यापार व शेती क्षेत्रातील मंदीमुळे एकाच वेळी सर्व ठेवीदारांना एकदम रक्‍कम देणे शक्‍य नाही. तक्रारदाराचे व्‍यतिरिक्‍त अन्‍य ठेवीदारांच्‍या ठेवी देखील दरम्‍यानच्‍या काळात परिपक्‍व झालेल्‍या असुन सामनेवाला पतसंस्‍थेतील प्रशासक यांनी सदर ठेवीदारांना क्रमाने मुदत ठेवीची रक्‍कम देण्‍यास सुरुवात केली आहे.   तसेच थकीत कर्जदाराविरुध्‍द योग्‍य ती कायदेशीर कारवाई देखील चालु आहे.   सामनेवाला पतसंस्‍था ही तक्रारदार यांना इतर ठेवीदारांना ज्‍या क्रमाने ठेवीची रक्‍कम देत आहे त्‍याचप्रमाणे तक्रारदार यांना देखील क्रमाने रक्‍कम देण्‍यास तयार आहे.   सामनेवाला यांनी तक्रारदार यांना जाणीवपुर्वक कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही.   सबब सामनेवाला क्र. 3 ते 6,8,9,10,12 ते 17 चे नांव तक्रारीमधुन वगळण्‍यात यावे व तक्रारदाराची तक्रार रद्य करण्‍यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र. 3 ते 6,8,9,10,12 ते 17 यांनी केलेली आहे.
            4.    तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे    याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता तसेच सामनेवाला क्र. 3 ते 6,8,9,10,12 ते 17 यांचे लेखी म्‍हणणे व  तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             5.  मुद्या क्रमांक 1   दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक   केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे.  म्‍हणून तक्रारदार ठेवीची रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत.    सबब मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
                              आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांची तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं. 1 ते 17 यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावती क्रमांक आदेश क्रमांक 1 मध्‍ये नमुद केलेप्रमाणे मॅच्‍युअर्ड झालेली असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे . 5 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
                        तसेच बचत खाते क्रमांक 3120 मध्‍ये जमा असलेली एकुण रक्‍कम बचत खात्‍यावरील प्रचलीत व्‍याज दरानुसार तक्रारदारास देण्‍यात यावी.
            ( क )       सामनेवाला क्रं.1 ते 17 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं.1 ते 17 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी   रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं.1 ते 17 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( ई )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 12/08/2009                
                                          (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )    ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव   
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.