तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सा.वाले हे फर्नीचरचे दुकान आहे. तक्रारदारांनी दि.18.04.2010 रोजी सा.वाले यांच्या दुकानातून रू.6,500/-,एवढा मोबदला देऊन कपाट खरेदी केले.
2 तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार दि.18.02.2011 रेाजी जेव्हा तक्रारदार कपाटाचे ड्रावर्स उघडत होते. त्यावेळेस संपूर्ण भरलेले कपाट त्यांच्या अंगावर कोसळले. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार कपाट खरेदी केल्यानंतर लगेचच थोडया महिण्यात कपाटाचे दरवाजे कपाटापासून वेगळे झाले. तक्रारदारांनी अनेक वेळा प्रत्यक्ष जाऊन कपाट दुरूस्त करण्याची विनंती केली. त्यावेळेस सा.वाले यांनी सुताराला पाठवून देतो असे आश्वासन दिले. परंतु कपाट दुरूस्तीसाठी सुताराला पाठविले नाही. दि.18.02.2011 च्या घटनेनंतर तक्रारदारांनी जेव्हा घटनेबद्दल सा.वाले यांना कळविले त्यावेळेस सा.वाले यांनी एका इसमास घरी पाठविले. त्या इसमाने कपाटाची पाहणी केल्यानंतर त्यांनी सा.वाले यांना फोनवरून कपाट दुरूस्तीसाठी सुताराची गरज असल्याचे कळविले. घटनेनंतर कपाटाची पाहणी केली असता चाके बसविलेली कपाटाच्या तळाखालील फळी निसटली होती. फळी ही उभी बसविली नसल्याकारणाने ती निसटली. तसेच कपाटात बसविलेली ड्रावर्स पुर्ण लांबीचे नव्हते. प्रत्येक ड्रावर तीन इंचानी कमी होते. तक्रारदारांनी सा.वाले यांना प्रत्यक्ष जाऊन सदोष कपाट व हलक्या प्रतीचे कपाट असल्याचे सांगीतले. सा.वाले प्रत्येक वेळी सुतारास दुरूस्तीसाठी पाठवून देतो असे आश्वासन देत होते. परंतू त्यांनी कधीही सुतारास पाठविले नाही.
3. म्हणून तक्रारदार यानी दि.28.02.2011 रोजी ग्राहक पंचायतीकडुन पत्र पाठवून कपाटातील दोष विनामुल्य दुरूस्त करण्याची किंवा दुरूस्त होत नसेल तर कपाट बदलुन देण्याचे किंवा त्याचे पैसे परत देण्याची मागणी केली. यास सा.वाले यांनी वकीलामार्फत उत्तर पाठविले व तक्रारदारांचे म्हणणे नाकारले.
4. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदार व त्यांची पत्नी ही वयस्कर आहेत. त्यामूळे या घटनेमुळे त्यांना मानसिक तणावाखाली राहावे लागले व पुन्हा पुन्हा सा.वाले यांच्याशी संपर्क साधुन कपाट दुरूस्तीबद्दल विनंती केली. नंतर ग्राहक पंचायतीकडुनही दोन वेळा संपर्क साधुनही सा.वाले यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करून सा.वाले यांनी कपाटाची किंमत रू.6,500/-,12% व्याजदराने परत द्यावे तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रू. 13,000/-,तक्रार अर्ज खर्च रू.3,000/-,व संपर्क साधण्यासाठी आलेला खर्च रू.300/-,असे एकुण रू.23,580/-,सा.वाले यांनी तक्रारदारांना द्यावेत अशी मागणी केली.
5. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडुन पाठविण्यात आली. पाठविलेली नोटीस सा.वाले यांना मिळाल्या आहेत. नोटीसीच्या पोचपावत्या अभिलेखावर दाखल आहेत. सा.वाले यांना नोटीस पाठविल्याचे शपथपत्र तक्रारदारांनी दाखल केले. नोटीस मिळूनही सा.वाले गैरहजर राहीले. म्हणून तक्रार अर्ज सा.वाले यांचे विरूध्द एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आला.
6. तक्रार अर्ज व अनुषंगीक कागदपत्रे व शपथपत्र यांची पडताळणी केली. करून पाहिली असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे सिध्द करतात काय? | होय. |
2 | तक्रार अर्जात केलेल्या मागणीस तक्रारदार पात्र आहेत काय? | होय अंशतः |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडुन दि.18.04.2010 रोजी 6× 2½×1½या मोजमापाचे रू.6,500/-,मोबदला देऊन खरेदी केला त्याची पावती तक्रार अर्जासोबत अभिलेखात पृष्ठ क्र. 7 वर दाखल आहे.
8. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार दि.18.02.2011 रोजी जेव्हा तक्रारदार कपाटातील ड्रावर उघडत होते तेव्हा संपूर्ण भरलेले कपाट त्यांच्या अंगावर कोसळला. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदार त्यांचे वय-74 व त्यांची पत्नीचे वय-65 या दोंघानाही ते कपाट सावरण्यास फार त्रास झाला. तक्रारदारांनी लगेचच या अपघाती दुर्घटनेबद्दल सा.वाले यांच्याशी संपर्क साधुन कळविले व कपाट दुरूस्ती करण्याबद्दल विनंती केली. त्यानंतर सा.वाले यांनी एका इसमास पाठवून दिले. परंतू त्या इसमाने सा.वाले यांना त्याच्याकडुन कपाट दुरूस्त होत नसल्याचे व त्यासाठी सुताराची गरज असल्याचे कळविले. कपाटाची पाहणी करता असे दिसून आले की, कपाटाखाली चाके बसविलेली तळाखालील फळी निसटलेली आहे व तसेच ड्रावर संपूर्ण लांबीचे नसून ते तीन इंचाने कमी आहेत व कपाटाचे दरवाजे निसटले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार कपाटामध्ये निर्मीती दोष असून कपाटातील तळाखालील फळी हे सुरक्षिततेच्या दृष्टीने व उभ्या फळीवर बसविलेले नाही. या घटनेनंतर तक्रारदारांनी सा.वाले यांच्याशी वारंवार संपर्क साधल्यानंतर सा.वाले यांनी दुरूस्तीसाठी सुतारास पाठवून देतो असे आश्वासन दिले परंतू त्यांनी कधीही सुतारास पाठविले नाही म्हणून तक्रारदार यांनी ग्राहक पंचायतीकडुन सा.वाले यांच्याकडे संपर्क साधून कपाट दुरूस्त करावे किंवा त्या बदल्यात दुसरे कपाट द्यावे किंवा कपाटाचे पैसे परत द्यावे अशी मागणी केली परंतू त्यास सा.वाले यांचेकडुन कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारदारांनी सा.वाले यांच्याशी वारंवार केलेले संपर्कपत्रे अभिलेखात दाखल केलेली आहेत.
9. तक्रारदारांनी तक्रार अर्ज शपथपत्रासह दाखल केले आहे. सा.वाले यांनी हजर राहून तक्रारदारांचे तक्रार अर्जातील म्हणणे नाकारले नाही. तसेच अभिलेखातील दाखल केले. कागदपत्रांवरून तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील कथनास पुष्टी मिळते
10. . दि.18.02.2011 रोजी तक्रार जेव्हा कपाटातील ड्रावर उघडत असतांना कपाट अंगावर कोसळले. तेव्हा कपाटाची पाहणी केली असता कपाटाची ड्रावर्स हे पूर्ण लांबीचे नव्हते. ते तीन इंचानी कमी होते. कपाट कोसळले त्यावेळी कपाटाचे चाके बसविलेली फळी निसटलेली होती व कपाटाची दारे निखळली होती. सहा महिण्याच्या आतच ही घटना घडली यावरून कपाटाचे काम योग्य दर्जाचे नव्हते असे म्हणावे लागेल. तसेच सा.वाले यांनी वारंवार आश्वासन देवूनही दुरूस्ती कामासाठी सुतारास पाठवून दिले नाही. यावरून सा.वाले यांनी निकृष्ट दर्जाची सेवासुविधा पुरवून सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे स्पष्ट होते.
11. तक्रारदारांनी कपाटाची संपूर्ण किंमत रू.6,500/-,सा.वाले यांनी परत द्यावे अशी मागणी केली आहे. परंतू तक्रारदारांनी कपाट दि.18.04.2010 ला
घेतल्यापासून ते घटना घडेपर्यत दि.18.02.2011 पर्यंत बिना तक्रार वापरले. त्यामूळे तक्रारदारांची ही मागणी मान्य करणे योग्य होणार नाही. परंतू सा.वाले यांनी तक्रारदारांना निकृष्ट कारागीरीचे कपाट पुरविले. म्हणून सा.वाले हे प्रस्तुत कपाट विनामुल्य दुरूस्त करून द्यावे असा आदेश देणे योग्य राहील.
12. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडुन मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रू.13,000/-,मागणी केली आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी हे वयोवृध्द असल्याकारणाने घडलेल्या घटनेमूळे त्यांच्यावर नक्कीच मानसिक दडपण आले असणार परंतू तक्रारदारांची मागणी ही जास्त व अवास्तव वाटते. कारण तक्रारदारांनी तक्रार अर्ज स्वतः चालविले आहे तक्रार अर्ज जरी सा.वाले यांचे विरूध्द एकतर्फा निकाली काढण्यात आले असले तरी तक्रारदारांना त्यांची तक्रार सिध्द करणे आवश्यक असते कपाटाची चाके सुरक्षिततेच्या दृष्टीने याबद्दल तज्ञाचे मत दाखल केले नाही तसेच कपाटाची किंमत रू.6,500/-,होती त्यामूळे ते फार किंमती कपाट होते असेही नाही. कपाट किती वजन पैलु शकेल हे सांगता येत नाही. परंतू सहा/सात महिण्यातच कपाटाची चाके निसटली. कपाटाचे दरवाजे निसटले यावरून कपाटाची कारगीरी ही योग्य प्रकारची नव्हती असा निष्कर्श काढावा लागतो त्यामूळे कपाट दुरूस्त करण्याचे आदेश दिलेलेच आहे त्यामूळे सा.वाले यांनी मानसिक त्रासाबद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.2,000/-,नुकसान भरपाई द्यावे व तसेच तक्रार अर्ज खर्च रू. 1,000/-,द्यावा असा आदेश देणे योग्य वाटते.
13. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 373/2011 अंशतः मान्य करण्यातयेते.
2. सा.वाले यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे जाहीर करण्यात
येते.
3 सा.वाले यांनी प्रस्तुत कपाट विनामुल्य दुरूस्त करून द्यावा
4. सा.वाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासाबद्दल रू.2,000/-,नुकसान
भरपाई द्यावी.
5. सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.1,000/-,तक्रार अर्ज खर्च द्यावा.
6. सा.वाले यांनी वरील सर्व आदेशांची पूर्तता आदेशाची प्रमाणीत प्रत
मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत करावी अन्यथा वरील रक्कमेवर
9% व्याजदराने रक्कम देईपर्यंत व्याज द्यावे
7. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.
तक्रारदार : स्वतः हजर
सामनेवाले : गैरहजर
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
आदेश
1. सा.वाले यांना प्रस्तुत मंचाकडून नोटीस पाठविण्यात आलेली आहे तरी देखील सा.वाले गैरहजर. तक्रारदारांनी आपल्या नावाच्या संदर्भात दुरूस्ती करण्याचा अर्ज दिला. तक्रारदारांचे आडनावात चुक झालेली दिसते ती जांभोटकर अशी असून ती त्या ऐवजी सा.वाले यांचे नाव जांबोटकर असे असून न्यायनिर्णयामध्ये योग्य ती दुरूस्ती करावी. न्यायनिर्णयाची प्रत दोन्ही बाजुंना पाठविण्यात याव्यात प्रकरण समाप्त.