(आदेश पारीत द्वारा- श्री.विजयसिंह ना. राणे, मा.अध्यक्ष) -/// आ दे श ///- (पारीत दिनांक – 08 एप्रिल, 2011) यातील सर्व तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रारी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेल्या आहेत. सदरच्या सर्व तक्रारींमध्ये गैरअर्जदार एकच आहेत आणि तपशिलाचा भाग वगळता बहुतांश वस्तूस्थिती आणि कायदेविषयक बाबी समान आहेत. म्हणुन या सर्व तक्रारींचा एकत्रितपणे निकाल देण्यात येत आहे. यातील सर्व तक्रारदार यांचे थोडक्यात निवेदन असे आहे की, गैरअर्जदार हे कृषक जमिनीचे अकृषक रुपांतरण करुन त्याचे भूखंड पाडण्याचा व्यवसाय करीतात आणि ते विकासक आहेत. तक्रारदारांनी त्यांचेसोबत भूखंड घेण्याचा व्यवहार केला व त्यांना निश्चित अशा रकमा दिल्या. पुढे गैरअर्जदाराने त्यांना दिनांक 4/8/2010 ला नोटीस देऊन तुम्ही भूखंडाची रक्कम दिली नाही, तर तुमचे भूखंड रद्द करण्यात येतील अशा सूचना दिल्या. त्यावरुन तक्रारदारांनी याबाबत अधिकची माहिती काढली तेंव्हा त्यांना असे आढळून आले की, सदर शेतजमिनीवरील भूखंड हे श्री नरुले आणि श्री चाफले यांचे नावावर आहेत आणि गैरअर्जदार व त्यांचेमध्ये वाद सुरु आहे. हा वाद सुरु असल्यामुळे कोणीही रकमा भरु नये अशी सूचना दिनांक 12/8/2010 रोजी vWM- विवेक कोलते यांनी दैनिक लोकमत व नवभारत मध्ये प्रकाशित केली होती. त्यामुळे सदरचे व्यवहार हे संशयास्पद ठरले, म्हणुन तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेशी संपर्क करुन त्यांना भूखंडाची त्यांनी दिलेली रक्कम परत मिळण्याची मागणी केली, मात्र गैरअर्जदाराने गुंडागर्दी करुन तक्रारकदार यांना हकलले व आपले कार्यालय दुसरीकडे हलविले. पुन्हा तक्रारदारांनी गैरअर्जदाराचे नवीन कार्यालयाचा शोध घेतला व त्यांची भेट घेतली, तेंव्हा त्यांना भूखंडाचे विक्रीपत्र करुन देतो असे सांगीतले, मात्र त्यांचे निवेदन चूकीचे होते. कारण गैरअर्जदारांनी इतरही लोकांसोबत सदर भूखंडाचे सौदे केल्याची त्यांना माहिती असून सुध्दा त्यांनी तक्रारदारांची फसवणूक केलेली आहे. म्हणुन तक्रारदारांनी नोटीस दिली आणि तीद्वारे रक्कम परत करा अशी मागणी केली. गैरअर्जदारानी सदर नोटीसला प्रतिसाद दिला नाही व जबाब सुध्दा दिलेला नाही. म्हणुन सर्व तक्रारदारांनी ह्या तक्रारी मंचासमक्ष दाखल करुन, त्याद्वारे गैरअर्जदाराने त्यांच्या भूखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे व ते शक्य नसल्यास दिलेल्या रकमा 12% व्याजासह परत कराव्यात, तसेच तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी प्रत्येकी रुपये 50,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रुपये 10,000/- मिळावेत अशा मागण्या केलेल्या आहेत. यातील तक्रारदारांनी मौजा मुरादपूर, तह. उमरेड, जि. नागपूर, प.ह.नं. 26, खसरा नं.30 व 31 या ठिकाणच्या लेआऊटमधील भूखंड खरेदी करण्यासंबंधिचे करार केलेले आहेत व त्यानुसार दिलेल्या रकमा व मागण्या इत्यादीसंबंधिचा संपूर्ण तपशिल खालील प्रमाणे आहे. ‘परिशिष्ट—अ’ अ. क्र. | तक्रार क्रमांक | तक्रारदाराचे नांव | भूखंड क्रमांक | क्षेत्रफळ (चौ.फु) | बयानापत्राचे वेळी दिलेली रक्कम | पुढे वेळोवेळी दिलेली रक्कम | एकूण दिलेली रक्कम | पावत्या प्रमाणे जमा रक्कम | मागणी केलेली रक्कम | 1. | 182/10 | अल्का बंड | 109 | 1629.06 | 10,000 | 7,000 | 21,500 | 17,000 | 25,000 | 2. | 183/10 | गजानन ठोसरे | 106 | 1396.80 | 15,000 | 6,500 | 21,500 | 21,500 | 21,500 | 3. | 184/10 | विशाल भिंगारे | 92 | 1684.20 | 15,000 | 13,500 | 28,500 | 28,500 | 35,500 |
सदरील सर्व प्रकरणात गैरअर्जदार यांना मंचाद्वारे नोटीस बजाविण्यात आल्या, मात्र ते मंचासमक्ष हजर झाले नाही वा त्यांचा लेखी जबाबही दाखल केला नाही. म्हणुन त्यांचेविरुध्द प्रकरणे एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 3/3/2011 रोजी परीत करण्यात आला. यातील तक्रारदार ह्यांनी आपल्या तक्रारी प्रतिज्ञालेखावर दाखल केलेल्या असून, सोबत नकाशा, इसारपत्र, बयानापत्र, रकमा दिल्याच्या पावत्या, नोटीस इत्यादी दस्तऐवज मंचासमक्ष दाखल केलेले आहेत. तक्रारदार यांच्या वकीलांनी या प्रकरणात मंचासमक्ष तोंडी युक्तीवाद केला. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब दाखल केला नाही व आपला कोणताही बचाव केला नाही.तक्रारदारांनी दाखल केलेले दस्तऐवज, गैरअर्जदार यांना दिलेल्या रकमा इत्यादी बाबी सिध्द केलेल्या आहेत. गैरअर्जदार यांना पुढे नोटीस दिली ती गैरअर्जदाराना मिळाली, मात्र त्यांनी नोटीसला उत्तर दिले नाही व याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी प्रतिज्ञालेखावर दाखल केल्या आहेत. याउलट गैरअर्जदाराने तक्रारदारांचे म्हणणे खोडून काढले नाही. यातील तक्रारदारांनी दाखल केलेले दस्तऐवज, प्रतिज्ञालेख इत्यादिंचा विचार करता, तक्रारदारांनी आपल्या तक्रारी मंचासमक्ष सिध्द केलेल्या आहेत. गैरअर्जदाराने मात्र तक्रारदारांस वादातील भूखंडाचे सौदे करुन सुध्दा विक्रीपत्र करुन दिले नाही या सर्व बाबी सिध्द होतात. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करता, आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. -000 अं ती म आ दे श 000- 1) सर्व तक्रारदारांच्या तक्रारी अंशतः मंजूर करण्यात येतात. 2) गैरअर्जदार यांनी तक्रार क्रमांक 182/10 ते 184/10 मधील तक्रारदारांना अनुक्रमे रुपये 17,000/-, रुपये 21,500/- आणि रुपये 28,500/- रक्कम दिल्याचे तारखेपासून रकमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम द्यावी.. 3) गैरअर्जदार यांनी सर्व प्रकरणांतील तक्रारदारांना शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल प्रत्येकी रुपये 10,000/- आणि तक्रारीच्या खर्चाबद्दल प्रत्येकी रुपये 1,000/- याप्रमाणे एकंदरीत रुपये 11,000/- प्रत्येकी (रुपये अकरा हजार केवळ) एवढी रक्कम द्यावी. गैरअर्जदार यांनी सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून एक महिन्याचे आत करावे. नपेक्षा उपरोक्त रकमांवर 12% ऐवजी द.सा.द.शे. 15% दराने दंडनिय व्याज गैरअर्जदार देणे लागतील.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |