जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ०८/२०१४
तक्रार दाखल दिनांक – १६/०१/२०१४ तक्रार निकाली दिनांक – ०५/१२/२०१४
श्री बाळकृष्ण हरी काकडे.
उ.व ७५ कामधंदा – निवृत्त
रा.प्लॉट नं.३६ मधुबन कॉलनी
देवपुर धुळे. . तक्रारदार
विरुध्द
श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या. धुळे.
नोटीसची बजावणी चेअरमन यांचेवर करण्यात यावी.
श्री.बीपीन भेरूलाल खिवसरा (चेअरमन)
रा.महावीर ज्वेलर्स, सराफबाजार धुळे. . सामनेवाला
न्यायासन
(मा.प्रभारी अध्यक्ष – श्री.एस.एस. जोशी)
(मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
उपस्थिती
(तक्रारदारातर्फे – अॅड.एस.वाय. शिंपी)
(सामनेवालातर्फे – गैरहजर)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्या – सौ.के.एस. जगपती)
१. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या. धुळे.’ या पतसंस्थेत मुदत ठेव पावतींमध्ये रक्कम गुंतविली होती. त्याचा तपशील खालील प्रमाणे.
पावती क्र. ठेव दिनांक देय दिनांक व्याजदर ठेव रक्कम
१) ३००० ८/१/०७ ८/१/१० १३% २५,०००/-
२) ३००१ ८/१/०७ ८/१/१० १३% २५,०००/-
३) ३००२ ८/१/०७ ८/१/१० १३% २५,०००/-
४) ३००३ ८/१/०७ ८/१/१० १३% २५,०००/-
५) १७३२ ११/२/०८ २६/३/०८ १२% ४५,०००/-
६) १७१२ २३/११/०७ ७/१/०८ १२% ३५,०००/-
-
एकुण रक्कम रू. १,८०,०००/- + व्याज
३. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेव पावतींमधील एकूण रक्कम रूपये १,८०,०००/- व त्यावर देय तारखेपासून १३% प्रमाणे व्याज आणि मानसिक त्रासापोटी रक्कम रूपये २५,०००/- व अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- अशी एकूण रक्कम सामनेवाले यांचेकडून मिळावी, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ मुदत ठेव पावतींच्या छायांकीत प्रती दाखल केलेल्या आहेत.
५. मंचाची नोटीस मिळाल्यावरही सामनेवाले हजर झाले नाहीत व त्यांनी खुलासाही दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारीत करण्यात आला.
६. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे, तक्रारदारांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कसूर केली आहे काय ? होय
- तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून देय रक्कम
व्याजासह आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
ड. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
७. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे मुदत ठेव पावतींमध्ये रक्कम गुंतविली होती. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी मुदत ठेव पावतींच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणून मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
८. मुद्दा ‘ब’ - प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदतठेव पावतींमध्ये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतु मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा ‘क’ - तक्रारदार यांनी दाखल केलेल्या मुदत ठेवपावतींमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला ‘श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या. धुळे. यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले पतसंस्था श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या. धुळे. यांचेकडून मुदत ठेवपावतींमधील एकूण रक्कम रूपये १,८०,०००/- व त्यावर ठेव दिनांकापासून देय दिनांकापर्यंत ठरलेल्या दराप्रमाणे व्याज. तसेच सदरील संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतींमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला यांच्याकडून परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या. धुळे. यांच्याविरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे व त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे. त्याचबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक त्रासापोटी रुपये २,०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रूपये १,०००/- भरपाई मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा ‘ड’ - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाले श्री. भगवान महावीर नागरी सहकारी पतपेढी मर्या. धुळे. यांनी तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासून पुढील तीस दिवसांच्या आत खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
- मुदत ठेवपावती क्र.३००० मधील ठेव रक्कम रूपये २५,०००/- (अक्षरी रूपये पंचवीस हजार) व त्यावर ठेव दि.०८/०१/०७ पासून देय दि.०८/०१/१० पर्यंत १३% प्रमाणे व्याज आणि दि.०९/०१/१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
- २) मुदत ठेवपावती क्र.३००१ मधील ठेव रक्कम रूपये २५,०००/- (अक्षरी रूपये पंचवीस हजार) त्यावर ठेव दि.०८/०१/०७ पासून देय दि.०८/०१/१० पर्यंत १३% प्रमाणे व्याज आणि दि.०९/०१/१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
- ३) मुदत ठेवपावती क्र.३००२ मधील ठेव रक्कम रूपये २५,०००/- (अक्षरी रूपये पंचवीस हजार) त्यावर ठेव दि.०८/०१/०७ पासून देय दि.०८/०१/१० पर्यंत १३% प्रमाणे व्याज आणि दि.०९/०१/१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
- ४) मुदत ठेवपावती क्र.३००३ मधील ठेव रक्कम रूपये २५,०००/- (अक्षरी रूपये पंचवीस हजार) त्यावर ठेव दि.०८/०१/०७ पासून देय दि.०८/०१/१० पर्यंत १३% प्रमाणे व्याज आणि दि.०९/०१/१० पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
- ५) मुदत ठेवपावती क्र.१७३२ मधील ठेव रक्कम रूपये ४५,०००/- (अक्षरी
रूपये पंचेचाळीस हजार) त्यावर ठेव दि.११/०२/०८ पासून देय दि.२६/०३/०८ पर्यंत १२% प्रमाणे व्याज आणि दि.२७/०३/०८ पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
- ६) मुदत ठेवपावती क्र.१७१२ मधील ठेव रक्कम रूपये ३५,०००/- (अक्षरी रूपये पस्तीस हजार) त्यावर ठेव दि.२३/११/०७ पासून देय दि.०७/०१/०८ पर्यंत १२% प्रमाणे व्याज आणि दि.०८/०१/०८ पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दराप्रमाणे व्याज द्यावे.
२. मानसिक त्रासापोटी रक्कम रूपये २,०००/- (अक्षरी रूपये दोन हजार मात्र)
व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रूपये १,०००/- (अक्षरी रूपये एक हजार मात्र)
दयावेत.
३. वर नमूद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक /व्यवस्थापक/ अवसायक /प्रशासक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेच आदेश क्र.२ (अ) व (ब) मधील रकमेपैकी काही रक्कम दिली असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
-
दिनांक ०५/१२/२०१४
(सौ.के.एस. जगपती) (श्री.एस.एस. जोशी)
सदस्या प्र.अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.