Maharashtra

Nagpur

CC/11/2018

SHRI. JIYALAL KESHAV VAIDYA - Complainant(s)

Versus

SHREE BALAJI REALTORS, THROUGH PROPRIETOR RAMDAS NARAYAN BANGINWAR - Opp.Party(s)

ADV. SEEMA MULMULE

16 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/2018
( Date of Filing : 06 Jan 2018 )
 
1. SHRI. JIYALAL KESHAV VAIDYA
R/O. PLOT NO. 42, R.B.I. COLONY, KATOL ROAD, NAGPUR-440013
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. AMOL JIYALAL VAIDYA
R/O. PLOT NO. 42, R.B.I. COLONY, KATOL ROAD, NAGPUR-440013
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHREE BALAJI REALTORS, THROUGH PROPRIETOR RAMDAS NARAYAN BANGINWAR
OFF. AT, PLOT NO. 06, SHRIRAM NAGAR, NEAR GAYATRI HOTEL, SOMALWADA, WARDHA ROAD, NAGPUR-440025
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHREE BALAJI REALTORS, THROUGH PROPRIETOR RAMDAS NARAYAN BANGINWAR
R/O. PLOT NO. 01, BENG LAYOUT, NEAR NAGAR PARISHAD REST HOUSE, DIGRAS, YAVTMAL-445203
YAVATMAL
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 16 Mar 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे मौजा बेलतरोडी, खसरा नंबर ४०/१, पटवारी हलका नंबर ३८, प्‍लॉट नंबर ३ ते १०, एकूण क्षेञफळ ९६२.५४ चौ.मी.  तहसिल जिल्‍हा नागपूर या भुखंडावर उभारलेल्‍या बालाजी टॉवर्स मधील पहिल्‍या माळ्यावरील फ्लॅट नंबर १०४ बी विंग, एकूण सुपर बिल्‍डअप क्षेञफळ १०११ चौरस फुट एकूण रुपये १५,१७,०००/- एवढ्या किंमतीत विकत घेण्‍याचा करार रुपये १००/- चे स्‍टॅम्‍प पेपरवर विरुध्‍द पक्षाशी दिनांक १८/२/२००८ रोजी केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक १८/८/२००९ रोजी रुपये ७०,०००/- व दिनांक ३०/०९/२००९ रोजी रुपये १,६०,०००/- धनादेशाव्‍दारे अदा केले असे एकूण रुपये २,३०,०००/- विरुध्‍दपक्षाला अदा केले. करारानुसार विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला रजिस्‍टर्ड नोंदनी विक्रीपञ करारानाम्‍यापासुन १५ महिण्‍यांचे आत करुन देणार होते. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी दिलेल्‍या वेळेत बांधकाम सुरु केले नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदीपोटी दिलेली रक्‍कम रुपये २,३०,०००/- ची मागणी केली परंतु विरुध्‍द पक्षाने देण्‍यास नकार दिला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक २१/१२/२०१३ रोजी पञ पाठवुन त्‍याव्‍दारे कळविले की, मा. जिल्‍हाधिकारी यांनी बांधकाम करण्‍यास मनाई केली असल्‍यामुळे सदनिकेचे बांधकाम बंद आहे. कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्‍याबाबत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कळविले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला दिनांक २४/११/२०१७ रोजी कायदेशीर नोटीस बजावली परंतु ती देण्‍यास नकार दिला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन सदनिका खरदीपोटी घेतलेली रक्‍कम रुपये २,३०,०००/- २५ टक्‍के व्‍याजाने परत करावी.
  2. मानसिक व शारिरीक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना स्‍थानिक वर्तमानपञातुन जाहिर नोटीस व्‍दारे नोटीस पाठवुनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ मंचात हजर झाले नाही त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक २६/१२/२०१९ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजांचे अवलोकन केल्‍यावर तसेच तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                        उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे मौजा बेलतरोडी, खसरा नंबर ४०/१, पटवारी हलका नंबर ३८, प्‍लॉट नंबर ३ ते १०, एकूण क्षेञफळ ९६२.५४ चौ.मी.  तहसिल जिल्‍हा नागपूर या भुखंडावर उभारलेल्‍या बालाजी टॉवर्स मधील पहिल्‍या माळ्यावरील फ्लॅट नंबर १०४ बी विंग, एकूण सुपर बिल्‍डअप क्षेञफळ १०११ चौरस फुट एकूण रुपये १५,१७,०००/- एवढ्या किंमतीत विकत घेण्‍याचा करार रुपये १००/- चे स्‍टॅम्‍प पेपरवर विरुध्‍द पक्षाशी दिनांक १८/२/२००८ रोजी केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक १८/८/२००९ रोजी रुपये ७०,०००/- व दिनांक ३०/०९/२००९ रोजी रुपये १,६०,०००/- धनादेशाव्‍दारे अदा केली असे एकूण रुपये २,३०,०००/- विरुध्‍दपक्षाला अदा केले. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजांचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन सदनिका विक्रीपोटी तक्रारकर्त्‍याकडुन एकूण रुपये २,३०,०००/- स्विकारले होते. परंतु मा. जिल्‍हाधिकारी यांनी सदनिका बांधकामास मनाई केल्‍याचे विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याला कळविल्‍यावर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास सदनिका खरेदीपोटी दिलेली रक्‍कम रुपये २,३०,०००/- ची मागणी केली असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास रक्‍कम परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला सदनिका विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये २,३०,०००/- अदा करावी व सदर रकमेवर दिनांक ३०/०९/२००९ पासुन १४ टक्‍के व्‍याज तक्रारकर्त्‍याला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावी.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तपणे तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये ४०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.