जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/248 प्रकरण दाखल तारीख - 11/10/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. सौ.ज्योती भ्र. दिंगबर माने वय 30 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार. रा. स्वातंञ सैनिक कॉलनी, नांदेड. विरुध्द. डॉ.शोभा अनिल तोष्णीवाल रा.तोष्णीवाल हॉस्पीटल गैरअर्जदार डॉक्टर्स लेन, घामोडिया परिसर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.म.मोहीओद्यीन निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. थोडक्यात अर्जदाराची तक्रार अशी की,अर्जदार हिचे लग्न दि.27.5.2003 रोजी झाले असून त्यांना दोन मूली आहे व ते नांदेड येथे राहतात. अर्जदारास तीन वर्षानंतर एक मूलगा हा सिंझरिंगची शस्ञक्रिया करुन दि.2.3.2006 रोजी जाधव हॉस्पीटल नांदेड येथे झाला. व दूसरा मूलगा दि.18.3.2008 रोजी हा गैरअर्जदार यांच्या दवाखान्यात सिझर करुनच जन्मला व जन्मापूर्वीपासून सदर मूलाचे पूर्ण देखरेख गैरअर्जदार यांचेकडे सूरु होता. गैरअर्जदार यांनी कूटूंब नियोजनाची शस्ञक्रिया करण्याचा सल्ला दिला म्हणून दि.18.3.2008 रोजी शस्ञक्रिया केली. शस्ञक्रिया केल्याचे प्रमाणपञ दिले व पून्हा भविष्यात गर्भ धारणा होणार नाही असे सांगितले. त्यानंतर अर्जदारास मार्च 2010 मध्ये पोट दूखण्याचा ञास सूरु झाला. दि.18.5.2010 रोजी अर्जदारास ञास सहन न झाल्याने गैरअर्जदार यांचेकडे गेले असता तेथे असा फलक लावला की, दि.16.5.2010 ते 26.5.2010 रोजी पर्यत दवाखाना बंद आहे. त्यामूळे त्यांनी डॉ.रचिता बिडवई यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी तपासणी केल्यानंतर व सोनोग्राफी रिपोर्ट आल्यानंतर व चाचण्याकेल्यानंतर अर्जदारास पून्हा गर्भ धारणा झाल्याचे सांगितले. त्यामूळे गैरअर्जदार यांनी केलेले गर्भधारणेचे आपॅरेशन अयशस्वी झाल्याचे सांगितले. त्यामूळे अर्जदारास व त्यांचे पतीस मानसिक धक्का बसला व अर्जदार यांचे जीवीतास धोका असल्यामूळे तिसरी सिंझरिंग केली व कूटूंब नियोजनाची शस्ञक्रिया केली. या सर्व परिस्थितीमूळे अर्जदार व त्यांचे पतीवर गंभीर परीणाम झाला. डॉ. बिडवई यांच्याकडे रु.30,000/- खर्च आला. गैरअर्जदार यांनी चूकीचे ऑपरेशन करुन अर्जदारास ञूटीची सेवा दिली त्यामूळे अर्जदाराच्या वकीली व्यवसायावर खूप परीणाम झाला व त्यांचे रु.2,00,000/- चे उत्पन्न बूडाले. या बाबत गैरअर्जदार यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले त्यामूळे दि.29.8.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस दिली व नूकसान भरपाई देण्याची मागणी केली. सदर नोटीसला गैरअर्जदार यांनी वकिलामार्फत उत्तर दिले व जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की नूकसान भरपाई रु.5,00,000/- 12 टक्के व्याजासह दयावी तसेच मानसिक व शारिरीक ञासाबददल रु.50,000/- व दावा खर्च रु.5,000/- दयावेत. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार हे शहरातील प्रसिध्द प्रसूती शास्ञज्ञ आणि स्ञीरोग शास्ञज्ञ आहेत. गेल्या 18 वर्षापासून व्यवसायाद्वारे समाजसेवा करतात. गैरअर्जदाराने पूरस्थितीनुसार अर्जदार यांना पहिला मूलगा पाच वर्षाचा होईपर्यत कूटूंब नियोजन शस्ञक्रिया करु नये असा सल्ला दिला होता पण अर्जदार व त्यांच्या पतीने आग्रह करुन कूटूंब नियोजनाची शस्ञक्रिया करुन घेतली. अर्जदार व त्यांच्या पतीस शस्ञक्रिये बाबत संपूर्ण माहीती दिली होती. कूटूंब नियोजनाची व सिझरिंगची शस्ञक्रिया अर्जदार व त्यांच्या पतीने खर्च कमी व्हावा म्हणून करुन घेतली. शस्ञक्रिये बाबतचे हमीपञ दोघाच्या सहीने लिहून दिल्यानंतरच शस्ञक्रिया करण्यात आली. पून्हा गर्भधारण होणे ही Act of God (ईश्वराची कृती ) आहे. यात गैरअर्जदार यांनी सेवेत कूठेही ञूटी केलेली नाही. अर्जदारास कोणतीही चूकीची वागणूक किंवा काहीही असभ्य शब्द वापरलेले नाहीत. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही फेटाळण्यात यावी असे म्हटलेले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? अंशतः 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 - अर्जदार हीस गैरअर्जदार डॉ.तोष्णीवाल यांचेकडे दि.18/03/2008 रोजी सीझर होऊन एक मुलगा झालेला आहे व दि.18/03/2008 रोजीच गैरअर्जदार यांचे देखरेखेत असतांनाच अर्जदार हीची कुटूंबनियोज शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यावेळेसचे सर्व कागदपत्र अर्जदार हयांनी दाखल केलेले आहेत व त्याबद्यल उभय पक्षात कसलाही वाद नाही म्हणजेच अर्जदार हीने गैरअर्जदार डॉक्टराकडुन फीस देऊन सेवा घेतली होती ही बाब स्पष्ट असल्यामुळे अर्जदार ही गैरअर्जदार हयांची ग्राहक आहे म्हणुन मुद्या नं. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र. 2 - अर्जदार हिचा विवाह दि.27/05/2003 रोजी झालेला आहे, त्यानंतर दि.02/03/2006 रोजी तीला एक मुलगा झाला त्यावेळी तीची सिझरिंग शस्त्रक्रीया झालेली होती. त्यानंतर दि.18/03/2008 रोजी गैरअर्जदार त्यांच्या औषधोपचारासह त्यांचेच दवाखान्यात दुसरा मुलगा सिझरींग शस्ञक्रिया होऊनच झाला. त्याच वेळी गैरअर्जदार डॉ.शोभा तोष्णीवाल यांचेच सल्ल्यानुसार त्यांच्याच हस्ते दि.18/03/2008 रोजी कुटूंबनियोजन शस्ञक्रिया झाली दोन्हीही मुलांचे जन्म हे सिझरींग शस्त्रक्रीयेद्वारा झाल्यामुळे अर्जदार हीस तीसरे मुल होणे जीवास घातक असल्यामुळे तिने कुटूंबनियोजनाची शस्ञक्रिया करुन घेतली होती व ती नीर्धास्त होणे स्वाभाविक आहे, कि यानंतर तिला तिसरे मूल होणार नाही अशी तिची मानसिक अवस्था असताना तिला मार्च 2010 पासून पोटदूखीचा ञास सुरु झाला. सर्वसाधारण उपचार करुन दिड ते दोन महिने अर्जदार हिने सहन केले पण अचानक दि.18.5.2010 रोजी अर्जदारास पोट दूखून वेदना होऊ लागल्या. अर्जदार ही गैरअर्जदार यांचेकडे औषधोपचारासाठी गेली असता तिथे एक फलक लावलेला होता व त्यावर दि.16.5.2010 ते दि.26.5.2010 पर्यत दवाखाना बंद आहे असे लिहीलेले असल्यामूळे अर्जदार हिचे पतीने तिला स्ञी रोग व प्रसुती तज्ञ डॉ. रचिता बिडवई हयांचे दवाखान्यात नेले. त्यानंतर डॉ. बिडवई हयांनी अर्जदाराच्या वेगवेगळया तपासण्या केल्या. अर्जदार हिची रक्ततपासणी, लघवी तपासणी, गर्भधारणेबददलची सोनोग्राफी व इतर काही चाचण्या करुन अर्जदार हिच्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार गर्भधारणा झाल्याची माहीती अर्जदार हिस दिली. अर्जदार हिचे कुटूंबनियोजनाची शस्ञक्रिया अयशस्वी झालेली आहे व गर्भधारणा ही गर्भपीशवीत झालेली नसून गर्भनलिकेत झालेली आहे व त्यासाठी तिसरे सिझरिंग शस्ञक्रिया करावी लागेल व गर्भ काढून टाकून पुन्हा कुटूंबनियोजनाची शस्ञक्रिया करावी लागेल असे सांगितले. अर्जदार हिने तक्रारी सोबत 1) दोन्ही मुलांचे जन्म दाखले, 2) कुटूंबनियोजनाची शस्ञक्रिया केल्याबददलचे प्रमाणपञ, 3) डॉ.रचिता बिडवई यांचे कुटूंबनियोजन शस्ञक्रिया अयशस्वी झाल्याचे प्रमाणपञ (failure of Tubaetomy) दि.23.5.2010. 4) दि.23.5.2010 रोजीचे डॉ. बिडवई यांचे रु.19100/- चे दवाखाना बिल, 5) योगेश पॅथालॉजीचे टेस्ट रिपोर्टस, 6) अर्जदार हिचेसाठी आणलेले रक्ताच्या (ब्लड बँकेच्या) पावत्या, 7) वटटमवार मेडीकलच्या औषध खरेदी पावत्या, 8) रेडीओलॉजीस्टचा रिपोर्ट, 9) डिसचार्ज कार्ड, दाखल केलेले आहेत. यामध्ये जर रेडीओलोजीस्ट यांचा रिपोर्ट पाहिला तर त्यामध्ये 13 mm 8-w.3d अशा प्रकारे लिखाण आहे जे की आठ आठवडे तीन दिवसांचा गर्भ अर्जदारास गर्भनलिकेत आहे असे दाखवते. दोन मुलाचे जन्माचेवेळी झालेले सिझरिंग व त्यानंतर केलेली कुटूंबनियोजन शस्ञक्रिया अयशस्वी झाल्याने पून्हा अचानक गर्भ राहणे हे अतीशय क्लेशदायक प्रवास एखादया स्ञीला करणे हे अतीशय कठीण आहे. आधीचेच दोन सिझर झालेली स्ञी ही प्रकृतीने नाजूक होते व कुटूंबनियोजन शस्ञक्रिया करवून घेतलेली आहे या वैचारिक अवस्थेनंतर अचानक पून्हा गर्भधारणा झाली तर त्यावेळी त्या स्ञीची मानसिक अवस्था खरोखर बिकट होते. अर्जदार हिची हीच अवस्था तिचा मानसिक ञास स्पष्ट करते. अर्थात अर्जदार यांनी अर्जात तिसरे सिझरिंग शस्ञक्रिया नसून Ectopic operation आहे. त्यामूळे अर्जदारास तिस-या सिझरिंग शस्ञक्रिये इतका ञास होत नाही. डॉ. बिडवई यांनी अर्जदाराची ब्लड तपासणी, हीमोग्लोबीन व इतर तपासण्या तसेच अर्जदार हिस द्यावे लागलेले रक्त हया सर्वाचा कागदोपञी पूरावा अर्जदारास झालेल्या ञासाची साक्ष आहे. आर्थिक, शारीरिक व मानसिक तिन्ही प्रकारचे ञास अर्जदारास भोगावे लागलेले आहेत हे यावरुन स्पष्ट होते व डॉ.रचिता बिडवई यांनी दिलेल्या प्रमाणपञावरुन गैरअर्जदार यांनी केलेली कुटूंबनियोजन शस्ञक्रिया ही अयशस्वी झालेली आहे हे मत एका स्ञि रोग तज्ञाचे असल्यामुळे हे मंच त्यावर विश्वास करुन अर्जदार हिस गैरअर्जदाराच्या दूर्रव्यवहारामुळे ञास सोसावे लागले हया मतापर्यत आलेले आहे. अर्जदाराच्या या अवस्थेमुळे तिच्या मुलांना व पतीला त्यांच्या पूर्ण कुटूंबाला ञास सहन करावा लागला असेल यात शंका नाही. गैरअर्जदार आपल्या लेखी म्हणण्यात सांगतात की, अर्जदार हिने कुटूंबनियोजन शस्ञक्रिया करतेवेळी सही केलेली होती पण जरी सही केलेली होती तो फॉर्म अर्जदार ऑपरेशन किंवा भूल देते वेळी वाचतो का ? आणि जरी वाचले तरी सही केल्याशिवाय पर्याय असतो का ? आणि जरी सही केली तरी डॉक्टर त्यांच्या कर्तव्यातून सुटू शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणातून केलेले कृत्य जर असेल तर डॉक्टरच्या कर्तव्यात कसूर झाली एवढेच म्हणता येईल. अर्जदार हिने दाखल केलेल्या औषधोपचाराच्या पावत्या व डॉ. बिडवई यांचे हॉस्पीटलचा खर्च पाहता अर्जदाराने अर्जात लिहीलेले रु.30,000/- खर्च डॉ. बिडवई याचे दवाखान्यात झाला असणार हे उघड आहे. म्हणून अर्जदारास झालेला वैद्यकीय खर्च रु.30,000/-, न्यायालयीन खर्च रु.10,000/- व अर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबददल रु.50,000/- हे अर्जदारास गैरअर्जदार यांनी एक महिन्यात दयावेत या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. आदेश 1. अर्जदार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास वैद्यकीय खर्चाप्रित्यर्थ रु.30,000/- एक महिन्यात दयावेत. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक ञासापोटी रु.50,000/- एक महिन्यात दयावेत. 4. न्यायालयीन खर्चप्रित्यर्थ रु.10,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक महिन्यात दयावेत. 5. आदेश क्रमाक 2,3,4 मध्ये आदेशीत केलेली रक्कम रु.30,000/- + रु.50,000/- + रु.10,000/- असे एकूण रु.90,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक महिन्यात न दिल्यास त्यावर 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम फिटेपर्यत दयावे लागेल. 6. संबंधीताना निर्णय कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघुलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |