जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक - १८९/२०११,
तक्रार दाखल दिनांक - १६-०९-२०११
तक्रार निकाली दिनांक - ३०-०७-२०१३
श्री.काशिनाथ पांडूरंग नागरे ----- तक्रारदार.
उ.व.६०,धंदा-निवृत्त
रा.सुभाष नगर,ग.नं.१२,
घर क्र.७२७,ता.जि.धुळे.
विरुध्द
शिवसागर मंगल कार्यालय ----- सामनेवाले.
म.प्रोप्रायटर सा,श्री.भुषन भरत मराठे
स्टेडियम समोर,गोंदुर रोड,वलवाडी.
ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्याः श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.के.आर.लोहार)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.ए.एस.सानप)
------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून मंगल कार्यालय रद्द केल्यामुळे उर्वरीत रक्कम मिळण्याकामी सदरची तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांच्या मुलीचे लग्न दि.११-०६-२०११ रोजी असल्याने त्यासाठी त्यांनी सामनेवाले यांचे मंगल कार्यालयात घेऊन त्यात रक्कम रु.८५,०००/- मध्ये करण्याचे ठरविले. यासाठी तक्रारदार यांनी डिपॉझीट कामी रु.१०,०००/- व रु.८५,०००/- असे एकूण रक्कम रु.९५,०००/- जमा केले. परंतु सदरचा कार्यक्रम रद्द झाल्याने तक्रारदार यांनी जमा केलेल्या डिपॉझीटची रक्कम रु.१०,०००/- सामनेवाले यांनी जमा करुन उर्वरीत रक्कम परत करण्याकामी मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी एकूण रकमेपैकी रु.५०,०००/- कपात करुन उरलेली रक्कम अदा केली आहे. सदरची खर्चाची कपात केलेली रक्कम ही जास्तीची आहे, त्यामुळे उर्वरीत रक्कम मिळावी याकामी तक्रारदार यांनी मागणी केली व तशी नोटिस पाठविली. परंतु त्या प्रमाणे सामनेवालेंनी पुर्तता केलेली नाही. ही सदोष सेवा सामनेवाले यांनी दिलेली असल्याने, तक्रारदार यांना सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे.
(३) तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी डिपॉझीटपोटी रक्कम वजा जाता उर्वरीत संपूर्ण रक्कम अदा करावी व मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.२५,०००/- व्याजासह द्यावेत.
(४) सामनेवाले यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी त्यांचा लेखी जबाब देऊन सदरचा अर्ज नाकारला आहे. त्यांनी असे नमूद केले आहे की, तक्रारदारांच्या मुलीचे लग्न असल्यामुळे, सदरचे पॅकेज रु.८५,०००/- मध्ये घेण्याचे ठरले. पंरतु सदर लग्न रद्द झाल्या कारणाने, तक्रारदारांच्या सांगण्याप्रमाणे करण्यात आलेले गुलाबजामून व शेव तयार ठेवलेले होते, त्यामुळे खाद्यप्रदार्थ व लागणारा संपूर्ण खर्च देण्यास तक्रारदार हे जबाबदार आहेत. तसेच भाजीपाला खर्च व त्यावर होणार नफा देण्याची जबाबदारी तक्रारदारांची आहे. त्यामुळे वरील सर्व खर्च रक्कम रु.५०,०००/- वजा जाता उर्वरीत रक्कम रु.३५,०००/- हे तक्रारदाराला अदा केलेले आहेत व कार्यालय रद्द केले कारणाने डिपॉझीटची रक्कम ही जमा करुन घेतलेली आहे. सर्व हिशेब करुन जेवढी योग्य रक्क्म निघते ती तक्रारदारांना अदा केलेली असल्याने सामनेवाले यांचेवर कोणतीही जबाबदारी नाही. केवळ तक्रारदार यांनी पैसे उकळण्याच्या गैर हेतूने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्याची मागणी केली आहे.
(५) तक्रारदारांचा अर्ज नि.नं.२, शपथपत्र नि.नं.३, कागदपत्र नि.नं.५ वर एकूण १ ते ३ तसेच सामनेवाले यांचा खुलासा, शपथपत्र व कागदपत्र पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत त्रृटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांच्या मुलीचे लग्न दि.११-०६-२०११ रोजी असल्याने, त्यासाठी त्यांनी सामनेवाले यांचे शिवसागर मंगल कार्यालय, धुळे हे नियोजीत केले. त्याची पावती नि.नं.५/१ वर दाखल केलेली आहे. सदर पावती पाहता यामध्ये तक्रारदार यांनी लग्न कार्यालसाठी येणा-या ८०० लोकांसाठी रक्कम रु.८५,०००/- व डिपॉझिट रु.१०,०००/- जमा करुन कार्यालय नियोजीत केले. या पॅकेजमध्ये एकूण १९ वस्तुंचा समावेश असून सकाळचा नाश्ता व जेवणाची सोय अंतर्भुत आहे. तसेच या पावतीवर नियम व अटी नमूद केलेल्या आहेत. परंतु यामध्ये कार्यक्रम रद्द झाल्याबाबतच्या कोणत्याही अटी नमूद नाही. सदर पावती पाहता तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. या बाबीचा विचार करता मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदारांच्या मुलीचे लग्न रद्द झाल्याकारणाने त्यांनी सामनेवाले यांच्याकडे डिपॉझीटची रक्कम रु.१०,०००/- वजा जाता उर्वरीत रकमेची मागणी केली आहे. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी खर्च वजा जाता रक्कम परत दिली आहे, त्याची पावती नि.नं.५/२ वर दाखल आहे.
(८) सदर पावती पाहता यामध्ये तक्रारदार यांनी मुलीचे लग्न रद्द झाल्याचे फोनवरुन कळविल्याचे दिसत आहे. तसेच कार्यालयाचे झालेले नुकसान यामध्ये एकूण खर्च नमूद केलेला आहे. यात मंगल कार्यालयाचे भाडे रु.१५,०००/-, गुलाबजाम रु.८,०००/-, शेव रु.४,०००/-, भाजीपाला रु.३,०००/- व २० टक्के नफा रु.२०,०००/- असे एकूण रु.५०,०००/- एवढा खर्च दाखविलेला आहे. त्यामुळे जमा रक्कम रु.९५,०००/- मधून रु.५०,०००/- वजा जाता रु.४५,०००/- हे तक्रारदारास दिल्याचे स्पष्ट होत आहे.
(९) वरील खर्चाच्या रकमेमध्ये सामनेवाले यांनी जो माल बनविला आहे त्यापोटी असलेली रक्कम ही वजा केलेली आहे. तसेच मंगल कार्यालय रद्द झाल्याने त्याचे भाडे हे वजा केलेले आहे. तसेच कार्यालय रद्द झाल्याकारणाने डिपॉझीटची रक्कम जमा केलेली आहे, ही बाब योग्य आहे. परंतु यामध्ये २० टक्के नफा रु.२०,०००/- हा वजा केलेला आहे. या बाबतचा कोणताही हिशोब किंवा खुलासा सामनेवाले यांनी दिलेला नाही. सामनेवालेंचा जो खर्च झाला आहे तो आणि डिपॉझीट असलेली रक्कम ही त्यांनी वजावट केलेली आहे. परंतु या व्यतिरिक्त २० टक्के नफा हा कोणत्या आधारे वजावट केला हे सामनेवालेंनी सिध्द केलेले नसल्याने, ती वजावट योग्य व रास्त वाटत नाही. त्यामुळे सदरची रु.२०,०००/- ही रक्कम वजावट करणे योग्य नाही. या बाबत सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत आहे. सदर रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारास परत करणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. या बाबीचा विचार करता मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(१०) सदरची रक्कम ही योग्य हिशोब करुन तक्रारदारास त्यांच्या मागणी प्रमाणे वेळेत परत करणे आवश्यक होती. परंतु सामनेवालेंनी ती केलेली दिसत नाही. त्यामुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे व सदरचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे. त्याकामी सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.५००,/- आणि अर्जाचा खर्च रु.५००/- देणे योग्य होईल असे या मंचाचे मत आहे.
(११) वरील सर्व बाबीचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारास रक्कम २०,०००/- (अक्षरी रु.वीस हजार मात्र) दि.११-०६-२०१० पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे. ६ % प्रमाणे व्याजासह द्यावेत.
(२) तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम ५००/- (अक्षरी रु.पाचशे मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम
धुळे.