( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष ) यातील तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, गैरअर्जदार हे विकसक असुन ते शेती खरेदी करुन त्यावर राहण्यायोग्य भुखंड पाडुन विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदाराने गैरअर्जदाराचे मौजा तरोडी (बु) ख.क्रं. 97/1+2, प.ह.न. 33, तह. कामठी, जिं.नागपूर येथील भुखंड क्रंमांक31 व 32 आराजी 2100 स्के.फुट प्रती रुपये 42 प्रमाणे रुपये 2,52,,000/-प्रती भुखंड असे दोन भुखंड रुपये 5,04,000/- खरेदी करण्याचा करारनामा दिनांक 13/2/2008 रोजी गैरअर्जदाराचे कार्यालयात केला. सदर भुखंडाची रक्कम रुपये 14,500/- प्रती माह भरण्याचे उभयपक्षांत ठरले होते. तक्रारदाराने कराराचेवेळी रुपये 1,50,000/- बँकेचे पे ऑर्डर द्वारे गैरअंर्जदार यांना दिला व उर्वरित रक्कम समान हप्त्यात देण्याचे ठरले. गैरअर्जदाराने तक्रारदारास त्यांचे संस्थचे पासबुक दिले व तक्रारदाराने वेळोवेळी दिलेल्या रक्कमांची नोंद त्यात करीत गेला. तक्रारदाराचे वडील दिनांक 6-4-2010 रोजी रुपये 80,000/- गैरअर्जदाराकडे देण्याकरिता गेले असता गैरअर्जदाराने ते घेण्यास नकार दिला. तक्रारदार विक्रीपत्र करुन घेण्यास सतत तयार होते मात्र गैरअर्जदाराने त्यांची भेट टाळली. दुरध्वनीवर संपर्क करीत नव्हते व दुरध्वनी केला असता दाद देत नव्हते व त्यामुळे गैरअर्जदाराची टाळाटाळ पाहुन तक्रारदाराने दिनांक 1.10.2010 रोजी वकीलामार्फत नोटीस दिली. त्याला गैरअर्जदाराने खोटे उत्तर देऊन विक्रीपत्र करुन देण्यास नकार दिला व दिनांक 28/9/2010 रोजी गैरअर्जदाराने तक्रारदारास फोनवर तक्रारदारास दिलेला भुखंड क्रं.31 रद्द करुन तुम्हास मागील भुखंड देतो असे कळविले. करारानाम्याचा भंग केला म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन तीद्वारे गैरअर्जदाराने उपरोक्त भुखंडाचे विक्रीपत्र करुन नोंदवुन द्यावे व झालेल्या मानसिक त्रासापोटी रुपये 1,000,00/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा अशी मागणी केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून दस्तऐवजयादी नुसार एकुण 25 कागदपत्रे दाखल केली. त्यात शपथपत्र, गैरअर्जदारास दिलेली नोटीस, नोटीसची पोचपावती, रक्कम दिल्याच्या पावत्या, इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले नाही व लेखी जवाब दाखल करुन आपला बचाव केला नाही म्हणुन प्रकरण त्यांचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक रोजी पारित करण्यात आला. -: का र ण मि मां सा :- प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती पाहता निर्वीवादपणे तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेशी त्यांचे मौजा तरोडी (बु) ख.क्रं. 97/1+2, प.ह.न. 33, तह. कामठी, जिं.नागपूर येथील भुखंड क्रंमांक 31 व 32 एकुण आराजी 4200 स्के.फुट रुपये 5,04,000/- एवढा मोबदला देऊन विकत घेण्याचा करारनामा दिनांक 13/2/2008 रोजी केला होता. सदर रक्कमेपैकी रक्कम रुपये 1,50,000/- तक्रारदाराने बयाणापोटी गैरअर्जदार यांना अदा केलेले होते व कराराप्रमाणे उर्वरित रक्कम दिनांक 13/2/2008 ते 13/2/2010 पर्यत अदा करावयाचे होते. तसेच नोंदणीची मुदत दिनांक 13/2/2010 अशी उभयपक्षात ठरलेली होती. सदर रक्कमेच्या व्यतिरिक्त तक्रारदाराने दिनांक 5/6/008, 16/12/2008, 30/4/2009, 25/8/2009 रोंजी अनुक्रमे रक्कम रुपये 25,000/-,15,000/-, 1,00,000/- 30,000/- असे एकुण 1,70,000/- रुपये गैरअर्जंदारास अदा केलेले होते. कराराप्रमाणे दिनांक 13/2/010 पर्यत तक्रारदारास उर्वरित रक्कम गैरअर्जंदारास अदा करावयाची होती. परंतु तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्र क्रं. 5 ते 9 या पावतींचे अवलोकन करता असे दिसुन येते की गैरअर्जदाराने तक्रारदाराकडुन करारामध्ये दिलेल्या देय तारखेनंतर रक्कम स्विकारलेली दिसुन येते. तसेच तक्रारदाराने शपथपत्रानुसार तसेच कागदपत्र व दाखल नोटीसवरुन असे दिसुन येते की गैरअर्जंदाराने दिनांक 24/12/2010 रोजी तक्रारदारास नोटीस पाठवुन सदर भुखंडाचे मोबदल्याची उर्वरित देय रक्कमेची मागणी केलेली दिसुन येते म्हणजे करारानुसार ठरलेली मुदतीनंतर देखील गैरअर्जदार यांची उर्वरित रक्कम स्विकारण्यास तयार होते. एवढेच नव्हे तर सदर भुखंड ही शेतजमीन होती व अकृषक परवानगी न घेता सदरचा भुखंड तक्रारदारास विकण्याचा करारा केला होता. ही गैरअर्जदार यांची कृती बेकायदेशिर आहे. कागदपत्र क्रं.18 वरुन तसेच कागदपत्र क्रं. 19 व 23 वरुन दाखल केलेले नोटीस वरुन तक्रारदाराने उर्वरित रक्कम देण्याची तयारी होती असे दिसुन येते. तक्रारदाराचा सदर मुद्दा खोडुन काढण्याकरिता गैरअर्जदाराने या मंचात उपस्थित राहुन कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार यांनी तक्रारदाराकडुन उर्वरित रक्कम घेऊन भुखंडाचे विक्रीपत्र करुन दयावे ही घ्यावे ही मागणी मान्य न करणे ही गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित आहोत. -//-//- आदेश -//-//- 1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर. 2. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास मौजा तरोडी (बु) ख.क्रं. 97/1+2, प.ह.न.33, तह. कामठी, जिं.नागपूर येथील भुखंड क्रंमांक31 व 32 एकुण आराजी 4200 स्के.फुट या भुखंडाचे विक्रीपत्र तक्रारदाराकडुन राहीलेली रक्क्म रुपये 1,84,000/- स्विकारुन आदेश प्राप्त झाल्यापासुन 2 महिन्याचे आत नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे. 3. नागपुर सुधार प्रन्यासने मागणी केल्यानंतर विकास खर्च देण्याची तसेच गैरअर्जदाराला आलेला जमिन अकृषक करण्याकरिता आलेला शासकीय खर्च देण्याची जबाबदारी तक्रारदाराची राहील. किंवा 4. तक्रारदार तयार असल्यास गैरअर्जदाराने तक्रारदारास करारनाम्याप्रमाणे ठरलेल्या भुखंड क्रं.31 व 32 चे आजच्या सरकारी बाजारभावाप्रमाणे येणा-या किंमतीतुन तक्रारदाराकडे राहीलेली मोबदल्याची रक्कम रुपये 1,84,000/-वगळुन येणारी रक्कम तक्रारदारास द्यावी. (आजच्या बाजारभावासाठी नोंदणी निबंधक, याचे कडील परिगणणा पत्रकाचा आधार घ्यावा.) 5. गैरअर्जदाराने तक्रारदारास दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार केवळ) द्यावे. 6. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन एक महिन्याचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |