जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/316 प्रकरण दाखल तारीख - 22/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 09/05/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मारोती पि. राघोजी एडके वय 55 वर्षे, धंदा शेती अर्जदार रा.कौठा ता.कंधार जि. नांदेड विरुध्द. 1 शिवानंद घोगरे कर्मचारी उज्वल एंटरप्रायजेस, हिंगोली नाका, नांदेड 2. व्यवस्थापक गैरअर्जदार गोदावरी अर्बन को-ऑप.बँक गांधी पुतळया जवळ, वजिराबाद, नांदेड. 3. राजेश झंपलवार, एजन्ट बजाज फायनान्स, उज्वल एंटरप्रायजेस, हिंगोली नाका, नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.जी.एस.भालेराव गैरअर्जदार क्र. 1 तर्फे - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - एकतर्फा. गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - अर्जदाराने स्टेप्स न घेतल्यामुळे त्यांचे विरुध्द तक्रार खारीज. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) 1. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार यांनी नोव्हंबर 2007 रोजी सी.टी.100 डिलक्स ही बजाज कंपनीची मोटार सायकल उज्वल एंटरप्रायजेस कडून खरेदी करण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे रु. 10,000/- भरणा केले. त्यांची पावती अर्जदार यांचेकडून हरवली ? गैरअर्जदार क्र.1 यांनी एजन्सी लोहा यांच्याकडे अर्जदार यांना सी.टी.100 डिलक्स मोटार सायकल देण्याबाबतचे पञ दिले. गैरअर्जदार यांना रक्कम दिली तेव्हा वाहनाची किंमत रु.38,000/- होती त्यापैकी बजाज फायनान्सचे म्हणजे गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडून फायनान्स घेतले त्यासाठी रु.1500/- चे 24 हप्त्यात कर्ज परतफेड करण्याचे ठरले. गैरअर्जदार क्र.3 यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे बचत खाते क्र.7616 दि.19.11.2007 रोजी उघडले व त्यात दरमहा रु.1500/- जमा करण्याचे ठरले. गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदाराकडून 24 कोरे चेक पैकी दरमहा रु.1500/-चा एक चेक गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठवून रक्कम वसूल करण्याचे ठरले. गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेल्या पञानहुसार अर्जदार यांना लोहा येथील एजन्सी मधून वरील वाहन देण्यात आले त्यांचा क्र.एमएच-26-यू-5035 असा आहे. अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदार क्र.3 यांना देण्यासाठी म्हणून गैरअर्जदार क्र.2 कडे रु.19,079/- भरणा केले व सुरुवातीस रु.10,000/- भरलेले होते. दि.20.09.2008 रोजी गैरअर्जदार क्र.3 कडे जमा केले म्हणजे रु.36,079/- कर्जफेडीपोटी जमा केले. अर्जदारांचा मूलगा वाहनावर जात असताना दि.27.08.2009 रोजी अडवून, आम्हाला गाडी जप्त करायची आहे म्हणून जबरदस्तीने गैरअर्जदार क्र.3 हे वाहन घेऊन गेले. तसेच अर्जदाराच्या मूलाकडचे रोख रक्कम रु.5,000/- सूध्दा घेऊन गेले. दि.14.09.2009 रोजी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे जाऊन थकीत रक्कम घ्या व मोटार सायकल परत करा अशी विनंती केली, परंतु मोटार सायकल परत केली नाही. म्हणून अर्जदाराने दि.26.11.2009 रोजी पोलिस निरिक्षक पोलिस ठाणे सोनखेड यांचेकडे तक्रार दाखल केली. परंतु पोलिसांनी अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतली नाही. अर्जदाराने रु.41,079/- चा भरणा करुनही गैरअर्जदार क्र.3 यांनी कसलाही हीशोब न दाखवता अर्जदाराचे वाहन जबरदस्तीने ओढून नेले, असे करुन गैरअर्जदार क्र.3 यांनी सेवेत ञूटी केली असून अर्जदाराची मागणी आहे की, रक्कम रु.41,079/- दिल्यामूळे नवीन वाहन सी.टी. 100 डिलक्स देण्याचे आदेश व्हावेत, किंवा वाहन देऊ शकत नसेल तर रु.41,079/- 18 टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश व्हावेत आणि मानसिक ञासाबददल व दाव्याच्या खर्चाबददल रु.10,000/-मिळावेत. 2. गैरअर्जदार क्र.1 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. अर्जदार यांनी बजाज अटो फायनान्स लि. पुणे यांच्याकडून वाहन खरेदी करिता कंपनीच्या अटी व नियमानुसार वाहन कर्जाचा करार केला होता. करार हा हायर परचेसनुसार बजाज फायनान्स लि. पूणे व अर्जदार यांचेमध्ये आहे. मी या कंपनीत डि.एम.ए. हंगामी कर्मचारी या पदावर काम करीत होतो माझेपेक्षा वरिष्ठ अधिकारी नांदेड येथे कार्यरत आहेत. अर्जदाराने केलेल्या तक्रारीचा व माझा काहीही संबंध नाही. तसेच वाहनाच्या कर्जाबददल वसूली करण्याचा व वाहन जप्ती करण्याचा यांचेशी माझा काहीही संबंध नाही.सदरचा वाद हा ग्राहक व कंपनी यांचा आहे माझे यांचेशी काहीही संबंध नाही म्हणून सदरची तक्रार माझे विरुध्द खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. 3. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीसची बजावणी होऊन ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 4. गैरअर्जदार क्र.3 विरुध्द अर्जदार यांनी कोणतीही स्टेप्स न घेतल्यामूळे त्यांचे विरुध्द तक्रार खारीज करण्यात येते. 5. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले कागदपञ पाहून जे मूददे उपस्थित होतात, ते मुददे व त्यावरील उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत हे सिध्द करतात काय ? नाही. 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 3. अर्जदार गैरअर्जदाराकडून पैसे परत मागण्यास हक्कदार आहे काय ? नाही. 4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 ते 3 ः 6. हे सर्व मूददे एकमेकांशी पूरक असल्याने ते एकञितपणे चचिल्या जात आहेत. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 बँकेचे विरुध्द कसलीही मागणी केलेली नाही किंवा त्यांचे सेवेत कोणतीही ञूटी आहे हे सूध्दा सिध्द केलेले नाही. गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत म्हणून त्यांचे विरुध्द “ एकतर्फा ” आदेश करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता, गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द अर्जदारांनी कोणतीही मागणी केलेली नाही किंवा त्यांची सेवा ञूटीची आहे असे कथनही केलेले नाही, त्यामूळे गैरअर्जदार क्र.2 यांनी या मंचापूढे येऊन म्हणणे दाखल करण्याची आवश्यकता नव्हती त्यामूळे ते हजर झालेले नसावेत. 7. कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 चे विरुध्द , संधी मिळूनही देखील काहीही स्टेप्स घेतली नाही. म्हणून दि.22.3.2011 रोजी नि.1 तक्रार अर्जावर आदेश करण्यात आला की, अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 यांचे विरुध्द काहीही स्टेप्स घेतली नाही त्यामूळे गैरअर्जदार क्र.3 चे विरुध्द ही तक्रार खारीज करण्यात येत आहे. असे असताना देखील अर्जदाराने तो दि.22.3.2011 रोजीचा आदेश रदद करण्यासाठी या मंचापूढे अर्जही दिला नाही किंवा त्यांचे विरुध्द काही स्टेप्स घेणार आहे असे कथन करणारा अर्जही दिलेला नाही. त्यामूळे ही तक्रार गैरअर्जदार क्र.3 चे विरुध्द खारीज झालेली आहे. अर्जदाराची मूख्य मागणी गैरअर्जदार क्र.3 विरुध्दच होती व अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 चे विरुध्द कोणतीही स्टेप्स न घेतल्यामूळे ही तक्रार त्याचे विरुध्द दि.22.3.2011 रोजीच खारीज झालेंली आहे. त्यामूळे आता अर्जदाराला गैरअर्जदाराकडून काहीही मागण्याचा अधिकार नाही असे आमचे मत झाले आहे. 8. गैरअर्जदार क्र.1 यांनी स्वतः हजर होऊन आपले म्हणणे दिलेले आहे. त्याचे म्हणण्याप्रमाणे सदरी करार अर्जदार यांनी बजाज अटो फायनान्स लि. पूणे यांचे सोबत हायर परचेस नुसार केला होता. गैरअर्जदार क्र.1 हा बजाज अटो फायनान्स नांदेड या कंपनीत हंगामी कर्मचारी म्हणून काही काळ कार्यरत होते. त्यावेळी त्याचे पेक्षा इतर अनेक वरिष्ठ अधिकारी तेथे कार्यरत होते. गैरअर्जदार क्र.1 चे काम फक्त वरिष्ठाचे सागणेवरुन करारानाम्यावर सही घेणे व कंपनीतर्फे स्कीमची माहीती देणे एवढेच होते. गैरअर्जदार क्र.1 चे असे म्हणणे आहे की, त्यांची सदरी हप्ता परतफेडीशी किंवा चेक बाऊन्स होण्याशी कोणताही संबंध नाही.तो फक्त कर्मचारी असल्यामूळे विनाकारण त्याचेवर ही तक्रार दाखल केलेली आहे म्हणून त्यांचे विरुध्द तक्रार खारीज करावी असे त्यांचे म्हणणे आहे. 9. अर्जदाराच्या अर्जामध्येच असे म्हटले आहे की,त्यांनी सूरुवातीला गैरअर्जदार क्र.1 कडे रु.10,000/- भरले होते परंतु त्याबददलची पावती त्यांचेकडून हरवली आहे ? सदरी रक्कम दिल्याचा पूरावा ते गैरअर्जदाराकडून अर्ज देऊन मागू शकले असते परंतु त्यांनी तसा अर्ज दिलेला नाही. म्हणून रु.10,000/- हे त्यांनी गैरअर्जदार क्र.1 ला दिले हे अर्जदार सिध्द करु शकले नाहीत. तक्रार अर्जाच्या परिच्छेद क्र.1 मध्ये अर्जदाराने असेही म्हटले आहे की, सदरी रु.10,000/- भरल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 यांनी श्री. राम पाटील कारेगांवकर एजन्सी लोहा ता.लोहा जि. नांदेड यांचेकडे अर्जदार यांना सी.टी.100 डिलक्स मोटार सायकल देण्या बाबतचे पञ दिले होते व त्याप्रमाणे अर्जदाराने ती मोटार सायकल त्यांचेकडून घेतली होती ? येथे महत्वाचा मूददा उपस्थित होतो तो म्हणजे अर्जदाराने सदरी श्री.राम पाटील कारेगांवकर एजन्सी यांना या तक्रारीमध्ये पक्षकार म्हणून का शरीक केले नाही ? सदरी एजन्सीचा या व्यवहाराशी काय संबंध आहे ? हे देखील अर्जदार स्पष्ट करु शकले नाहीत. अर्जदाराच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या चेक पैकी काही चेकस बाऊन्स झालेले आहेत. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्यानंतर त्यांनी गैरअर्जदार क्र.2 बँकेमध्ये रु.19,079/- जमा केले होते. तक्रार अर्जाच्या परिच्छेद क्र.4 मध्ये तसे कथन केले आहे व तेथेच असे म्हटले आहे रक्कम रु.19,079/- व पूर्वी भरलेले रु.10,000/- असे एकूण मिळून रु.36,079/- अर्जदारानी गैरअर्जदाराकडे जमा केलेले आहेत ? या सूध्दा आकडयाचा ताळमेळ लागत नाही. तक्रार अर्जाच्या परिच्छेद क्र.5 मध्ये अर्जदाराने असे म्हटले आहे की, अर्जदाराने रु.36,079/- दिलेले असतानाही दि.27.8.2009 रोजी जेव्हा अर्जदाराचा मूलगा रमाकांत हा मोटार सायकल घेऊन जात असताना त्यांची मोटार सायकल गैरअर्जदार क्र.3 यांनी अडवली व गैरअर्जदार क्र.3 व त्याचे सहका-यांनी सदरी मोटार सायकल मूलगा रमाकांत यांचेकडून जबरदस्ती घेऊन गेले. अर्जदाराची अशीही तक्रार आहे की, सदरी गैरअर्जदार क्र.3 व त्यांचे सहका-यांनी मूलगा रमाकांत यांचेकडून रु.5,000/- त्यांला धक्काबूक्की करुन घेऊन गेले ? तक्रार अर्जाच्या परिच्छेद क्र. 6 मध्ये अर्जदार कथन करतात की, त्यानंतर अर्जदार व त्यांचा मूलगा रमाकांत हे मिळून दि.14.9.2009 रोजी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे गेले व थकीत झालेली रक्कम घ्या व मोटार सायकल परत द्या अशी विनंती केली परंतु गैरअर्जदार क्र.3 यांनी त्यांना थांगपत्ता लागू दिला नाही ? अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्यामूळे अर्जदाराने दि.26.11.2009 रोजी पोलिस स्टेशन सोनखेड येथे फिर्याद दिली. 10. सदरी फिर्यादची झेरॉक्स प्रत अर्जदाराने दाखल केली आहे. त्यावर अर्जदाराने स्वतःचे वय 60 वर्षे असे लिहीलेले आहे परंतु प्रस्तूतच्या तक्रारीमध्ये त्यांनी स्वतःचे वय 55 वर्षे असे लिहीलेले आहे ? सदरी पोलिस तक्रारीमध्ये अर्जदाराने म्हटले आहे की, सूरुवातीला डाऊन पेमेट म्हणून रु.9,000/- गैरअर्जदाराला दिले व त्यानंतर फक्त रु.30,000/- चे कर्ज घेतले होते ? यांही आकडयामध्ये तफावत आहे कारण अर्जदाराचे म्हणणे आहे की, त्यांनी डाऊन पेमेट मध्ये रु.10,000/- दिले होते व त्यांची पावती हरवली आहे ? पोलिस तक्रारीमध्ये त्यांनी कबूल केले आहे की, त्यांनी दिलेले एकूण पाच चेक वटले नाहीत, परंतु त्यानंतर अर्जदाराने रु.6,000/- दंड म्हणून भरले आहेत, तेथेच अर्जदार असेही म्हणतात की, त्यांनी दि.26.9.2008 रोजी रु.7,000/- पावती नंबर 4171033716 प्रमाणे भरले आहेत. पूढे असेही म्हटले आहे की, त्यांनी गैरअर्जदार क्र.3 कडे एका हप्त्याचे रु.1500/- व रु.100/- दंड म्हणून एकूण रु.1600/- भरलेले आहेत ? अर्जदाराच्या तक्रारी अर्जामध्ये व पोलिसाकडे दिलेली तक्रार यामध्ये अतीशय तफावत आहे. अशी तफावत का आली या बददल अर्जदार स्पष्टीकरण देत नाहीत. 11. कागदपञावरुन असे दिसते की, पोलिसापूढे तक्रारीमध्ये अर्जदाराने स्वतःहून असे म्हटले आहे की, त्याचा मूलगा रमाकांत यांनी स्वतःहून रु.5,000/- गैरअर्जदार क्र.3 यांना दिले ? प्रस्तूत तक्रार अर्जामध्ये त्यांनी वेगळेच कथन केले आहे त्यावरुन असे दिसते की, गैरअर्जदार क्र.3 यांचे सहका-यांनी सदरी मूलगा रमाकांत यांस धक्काबूक्की करुन रु.5,000/- व मोटार सायकल घेऊन गेले ? जर सदरी घटना दि.27.8.2009 रोजी झाली असती तर तक्रारदार व त्यांचा मूलगा ताबडतोब पोलिस स्टेशनमध्ये का गेले नाहीत ? व तक्रार का नोंदविली नाही ? याबददल काहीही खूलासा करीत नाहीत. याउलट त्यांचे म्हणणे असे आहे की, ते स्वतः व त्यांचा मूलगा प्रथमतः दि.14.9.2009 रोजी गैरअर्जदार क्र.3 कडे गेले व त्यांची थकबाकीची रक्क्म घ्या व वाहन परत दया अशी विनंती केली ? त्यावेळी अर्जदाराने व त्यांचे मूलाने असे सांगितले की, त्याचे थकबाकी पैकी रु.5,000/- कंपनीमध्ये जमा केलेले होते ? एकंदरीत सदरी पोलिस तक्रार वाचून पाहता असे दिसते की, अर्जदार हा स्वच्छ हाताने या मंचापूढे आलेला नाही. सदरी पोलिस तक्रारीमध्ये अर्जदाराने असेही कथन केले आहे की, गैरअर्जदाराच्या कंपनीतील एक अधिकारी श्री.विजय तळपदे यांनी स्वतःहून तक्रारदाराला सांगितले की, त्यांनी ती मोटार सायकल विकली आहे व तक्रारदाराने स्वतःहून त्यांचे औरंगाबाद येथील मूख्य कार्यालयात जाऊन चौकशी करावी ? वरील सर्व तफावतीवरुन असे दिसते की, अर्जदार हा स्वच्छ हाताने या मंचापूढे आलेला नाही. त्यांची स्वतःची चूक असताना त्यांनी गैरअर्जदारावर ही खोटी तक्रार केल्याचे सकृतदर्शनी वाटते. 12. वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदाराने मूख्य गैरअर्जदार क्र.3 यांचे विरुध्द कोणतीही स्टेप्स का घेतली नाही ? याबददल खूलासा केलेला नाही. ही तक्रार गैरअर्जदार क्र.3 चे विरुध्द दि.22.3.2011 रोजी खारीज झालेली असल्यामूळे आता अर्जदार या मंचापूढे गैरअर्जदाराकडून कोणतीही मागणी मागण्यास हक्कदार नाहीत असे वाटते. 13. तक्रारीतील कथनाप्रमाणे जर अर्जदार स्वतःहून राहीलेली कथीत थकबाकी गैरअर्जदार यांना देण्यास तयार असेल तर ते परस्पर गैरअर्जदाराकडे जाऊन सदरी थकबाकी परत करुन आपली मोटार सायकल वापस घेऊ शकतील. मोटार सायकलचे कागदपञ किंवा त्यांच्या नकला देखील या मंचापूढे अर्जदाराने दाखल केलेल्या नाहीत. एकंदरीत ही तक्रार व त्याचे कथन व पोलिस तक्रारीतील कथनाशी विसंगत असल्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदाराकडून सदरी मागणी मागण्यास हक्कदार नाहीत असे वाटते. वर उल्लेख केल्याप्रमाणे मूळ तक्रार गैरअर्जदार क्र.3 विरुध्द दि.22.3.2011 रोजी खारीज झालेली आहे. वरील सर्व चर्चेवरुन मूददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते. 14. वरील कथनावरुन अर्जदार हे तक्रारीतील कथन सिध्द करु शकलेले नसल्यामूळे व सदरी तक्रार मूख्य गैरअर्जदार क्र.3 विरुध्द खारीज झालेली असल्यामूळे आता तक्रारदार गैरअर्जदाराकडून कोणतीही मागणी करण्यास हक्कदार नाहीत असे आमचे मत झाले आहे म्हणून सदरी तक्रार खारीज होण्यास योग्य आहे. म्हणून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT | |