Maharashtra

Nagpur

CC/507/2015

Shri. Aniruddha Nasre - Complainant(s)

Versus

Shivam Transport - Opp.Party(s)

Sandip V. Dangore

06 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/507/2015
( Date of Filing : 15 Sep 2015 )
 
1. Shri. Aniruddha Nasre
R/o Plot no. 156, Ruikar Road, Near Hanuman Mandir, Mahal, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shivam Transport
Khadgaon Turning Point, Amravati Road, Wadi, Nagpur-23
Nagpur
Maharashtra
2. Mukunda Namdev Bhumbare
R/o Hirpur Tah.Murtijapur
Akola
Maharashtra
3. Shriram General Insurance Company Ltd.
313 3rd floor, east wing, Arora Tower Society, Dr.Ambedkar Road, Camp, Pune-411001
PUNE
Maharashtra
4. Shriram General Insurance Company Ltd.
Head off- E-8, EPIP, RIICO, INDUSTRIAL Area, Sitapura, Jaipur, Rajasthan-302022
JAIPUR
RAJASTHAN
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Sandip V. Dangore, Advocate
For the Opp. Party: Adv. Charuchandra B. Pande, Advocate
Dated : 06 Mar 2020
Final Order / Judgement

                          आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  त्‍याची हिरो होंडा पॅशन वाहन क्रं. एम.एच.31 सी.एक्‍स. 0824  विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडून नागपूर वरुन पुणे येथे पाठवावयची होती. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने त्‍याची हिरो होंडा विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍या मालकीचे आयसर टाटा 909,  वाहन क्रं. एम.एच.14, बी.जे. 2209 या ट्रकने पाठविण्‍याकरिता विरुध्‍द 1 यांच्‍याकडे आवश्‍यक खर्च रुपये 1,000/- पावती क्रं. 18617 दि. 12.02.2015 प्रमाणे जमा करुन त्‍याचे दुचाकी वाहन पाठविले. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 याचे मालकीचे वाहन क्रं.एम.एच.14 बी.जे.2209 या वाहनाचा विरुध्‍द पक्ष 3 व 4 कडून विमा पॉलिसी क्रं. 10003/31/15/287515 अन्‍वये विमा काढलेला होता.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्त्‍याचे वाहन इतर सामाना सोबत विरुध्‍द पक्ष 2 यांचे वाहन क्रं.  एम.एच.14 बी.जे.2209 या वाहनात लोड करुन दि. 13.02.2015 ला पुणे येथे जाण्‍याकरिता निघाले असता सदर वाहनाचा दि. 14.02.2015 रोजी जऊळका गांवाजवळ काटेपूर्णा नदिच्‍या पुलावर अपघात झाला व अपघाता दरम्‍यान ट्रक मधील 2 व्‍यक्‍ती मरण पावले. तसेच उर्वरित सामान तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनासह नदीत बुडाले. सदर अपघाताबद्दल दि. 15.02.2015 ला जऊळका पोलिस स्‍टेशन, जि. वाशिम येथे भा.द.वि.कलम 279, 337,  304 अंतर्गत अपघातातील आयसर टाटा 909 ट्रकच्‍या चालका‍ विरुध्‍द गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. अपघाताची माहिती मिळताच तक्रारकर्ता हा जऊळका पोलिस स्‍टेशन, जि. वाशिम येथे पोहचला असता त्‍याला त्‍याची मोटर सायकल जऊळका पोलिस स्‍टेशनला आढळून आली. सदरची मोटरसायकल अपघात झाल्‍यानंतर 15 दिवस नदी पात्रात पडून राहिल्‍याने मोटरसायकल जंगून चिखल मातीने खराब झाली होती. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन स्‍वतः खर्च करुन जऊळका येथून नागपूरला स्‍वखर्चाने आणले व विरुध्‍द पक्ष क्रं. 1 च्‍या सल्‍ल्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने अपघातग्रस्‍त मोटर सायकल दुरुस्‍तीकरिता पाठविण्‍यापूर्वी तिची तपासणी केली. त्‍याकरिता रुपये 371/- तपासणी शुल्‍क आदित्‍य अॅटो एजन्‍सीकडे जमा केले. त्‍यानंतर आदित्‍य अॅटो एजन्‍सी यांनी दि. 01.04.2015 रोजी सदर अपघातग्रस्‍त मोटर सायकल दुरुस्‍तीकरिता अंदाजे रक्‍क्‍म रुपये 37,259/- खर्च अपेक्षित असल्‍याचे तक्रारकर्त्‍याला सांगितले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या वाहनाची नुकसानभरपाई विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांना देण्‍याची मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या मागणीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक 11.05.2015 रोजी विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांना कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु विरुध्‍द पक्षाने सदरची नोटीस घेण्‍यास नकार दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
  3.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मागणी केली की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या मोटर सायकल दुरुस्‍तीचा खर्च रुपये 37,259/-, मोटर सायकल वाहतूक व  अधिकृत तपासणी खर्च रुपये 4,471/-, हे सर्व 24 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा.  तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली.
  4.      विरुध्‍द पक्ष 1 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त झाल्‍याप्रमाणे ते मंचासमक्ष हजर होऊन ही त्‍यांनी लेखी जबाब दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण विना लेखी जबाब पुढे चालविण्‍याचा आदेश दिनांक 21.07.2017 रोजी पारित करण्‍यात आला.
  5.      विरुध्‍द पक्ष 2 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 16.05.2017 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 3 व 4 यांनी आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 3 व 4 यांच्‍याकडून कुठलीही सेवा घेतली नव्‍हती व त्‍यांच्‍याकडून कुठलाही विमा काढण्‍यात आलेला नव्‍हता. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष 3 व 4 चा ग्राहक होत नाही. तक्रारकर्त्‍याने त्‍याची मोटर सायकल विरुध्‍द पक्ष क्रं. 2 चे वाहन क्रं एम.एच.14 बी.जे.2209 या वाहनाने  पुणे येथे पाठवितांना वाहन संरक्षणाकरिता कोणताही विमा उतरविला नव्‍हता त्‍यामुळे  तक्रारकर्ता वि.प. 3 व 4 विरुध्‍द प्रकरण दाखल करु शकत नाही. म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे. 

 

  1.        उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला कायॽ           होय

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं.3 व 4 ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण

सेवा दिली काय ?                                  नाही

 

  1. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

  निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत -  तक्रारकर्त्‍याने त्‍याची मोटर सायकल क्रं. एम.एच.31 सी. एक्‍स 0824 ही विरुध्‍द पक्ष 2 यांच्‍या मालकीचे वाहन क्रं. एम.एच.14 बी.जे.2209 या वाहनाने नागपूर येथून पुणे येथे पाठविण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांच्‍याकडे आवश्‍यक खर्च रुपये 1,000/- जमा केले होते हे नि.क्रं. 2 वर दाखल पावती वरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 चा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांच्‍या मार्फत विरुध्‍द पक्ष 2 च्‍या वाहनातून वाहून नेण्‍याकरिता विरुध्‍द पक्ष 1 कडे रुपये 1,000/-  दि. 12.02.2015 अन्‍वये जमा केल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व तक्रारकर्ता यांच्‍यात करार झाला. सदरच्‍या करारानुसार विरुध्‍द पक्ष 1 ने तक्रारकर्त्‍याचे वाहन पुणे येथे सुरक्षित पोहचविण्‍याची जबाबदारी होती. विरुध्‍द पक्ष 1 यांनी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍या वाहना मार्फत पुणे येथे मोटर सायकल पोहचवित असतांना विरुध्‍द पक्ष 2 च्‍या वाहन दि. 13.02.2015 ला जऊळका गावाजवळील काटेपूर्णा नदिच्‍या पुलावरुन खाली नदीत कोसळल्‍याने तक्रारकर्त्‍याचे वाहन अपघातग्रस्‍त झाले. तसेच तक्रारकर्त्‍याला त्‍याचे क्षतिग्रस्‍त वाहन जऊळका पोलिस स्‍टेशन, जि. वाशिम येथून नागपूर येथे वाहून आणण्‍याकरिता रुपये 4100/- एवढा  खर्च व क्षतिग्रस्‍त वाहन दुरुस्‍तीकरिता रुपये 37,259/- एवढा खर्च सहन करावा लागला हे दाखल दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्‍याचे वाहन पुणे येथे सुरक्षित न पोहचविल्‍यामुळे व  तक्रारकर्त्‍याच्‍या क्षतिग्रस्‍त वाहनाची नुकसान भरपाई न देऊन सेवेत त्रुटी केली असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांच्‍याकडून क्षतिग्रस्‍त वाहनाची नुकसानभरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 
  2.     तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 3 व 4 कडून कोणताही विमा काढलेला नसून कुठलीही सेवा घेतली नसल्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 3 व 4 विरुध्‍दची तक्रार खारीज करणे योग्‍य आणि वाजवी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

                सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला

त्‍याचे क्षतिग्रस्‍त मोटर सायकलच्‍या दुरुस्‍तीकरिता आलेला खर्च रुपये 37,259/- व मोटर सायकल वाहून आणण्‍याकरिता व तपासणी करिता आलेला खर्च रुपये 4,471/- असे एकूण रक्‍कम रुपये 41,730/- अदा करावी व सदरहू रक्‍कमेवर तक्रार दाखल तारीख म्‍हणजेच दिनांक 04.09.2015 पासून ते रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.  

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 25,000/- व  तक्रारीचा खर्च म्‍हणून  रुपये 10,000/- द्यावा.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं.  3 व 4 यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.