आदेश (दि.08.10.2010) (द्वारा श्री.एम.जी.रहाटगांवकर, मा.अध्यक्ष) सदर प्रकरण आज रोजी मंचासमक्ष दाखल करुन घेण्यासाठी व विरुध्द पक्षाला जवाबासाठी नोटीस जारी करण्याबाबत सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते. मंचाने तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले तसेच तक्रारीचे अवलोकन केले. त्याआधारे खालीलप्रमाणे मुद्ये उपस्थित होतात. 01. सदर तक्रारीचे निराकरण करणे मंचाच्या न्यायीक कार्यकक्षेत येते काय? नाही.
...2... तक्रार क्र.356/10 स्पष्टीकरण मुद्या क्र.1 - तक्रारकर्त्याच्या कथनानुसार त्याने विरुध्द पक्षाकडून दि.09.07.2009 रोजी नोंदणीकृत करारनाम्याने दुकान विकत घेतले. हे दुकान अंबरनाथ नगरपालीका पाडणार आहे याची कल्पना विरुध्द पक्षाला आधीच होती. दुकान पाडण्याची संपूर्ण पूर्वकल्पना असूनही वि.प.ने सदर दुकान त्याला विकले. त्यानंतर दि.19.05.2010 रोजी नगरपालीकेने हे वादग्रस्त दुकान पाडले. त्यामुळे वि.प.ला दिलेली दुकानाची खरेदीची रक्कम तसेच नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने त्याने तक्रार दाखल केली आहे. मंचाच्या निदर्शनास येते की, विरुध्द पक्ष हा इमारत बांधकाम व्यावसायीक नाही. इमारतीचे बांधकाम करुन, भुखंड विकसीत करुन वेगवेगळया लोकांना सदनिका अथवा दुकानाचे गाळे विकणे असा व्यवसाय विरुध्द पक्षाचा नाही. सुनावणीच्या वेळेस तक्रारदाराने स्वतः ही बाब नमुद केली. त्यामुळे तक्रारदार व विरुध्द पक्ष यांचे नाते ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदीनुसार सेवा देणारा व ग्राहक असे नाही. दुकानाच्या खरेदीचा व्यवहार हा वैयक्तिक स्वरुपाचा व्यवहार आहे. तक्रारदार हा विरुध्द पक्षाचा ग्राहक कायद्याच्या कलम 2(1)ड अन्वये ‘‘ग्राहक’’ नाही. सबब उभय पक्षातील वादाचे स्वरुप ‘‘ग्राहक वाद’’ नाही. त्यामुळे या तक्रारीचे निराकरण करणे मंचाच्या मते ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार ग्राहक मंचाच्या न्यायीक कार्यकक्षेत येत नाही ही बाब स्पष्ट करण्यात येते. आवश्यकता वाटल्यास तक्रारदार योग्य त्या दिवाणी न्यायालयासमक्ष आपला दावा दाखल करण्यास स्वतंत्र आहे. सबब अंतीम आदेश पारीत करण्यात येतो. आदेश
01. तक्रार क्र.356/2010 खारीज करण्यात येते. 02. खर्चाचे वहन तक्रारदाराने स्वतः करावे. 03. तक्रारीचे अतिरिक्त संच तक्रारदारास परत करण्यात यावेत. दिनांक - 08.10.2010 ठिकाण - ठाणे (ज्यो ती अय्यर) (एम.जी.रहाटगांवकर) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे. |