जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/01. प्रकरण दाखल तारीख - 01/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 08/04/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, - सदस्या. महेश राजाराम मुधोळकर वय 28 वर्षे, धंदा वकीली, अर्जदार रा.नांदेड हाऊसिंग सोसायटी, विजय नगर, नांदेड. विरुध्द. 1. शिवाजी हिरामणराव बोकारे गैरअर्जदार रा.व्यकंटेश्वरा नगर, नांदेड. 2. सुजित शिवाजीराव दळवी रा.माणिक नगर, नांदेड 3. व्यवस्थापक, दि. भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि. नांदेड. मुख्य शाखा महावीर चौक, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.अ.व्ही.चौधरी गैरअर्जदार 1 व 2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - अड.सौ.एस.बी.मनूरकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी म.न.पा. क्र.3-1-289/19 या खोली बाबत सौदाचिठठी करुन त्यांचे हक्कात खरेदी खत करुन दिले नाही म्हणून ही तक्रार नोंदविण्यात आलेली असून ती खालील प्रमाणे आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून दि.24.10.2007 रोजी त्यांचे मालकी व ताब्यातील घामोडीया या फॅक्ट्री मधील प्लॉट नंबर 11 वरील व सिटी सर्व्हे नंबर 3901 वर सत्यभामा कॉम्प्लेक्स मधील दूस-या मजल्यावरील पाय-यासमोर एक खोली आहे ज्यांचा मनपा क्र.3-1-289/19 वीषयी ती विक्री करण्यासाठी अर्जदार यांचेशी सौदाचिठठी केली, त्यांची किंमत रु.1,75,000/- ठरलेली असून बयाणापोटी रु.75,000/- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दिलेले आहेत. उर्वरित रक्कम रु.1,00,000/- गैरअर्जदार क्र.3 यांचेशी पूर्णा रोड शाखेमध्ये असलेले खाते क्र.34 मध्ये जयेश ग्लॉस हाऊस यांचे खात्यात कर्जापोटी भरणा करतील असे ठरले होते. सदरील खरेदी विक्रीचा करार रजिस्ट्रर क्र.5881 दि.17.11.2005 रोजी यावरुन ठरलेला आहे. सदरील मालमत्ता ही गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे रु.2,00,000/- कर्जापोटी तारण ठेवलेली आहे. अर्जदार यांचा सदरील मालमत्ते वर ताबा असून गैरअर्जदार त्यांना बेबाकी प्रमाणपञ मिळून अधिकृत विक्री खत करुन देतील या आशेवर ते आहेत. अर्जदार हे मालमत्तेची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांना ती मालमत्ता गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे तारण आहे अशा आशयाचा मजकूर लिहीलेला दिसून आला. तेथे सिल लावलेले दिसले. गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र. 3 यांना यावीषयी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अर्जदार यांची मागणी आहे की, सदरील मालमत्ता विक्री करण्यापासून गैरअर्जदार क्र.3 यांना पाबंद करावा व लिलाव करु देऊ नये. तसेच सदरील मालमत्ता अर्जदार यांचे हक्कात गैरअर्जदार यांनी विक्री खत करुन देण्याचे आदेश करावेत. गैरअर्जदार यांनी केलेल्या चूकीच्या सेवेबददल व मानसिक ञासाबददल रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मागितलेले आहेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस पाठविण्यात आली, त्यांना नोटीस तामील होऊ शकलेली नाही म्हणून वर्तमानपञात जाहीर प्रगटन देण्यात आले. यानंतर ही ते हजर झाले नाही म्हणून प्रकरण एकतर्फा आदेश करुन पूढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे त्यांचे बँकेचा व्यवसाय आहे. गैरअर्जदार क्र.2 हा बँकेचा कर्जदार सभासद असून त्यांचे दि.21.6.2006 च्या मागणीनुसार रु.2,00,000/- चे कर्ज दोन वर्षासाठी मंजूर केलेले होते. या गैरअर्जदार क्र.1 व अन्य लष्करे शंकरसींग रामसिंग हे जमानतदार आहेत. या तक्रार अर्जात नमूद मालमत्ता कर्जापोटी गहाण करुन दिलेली आहे. दि.31.3.2009 अखेर गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून बँकेचे रु.2,4,6,187/- येणे बाकी आहेत. यांची मूदत संपूनही ते कर्जाची परतफेड करीत नसल्याकारणाने बँकेने दि.18.09.2009 रोजी मनूद मालमत्ता जप्त केलेली आहे. अर्जदार यांनी मा. दिवाणी न्यायालय यांचेकडे स्पेशल सिव्हील सूट नंबर 41/2009 दाखल केलेला असून दावा प्रलंबित आहे. अर्जदार व गेरअर्जदार क्र.1 व 2 यांचेतील व्यवहार बँकेचे परस्पर झाला असून या बददलची कोणतीही माहीती त्यांना नाही. कर्जाची पूर्ण परतफेड जोपर्यत होत नाही तोपर्यत ती मालमत्ता त्यांचेकडे गहाण आहे. अर्जदाराचा सदरील मालमत्तेवर ताबा आहे हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. मालमत्ता ही तारण असल्याबददलची पाटी कर्ज वितरणाचे वेळी जागेवर लावण्यात आलेली आहे. बँकेचे परस्पर बँकेकडून पासबूक प्रमाणपञ न घेता गहाण मालमत्ता विक्रीचा करार अर्जदार व गेरअर्जदार क्र.2 यांनी जो केला आहे तो बेकायदेशीर आहे. दाव्यातील मालमत्ता कर्ज वसूल न झाल्याकारणाने ती जप्त करुन विक्री करण्याचा व त्यातून त्यांची रक्कम वसूल करण्याचा बँकेला अधिकार आहे. म्हणून दि.01.10.2010 रोजीचा आदेश रदद करण्याजोगा आहे. म्हणून तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.3 यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे, दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे सेवेतील अनूचित प्रकार अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दि.25.10.2007 रोजी सौदाचिठठी द्वारे म.न.प. क्र.3-1-289/19 ही मालमत्ता रु.1,75,000/- मध्ये खरेदी करण्यासाठी करार केलेला होता. ही सौदाचिठठी बारकाईने पाहिली असता यात अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे झालेल्या कराराप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रु.75,000/- सौदाचिठठी वर बयाणा म्हणून दिलेले आहेत व उर्वरित रक्कम रु.1,00,000/- जयेश ग्लास हाऊस यांचे सी.सी. वर कर्जापोटी रु.1,00,000/- हे अर्जदार भरतील व उर्वरित रु.1,00,000/- हे गैरअर्जदार क्र.1 व 2 भरतील. वादातील मालमत्ता ही कर्जापोटी तारण ठेवलेली आहे व त्यांचे नो डयूज प्रमाणपञ घेऊन गैरअर्जदार क्र.1 व 2 हे मूदतीत विक्री खत करुन देतील असा करार आहे. याशिवाय तक्रार अर्जात अर्जदारांनी परिच्छेद क्र.3 मध्ये त्यांचे मजूकराचा उल्लेख केलेला आहे. यावरुन हे अतीशय स्पष्ट होते की, तक्रार अर्जातील नमूद मालमत्तेचा विक्रीचा करार करताना ही मालमत्ता गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे गहाण आहे व त्यापोटी त्यांना रक्कम भरणे आहे हे माहीत होते व हे माहीत असून ही त्यांनी सदरील करार केलेला आहे व आता या कराराचे पालन जर होत नसेल तर यात गैरअर्जदार क्र.3 यांची कोणतीही चूक नाही. यानंतर प्रकरण सविस्तर चालविल्यानंतर हे लक्षात आले की गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून त्यांचा जयेश ग्लास हाऊस तरोडा यासाठी सी.सी. रु.2,00,000/- चे जे घेतले होते त्या रक्कमेची पूर्ण परतफेड केलीच नाही शिवाय दि.31.03.2009 रोजी अखेर रु.2,46,127/- येणे बाकी आहे. हया कर्जाची परतफेड करण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी कोणतेच प्रयत्न न करता सदरील गहाण मालमत्ता विकण्याचा प्रयत्न केला व त्यांस अर्जदार यांनी ही संमती दिली, असे केल्याने आता अर्जदार यांचे वर संपूर्ण जबाबदारी आली व गैरअर्जदार क्र.3 यांचे कर्ज खाते जर निल होते नसेल तर बँकेला रिकव्हरी अक्ट खाली सदरील मालमत्ता जप्त करु लिलाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे गैरअर्जदार क्र.3 यांनी दाखल केलेल्या कागदपञावरुन सिध्द झालेले आहे. फोटोग्राफस पाहिले असता यात सत्यभामा कॉम्प्लेक्स मधील म.न.पा. क्र.3-1-289/19 ही खाली समोर लिहीलेले शटर मध्ये सदरील मालमत्ता ही गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे तारण आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. यात आता एकच रस्ता आहे की अर्जदार हे गैरअर्जदार क्र 1 व 2 यांनी पूर्ण कर्जाची रक्कम गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे भरावयास पाहिजे होती. अर्जदार यांचे वकिलांनी यूक्तीवाद करते वेळेस अशी ही मागणी केली आहे की, गैरअर्जदार क्र.3 या मालमत्तेचा लिलाव करीत असले तरी अर्जदार यांनी पहिली पंसती दिली पाहिजे, पण असे करता येणार नाही. गैरअर्जदार क्र.3 हे त्या मालमत्तेचा लिलाव करतील. अर्जदार यांनी त्यात भाग घेऊन बोली बोलता येईल व ज्यांची बोली सर्वात जास्त असेल त्यांना ती मालमत्ता मिळू शकते परंतु त्यांना पहिली पंसती दया असा आदेश करता येणार नाही. अर्जदार यांनी2007 पासून सौदाचिठठी झाल्यानंतर मालमत्ता त्यांचे ताब्यात आहे असे सिध्द करणारा कोणताही पूरावा त्यांचेकडे नाही. विक्री खत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी करुन दयावे असा अर्जदार यांनी पाठपूरावा केला असेही यात दिसून येत नाही. याशिवाय गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे कर्जाची रक्कम भरण्याचा प्रयत्न केला हे ही ते दाखवू शकलेले नाहीत. एकंदर गैरअर्जदार क्र.3 यांना अर्जदार यांनी पक्षकार करुन अर्जदार यांनी सर्व ज्ञात असताना त्यांना जो ञास दिला त्यांस अर्जदार स्वतः जबाबदार आहेत. परंतु गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराकडून रक्कम घेऊन प्रकरणात संधी दिली असताना आपले म्हणणे दिले नाही म्हणजे थोडक्यात या सौदाचिठठीस संमती दिली असाच त्यांचा अर्थ होईल व आपले करार पूर्ण न करुन अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. अर्जदार यांनी यांच कारणासाठी दिवाणी न्यायालयात स्पेशल सूट दाखल केलेला आहे. परत मंचात ही तक्रार केलेली आहे. दिवाणी न्यायालयानी निकाल दिला नसल्याकारणाने मंचाने हे प्रकरण चालवले व त्यावर आदेश करीत आहोत. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांची तक्रार गैरअर्जदार क्र.3 यांचे विरुध्द फेटाळण्यात येते, शिवाय दि.01.01.2010 रोजी दाखल केलेला अंतरिम आदेश या आदेशाअन्वये रदद करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्र.3 यांनी म.न.पा.क्र.3-1-289/19 ही तारण मालमत्ता लिलाव करण्यासाठी मुभा देण्यात येते व यातून ते आपली कर्जाची रक्कम वसूल करु शकतात. 3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी म.न.पा.क्र.3-1-289/19 या बाबत केलेला करारनामा बददल त्यांनी कराराचे पालन केले नाही म्हणून अर्जदाराकडून बयाणा म्हणून घेतलेली रक्कम रु.75,000/- यात अजून रु.50,000/- टाकून असे एकूण रु.1,25,000/- अर्जदार यांना नूकसान भरपाईसह दयावेत, असे न केल्यास दि.09.05.2010 पासून 12 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 4. अर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबददल गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत. 5. गैरअर्जदार क्र.3 यांना अर्जदार यांनी खर्चाबददल (Compensatory Cost ) रु.5,000/- दयावेत, वरील आदेशाचे पालन 30 दिवसांचे आंत करण्यात यावे. 6. पक्षकारांना आदेशाच्या प्रति देण्यात याव्या. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |