निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 20.08.2009 तक्रार नोदणी दिनांकः- 10.09.2009 तक्रार निकाल दिनांकः- 12.05.2010 कालावधी 08 महिने 02 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ सयद मुकर्रम सयद मंजूर पटेल अर्जदार रा.दर्गारोड,परभणी ता.जि परभणी. ( अड बी.आर.पेकाम ) विरुध्द शिव मोटर्स भालेराव कॉम्पलेक्स बसमत रोड, परभणी तर्फे पार्टनर्स. 1 अशोक तेजलाल पटेल गैरअर्जदार वय 30 वर्षे धंदा व्यापार रा. गिता टिंबर, ( अड शिरीष वेलणकर ) सॉ मिल जिल्हा परीषद ऑफीसच्या मागे, ज्ञानोपासक कॉलेज जवळ जिंतूर रोड, परभणी. 2 विरजी पटेल रा. व्दारा आर पेट्रोल पंप बसमत, बसमतनगर जि. हिंगोली -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- डिलरकडून खरेदी केलेली इलेक्ट्रीक यो बाइक मध्ये बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीसाठी ताब्यात दिल्यानंतर परत केली नाही म्हणून वाहनाची किंमत व इतर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्तूतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत अर्जदाराने बॅटरीवर चालणारी विना द्रवइंधन यो इलेक्ट्रीक बाईक चे परभणी येथील डिलर गैरअर्जदारांचे शोरुम मे. शिव मोटर्स मधून दिनांक 31.12.2007 रोजी रुपये 35486/- ला खरेदी केली होती. तीचा आर.टी.ओ.रजि.क्रमांक एम.एच.22-के. 4640 असा आहे. दिनांक 15 जुन 2009 रोजी बाइकमध्ये बिघाड झाल्यामुळे गैरअर्जदाराच्या वर्कशॉप मध्ये नेली त्यावेळी दुरुस्तीसाठी दोन दिवस लागतील असे सांगितले व बाईक ठेवून घेतली. मात्र आजअखेर ती दुरुस्त करुन मिळाली नाही. शिवाय गैरअर्जदारांची डिलरशीप दरम्यानच्या काळात बंद झाली व शोरुम ही बंद झाले होते. अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदाराना समक्ष भेटून त्याची बाइक मागितली असता त्यानी दिली नाही. दुरुस्तीसाठी लागणारे स्पेअर पार्टस येथे मिळत नसल्याचे कारण सांगितले. त्यानंतर कंपनीच्या नागपूर येथील तज्ञ मॅकेनीकशी अर्जदाराने संपर्क साधला परंतू त्यानेही योग्य तो प्रतिसाद दिला नाही. अशारीतीने गैरअर्जदारानी सेवा त्रूटी करुन अर्जदाराची बाइक विनाकारण ताब्यात ठेवून अर्थिक नुकसान केले म्हणून बाइकची किंमत रुपये 35486/- तसेच मानसिक त्रासापोटी रुपये 20000/- अर्जाचा खर्च रुपये 5000/- देण्यास गैरअर्जदार जबाबदार असल्याने त्याच्याकडे रुपये 40,000/- ची मागणी केली असता त्यानी देण्याचे नाकारले म्हणून ग्राहक मंचात प्रस्तूतची तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराकडून वरील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 5 लगत यो. बाइक खरेदीची पावती, आर.टी.ओ.रजिष्ट्रेशन फी पावती, आर.सी.बुक तपशील वगैरे चार कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे दिनांक 31.10.2009 रोजी प्रकरणात नि.11 ला सादर केले आणि गैरअर्जदार क्रमांक 2 ला पाठविलेली रजिष्टर नोटीस त्याने न स्विकारल्यामुळे पोष्टाकडून नोटीस लखोटा परत आला म्हणून त्याचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबात ( नि.11) त्यांचेकडून अर्जदाराने दिनांक 31.12.2007 रोजी रुपये 35486/- ला यो इले. बाइक एम.एच.22/के.4640 खरेदी केली होती हे मान्य केलेले आहे. वारंटी काळात बाइकचे फ्री सर्व्हीसिंग कंपनीच्या नियमाप्रमाणे करुन दिलेले होते हा तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 3 मधील मजकूरही त्यानी मान्य केला आहे मात्र खरेदीनंतर बाइक वेळोवेळी बिघडत होती व गैरअर्जदाराकडून ती अनेक वेळा दुरुस्त करुन घ्यावी लागली ही तक्रार अर्जातील परिच्छेद क्रमांक 4 मधील विधाने साफ नाकारली आहे. वारंटी पिरीयड मध्ये फ्री सर्व्हीसिंगच्या काळात बाइक मध्ये कसलाही दोष नव्हता किंवा त्यानंतरही अर्जदार बाइक बिघाडल्याची तक्रार घेवून वारंटी पिरीयड संपेपर्यत आला नव्हता असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. अर्जदार त्याची बाइक वर्कशॉप मध्ये दिनांक 15.06.2009 रोजी घेवून आला त्यावेळी दुरुस्तीसाठी दोन दिवस ठेवावी लागेल म्हणून ताब्यात घेतली व आजतगायत परत दिली नाही हा देखील तक्रार अर्ज परिच्छेद 5 मधील मजकूर गैरअर्जदाराने साफ नाकारला आहे या संदर्भात त्याने असा खुलासा केला आहे की, कंपनीचे इजिनीअर परभणी येथे आले त्यावेळी अर्जदार वर्कशॉपमध्ये गाडी घेवून आला होता. गाडीची तपासणी केली त्यावेळी बाइकच्या कंट्रोलरमधील पार्ट खराब झाल्याचे आढळले व तो नवीन टाकण्यासाठी पार्टसची किंमत दयावी लागेल कारण वारंटी पिरीयट संपल्यावर तो पार्ट खराब झाला आहे असे अर्जदारास सांगितले. अर्जदाराने कबूल करुन वर्कशॉप मध्ये बाइक ताब्यात दिली. कंपनीचा इंजिनीअरने खराब पार्ट बदलून देण्यासाठी तो सोबत घेवून गेला होता परंतू प्रवासात तो पार्ट हरवला त्यामुळे तो पार्ट अर्जदारास विनामोबदला बदलून देण्याचे अश्वासन दिले. त्याप्रमाणे रुपये 1500/- किंमतीचा लगेच नवीन पार्ट कंपनीतून आणून मॅकेनिकने तो वर्कशॉप मध्ये बसविला व बाइक पूर्ववत दुरुसत करुन ठेवली मात्र अर्जदार त्यानंतर बाइक घेवून जाण्यासाठी गैरअर्जदाराच्या वर्कशॉप मध्ये आला देखील नाही मात्र ही वस्तूस्थिती दडवून ठेवून जुन 09 ते ऑगष्ट 09 पर्यंत गाडी दुरुसत केली नव्हती व परत ताब्यात ही दिली नाही असे गैरअर्जदारावरच खोटे आरोप करुन प्रस्तूतची केस केली आहे. अर्जदाराच्या बाइकचा बदलेल्या नवीन पार्टसची किंमत ही त्याचेकडून घेतलेली नव्हती फक्त मजूरीचे चार्जेस रुपये 800/- त्याचेकडून येणे आहे. अर्जदारास योग्य ती सेवा वारंटी नंतर ही दिली असतानाही गैरअर्जदारावर सेवा त्रूटीचे आरोप करुन प्रस्तूतची खोटी तक्रार केली आहे सबब मजूरी चार्जेस रुपये 800/- देवून अर्जदाराने चालू कंडीशन मधील बाइक घेवून जाण्याचे मंचाने आदेश दयावेत व तक्रार अर्जातील मागणी फेटाळण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयार्थ गैराअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र ( नि.12) दाखल केले आहे. प्रस्तूतचे प्रकरण अंतीम सुनावणीसाठी प्रलंबित असताना अर्जदाराने नि. 18 चा अर्ज देवून गैरअर्जदाराशी तडजोडीची बोलणी चालू आहेत व त्यासाठी पुढील मुदत मिळावी अशी विनंती केली होती. तो अर्ज मंजूर करुन प्रकरणात 27.01.2010 ही तारीख दिली. सदर तारखेस अर्जदार व गैरअर्जदार आणि त्यांचे वकिलानी नि. 19 ची जाइंट पुरशीस सादर करुन अर्जदाराने त्याची गाडी एम.एच.22/के.4640 ची योग्य ती दुरुस्ती करुन ताब्यात घेतली असल्याचे लिहून देवून 15 दिवस गाडी चालवून पाहातो व व्यवस्थित चालत असल्याची खात्री करुन केस काढून घेतो असे अर्जदार व त्याचे वकिलानी मंचापुढे तोंडी विनंती केल्याने ती मान्य करुन प्रकरणात 04.02.2010 ही तारीख रिपोर्ट तथा स्टेप्ससाठी नेमली परंतू त्या तारखेस अर्जदार अथवा त्याचे वकिल मंचापुढे हजर झाले नाही म्हणून 16.02.2010 तारखेस प्रकरण ठेवण्यात आले व त्याही तारखेस अर्जदार व त्याचे वकिल गैरहजर राहीले व त्यानंतर ही पुन्हा 28.04.2010 पर्यंत सहा वेळा प्रकरण प्रलबित ठेवून ही अर्जदाराने कोणतीही स्टेज घेतली नाही अथवा रिपोर्ट सादर केला नाही यावरुन अर्जदाराची बाइक निश्चीतपणे व्यवस्थीत चालू असावी त्याबाबत तक्रार राहीलेली नाही असाच यातून निष्कर्ष निघतो असे असतानाही तक्रार अर्ज मागे घेण्याची कार्यवाही न करता आजपर्यंत विनाकारण प्रस्तूतचे प्रकरण प्रलंबित राहीलेले असल्याने वरील सर्व बाबी विचारात घेवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 तक्रार अर्ज निकाली काढण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदारानी आपापला सोसावा.. सौ.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |