:: तक्रार दाखल पूर्व सुनावणी आदेश ::
(पारीत व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारीत दिनांक– 03 नोव्हेंबर, 2017)
01. तक्रारकर्त्याची, विरुध्दपक्षा विरुध्दची ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खालील आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारी नुसार संक्षीप्त कथन पुढील प्रमाणे-
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला ‘4X6.5’ फुटचा एक दिवाण आणि 03 आसनी सोफासेट बनविण्याची ऑर्डर दिली होती. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्षाने जो कॅटलॉग दाखविला आणि तक्रारकर्ता व विरुध्दपक्षा मध्ये जे ठरले होते, त्या प्रमाणे, दिवाणचा प्लॉयवूड हा 18 MM चा आणि त्याचे सर्व पाय सागवानचे राहतील. परंतु विरुध्दपक्षाने दिवाणला 14 MM चे प्लॉयवूड लावले. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याने सोफासेट करीता जे कव्हर निवडले होते, ते विरुध्दपक्षाने लावले नव्हते, अशाप्रकारे विरुध्दपक्षाने सेवेत कमतरता ठेवली आणि तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान केले असे आरोप विरुध्दपक्षा विरुध्द केलेले आहेत.
तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत विरुध्दपक्षाने दिलेले एक बिल लावले आहे तसेच दिवाण व सोफासेट यांच्या फोटोची एक प्रत लावली आहे, परंतु या दोन्ही दस्तऐवजां वरुन हे प्रथम दर्शनी दिसून येत नाही की, दिवाणला 18 MM चा प्लॉयवूड लावण्याचे ठरले होते तसेच सोफासेटला तक्रारकर्त्याने निवडलेले विशीष्ट कव्हर लावण्याचे ठरले होते. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने ऑर्डर दिल्या प्रमाणे विरुध्दपक्षाने केले नाही परंतु केवळ तक्रारीतील कथना व्यतिरिक्त तक्रारकर्त्या कडे तो विरुध्दपक्षा विरुध्द करीत असलेल्या तक्रारीला आधार म्हणून कुठलाही सकृतदर्शनी पुरावा या प्रकरणात दिसून येत नाही, तक्रारकर्त्याला त्याचे तक्रारीचे पुष्टयर्थ दस्तऐवजी पुरावा दाखल करण्यासाठी बरीच संधी देण्यात आली परंतु त्याचे कडे उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे केवळ 02 दस्तऐवजां व्यतिरिक्त इतर कुठलाही दुसरा पुरावा नसल्याचे त्याने सांगितले, त्यामुळे तक्रारकर्त्याने जी तक्रार केली की, विरुध्दपक्षाने कबुल केल्या प्रमाणे दिवाणचा प्लॉयवूड हा 18 MM चा लावला नाही किंवा त्याने सोफासेट करीता जे कव्हर निवडले होते, ते विरुध्दपक्षाने सोफासेटला लावले नाही या त्याचे आरोपानां कुठलाही आधार दिसून येत नाही, त्यामुळे ही तक्रार दाखल करुन घेण्यासाठी केवळ तक्रारीतील कथना शिवाय इतर कुठलाही सकृतदर्शनी आधार किंवा पुरावा नाही, सबब ही तक्रार दाखल सुनावणी पूर्व खारीज करण्यात येते, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री विश्वनाथ काशिनाथ राठोड यांची, विरुध्दपक्ष शितल फर्निचर मार्ट तर्फे प्रोप्रायटर अतुल नारनवरे याचे विरुध्दची तक्रार केवळ तक्रारीतील आरोपा शिवाय त्याला आधार म्हणून इतर कुठलाही दस्तऐवजी पुरावा नसल्याचे कारणा वरुन, दाखल सुनावणीचे स्टेजला खारीज करण्यात येते.
2) आदेशाची नोंद संबधित पक्षकार व त्यांचे वकीलानीं घ्यावी.