Maharashtra

Satara

CC/13/173

SANGITA SUNIL KAMBLE - Complainant(s)

Versus

SHIRAM JANRAL INSURANCE CO - Opp.Party(s)

11 May 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/13/173
 
1. SANGITA SUNIL KAMBLE
SAHUPURI SATARA
...........Complainant(s)
Versus
1. SHIRAM JANRAL INSURANCE CO
SITAPUR JAYPUR (RJ)
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
 HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

न्‍यायनिर्णय

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

                                                                                      

1.  तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केली आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

तक्रारदार हे सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत.  त्‍यांचे मालकीची टोयाटो इनोव्‍हा ही गाडी रजि.क्र.MH-20/AG-5517 आहे.  सदर वाहन तक्रारदाराने घरगुती वापरासाठी घेतलेले होते व आहे.  तक्रारदार ही महिला असल्‍याने सदर वाहन चालवणेसाठी शेजारीच रहाणारा आशपाक अन्‍वर शेख, यास गरज असेल त्‍यावेळी ड्रायव्‍हींगसाठी घेऊन जात होत्‍या.  दि.23-4-2013 रोजी आशपाक शेख यास मुलगी बघणेचा कार्यक्रम असल्‍याने सोलापूर येथे प्रस्‍तुत आशपाक अन्‍वर शेख हे सदर तक्रारदाराची गाडी घेऊन व त्‍याचे घरच्‍या लोकांसह      गाडी घेऊन जाणेबाबत तक्रारदारास विनंती केली.  शेजारधर्म म्‍हणून तक्रारदाराने आशपाक शेख यास त्‍याचे कुटुंबियाना घेऊन सोलापूर येथे जाणेसाठी तक्रारदाराची इनोव्‍हा गाडी घेऊन गेले.  मुलगी पसंत न पडल्‍याने आशपाक शेखचे कुटुंबीय सोलापूर येथे राहिले.  दि.2-5-2013 रोजी तक्रारदाराचे मुलीचा विवाह असल्‍याने आशपाक अन्‍वर शेख एकटाच सोलापूर येथे गाडी घेऊन येत होता.  पंढरपूर येथे थांबला असता त्‍याचा मित्र अक्षय व त्‍याचे काका चंद्रकांत नारायण नाईक हे भेटले.  ते सातारा येथे येणार असल्‍याने त्‍याना आशपाकने गाडीत घेतले. तदनंतर ते पंढरपूर येथून सातारा येथे येत असताना रविंद्र संपत माने हे चंद्रकांत नाईक यांचे ओळखीचे इसम गाडीत बसले.  सदर गाडी पंढरपूर मार्गे सातारा येथे घेऊन येत असता दि.25-4-2013 रोजी रामोशीवाडी हद्दीत वर्धनगड गावाचे हद्दीत सदर वाहनाचा अपघात झाला व तक्रारदाराची गाडी वडाचे झाडाला धडकली.  सदर अपघातात चंद्रकांत  नाईक ही व्‍यक्‍ती मयत झाली. 

        जाबदार क्र.1 ही विमा कंपनी असून जाबदार क्र.4 ही जाबदार क्र.1 ची शाखा असून जाबदार क्र.4 यांचेमधील विमा पॉलिसी तक्रारदारास अदा केली आहे.  जाबदार क्र.2 हे शाखाधिकारी तर जाबदार क्र.3 हे विमा एजंट आहेत.  तक्रारदाराच्‍या गाडीचा विमा पॉलिसी क्र.215065/31/13/000529 असा आहे.  दरम्‍यान अपघात झालेस वाहन पूर्ण डॅमेज झालेस रक्‍कम रु.4,00,000/- इतकी विमा रक्‍कम देणेचे विमा कंपनीने मान्‍य केले होते.  अपघातानंतर तक्रारदारानी योग्‍य त्‍या सर्व कागदपत्रांसह विमा क्‍लेम जाबदारांकडे जाबदार क्र.3 मार्फत सादर केलेनंतर दि.18-7-2013 रोजी रक्‍कम रु.3,50,000/- या रकमेस जादबार कंपनीने तक्रारदाराचा विमा क्‍लेम मंजूर केला असलेचा त्‍याचा मेल जाबदार क्र.3 यानी तक्रारदारास दाखवला व त्‍याप्रमाणे रक्‍कम रु.3,50,000/- ला तक्रारदारांची मान्‍यता असलेचे संमतीपत्र अशी विनंती जाबदार क्र.3 ने तक्रारदारास केली व तक्रारदाराने दि.18-7-2013 रोजी रक्‍कम रु.100/-च्‍या स्‍टॅम्‍पपेपररव  नोटराईज्‍ड संमतीपत्र करुन जाबदार क्र.3 कडे दिले.  सदर समंतीपत्र मिळालेवर जाबदार विमा कंपनीकडून 10 दिवसात चेक तक्रारदारास मिळेल अशी खात्री जाबदार क्र.3 ने दिली होती, परंतु दि.15-10-2013 रोजी जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारलेचा मेल जाबदार क्र.3 याना पाठविला व सदर मेलची प्रत जाबदार क्र.3 ने तक्रारदारास दिली.  सदरचा विमा क्‍लेम तक्रारदाराने वाहनाचा वापर भाडयाने देणेसाठी केल्‍याचे निष्‍पन्‍न झालेने तसेच तक्रारदाराने सदर गाडीत प्रवासी भाडयाने घेतले असल्‍याने सदरचा विमा क्‍लेम नाकारला.  त्‍यामुळे जाबदारानी चुकीच्‍या कारणासाठी क्‍लेम नाकारला असल्‍याने तक्रारदारास त्रुटीची सेवा दिल्‍याने तक्रारदारानी सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे. 

2.    सदर कामी तक्रारदाराने जाबदारांकडून वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराचे वाहनाचे नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.3,50,000/- वसूल होऊन मिळावेत, सदर रकमेवर दि.18-7-2013 पासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याज मिळावे, तक्रारदारास झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- जाबदाराकडून मिळावेत, तक्रारअर्जाचा खर्च रु.25,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर कामी केली आहे. 

3.      तक्रारदारानी प्रस्‍तुत कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत पोलिस स्‍टेशनची अपघाताबाबत एफ.आय.आर.ची प्रत, अशपाक शेखचे ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, विमा कंपनीने विमा क्‍लेम नाकारलेचे पत्र, विमा कंपनीचा ईमेल, तक्रारदाराने जाबदारास दिलेले संमतीपत्र, तक्रारदाराचे वाहनाची विमा पॉलिसी, अजिंक्‍यतारा महिला सह.बँकेचे अकौंट स्‍टेटमेंट, तक्रारदाराने टोयाटो कंपनीची इनोव्‍हा गाडीचे काढलेले एस्‍टीमेट, नि.22 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.23 कडे रिजॉईंडर वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने सदर कामी दाखल केली आहेत. 

4.    जाबदार क्र.2 यास सदर तक्रारअर्जातून वगळलेले आहे तर जाबदार क्र.1 यानी नि.20 कडे म्‍हणणे दाखल केले आहे.  नि.21 कडे म्‍हणण्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.27 कडे सदर कामी जाबदार क्र.1 ने दाखल केलेले म्‍हणणे हेच पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र समजणेत यावे म्‍हणून दिलेली पुरसीस, नि.40 चे कागदयादीसोबत अपघात वाहनाची विमा पॉलिसी तसेच मे.राष्‍ट्रीय आयोगाचा न्‍यायनिवाडा 2014 CL CPR (NC)491 दाखल केला आहे.  नि.28 कडे जाबदार क्र.3 चे म्‍हणणे, नि.29 चे प्रतिज्ञापत्र, नि.30 चे कागदयादीसोबत जाबदार क्र.3 चे श्रीराम चिटस लि. चे पत्र, नि.24 कडे जाबदार क्र.2 चे म्‍हणणे, नि.35 चे कागदयादीसोबत जाबदार क्र.3 चे अपॉईंटमेंट लेटर व ऑफर लेटर, नि.37 चे कागदयादीसोबत जाबदार क्र.2 चे प्रमोशनलेटर व ऑफर लेटर, नि.39 चे कागदयादीसोबत नि.39/1 कडे जाबदार क्र.2 चा मूळ दाखला, जाबदार क्र.3 चा मूळ दाखला वगैरे कागदपत्रे जाबदारानी सदर कामी दाखल केली आहेत.  सदर कामी जाबदार क्र.2 व 3 यानी सदर जाबदारांचा व जाबदार क्र.1 विमा कंपनीचा कोणताही संबंध नसल्‍याने त्‍यांची नावे तक्रारअर्जातून कमी करणेबाबत अर्ज दाखल केले होते.  प्रस्‍तुत जाबदार क्र.2 चे अर्जावर दि.12-1-2015 रोजी आदेश झालेले आहेत व प्रस्‍तुत जाबदार क्र.2 चे नाव तक्रारअर्जातून वगळणेचे आदेश मे.मंचाने दिले आहेत.  तसेच जाबदार क्र.3 चा अर्जाचा नि.25 कडील अर्जाचा विचार करता जाबदार क्र.3 यांचासुध्‍दा प्रस्‍तुत कामी नि.37/2 कडील ऑफर लेटर व अपॉइंटमेंट लेटरवरुन त्‍यांचा म्‍हणजेच जाबदार क्र.3 चा सुध्‍दा जादबार क्र.1 व 4 यांचेशी कोणताही संबंध असलेचे दिसून येत नाही, तसेच जाबदार क्र.4 कडून तक्रारदाराने कोणतीही मागणी केलेली नाही.  जाबदार क्र.1 ने दाखल केलेले नि.2 कउील म्‍हणण्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारअर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे परंतु प्रस्‍तुत अपघातग्रस्‍त वाहनाचा जाबदार क्र.1 कडे विमा उतरवलेचे मान्‍य केले आहे.  त्‍यांनी पुढे म्‍हटले आहे की, प्रस्‍तुत वाहनासाठी खाजगी वापरासाठी वाहन (प्रायव्‍हेट कार) या अटी व शर्तीवर विमाकृत केले आहे.  प्रस्‍तुत वाहन प्रवाशांचे वापरासाठी वापरणेचे नव्‍हते.  (हायर ऑर रिवार्ड) अशी अट विमा पॉलिसीत नमूद आहे याची जाणीव तक्रारदारास आहे.  असे असताना प्रस्‍तुत वाहन अपघात झाला त्‍यावेळी सदर वाहनातून प्रवाशांची वाहतूक केलेचे तपासात निष्‍पन्‍न झाले आहे.  मात्र मे.मंचाची व विमा कंपनीची दिशाभूल करुन जाबदार क्र.1 विमा कंपनीकडून विमा रक्‍कम उकळणेसाठी तक्रारदाराने चुकीचे कथन केलेले आहे.  तक्रारदाराने सदर वाहनातून अनाधिकृतपणे प्रवासी वाहतूक केलेने त्‍यांनी विमा पॉलिसीतील मुख्‍य अटींचा भंग केलेला आहे आणि म्‍हणूनच विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव फेटाळला आहे, त्‍यामध्‍ये विमा कंपनीने जाबदार क्र.1 ने तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही किंवा  सेवेत त्रुटी केलेली नाही.  तक्रारदाराकडून रक्‍कम रु.100/-चे स्‍टॅम्‍पपेपरवर संमतीपत्र देणेचे होते आणि रक्‍कम रु.3,50,000/- विमा  रक्‍कम देणेस विमा कंपनी तयार आहे असे नसून प्रस्‍तुत संमतीपत्र क्‍लेम प्रोसेसिंगसाठी लागणा-या कागदपत्रांची पूर्तता करणेसाठी म्‍हणून तक्रारदाराने दि.18-7-2013 चे संमतीपत्र ठराविक नमुन्‍यात तयार करुन घेऊन ते विमा कंपनीकडे सादर केलेले होते.  प्रस्‍तुत संमतीपत्राचा तक्रारदाराने गैरअर्थ काढलेला आहे.  रक्‍कम रु.3,50,000/- विमा क्‍लेम देणेस जाबदार कंपनी कधीही तयार नव्‍हती.  जाबदार क्र.2 ते 4 हे या कामी आवश्‍यक पक्षकार नाहीत.  प्रस्‍तुत जाबदार हे या विमा कंपनीचे पदाधिकारी नाहीत.  जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा पुरविलेली नाही.  सबब प्रस्‍तुत तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्‍हणणे जाबदार क्र.1 यानी दिले आहे.  जाबदार क्र.2 व 3 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये प्रस्‍तुत जाबदार हे जाबदार क्र.1 विमा कंपनीचे पदाधिकारी नव्‍हते व नाहीत त्‍यामुळे त्‍याना वगळणेत यावे असे म्‍हटले आहे.  पैकी जाबदार क्र.2 ला सदर कामातून वगळलेले आहे तर जाबदार क्र.4 यांस नॉमिनल पक्षार केले आहे.  जाबदार क्र.4 कडून तक्रारदाराने कोणतीही मागणी केलेली नाही.

5.    वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे.मंचाने सदर तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.         मुद्दा                                                 उत्‍तर

 1. तक्रारदार व जाबदारांचे दरम्‍यान ग्राहक व सेवादेणार असे नाते आहे काय?   होय.

                                         जाबदार क्र.1 व तक्रारदारांमध्‍ये आहे.

 2. जाबदारानी तक्रारदारांस सदोष सेवा पुरवली आहे काय?                   होय.

 3. तक्रारदार विमा क्‍लेम/नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय?           होय.

 4. अंतिम आदेश काय?                                    शेवटी नमूद केलेप्रमाणे.

विवेचन-

6.     वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण जाबदार क्र.1 यांचेकडे तक्रारदाराचे मालकीचे वाहन क्र.MH-20-AG-5517  या टोयाटो इनोव्‍हा गाडीचा विमा उतरविला होता.  प्रस्‍तुत विमा हा अपघातकाळात चालू होता ही बाब विमा पॉलिसी नि.5/9 वरुन सिध्‍द होते, तसेच जाबदारानेही प्रस्‍तुत बाब मान्‍य केली आहे.  त्‍यामुळे तक्रारदार व जाबदार क्र.1 यांचेदरम्‍यान ग्राहक व सेवादेणार असे नाते आहे, सबब आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे. 

7.      वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे नमूद इनोव्‍हा गाडीचा अपघात दि.25-4-2013 रोजी वडाच्‍या झाडाला धडकून रामोशीवाडी वर्धनगड गावाचे हद्दीत झाला.  सदर अपघातात तक्रारदाराचे गाडीचे पूर्ण नुकसान झाले.  सदर विमा पॉलिसीतील अटीनुसार वाहनाचे पूर्ण नुकसान झालेस रक्‍कम रु.4,00,000/- (रु.चार लाख मात्र) रक्‍कम देणेचे जाबदार विमा कंपनीने मान्‍य केले होते.  तक्रारदाराचे गाडीचा अपघात झालेनंतर तक्रारदाराने सर्व कागदपत्रांसह जाबदारांकडे विमा क्‍लेम दाखल केला परंतु जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराने सदर वाहनाचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी केल्‍याने तक्रारदाराने विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग केला असलेचे कारण देऊन विमा क्‍लेम फेटाळला.   वास्‍तविक तक्रारदाराने सदर वाहन प्रवासी वाहतुकीसाठी वापरले ही बाब किंवा प्रस्‍तुत प्रवाशांकडून तक्रारदाराने भाडे स्‍वरुपात रक्‍कम स्विकारलेचे जाबदाराने सिध्‍द केलेले नाही. असे असतानाही तक्रारदाराचा विमा क्‍लेम जाबदार क्र.1 विमा कंपनीने फेटाळला आहे म्‍हणजेच तक्रारदारास जाबदार क्र.1 विमा कंपनीने सदोष सेवा पुरवली असल्‍याचे आमचे स्‍पष्‍ट मत आहे, सबब आम्‍ही मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत. 

8.     वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदाराचे इनान्‍हवा गाडी क्र. MH-20-AG-5517 चा विमा जाबदार क्र.1 कडे उतरविला होता.  त्‍याचा कालावधी दि.12-11-2012 ते दि.29-5-2013 असा होता.  प्रस्‍तुत गाडीचा दि.25-4-2013 रोजी अपघात झाला व सदर अपघातात प्रस्‍तुत गाडीचे संपूर्ण नुकसान झाले.  तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीकडे विमा क्‍लेम/नुकसानभरपाई मिळणेसाठी प्रस्‍ताव सादर केला परंतु विमा कंपनी जाबदार क्र.1 ने तक्रारदाराने सदरचे वाहन खाजगी वाहतुकीसाठी वापरणेसाठी विमाकृत केले होते परंतु तक्रारदाराने सदर वाहनातून प्रवासी वाहतूक केलेने विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केलेचे कारण देऊन नाकारला.  वास्‍तविक तक्रारदाराने प्रस्‍तुत वाहन प्रवासी वाहतुकीसाठी वापरलचे व प्रवाशांकडून भाडेस्‍वरुपात रक्‍कम स्विकारलेचे जाबदारांनी सिध्‍द केलेले नाही.  सदर कामातील दाखल एफ.आय.आर. नि.5/1 व वाहनातून प्रवास करणारी व्‍यक्‍ती रविंद्र संपत माने यांचा जबाब नि.5/2 यामध्‍येही कुठेही प्रवासी भाडे वाहनाच्‍या ड्रायव्‍हरने घेतलेबाबत उल्‍लेख नाही.  प्रस्‍तुत वाहन प्रवासी भाडेसाठी वापरलेची बाब जाबदारांनी सिध्‍द केलेली नाही आणि असे असतानाही तक्रारदाराचा विमा क्‍लेम फेटाळला आहे हे चुकीचे व बेकायदेशीर आहे.  तक्रारदाराचे वाहनाची विम्‍याची एकूण रक्‍कम रु.4,00,000/-(रु.चार लाख मात्र) सदरचे वाहन टोटल डॅमेज झालेचे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्राद्वारे प्रतिज्ञेवर कथन केले आहे.  सबब तक्रारदाराना जाबदार क्र.1 विमा कंपनीकडून वाहनाची विमा रक्‍कम/नुकसानभरपाई रक्‍कम नॉन स्‍टँडर्ड बेसिसवर मिळणे न्‍यायोचित होणार आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  प्रस्‍तुत कामी आम्‍ही जाबदारानी दाखल केलेला पुढील न्‍यायनिवाडा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

(2014)1 CPR (NC)491- 

Mohd.Unis V/s. United India Insurance.

Consumer Protection Act 1986- Sec.21(b)- vehicle insured met with accident- Repudiation of claim- complaint-Allowed by District Forum- Appeal- allowed by State Commission- Revision petition- Admittedly the petitioner had taken a comprehensive policy for the vehicle in question and as such keeping in view the ratio in case of National Insurance Company Ltd.V/s. Nitin Khandelwal reiterated in the case of Amalendu Sahoo, District Forum rightly accepted the claim of the petitioner on non-standard basis-State Commission failed to appreciate the fine distinction between the two judgments of the Hon’ble Supreme Court- Hence, impugned order of State Commission held liable to be set aside- Revision petition allowed.(para 8)

     प्रस्‍तुत कामी तक्रारदाराना जाबदार क्र.1 विमा कंपनीने विमा क्‍लेम रक्‍कम किंवा वाहनाची नुकसानभरपाई नॉन स्‍टँडर्ड बेसिसवर रक्‍कम रु.2,62,500/-(रु.दोन लाख बासष्‍ट हजार पाचशे मात्र) अदा करणे न्‍यायोचित होणार आहे, तसेच सदर कामातील जाबदार क्र.2 ते 4 यांना सदर जबाबदारीतून वगळणेत येते व प्रस्‍तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज जाबदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास अदा करणे न्‍यायोचित होणार आहे व प्रस्‍तुत रक्‍कम मिळणेस तक्रारदार हे पात्र आहेत असे आम्‍हांस वाटते. 

9.    सबब सदर कामी आम्‍ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                            -ः आदेश ः-

1.  तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. तक्रारदाराना जाबदार क्र.1 विमा कंपनीने नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.2,62,500/-(रु.दोन लाख बासष्‍ट हजार पाचशे मात्र) अदा करावेत.

3.  प्रस्‍तुत रक्‍कम रु.2,62,500/-/-(रु.दोन लाख बासष्‍ट हजार पाचशे मात्र)  वर अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज जाबदार क्र.1 ने तक्रारदारास अदा करावे.

4. तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- (रु.पाच हजार मात्र) जाबदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावत.

5.  तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/-(रु.वीस हजार मात्र) जाबदार क्र.1 विमा कंपनीने तक्रारदारास अदा करावेत.

5.    वर नमूद आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून जाबदारानी 45 दिवसात करावयाचे आहे.

6.    आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्‍यास तक्रारदाराना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये कारवाई करणेची मुभा राहील.

7.    सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

8.   सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात. 

 

ठिकाण- सातारा.

दि. 11-5-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)   (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या          सदस्‍य             अध्‍यक्षा

                जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.