Maharashtra

Beed

CC/12/159

Balkisan Chatrabhuj Kakde - Complainant(s)

Versus

Shiram General Insurance company ltd. - Opp.Party(s)

Doephode

18 Nov 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/159
 
1. Balkisan Chatrabhuj Kakde
r/o Takalgavan Tq.Georai
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shiram General Insurance company ltd.
r/o near S.F.S.School, Jalna Road, Aurangabad
Aurangabad
Maharashtra
2. Shriram General Insurance company ltd.
Arrora Tower, Pune
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकाल
दिनांक- 18.11.2013
(द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्‍यक्ष)
तक्रारदार बालकिसन छत्रभुज काकडे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे, म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार यांनी दि.25.08.2011 रोजी महिंद्रा कंपनीची स्‍कॉर्पिओ एम.डी.आय.रजि.नं.एम.एच.14/बी.सी.-7140 ही गाडी भाऊ मारुती कुचेकर यांचेकडून खरेदी केलेली आहे. ज्‍या दिवशी गाडी खरेदी केली, त्‍याच दिवशी गाडीचा इन्‍शुरन्‍स, आर.सी.बुक यावर हस्‍तांतरण करण्‍याबाबत कार्यवाही केलेली आहे. तक्रारदार यांनी श्रीराम फायनान्‍स कंपनीकडून कर्ज घेतलेले आहे. वर नमुद केलेल्‍या गाडीची पॉलीसी ही सामनेवाला यांच्‍याकडे उतरविलेली आहे व पॉलीसीची मुदत दि.25.08.2011 ते 09.06.2012 पर्यंत वैध आहे.
तक्रारदार यांचे कथन की, दि.20.12.2011 रोजी तक्रारदार हे व्‍यापाराच्‍या निमित्‍ताने जात असताना पाडळसिंगी ते मादळमोळी रस्‍त्‍याच्‍या वळणावर गाडी स्‍लीप होऊन उजव्‍या बाजूला पलटी झाली त्‍या अपघातात गाडीचे उजव्‍या बाजुचे नुकसान झाले. सदरील गाडीचा अपघात झाल्‍यानंतर दुस-या दिवशी अपघातग्रस्‍त गाडीचे फोटो काढण्‍यात आले. सदरील गाडी नगर येथील महिंद्रा अण्‍ड महिंद्राचे अधिकृत गॅरेजमध्‍ये दुरुस्‍ती कामी नेण्‍यात आले. गाडी दुरुस्‍तीचा एकूण खर्च रु.1,34,435/- सांगण्‍यात आला. तक्रारदार यांनी अपघाताची खबर सामनेवाला यांना दिली. सामनेवाला यांचे संबंधित सर्व्‍हेअर यांनी गाडीची पाहणी केली व तपासणी केली, तसेच त्‍याचा अहवाल करुन गाडीचे फोटो काढून सामनेवाला यांच्‍याकडे क्‍लेम फॉर्म सोबत पाठविले.गाडी दुरुस्‍त होण्‍यास साधारण दोन अडीच महिने लागले. गाडी दुरुस्‍ती करता रक्‍कम रु.88,791/-एवढा खर्चझाला. गाडी दुरुस्‍त कामी तक्रारदार यांना अहमदनगर येथे वारंवार जावे लागले,त्‍या कामी तक्रारदार यांचा बराच खर्च झाला. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्‍याकडे सर्व कागदपत्राची पुर्तता केली परंतू सामनेवाला यांनी रक्‍कम अदा केली नाही. गॅरेज व्‍यवस्‍थापनाकडून तक्रारदार यांना गाडी दुरुस्‍त झाली आहे घेऊन जा, याबाबत कळवले. सामनेवाला यांच्‍याकडून विम्‍याची रक्‍कम अद्याप मिळालेली नाही ही बाब तक्रारदार यांनी गॅरेज व्‍यवस्‍थापनाच्‍या निदर्शनास आणून दिली. गॅरेज व्‍यवस्‍थापनाने तक्रारदार यांना सांगितले की, तुमच्‍या जवळची रक्‍कम बिलापोटी भरा व गाडी घेऊन जा. विमा कंपनीकडून येणारे बिल तुम्‍ही घ्‍या. सदरील बाबीस सामनेवाला यांनी मान्‍यता दिली. तक्रारदार यांनी स्‍वतः जवळची रक्‍कम रु.88,791/- गॅरेजर व्‍यवस्‍थापनास दिली व ते गाडी घेऊन आले. तक्रारदार यांना सदरील रक्‍कम भरावी लागल्‍यामुळे गाडीच्‍या कर्जाचे हप्‍ते थकले. फायनान्‍स कंपनीने तक्रारदार यांनी भरलेल्‍या रकमेचे बिल स्‍वतःकडे ठेऊन घेतले ते बिल परत देण्‍यास फायनान्‍स कंपनीने नकार दिला. फायनान्‍स कंपनीचे एजन्‍ट तक्रारदार यांच्‍या गावात येऊन कर्ज रकमेची मागणी करु लागले.
तक्रारदार यांनी तक्रारीत पुढे असे‍ कथन केले आहे की, दि.31.03.2012 रोजीसामनेवाला कंपनीकडून पत्र मिळाले, त्‍या पत्रात वाहनाच्‍या तपासणी पूर्वीचे फोटो व तपासणी नंतरच्‍या फोटोमध्‍ये तफावत असल्‍यामुळे विमा कंपनीने क्‍लेम नामंजूर केला आहे असे कळवले. सामनेवाला यांच्‍या ताब्‍यात सर्व दस्‍तऐवज होते. केवळ रक्‍कम द्यावी लागू नये या भावनेने सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम फेटाळलेला आहे. तक्रारदार यांनी दि.05.07.2012 रोजी सामनेवाला कंपनीस नोटीस पाठविली, सामनेवाला यांनी त्‍यास उत्‍तर दिले नाही. तक्रारदार हे सामनेवाला कंपनीचे ग्राहक असून सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. सबब तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदार यांनी गाडी दुरुस्‍ती कामी केलेला खर्च व त्‍या अनुषंगाने झालेला खर्च रक्‍कम रु.90,000/- मिळावे तसेच रु.25,000/- नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे.
सामनेवाला यांना तक्रारीची नोटीस मिळाली व ते मंचासमोर हजर झाले. सामनेवाला यांनी, तक्रारदार यांनी तक्रारीत कथन केलेला मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला यांचे म्‍हणणे की, वाहन नं. एम.एच.14/बी.सी.-7140 या वाहनाचा सामनेवाला यांच्‍याकडे विमा उतरविलेला होता, तसेच सदरील वाहनाची विमा पॉलीसी सामनेवाला यांनी मान्‍य केली आहे. सामनेवाला यांचे कथन की, ज्‍या वेळेला विमा पॉलीसी काढण्‍यात आली, त्‍या वेळेला जे वाहन तपासणीसाठी आणले होते ते दुसरे होते व ज्‍या वाहनाचा अपघात झाला व फोटो पाठविले ते वाहन वेगळे होते. दोन्‍ही फोटो हे एकमेकाशी मिळतेजुळते नाही तक्रारदार यांनी सामनेवाला यांना फसवलेले आहे.
सामनेवाला यांनी पुढे असे कथन केले आहे की, त्‍यांना अपघाताची खबर मिळाल्‍यानंतर सामनेवाला यांनी सर्व्‍हेअरची नियुक्‍ती केली होती व गाडीचे काय नुकसान झाले याबाबत अहवाल मागविला होता. गाडी ही 2007 मध्‍ये उत्‍पादीत केलेली होती त्‍याचा विचार केला असता व 50 टक्‍के घसारा लक्षात घेतला असता सर्व्‍हेअर यांनी नुकसान भरपाईचा अहवाल सादर केला. सर्व्‍हेअर यांनी रु.33,509/- नुकसान भरपाई बाबत अहवाल दिला. तसेच लेबर चार्जेस रक्‍कम रु.27,641/- असे एकूण रु.61,150/- चे नुकसान झाल्‍याबाबत सामनेवाला यांना कळवले, त्‍या रकमेतून salvage value रु.2,000/- व less रु.1,000/- वजा करुन एकूण रक्‍कम रु.58,150/-ची रक्‍कम सामनेवाला देणे लागेल असे कळवले. जर तक्रारदार यांनी अगोदर दिलेले फोटो व नंतर दिलेले फोटो यात कसा बदल झाला हे शाबीत करणे आवश्‍यक आहे. सामनेवाला यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला यांना अपघाताबाबत आठ दिवस उशिराने कळवले सदरील बाब ही पॉलीसीचा भंग करणारी आहे.सबब तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार रदद करावी अशी मागणी केली आहे.
तक्रारदार व सामनेवाला यांचे कथन लक्षात घेता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्‍तर 1) सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी शाबीत
केली आहे काय? होय.
2) तक्रारदार यांनी पॉलीसी घेतेवेळेस वेगळी गाडी दाखवली, व अपघातग्रस्‍त गाडी वेगळी आहे, ही बाब सामनेवाला यांनी शाबीत केली आहे काय? नाही.
3) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र
आहे काय? होय. 4) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 4 ः- तक्रारदार यांचे कथन व सामनेवाला यांचे कथन यांचा एकत्रित विचार केला असता खालील बाबी तक्रारदार व सामनेवाला यांना मान्‍य व कबूल आहे. तक्रारदार हे वाहन नं. एम.एच.14/बी.सी.-7140 चे मालक असून सदरील वाहन सामनेवाला यांच्‍याकडे पॉलीसी नं.215037/31/12/000690 अन्‍वये इन्‍शुअर्ड केलेली आहे. तक्रारदार याने सामनेवाला यांच्‍याकडे सदरील गाडीचा अपघात झाल्‍यानंतर क्‍लेम दाखल केला आहे. सामनेवाला यांनी सर्व्‍हेअर यांची नियुक्‍ती करुन सदरील वाहनास झालेली नुकसान भरपाईची पाहणी करुन अहवाल मागविलेला आहे. सदरील वाहन हे अहमदनगर येथील महिंद्रा अण्‍ड महिंद्रा कंपनीचे अधिकृत गॅरेजमध्‍ये दुरुस्‍तीस टाकले होते व ते वाहन दुरुस्‍त करण्‍यात आले.
सामनेवाला यांचे वकील श्री.वाघमारे यांचा युक्‍तीवाद की, तक्रारदार यांनी ज्‍यावेळेस वाहनाचा विमा काढला, त्‍यावेळेस जे वाहन तपासणीसाठी दाखवले होते ते दुसरे होते. तदनंतर ज्‍या वाहनाचा अपघात झाला तेव्‍हा ते वाहन दुसरे आढळून आले. तक्रारदार यांनी जे फोटो हजर केले, ते फोटो अगोदरच्‍या फोटोपेक्षा भिन्‍न आढळून आले ते एकमेकाशी मिळतेजुळते नसल्‍यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला यांना चुकीची माहिती दिली. सदरील बाब ही पॉलीसीच्‍या शर्ती व अटीचे भंग करणारी आहे. तसेच सामनेवाला यांचे वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, सदरील वाहनाचा अपघात झाल्‍यानंतर तक्रारदार यांनी ताबडतोब सदरील बाब इन्‍शुरन्‍स कंपनीला लेखी स्‍वरुपात कळविणे गरजेचे होते. तक्रारदार यांनी सदरील बाब इन्‍शुरन्‍स कंपनीस कळविली नाही त्‍यामुळे पॉलीसीमध्‍ये नमुद केलेले शर्त नं.1 चा भंग झालेला आहे त्‍या कारणास्‍तव इन्‍शुरन्‍स कंपनीने तक्रारदार यांचा क्‍लेम नामंजूर केला आहे. त्‍यास संयुक्‍तीक व योग्‍य कारण आहे. तक्रारदार हे विमा कंपनीकडून मागणी केलेली रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही. तसेच सामनेवाला यांच्‍या वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी जो दुरुस्‍तीचा खर्च दाखवला आहे तो अवाजवी आहे. सामनेवाला यांच्‍या सर्व्‍हेअरने दिलेल्‍या नुकसानीचा व दुरुस्‍तीचा आढावा घेतला असता सामनेवाला यांची रक्‍कम रु.58,150/- देण्‍याची जबाबदारी निश्चितच होते. परंतू तक्रारदार यांनी इन्‍शुरन्‍स पॉलीसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केल्‍यामुळे तक्रारदार हे सदरील रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही.
तक्रारदार यांचे वकील श्री.डोईफोडे यांनी असा युक्‍तीवाद केला की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम वाहनाचे फोटो वेगवेगळे अहेत या कारणास्‍तव नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी संबंधित कागदपत्रे या मंचासमोर हजर केलेले नाहीत त्‍यामुळे पॉलीसी घेतेवेळेस जे वाहन दाखवले ते अपघातग्रस्‍त वाहन नाही ही बाब सामनेवाला यांनी सिध्‍द केलेली नाही. सामनेवाला यांच्‍या ताब्‍यात सदरील फोटो असताना सुध्‍दा ते त्‍यांनी हेतुपुरस्‍सर दाखल केलेले नाही. तक्रारदार यांच्‍या वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, सामनेवाला यांच्‍याकडे अपघातग्रस्‍त वाहनाचा विमा उतरवलेला होता. तक्रारदार हे त्‍या वाहनाचे मालक आहेत. तक्रारदार यांनी सर्व कागदपत्राची पुर्तता करुनही सामनेवाला यांनी बेकायदेशिररित्‍या तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारलेला आहे. तसेच तक्रारदार यांच्‍या वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, सामनेवाला इन्‍शुरन्‍स कंपनीला वाहनाचा अपघात झाल्‍याबरोबर सदरील बाब कळविली होती व सामनेवाला यांनी वाहनाची पाहणी करुन काय काय नुकसान झाले आहे याबाबत रिपोर्ट तयार केलेला आहे. सामनेवाला यांना तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारण्‍यास कोणतेही संयुक्‍तीक कारण घडलेले नाही.
तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलाचा युक्‍तीवाद लक्षात घेता, तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचा पुरावा व सोबत दाखल केलेले कागदपत्र यांचा सखोल विचारकेला असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सेवेतत्रुटीठेवली आहे किंवा काय? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे वाहनाचा सामनेवाला कंपनीकडे विमा उतरविलेला आहे ही बाब मान्‍य आहे. तक्रारदार यांच्‍या क्‍लेम केवळ सामनेवाला यांनी वाहनाचे फोटोमध्‍ये भिन्‍नता आढळून आली या कारणास्‍तव नाकारलेला आहे. सदरील वाहनाचे फोटो सामनेवाला यांच्‍याकडे उपलब्‍ध होते व ते फोटो सामनेवाला यांनी या मंचासमोर दाखल करणे क्रमप्राप्‍त होते. तक्रारदार यांनी वाहनाचा विमा उतरविला त्‍यावेळेस जे फोटो दिले व अपघातग्रस्‍त वाहनाचे जे फोटो दिले ते भिन्‍न आहे, हे शाबीत करण्‍याची जबाबदारी सामनेवाला यांचेवर आहे. सामनेवाला यांनी शब्‍दाव्‍यतिरिक्‍त कोणताही दस्‍तऐवज हजर केलेला नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांचा बचाव ग्राहय धरता येणार नाही. सदरील वाहनाचा नं. एम.एच.14/बी.सी.-7140 हा आहे. हयाच वाहनाचा सामनेवाला यांच्‍याकडे विमा उतरविलेला आहे, त्‍याच वाहनाचा अपघात झाला आहे, व ते अहमदनगर येथील मान्‍यताप्राप्‍त गॅरेजमधून दुरुस्‍त करुन घेतलेली आहे व त्‍याच वाहनाचा क्‍लेम सामनेवाला यांच्‍याकडे केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी क्‍लेम दाखल केला त्‍यावेळेस दुस-या वाहनाचे फोटो दिले ही बाब मान्‍य करता येणार नाही. सबब सामनेवाला यांनी ज्‍या कारणास्‍तव तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारला आहे, ते संयुक्‍तीक व कायदेशिर नाही.
सामनेवाला यांचा बचाव की, तक्रारदार यांनी वाहन अपघातग्रस्‍त झाल्‍यानंतर ताबडतोब सदरील बाब सामनेवाला यांच्‍या निदर्शनास आणून दिली नाही. सामनेवाला यांचे कागदपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदरील वाहनाचा अपघात झाल्‍यानंतर आठ दिवसाचे आत सामनेवाला यांना अपघाताबाबत कळविण्‍यात आले आहे. सामनेवाला यांनी सर्व्‍हेअरची नियुक्‍ती करुन अपघातग्रस्‍त वाहनाची पाहणी केली आहे व तसा रिपोर्ट सामनेवाला यांना दिलेला आहे. तसेच वाहनाच्‍या नुकसानीबाबत ही अहवाल सामनेवाला यांना प्राप्‍त झालेला आहे. वरील बाबी लक्षात घेता तक्रारदार यांनी सामनेवाला यांना विलंबाने अपघाताबददल माहिती दिली ही बाब स्विकारता येणार नाही.
वर नमुद केलेल्‍या कारणमिमांसेवरुन व या मंचासमोर दाखल झालेल्‍या पुराव्‍यावरुन या मंचाचे मत असे पडते की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार हे किती दुरुस्‍ती खर्च मिळण्‍यास पात्रआहे हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांच्‍या मते त्‍यांनी वाहन दुरुस्‍तीसाठी रु.88,791/- खर्च केलेले आहे, त्‍याबाबत तक्रारदार यांनी बिले हजर केलेली आहे. तक्रारदार यांनी असेही कथन केले आहे की, सामनेवाला यांनी क्‍लेम मंजूर न केल्‍यामुळे तक्रारदार यांनी सदरील रक्‍कम भरलेली आहे. तसेच सदरील वाहनावर फायनान्‍स कंपनीकडून कर्ज घेतलेले आहे, सदरील कर्ज गाडीचा अपघात झाला त्‍यामुळे तक्रारदार हे फेडू शकले नाही त्‍यामुळे खर्चाच्‍या पावत्‍या फायनान्‍स कंपनीने घेतल्‍याचे तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या दुरुस्‍ती खर्चाचे निरीक्षण करता तसेच सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे झालेल्‍या नुकसानीबाबत जो रिपोर्ट हजर केला आहे त्‍याचे अवलोकन केले असता त्‍याचप्रमाणे सदरील गाडी ज्‍या सालात उत्‍पादीत करण्‍यात आली ती विचारात घेता, या मंचाचे असे लक्षात येते की, खर्चामध्‍ये काही बाबी समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या आहेत की त्‍या इन्‍शुरन्‍स कंपनी देय होत नाही. सामनेवाला यांनी दुरुस्‍ती खर्च लेबर चार्जेस याचा विचार करुन एकूण दुरुस्‍ती खर्चरु.61,150/- असा निश्चित केला आहे. त्‍यामध्‍ये salvage value रु.2,000/- व less रु.1,000/- वजा करुन एकूण रक्‍कम रु.58,150/- निश्चित केलेली आहे. त्‍या बाबीचा विचार केला असता व तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या दुरुस्‍ती खर्चाचा विचार केला असता या मंचाचे मत असे पडते की, तक्रारदार हे रक्‍कम रु.70,000/- वाहनाचा दुरुस्‍ती खर्च म्‍हणून मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारदार यांचाक्‍लेम सामनेवाला यांनी नाकारुन तक्रारदार यांना जो मानसिक व शारिरिक त्रास झालेला आहे त्‍याबाबत रक्‍कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.3,000/- मिळण्‍यास पात्र आहे. तसेच तक्रारदार हे सदरील रक्‍कम तक्रार दाखल केल्‍यापासून सदरील रकमेवर द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. सबब मुददा क्रमांक 1 व 3 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2) सामनेवाला इन्‍शुरन्‍स कंपनी यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी
रक्‍कम रु.70,000/- (अक्षरी रु.सत्‍तर हजार) तक्रारदार यांना
निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत द्यावी. सदर रक्‍कम
विहीत मुदतीत न दिल्‍यास संपूर्ण रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून
रक्‍कम वसूल होईपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज द्यावे.
3) सामनेवाला यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदार यांना
झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व
तक्रारीचा खर्च रु.3,000/-द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.


श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्‍य अध्‍यक्ष
 

 


 

 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.