Maharashtra

Dhule

CC/11/1

Shri Guiabrao rajaram Patil R/o Bhadane Tal Shirpur Dist Dhule - Complainant(s)

Versus

Shiram Bioseeds Genetics India Ltd Plot No 206 Haidrabad A P - Opp.Party(s)

A P barde

21 Nov 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/11/1
 
1. Shri Guiabrao rajaram Patil R/o Bhadane Tal Shirpur Dist Dhule
...........Complainant(s)
Versus
1. Shiram Bioseeds Genetics India Ltd Plot No 206 Haidrabad A P
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.R.Londhe PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

 

निकालपत्र

(द्वारा : मा.अध्‍यक्ष - श्री.व्‍ही.आर.लोंढे)

 

(१)       तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्‍वये, सामनेवाले यांनी मक्‍याचे निकृष्‍ट दर्जाचे बियाणे पुरवून सेवेत त्रुटी ठेवली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.

 

(२)       तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात येणे प्रमाणे.   

          तक्रारदार हे मौजे भटाणे, ता.शिरपूर जि.धुळे येथे राहतात.  तक्रारदार हे व्‍यवसायाने शेतकरी आहेत.  तक्रारदार यांचे नांवे मौजे भटाणे येथे सर्व्‍हे नं.१०२/५ ही शेतजमीन नोंदलेली आहे.  तक्रारदार यांना उत्‍तम शेती करण्‍याचा अनुभव आहे.  तक्रारदार हे ब-याच वर्षापासून त्‍यांचे शेतात मक्‍याचे पिक घेतात.  तक्रारदार यांची शेतजमीन बागायती आहे.  सामनेवाले क्र.१ हे सदर बियाणे उत्‍पादक कंपनी असून, सामनेवाले क्र.२ हे बियाणे विक्रेते आहेत.  सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदार यांना सामनेवाले क्र.१ यांनी उत्‍पादीत केलेले “मका राजकुमार गोल्‍ड” या वाणाच्‍या बियाण्‍याची लागवड करा असे सांगीतले  व चांगले उत्‍पादन होईल याची हमी दिली.  सामनेवाले क्र.२ यांचे शब्‍दावर विश्‍वास ठेवून तक्रारदार यांनी आठ किलो वजनाच्‍या दोन बियाण्‍याच्‍या पिशव्‍या प्रत्‍येकी रक्‍कम रु.१,१००/- प्रमाणे खरेदी केल्‍या.  सामनेवाले क्र.२ यांनी बिल नं.ए १०२२४ दिले.  तक्रारदार यांनी दिलेल्‍या मार्गदर्शनानुसार दि.२६-१२-२००९ रोजी लागवड केली.  बियाण्‍यामध्‍ये उत्‍पादन दोष व निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याने पिक उगवले नाही.  तक्रारदार यांनी पिकांना योग्‍य खतपाणी वापरले.  काही किरकोळ मक्‍याची रोपे उगवलेली आढळली.  तक्रारदार यांनी बियाणे सदोष असल्‍याबाबत दि.१८-०१-२०१० रोजी कृषिविभाग यांचेकडे तक्रार केली.  तक्रारदार यांनी मका पिकाचे फोटोही काढलेले आहेत.  कृषि अधिकारी यांनी मका पिकाची पाहणी केली व बियाण्‍यामध्‍ये उगवणक्षमता कमी असल्‍यामुळे उत्‍पन्‍नात घट येणार असल्‍याची नोंद केली.  सामनेवाले क्र.१ यांनी सदोष बियाण्‍याचे उत्‍पादन केले व सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदार यांना चांगल्‍या उत्‍पन्‍नाची हमी देऊन बियाणे घेण्‍यास भाग पाडले.  सदरील बियाणे निकृष्‍ट आणि नपूसक असल्‍यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले.  तक्रारदार यांना दर एकरी रु.५०,०००/- चे उत्‍पन्‍न मिळाले असते.  तक्रारदार यांनी खते, मेहनत, मशागत यासाठी रु.३०,०००/- एवढा खर्च केला.  सामनेवाले यांनी दोषयुक्‍त बियाणे पुरविल्‍यामुळे तक्रारदार यांना रु.१,३०,०००/- एवढे नुकसान सोसावे लागले.  तक्रारदार यांनी सामनेवाले यांना नोटीस पाठविली.  सामनेवाले यांनी नोटीसीस उत्‍तर दिले नाही.  तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत.  सबब तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांच्‍याकडून नुकसानीपोटी रक्‍कम रु.१,३०,०००/- मिळावेत तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.१,००,०००/- व तक्रारीचा खर्च रु.५०,०००/- मिळावेत अशी विनंती केली आहे. 

 

(३)       सामनेवाले क्र.१ हे या मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी नि.नं.१२ अन्‍वये लेखी खुलासा दाखल केला.  सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेल्‍या सर्व बाबी स्‍पष्‍टपणे नाकारल्‍या आहेत.  सामनेवाले यांचे कथन की, कृषिअधिकारी यांनी केलेल्‍या पंचनाम्‍यामध्‍ये बियाण्‍याची उगवण चांगली झाल्‍याबाबत लिहिलेले आहे.  सदरील पंचनाम्‍यामध्‍ये अनेक त्रुटी आहेत.  पंचनाम्‍यामध्‍ये ०.२० हेक्‍टर क्षेत्रामध्‍ये ९०० एम गोल्‍ड मॉनसेटो बियाणे पेरले बाबत नमूद केले आहे.  तक्रारदार यांनी ०.८० आर क्षेत्रामध्‍ये मका पेरलेला नाही.  सामनेवाले क्र.१ यांनी पुढे असे कथन केले आहे की, बियाण्‍यामध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा उत्‍पादकीय दोष नाही.  सामनेवाले क्र.१ यांनी उच्‍च प्रतीच्‍या बियाण्‍याचा पुरवठा केलेला आहे.  सामनेवाले क्र.१ यांनी सदरील बियाणे प्रयोगशाळेत तपासून त्‍याची उगवणशक्‍ती ९५ ते ९८ टक्‍के असल्‍याबाबत रिपोर्ट दिलेला आहे.  सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेली नाही, सबब तक्रार रद्द करण्‍यात यावी.

 

(४)       सामनेवाले क्र.२ यांना रजिष्‍टर्ड पोष्‍टाने नोटीस प्राप्‍त झाली.  परंतु ते मंचासमोर हजर झाले नाहीत.  सबब त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला आहे. 

 

(५)       तक्रारदार यांनी नि.नं.४ सोबत बियाणे खरेदी केल्‍याच्‍या छायांकीत पावत्‍या, कृषिअधिकारी धुळे यांनी केलेला पंचनामा, पिक पाहणी अहवाल, पिक परिस्थितीचा पंचनामा, सामनेवाले यांना पाठविलेल्‍या नोटीसीची प्रत तसेच पुराव्‍याकामी स्‍वत:चे शपथपत्र नि.नं.१४ वर दाखल केले आहे.   सामनेवाले क्र.१ यांनी पुराव्‍याचे शपथपत्र नि.नं.१२ वर दाखल केले आहे.  तक्रारदार यांनी लेखी युक्तिवाद नि.नं.१५ वर दाखल केला आहे.  सामनेवाले क्र.१ यांचे वकील व सामनेवाले क्र.१ हे ब-याच तारखांपासून गैरहजर आहेत.  त्‍यांनी युक्तिवाद केला नाही. 

मुद्देः

   निष्‍कर्षः

(अ) सामनेवाले यांनी तक्रारदार यांना निकृष्‍ट दर्जाच्‍या बियाण्‍याची विक्री करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय ?

:  नाही

(ब) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

:  नाही

(क) आदेश काय ?

: अंतिम आदेशा प्रमाणे

विवेचन

(६)       मुद्दा क्र. “अ” आणि “ब” :-   तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या लेखी युक्तिवादामध्‍ये असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांनी उत्‍पादीत केलेले “मका राजकुमार गोल्‍ड” या जातीच्‍या मका बियाण्‍याच्‍या आठ किलोच्‍या दोन पिशव्‍या प्रत्‍येकी रक्‍कम रु.१,१००/- याप्रमाणे खरेदी केल्‍या.  तक्रारदार यांनी सदरील बियाण्‍यांची लागवड दि.२६-१२-२००९ रोजी केली.  सदरील बियाणे सदोष असल्‍यामुळे त्‍याची उगवण क्षमतेपेक्षा कमी झाली.  तक्रारदार यांनी जमिनीची योग्‍य प्रकारे मशागत केली होती.  पिकास योग्‍य पाणी पुरवठा व खते याचा वापर केला होता.  मक्‍याची रोपे कोमेजून जळून पडली होती.  सदरील बियाणे निकृष्‍ट असल्‍याबाबतची बाब कृषिअधिकारी यांना कळविण्‍यात आली.  कृषिअधिकारी यांनी पिकाची पाहणी करुन बियाण्‍यामध्‍ये उगवणक्षमता व शक्‍ती कमी असल्‍यामुळे मोठया प्रमाणात उत्‍पन्‍नात घट येईल असा अभिप्राय दिला.  सदरील बाब तक्रारदार यांनी सामनेवाले यांना नोटीस देऊन निदर्शणास आणून दिली व नुकसान भरपाई मागितली.  सामनेवाले यांनी दखल घेतली नाही.   तक्रारदारांचे एकूण रक्‍कम रु.१,३०,०००/- चे नुकसान झालेले आहे. 

(७)      तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या पिक वादाचे समर्थनार्थ खाली नमूद केलेले न्‍यायनिवाडे दाखल केले आहेत.

  • 2008 NCJ 714 (NC.) : Ankur seeds P.Ltd Vs Kandabrolu Hasen Rao & Ors.

The Hon’ble National Consumer Disputes Redressal  Commission Newdelhi.

     There is expert report in favour of the complainant, on the other hand there is no Expert Report to counter this report on behalf of the petitioner, to rebut the report of the Horticulture Officer or for that matter their own independent evidence in support of the quality of seeds.  The Revision Petition came to be dismissed.

  • IV (2000) CPJ 178 (NC) : E.I.D. Parry (I) Ltd. Vs Gourishankar & Anr.

     It is observed that in order to prove that the seeds was not sub-standard/defective, o. p. could have sent sample for testing – failed to do. So - no adverse inference can be drown against complainant on this ground. 

 

(८)       सामनेवाले यांनी घेतलेला बचावाचा मुद्दा की, बियाणे प्रयोगशाळेमध्‍ये तपासणी केल्‍यानंतर सिलबंद पिशवीमध्‍ये पॅक करुन शेतक-यांना विक्रीसाठी पाठविले जाते.  सदरील बियाण्‍याची उगवणशक्‍ती ९५ ते ९८ टक्‍के आहे.  सदरील बाब बियाण्‍याच्‍या पॉकेटवर नमूद केलेली आहे.  सदरील बियाण्‍यामध्‍ये कोणतीही भेसळ नसून उगवणशक्‍ती चांगली आहे.  तक्रारदार यांनी तक्रारीत व त्‍यांचे शपथपत्रात कथन केले आहे की, सदरील बियाणे उगवले नाही.  हे शाबीत करण्‍यासाठी जो रिपोर्ट दाखल केला आहे, त्‍यावर विश्‍वास ठेवता येणार नाही.  तक्रारदार यांनी बियाण्‍याची पिशवी अथवा बियाण्‍याचे नमूणे या मंचासमोर हजर केलेले नाही.  तसेच ते तपासून घेण्‍याकामी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. 

 

(९)       तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रांचे अवलोकन केले.  तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांनी उत्‍पादीत केलेल्‍या राजकुमार गोल्‍ड मका बियाण्‍याची खरेदी सामनेवाले क्र.२ यांच्‍या दुकानातून केली आहे.  ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या बियाणे खरेदीच्‍या पावतीवरुन दिसून येते.  सबब तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेले बियाणे सामनेवाले यांच्‍याकडून विकत घेतले आहे ही बाब स्‍पष्‍ट होते.  तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. 

          तक्रारदार यांनी खरेदी केलेले बियाणे प्रथमदर्शनी सदोष होते हे शाबीत करण्‍याची जबाबदारी तक्रारदार यांचेवर आहे.  तक्रारदार यांनी या मंचासमोर पिक पाहणीचा रिपोर्ट हजर केलेला आहे.  पिक पाहणीच्‍या पंचानाम्‍याचे अवलोकन केले असता, त्‍या रिपोर्टमध्‍ये पिकाची उगवण कमी झाली आहे असे नमूद केले आहे.  पिकाची वाढ चांगली झाली आहे, पिकावर किडीचा प्रादुर्भाव नाही, तसेच पाच ठिकाणी एक चौरसमिटर क्षेत्रातील झाडांची संख्‍या मोजली असता, सहा रोपे एक चौरसमिटरवर आढळून आली.  तसेच पेरणी केलेल्‍या क्षेत्रापैकी ०.२० हेक्‍टर क्षेत्रावर ९०० एम गोल्‍ड पेरलेला आढळून आला.  त्‍याची उगवणशक्‍ती चांगली असल्‍याचे आढळून आले.  उगवणशक्‍ती कमी असल्‍यामुळे उत्‍पन्‍नात घट झाली असे नमूद केलेले आहे.  केवळ बियाणे हे कमी प्रमाणात उगवले यावरुन सदर बियाणे सदोष होते असा निष्‍कर्ष काढणे योग्‍य होणार नाही.  सदरील मका बियाण्‍याची पेरणी गट नं.१०२/५ मध्‍ये केल्‍याचे म्‍हटले आहे.  तक्रारदार यांनी ७/१२ च्‍या उता-याची छायांकीत प्रत दाखल केली आहे.  सदरील ७/१२ उता-यावर तक्रारदार क्र.२ इंदूबाई बारकू पाटील यांचे एकटयाचेच नावाची नोंद आहे.  ७/१२ वरील पिक पाहणीची नोंद याचे अवलोकन केले असता रब्‍बी मका ०.८० आर पेरल्‍याबाबत नोंद आहे.  सदरील मक्‍याची रब्‍बी मका म्‍हणून पेरणी करण्‍यात आली आहे.  रब्‍बी पिकाचे उत्‍पादन घेत असतांना बियाण्‍याची उगवणक्षमता ही ब-याचशा बाबीवर अवलंबून असते.  जमीनीत पुरेसा ओलावा असणे आवश्‍यक आहे, बि उगवण्‍यास योग्‍य व पोषक वातावरण असणे आवश्‍यक आहे, बियाण्‍याची उगवणक्षमता चांगली असतांनाही कधीकधी बी उगवण्‍यास पोषक वातावरण नसेल तर बियाण्‍याची उगवण कमी प्रमाणात होते.  तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या पंचनाम्‍यामध्‍ये व पिक पाहणी अहवालामध्‍ये शेतात पाणी देण्‍याची काय व्‍यवस्‍था होती याबाबत कुठेही उल्‍लेख केलेला नाही.  तसेच तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या ७/१२ उता-यामध्‍ये विहिर असल्‍याबाबत नोंद नाही.  त्‍यामुळे फेब्रुवारी महिन्‍यात कोणत्‍या परिस्थितीत पिकाची लागवड केली याबाबत खुलासा उपलब्‍ध नाही.  तक्रारदार यांनी बियाण्‍याचे नमूने अथवा बियाण्‍यांच्‍या पिशव्‍या जतन केल्‍या नाही व त्‍या या मंचासमोर हजर केल्‍या नाहीत. सदरील बियाणे हे सदोष आहे हे प्रयोगशाळेत तपासल्‍याशिवाय व तसा निष्‍कर्ष प्राप्‍त झाल्‍याशिवाय प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये बियाणे सदोष होते असा निष्‍कर्ष काढता येणार नाही.    पिक परिस्थितीच्‍या पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता, सदरील अहवालाची छायांकीत प्रत दाखल केली आहे.  तालुका बियाणे तक्रार निवारण समितीचे प्रतिनिधी यांनी सदरील पंचनामा तक्रारदार यांच्‍या शेतावर जावून प्रत्‍यक्ष केला आहे हे स्‍पष्‍ट होण्‍यासाठी, पिक परिस्थितीच्‍या पंचनाम्‍याची मुळ प्रत किंवा सक्षम अधिका-याने प्रमाणीत केलेली प्रत हजर करणे गरजेचे होते. 

          वर नमूद केलेल्‍या कारणमिमांसेवरुन व तसेच तक्रारदार व सामनेवाले यांनी सादर केलेल्‍या पुराव्‍यावरुन या मंचाचे मत की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदोष बियाणे विक्री करुन सेवेत त्रुटी ठेवलेली आहे, ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केलेली नाही.  तक्रारदार यांनी युक्तिवादामध्‍ये नमूद केलेल्‍या केस लॉ ची वस्‍तुस्थिती व या मंचासमोर तक्रारदार यांनी मांडलेली केस यांची वस्‍तुस्थिती भिन्‍न आहे.  त्‍यामुळे सदरील केस लॉ चे तत्‍व या प्रकरणास लागूपडत नाही.   सबब हे मंच मुद्दा क्र. “अ” आणि “ब” चे उत्‍तर नकारार्थी देत आहे.

 

(१०) मुद्दा क्र. “क” :-  उपरोक्‍त सर्व विवेचनाचा विचार करता, हे मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.

आदेश

 

  1. तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्‍यात येत आहे.

(ब)  तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. 

धुळे.

दिनांक : २१-११-२०१४ 

 

                      (श्री.एस.एस.जोशी)       (श्री.व्‍ही.आर.लोंढे)

                          सदस्‍य                अध्‍यक्ष

                          जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 
 
[HON'BLE MR. V.R.Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.