जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 45/2012
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः- 22/02/2012
आदेश तारीख- 05/03/2012
शेख नईम शेख निजामुद्यीन .........तक्रारदार
उ व 40, धंदा व्यापार
रा.तुप बाजार फैजपुर ता. यावल,
जि.जळगांव.
विरुध्द
1. श्री.विठठल रखुमाई अब्रन को ऑप क्रेडी सोसायटी ....... सामनेवाला
भुसावळ, लहान मारोतीजवळ,विठठल मंदीर वार्ड,
भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव.
(समन्स म.मॅनेजर यांचेवर बजवावे)
2. श्री.बी.के.अटकाळे, वसुली अधिकारी(शासन मान्य)
श्री.विठठल रखुमाई अब्रन को ऑप क्रेडी सोसायटी
भुसावळ, लहान मारोतीजवळ,विठठल मंदीर वार्ड,
भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव.
3. श्री.आर.बी.इंगळे, वीशेष वसुली अधिकारी,
श्री.विठठल रखुमाई अब्रन को ऑप क्रेडी सोसायटी
भुसावळ, लहान मारोतीजवळ,विठठल मंदीर वार्ड,
भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव.
4. श्री.प्रमोद किसन चौधरी (मॅनेजर)
रा.शारदा नगर, भोळे कॉलनी, भुसावळ ता.भुसावळ,
जि.जळगांव.
5. श्री.संजय पृथ्वीराज फालक (चेअरमन)
विठठल मंदीर वार्ड,
भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
-------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.हेमंत भंगाळे
नि.6 वरील अंतरिम आदेश
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष ः तक्रारदार यांनी श्री.विठठल रखुमाई अब्रन को ऑप क्रेडी सोसायटीकडुन घेतलेल्या कर्जची पुर्ण परतफेड केल्यानंतरही संस्थेने तक्रारदाराची मिळकत विक्री करण्याची धमकी देऊन सेवेत त्रुटी केल्यामुळे तक्रारदार यांनी या मंचात तक्रार दाखल केली आहे व ती प्रलंबीत आहे. सदर तक्रारीत तक्रारदार यांनी नि.6 वर तुर्तातुर्त मनाई हुकूम मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी सोसायटीकडुन दि. 04/12/2003 रोजी रु.2,00,000/- चे कर्ज घेतले होते. सदर कर्जास त्यांनी गट नं.52 मधील मिळकत तारण दिली होती व त्यांचा बोजा 7/12 उता-यावर घेतला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी सदर कर्जाची संपुर्ण परतफेड केली आणी निलचा दाखला घेतला. त्याबाबत दुयम निबंधक,सावदा येथे दस्त क्र.1784/10 दि.07/05/2010 रोजी नोंदवला, असे असतांना विरूध्दपक्षाने तक्रारदारास दि.28/01/12 रोजी दिलेला लवाद संपुर्ण रक्कम भरणेचे अपेंडीक्स पत्र पाठवुन दिले व रक्कमेची मागणी केली. विरुध्द पक्षाने केलेली कार्यवाही ही खोटी व बेकायदेशीर आहे असे म्हटले आहे.
3. आम्ही तक्रारदार त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची अवलोकन केले आहे त्यावरुन संस्थेने तलाठी यांना पत्र देऊन बोजा कमी करण्याबाबत कळवल्याचे दिसुन येते त्यावरुन तक्रारदाराच्या मिळकतीवरील कर्जाचा बोजा कमी झालेला आहे. अशा परिस्थीतीत तक्रारदाराचा तुर्तातुर्त आदेश मिळण्याचा अर्ज मंजुर न केल्यास तक्रारदार यांचे नुकसान होऊ शकते असे आम्हास वाटते त्यामुळे पुढील आदेशापर्यत संस्थेने तक्रारदाराची मिळकतीचे विक्री करु नये, असा आदेश करणे आम्हास योग्य व न्यायाचे वाटते.
4. वरिल विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांचा तुर्तातुर्त मनाई हुकूमाचा अर्ज मंजुर करण्यात येत आहे.
2. विरध्दपक्ष यांनी पुढील आदेशापर्यत तक्रारदाराची मिळकतीचे विक्री करु नये
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.डि.डि.मडके )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव