नि.33 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 136/2010 नोंदणी तारीख – 7/5/2010 निकाल तारीख – 15/10/2010 निकाल कालावधी – 156 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. हेमंतकुमार धनाजीराव सकुंडे 2. सौ लता हेमंतकुमार सकुंडे रा.500अ/6, धनंजय बंगला, डॉ ठोके हॉस्पीटलसमोर, सदर बझार, ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.मिलिंद ओक) विरुध्द 1. श्रीमंत मालोजीराजे गृहतारण सहकारी संस्था मर्या. फलटण, लक्ष्मीनगर, फलटण ता.फलटण जि. सातारा तर्फे चेअरमन 2. संस्थापक/चेअरमन, श्री दुर्योधन दत्तात्रय रणनवरे रा.दत्तकृपा, गोळीबार मैदान, संभाजीनगर, फलटण ता.फलटण जि. सातारा 3. चेअरमन, श्री शंतनू दुर्योधन रणनवरे रा.दत्तकृपा, गोळीबार मैदान, संभाजीनगर, फलटण ता.फलटण जि. सातारा 4. व्हा.चेअरमन, देवराज विश्वासराव जाधव रा.गोळीबार मैदान, फलटण ता.फलटण जि. सातारा 5. संचालक, प्रकाश प्रतापराव जाधव रा.संजीव राजेनगर, फलटण ता.फलटण जि. सातारा 6. संचालक, पुरुषोत्तम लक्ष्मण बक्षी, रा.रॉयल रेसिडेन्सी, फलटण ता.फलटण जि. सातारा 7. संचालक, जोतीराम महादेव गोरे रा. अयोध्या प्रेस फलटण ता.फलटण जि. सातारा 8. संचालक, राजेंद्र रामचंद्र ताम्रे-पाटील रा.गोळीबार मैदान फलटण ता.फलटण जि. सातारा 9. संचालक, पोपट आण्णा जाधव रा.मारवाड पेठ, फलटण ता.फलटण जि. सातारा 10. संचालक, सदाशिव गोविंद घोलप रा.ठाकुरकी, फलटण ता.फलटण जि. सातारा 11. संचालक, बबन भिकु चव्हाण रा.ठाकुरकी, फलटण ता.फलटण जि. सातारा 12. संचालिका, सौ शारदादेवी दुर्योधन रणनवरे रा.गोळीबार मैदान फलटण ता.फलटण जि. सातारा 13. संचालक, यशवंत गजानन कांबळे रा.सुमाहवाडी, फलटण ता.फलटण जि. सातारा 14. संचालिका, सौ कांचन शंकरराव जाधव रा.गोळीबार मैदान, फलटण जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा ) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींवरील व्याज हे दर तिमाही अगर ठेवीची मुदत संपलेनंतर धरण्यात येईल असे अर्जदार व जाबदार यांचेमध्ये ठरले होते. त्याप्रमाणे ठेवपावत्यांच्या पाठीमागील तपशीलाप्रमाणे व्याज जाबदार यांनी अर्जदार यांना दिले. ठेवपावती क्र.009663 ची मुदत संपलेनंतर अर्जदार यांनी ठेवरकमेची मागणी केली असता जाबदार यांनी ठेव रक्कम परत करण्यास नकार दिला. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी व्याजासह होणारी ठेवींची एकूण रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रकमेची मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 7 व 9 ते 12 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र.8, 13 व 14 यांचेविरुध्द जाहीर नोटीस काढण्यात येवूनही ते याकामी नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, जाबदार क्र.1 ते 14 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 व 3 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 6 सोबत दाखल केलेल्या मूळ ठेवपावत्या पाहिल्या. 4. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या होत्या व आहेत. सदरच्या ठेव पावत्यांची मुदत अद्याप संपलेली नाही. तसेच सदरच्या ठेवपावत्यांवरुन जाबदार यांनी अर्जदार यांना व्याजाची काही रक्कम दिल्याचेही दिसून येत आहे. ठेवीची मुदत संपलेनंतर अगर संपणेपूर्वी ठेवरक्कम परत मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. अर्जदारचे इच्छेविरुध्द अर्जदारची ठेव रक्कम जाबदार अडवून ठेवू शकत नाहीत. परंतु अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवपावत्यांवर मुदतपूर्व देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम अर्जदार यांनी मागणी करुनही दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 5. एक गोष्ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र. 3 जे श्रीमंत मालोजीराजे गृहतारण सहकारी संस्था या संस्थेचे चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्या पदावर काम करणा-या व्यक्तीने प्रस्तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्वीकारणे व नेमलेल्या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते. तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 3 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 3 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. जाबदार यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही. सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्ये केलेली विनंती अंशतः मान्य करणे जरुरीचे आहे. 6. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र.020794, 019042, 014099, 020795, 022130 वरील मूळ रक्कम मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. ब. जाबदार यांनी या निकाल तारखेपूर्वी अर्जदार यांना अदा केलेल्या ठेवींवरील व्याजाच्या रकमेची देय रकमेतून वजावट करण्यात यावी. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 15/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |