नि.27 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 144/2010 नोंदणी तारीख - 28/5/2010 निकाल तारीख - 6/9/2010 निकाल कालावधी – 98 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री सुग्रीव सुभेदार शेडगे रा. चिंतामणी अपार्टमेंट, सदनिका क्र.2, लक्ष्मीनगर, रिंगरोड, फलटण ता.फलटण जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.आर.सी.कोरडे) विरुध्द 1. श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्था मर्या.लक्ष्मीनगर फलटण तर्फे मॅनेजर श्री संभाजीराव संपतराव शिंदे रा. रॉयल रेसिडेन्सी, कसबा पेठ, फलटण ता. फलटण जि.सातारा 2. जाबदार क्र.1 तर्फे संस्थापक चेअरमन श्री दुर्योधन दत्तात्रय रणनवरे 3. जाबदार क्र.1 तर्फे चेअरमन श्री शंतनु दुर्योधन रणनवरे नं.2 व 3 रा दत्तकृपा, लक्ष्मीनगर, गोळीबार मैदान, फलटण ता. फलटण जि. सातारा 4. जाबदार क्र.1 तर्फे संचालक देवराज विश्वासराव जाधव रा.दुर्योविश, गोळीबार मैदान, फलटण ता. फलटण जि. सातारा 5. जाबदार क्र.1 तर्फे श्री पुरुषोत्तम लक्ष्मण बक्षी रा. रॉयल रेसिडेन्सी, कसबा पेठ, फलटण ता. फलटण जि.सातारा 6. जाबदार क्र.1 तर्फे संचालक श्री राजेंद्र रामचंद्र झांबरे पाटील रा.गोळीबार मैदान, फलटण ता. फलटण जि. सातारा 7. जाबदार क्र.1 तर्फे श्री जोतीराम महादेव गोरे रा. अयोध्या प्रेस, फलटण ता. फलटण जि. सातारा 8. जाबदार क्र.1 तर्फे संचालक श्री सदाशिव गोविंद घोलप रा.ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा ----- जाबदार क्र.1,5,7,8 (अभियोक्ता श्री अविनाश अभंग) 9. जाबदार क्र.1 तर्फे श्री बबन भिकू चव्हाण रा.ठाकुरकी, ता.फलटण जि. सातारा 10. जाबदार क्र.1 तर्फे सौ शारदादेवी दुर्योधन रणनवरे रा दत्तकृपा, लक्ष्मीनगर, गोळीबार मैदान, फलटण ता. फलटण जि. सातारा 11. जाबदार क्र.1 तर्फे श्री यशवंत गजानन कांबळे रा.धुमाळवाडी, ता.फलटण जि.सातारा 12. जाबदार क्र.2 तर्फे संचालक सौ कांचनमाला शंकरराव जाधव रा. गोळीबार मैदान, फलटण ता. फलटण जि. सातारा 13. जाबदार क्र.1 तर्फे संचालक श्री पोपट आण्णा जाधव रा. मारवाड पेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा मर्या.फलटण तर्फे मॅनेजर संभाजीराव संपतराव शिंदे न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये रक्कम रु.72,000/- मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेली आहे. सदरच्या ठेवीची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची व्याजासहित देय होणारी एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.12 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार संस्थेच्या कर्जदारांनी कर्ज वसुली दिली नाही तसेच ठेवीदारांनी अचानकपणे ठेवी काढून नेल्या त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी जाबदार संस्थेला वेळेवर देता आल्या नाहीत. जसजशा कर्जाच्या थकीत रकमा वसुल होतील, तशा तशा ठेवीदारांच्या ठेवी जाबदार संस्था देण्याची व्यवस्था करीत आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे सभासद आहेत त्यामुळे ते ग्राहक होवू शकत नाहीत. जाबदार क्र.1 संस्थेचे व्यवस्थापक यांनी राजीनामा दिलेला आहे व तो संस्थेच्या संचालक मंडळाने मंजूरही केलेला आहे. तसेच जाबदार क्र.5, 7 व 8 यांनी दिलेला राजीनामाही जाबदार संस्थेने मंजूर केलेला आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांचे कथन आहे. 3. जाबदार क्र.1, 5, 7, व 8 यांनी त्यांचे तक्रारअर्जास नि.19 ला म्हणणे दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. अर्जदारची ठेवरक्कम देण्यास सदरचे जाबदार जबाबदार नाहीत. जाबदार क्र.1 व्यवस्थापक तसेच जाबदार क्र.5, 7 व 8 यांनी राजीनामे दिले असून ते संस्थेच्या संचालक मंडळाने मंजूर केलेले आहेत. त्यामुळे ठेवपरतीची कायदेशीर जबाबदारी त्यांचेवर येत नाही, सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 4. जाबदार क्र.2, 3, 4, 6, 9, 10, 11, 12 व 13 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्तुतकामी दाखल आहेत. सदरचे जाबदार हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 5. जाबदार क्र.1, 5, 7 व 8 यांनी त्यांचे लेखी म्हणणे मध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार हे जाबदार संस्थेचे सभासद असल्याने ते ग्राहक होत नाही. परंतु अर्जदार व जाबदार यांचेमधील वाद हा सहकारी संस्थेचा सभासद व सहकारी संस्था यांचेमधील वाद ठेवीदार ग्राहक व पतसंस्था यांचेदरम्यानचा वाद आहे. त्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मे.मंचाचे अधिकारक्षेत्रात येतो असे या मंचाचे मत आहे. 6. जाबदार क्र.1, 5, 7 व 8 यांनी त्यांचे लेखी म्हणणे मध्ये पुढे असे कथन केले आहे की, सदरचे जाबदार यांनी राजीनामा दिल्याने ठेवपरतीची जबाबदारी कायद्याने त्यांचेवर येत नाही. परंतु ज्या कालावधीत अर्जदारने ठेव ठेवली त्या कालावधीमध्ये सदरचे जाबदार हे जाबदार संस्थेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्या काळातील आर्थिक व्यवहारांची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. तसेच जरी त्यांनी राजीनामे दिले असले व ते मंजूर झाले असले तरी त्यांना संस्थेच्या आर्थिक जबाबदारीतून मुक्त करण्यात आले हे दर्शविणारा सक्षम अधिका-यांचा कोणताही आदेश वा परिपत्रक याकामी जाबदार यांनी दाखल केलेले नाही. त्यामुळे सदरचे जाबदार यांना त्यांचे कायदेशीर देयत्वाची जबाबदारी झटकता येणार नाही. 7. जाबदार क्र.1, 5, 7 व 8 यांनी त्यांचे लेखी म्हणणे मध्ये पुढे असे कथन केले आहे की कर्जवसुलीची कार्यवाही सुरु आहे, जसजशी वसुली होईल तसतसे ठेवीदारांच्या रकमा परत करण्यात येतील. परंतु ठेवीची मुदत संपल्यानंतर अगर संपणेपूर्वी ठेवरक्कम परत मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. कर्जदार वसुली देत नाही हे अर्जदारची ठेव रक्कम परत न करण्यास कायदेशीर कारण ठरु शकत नाही. सबब अर्जदार यांचे शपथपत्र, जाबदार यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार क्र. 1 ते 13 यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवीची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार क्र. 1 ते 13 यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 8. एक गोष्ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र. 2 व 3 जे श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्था या संस्थेचे संस्थापक चेअरमन व विद्यमान चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्या पदावर काम करणा-या व्यक्तीने प्रस्तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्वीकारणे व नेमलेल्या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते. तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 2 व 3 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 व 3 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. जाबदार यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही. सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्ये केलेली विनंती अंशतः मान्य करणे जरुरीचे आहे. 9. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र. 1 ते 13 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र. 025223 वरील मूळ रकमा ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.6/9/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |