Maharashtra

Ratnagiri

CC/33/2023

Sushilkumar Vasant Mulye for Apex Hospital, Ratnagiri - Complainant(s)

Versus

Shilpa Totla for Medi Recruiters Healthcare Recruitment Consultant - Opp.Party(s)

29 Nov 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, RATNAGIRI
Collector Office Compound, Ratnagiri
Phone No.02352 223745
 
Complaint Case No. CC/33/2023
( Date of Filing : 17 May 2023 )
 
1. Sushilkumar Vasant Mulye for Apex Hospital, Ratnagiri
Rampeth Sangmeshwar 415611
Ratnagiri
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shilpa Totla for Medi Recruiters Healthcare Recruitment Consultant
Kushal Path Lab 4 Chirayu Childrens Hospital, F/30, N-5, Near Bajrang Chauk, CIDCO, Chatrapati Sambhaji Nagar 431003
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ARUN R GAIKWAD PRESIDENT
 HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE MEMBER
 HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 29 Nov 2023
Final Order / Judgement

नि. 1 खालील आदेश

(दि. 29-11-2022 रोजी पारीत)

 

द्वारा – मा. श्री अरुण रा.गायकवाड, ध्यक्ष

 

(1)   प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या विरुध्द सामनेवाला यांनी कराराप्रमाणे तक्रारदाराकडून ॲडव्हान्स रक्कम घेऊनही, तीन महिन्यात  डॉक्टर नियुक्तीसाठी कोणतेही प्रयत्न न करुन सामनेवालाने तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे म्हणून दाखल केला आहे. सदरचा तक्रार अर्ज आजरोजी दाखलपूर्व युक्तीवादासाठी नेमण्यात आला होता. तक्रारदार तर्फे विधिज्ञांचा युक्तीवाद ऐकला.

 

(2)   तक्रारदारांची तक्रार पाहता, तक्रारदार ही पार्टर्नरशिप फर्म असून मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल आहे. सदर हॉस्पीटलसाठी PCPNDT, MTP च्या शासनमान्य परवानग्या आहेत. तसेच UROLOGY, PLASTIC SIRGERY, GENERA; SURGERY, ORTHOPADIC,  PHYSICIAN इत्यादीकरिता डॉक्टरांची गरज असते. त्यासाठी तक्रारदार यांनी हॉस्पीटलसाठी डॉक्टर उपलब्ध करुन देणा-या सामनेवाला कंपनीला दि.04/05/2022 रोजी NEFT व्दारे रक्कम रु.50,000/- अदा करुन सामनेवालांसोबत करार केला. सदर कराराप्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदार हॉस्पीटलला लागणारे डॉक्टर पुरविले नाही तर Advance cum Security  पोटी घेतलेली रक्कम परत करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे सामनेवाला कंपनीने तकारदारास ॲडव्हान्स पोटी रक्कम भरुनही तीन महिन्यामध्ये एकाही डॉक्टराची उपलब्धता करुन दिली नाही व तक्रारदाराने ॲडव्हान्स रक्कम परत मागणी करुनही ती तक्रारदारास परत दिलेली नाही. ही सामनेवाला यांची सेवेतील त्रुटी असलेने सदरची तक्रार दाखल केली आहे.   

 

(3)   तक्रारदार तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार ही फर्म मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल असून त्यामध्ये वेगवेगळे डॉक्टरांची नेमणूक करुन वेगवेगळया आजारावर उपचार केले जातात. त्याकरिता येणा-या पेशन्टकडून रक्कम घेतली जाते. सदरची फर्म ही धर्मादाय संस्था (Charitable Trust) नसून सदरचे हॉस्पीटल हे व्यावसायिक कारणासाठी चालविले जाते. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार या आयोगास ग्राहक तक्रारीचे निवारण करण्यासाठी आदेश देण्याबाबत ज्या तरतुदी केल्याआहेत, त्यामध्ये तक्रारदाराने मागणी केलेल्या बाबींचा समावेश होत नाही. तक्रारदाराने विनंती कलमामध्ये ज्या मागण्या केल्या आहेत, त्या ग्राहक संरक्षण कायदयाच्या अधिकारकक्षेमध्ये येत नाहीत असे या आयोगाचे मत आहे. सबब, ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींनुसार प्रस्तुतची तक्रार या आयोगास चालविणेचे अधिकारक्षेत्र या आयोगास नाही या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे. सबब योग्य त्या न्यायालयात / सक्षम ऑथॉरिटीकडे दाद मागणेचा तक्रारदाराचा हक्क अबाधित ठेवून प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदारास परत करण्यात येतो. सबब, आदेश

 

आ दे श

 

  1. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होत नसलेने योग्य त्या न्यायालयात/सक्षम ऑथॅारिटीकडे दाद मागणेचा तक्रारदाराचा हक्क अबाधीत ठेवून प्रस्तुतचा तक्रार अज्र तक्रारदारास परत करण्यात येतो.

 

  1. खर्चाबाबत आदेश नाही.

 

 
 
[HON'BLE MR. ARUN R GAIKWAD]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. SWAPNIL D MEDHE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. AMRUTA N BHOSALE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.