निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 22.07.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 29.07.2010 तक्रार निकाल दिनांकः- 25.01.2011 कालावधी 5महिने26 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 सुनिल संदीपानराव कोल्हे अर्जदार वय 32 वर्षे मु.पो.मानवत गोलाईत कॉलनी, स्वतः नविन बस स्टॅड समोर ता.मानवत जि.परभणी विरुध्द 1 सिध्दी विनायक फ्रेट प्रा.लिमीटेड मार्फत प्रतिनीध मानवत ( मध्यवर्ती बस स्थानक ), मानवत ता.मानवत जि.परभणी. 2 सिध्दी विनायक फ्रेट प्रा.लिमीटेड गैरअर्जदार पहिला मजला श्रीराम कॉम्पलेक्स, लोकमत ऑफीसच्या वर साक्री रोड, धुळे 424001. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे अड. वेलणकर कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्य ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या ) अर्जदाराचे कुरीअर गैरअर्जदाराने गहाळ करुन त्रूटीची सेवा दिल्याबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा. मानवत येथील रहीवासी असून त्याने मानवत येथून पुणे येथील त्याच्या नातेवाईकाना त्यांच्या मुलीच्या वैद्यकीय बिलाच्या संपूर्ण मुळ पावत्या गैरअर्जदाराच्या कुरीअर सेवेमार्फत पाठवल्या होत्या. दिनांक 03.02.2010 रोजी मानवत येथून पाठवलेले कुरीअर घेण्यासाठी पुणे येथे दिनांक 04.02.2010 रोजी सकाळी 10.30 वाजता अर्जदाराचे नातेवाईक गेले असता तेथिल व्यवस्थापकानी दुस-या दिवशी येण्यास सांगितले व दुस-या दिवशीही गेल्यानंतर फोनवरुन संपर्क करत रहा पार्सल मिळाले की तुम्हाला देण्यात येइल असे सांगण्यात आले व शेवटी कुरीअर मिळत नसल्याचे सांगण्यात आले. या कुरीअरमधून अर्जदाराने त्याचे नातेवाइक अरुण शिवाजीराव काळे यांच्या मुलीच्या वैद्यकीय बिलाच्या सर्व मुळ पावत्या ज्याची किंमत रुपये 10000/- होती त्या पाठवल्या होत्या. या बिलाची रक्कम अरुण काळे याना शासकीय नियमानुसार मिळाली असती कारण ते शासकीय सेवेत आहेत. गैरअर्जदाराने कुरीअर गहाळ करुन त्यांना बिलाची रक्कम मिळण्यापासून वंचीत ठेवले व त्यांचे नुकसान झाले म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2), कुरीअर पाठवल्याची पावती, गैरअर्जदाराशी केलेला पत्रव्यवहार वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत . गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात गैरअर्जदार आपली कुरीअर सेवा देण्याचे काम महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या अधिपत्याखाली करतात म्हणून राज्य परीवहन महामंडळाल्ला यात पक्षकार करणे जरुरीचे होते तसेच ज्यांच्या वैद्यकीय बिलाबाबत रुपये 10,000/- नुकसान भरपाई मागितली आहे त्याचाही तक्रारीत अर्जदार म्हणून समावेश नाही. म्हणून Non joinder of necessary parties या कायदेशीर आक्षेपावर तक्रार फेटाळण्यायोग्य आहे असे म्हटले आहे. जी व्यक्ति गैरअर्जदाराची ग्राहक नाही त्या व्यक्तिस होणा-या नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केलेली आहे म्हणून देखील ही तक्रार या न्यायमंचासमोर चालण्यास योग्य नाही. अर्जाराने कुरीअरमधून रुपये 10000/- ची मुळ वैद्यकीय बिले पाठवली होती याबाबत कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही व जर या कागदपत्रांची किंमत रुपये 10,000/- होती तर अर्जदाराने त्याचा विमा उतरवणे आवश्यक होते. गैरअर्जदाराने दिनांक 03.02.2010 रोजी पावती क्रमांक 3539023 अन्वये नोंदवलेले एक टपाल पूणे येथे पाठवले होते मात्र अवधनाने गहाळ झाले. अर्जदाराने याबाबत ‘’ लेखी तक्रार 30 दिवसाच्या आत लेखी स्वरुपात करावी व त्यानंतरच्या कोणत्याही तक्रारीचा विचार केला जाणार नाही ‘’ असे पावतीच्या मागील बाजूस छापलेल्या अटी व शर्तीप्रमाणे आहे. असे असताना अर्जदाराने दिनांक 26.03.2010 रोजी नोटीस पाठवली म्हणून गैरअर्जदाराने त्याचा विचार केला नाही. अर्जदाराला गैरअर्जदाराने नियमाप्रमाणे रुपये 100/- देवू केले होते पण अर्जदाराने ती स्विकारली नाही म्हणून अर्जदाराला गैरअर्जदाराने कोणतीही त्रूटीची सेवा दिलेली नाही म्हणून ही तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारीत दाखल कागदपत्र व युक्तिवादावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. . मुद्दे. उत्तर. 1 तक्रारीस Non Joinder of necessary parties या न्यायतत्वाची बाधा येते काय ? नाही 2 गैरअर्जदारानी अर्जदारास त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 3 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराने दिनांक 03.02.2010 रोजी पुणे येथे श्री. अरुण काळे याना गैरअर्जदारातर्फे एक पार्सल पावती क्रमांक 3539023 व्दारे पाठवले होते ही बाब सर्वमान्य आहे. गैरअर्जदाराने या तक्रारीस Non Joinder of necessary parties या न्यायतत्वाची बाधा येते म्हणून ही तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार आपली कुरीअर सेवा देण्याचे काम महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या अधिपत्याखाली करतात म्हणून राज्य परीवहन महामंडळाला यात पक्षकार करणे जरुरीचे होते असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदार हे महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामडळाकडून कॉंट्रक्ट घेवून बसेस व्दारे कुरीअर पाठवतात. नि. 3/1 वर दाखल पावतीवर सिद्यीविनायक फ्रेट प्रा. लिमीटेड असेच छापलेले आहे व अर्जदाराकडून पार्सल घेउन ज्याने पावती दिली त्यानेसुध्दा सिद्यीविनायक फ्रेट प्रा.लिमीटेड करीता अशीच सही केली आहे. त्यामुळे अर्जदाराने हया तक्रारीत महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाला पक्षकार केले नसले तरी त्याला Non Joinder of necessary parties या न्यायतत्वाची बाधा येत नाही म्हणून मुद्या क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. अर्जदाराचे कुरीअर गैरअर्जदाराने गहाळ झाल्याचे लेखी जबाबात मान्य केले आहे. अर्जदाराचे कुरीअर गहाळ करुन गैरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिली आहे. अर्जदाराने तक्रारीत पावती क्रमांक 3539023 व्दारे श्री. अरुण काळे पुणे याना पाठवलेल्या पावतीवर नि. 3/1 कुरीअरने Document पाठवल्याचा उललेख आहे. Insured value या रकान्यात किंमतीचा उल्लेख नाही तसेच अर्जदाराने कुरीअरने रुपये 10,000/- ची बीले पाठवली होती व कुरीअर गहाळ झाल्यामुळे श्री. अरुण काळे याना त्याचा कार्यालयातून या बिलाचा परतावा मिळाला नाही याचा ठोस पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही त्यामुळे अर्जदाराची रुपये 10,000/- ची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी कान्य करता येणार नाही. अर्जदाराच्या तक्रारीवर खालीलप्रमाणे आदेशदेत आहोत. आदेश 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास रुपये 100/- निकाल समजल्यापासून 30 दिवसाच्या आत दयावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रुपये 200/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 200/- आदेश मुदतीत दयावेत. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |