Maharashtra

Kolhapur

CC/09/776

Mahadev Ganapati Bachate - Complainant(s)

Versus

Sheti Biz Bhandar - Opp.Party(s)

S.S.Yadav

09 Mar 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/776
1. Mahadev Ganapati BachateBahireshwar, Tal-Karveer, Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Sheti Biz BhandarLalchand Complex, Vyapari Peth, Shahupuri, Kolhapur 416 001.2. Chairman, Vardha Seeds Co. through Chairman/Managing Director,Opp Haveri Bus Stand, Haveri, Tal-Haveri, Dist.Haveri, Karnataka. ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.S.S.Yadav for the complainant
Adv.Ashok Shrimal of the Opponent No.1

Dated : 09 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.09.03.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 यांनी म्‍हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 यांनी म्‍हणणे दाखल केले नाही. परंतु, सामनेवाला क्र.1 या विक्रेत्‍याने सुनावणीचेवेळेस युक्तिवाद केला आहे. तसेच, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला क्र.2 गैरहजर.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           प्रस्‍तुतचे प्रकरण दाखल झालेनंतर तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 उत्‍पादक कंपनीस आवश्‍यक पक्षकार करावा याबाबत तक्रार दुरुस्‍ती अर्ज दिलेला होता. सदरचा अर्ज या मंचाने मंजूर केला. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 कंपनीने उत्‍पादित केलेले    पॅडी आर 1 (एफ/एस्) या जातीचे भात बियाणे सामनेवाला क्र.1 विक्रेत्‍याकडून दि.28.05.2009 रोजी खरेदी केले आहे व सदर भात बियाणे तक्रारदार यांनी दि.04 व 05 जून 2009 रोजी त्‍यांच्‍या शेत जमिन एकूण 40 आर क्षेत्रामध्‍ये मशागत करुन लागवड केली. सदर भाताची लागवड केलेनंतर 2 ते सव्‍वादोन महिन्‍यात सदर भात बियाणामध्‍ये भेसळ असल्‍याचे दिसून आले. याबाबत सामनेवाला क्र.1 यांना प्रत्‍यक्ष भेटून भेसळीबाबत कळविले. परंतु, त्‍यांनी त्‍याची दखल घेतली नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली. सदर समितीने दि.01.10.2009 रोजी प्रत्‍यक्ष भेट देवून पिकाची पाहणी केली व सदर बियाणामध्‍ये भेसळीची टक्‍केवारी 51 टक्‍के असलेबाबतचा अहवाल दिला. तक्रारदारांच्‍या एकूण 40 आर क्षेत्रामध्‍ये तक्रारदारांना अंदाजे 60 क्विंटल इतके भाताचे उत्‍पन्‍न मिळाले असते. स्‍थानिक बाजारभाव विचारात घेतला असता रक्‍कम रुपये 66,000/-, पिक लागवड खर्च रुपये 11,000/- इतकी रक्‍कम तसेच मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/-, खर्च रुपये 5,000/- इत्‍यादी रक्‍कमा व्‍याजासह देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(3)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत बियाणे खरेदी कॅश मेमो नं.1300, 1301, कृषि अधिकारी-जि.प. यांना दिलेला तक्रार अर्ज दि.16.09.2009, गट विकास अधिकारी-पंचायत समिती यांना दिलेला तक्रार अर्ज दि.16.09.2009, जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समितीचा निष्‍कर्ष अहवाल दि.14.10.2009, सामनेवाला यांना दि. 27.10.2009 तसेच दि.14.01.2010 रोजी पाठविलेली नोटीस, कोल्‍हापूर शेती उत्‍पन्‍न बाजार समितीचा दि.25.06.2010 रोजीचा दाखला इत्‍यादीच्‍या प्रती व शपथपत्र दाखल केल आहे.
 
(4)        सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये सदर समानेवाला यांनी उत्‍पादित केलेले भात बियाणे खरेदी केले, त्‍याची लागवड केली व सदर बियाणामध्‍ये दोष होता इत्‍यादी कथने चुकीचे आहेत. तसेच, तक्रारदारांचे नुकसान झाले आहे हे तक्रारदारांचे कथन चुकीचे आहे. जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समितीने दिलेला अहवाल सदर सामनेवाला यांना मान्‍य नाही. सामनेवाला यांनी उत्‍पादित केलेले भात बियाणे यामध्‍ये कोणताही दोष नाही. याबाबत कर्नाटका स्‍टेट सीडस् एजन्‍सी यांनी दिलेल्‍या चाचणी अहवाल यावरुन बियाणांमध्‍ये 99 टक्‍के शुध्‍दता होती. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 13 अन्‍वये कोणत्‍याही तज्‍ज्ञ मताचा अहवाल आलेला नाही. तसेच, तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत उल्‍लेख केलेल्‍या समस्‍या या वातावरणातील परिस्थिती, क‍मी-जास्‍त प्रमाणात तापमानात होणारे बदल, अपुरा होणारा पाऊस, शेती करणेची पध्‍दत इत्‍यादी बाबींमुळे नुकसान होवू शकते. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(5)        तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचे वकिलांनी युक्तिवाद केला. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केलेले नाही. उपलब्‍ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता, सामनेवाला क्र.2 कंपनीने उत्‍पादित केलेले पॅडी आर 1 (एफ/एस्) या जातीचे भात बियाणे सामनेवाला क्र.1 विक्रेत्‍याकडून खरेदी केले आहेत. तसेच, सदर भाताची लागवड तक्रारदारांनी 40 आर क्षेत्रामध्‍ये केली आहे. सदर भात बियाणे सदोष असल्‍याने तक्रारदारांनी जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समिती यांचेकडे तक्रार दिली आहे. इत्‍यादी वस्‍तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समितीच्‍या अहवालाचे अवलोकन केले असता समितीमध्‍ये पुढीलप्रमाणे सदस्‍या म्‍हणून पाहणी केलेले आहेत :-

अ.क्र.
सदस्‍या व अधिका-यांचे नांव
हुद्दा
1.
श्री.एस्.एम्.तोटावार
अध्‍यक्ष, जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समिती तथा कृषि विकास अधिकारी, जिल्‍हा परिषद, कोल्‍हापूर.
2.
प्रा.एस्.बी.चव्‍हाण
सदस्‍य, जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समिती तथा सहायक प्राध्‍यापक, कृषिविद्या विभाग, कृषि संशोधन केंद्र, कृषि महाविद्यालय, कोल्‍हापूर.
3.
श्री.बी.एस्.मेहेर
सदस्‍य, जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समिती, कोल्‍हापूर तथा प्रतिनिधी, जिल्‍हा बीज प्रमाणिकरण अधिकारी, सातारा.
4.
श्री.एस.बी.चव्‍हाण
सदस्‍य, जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समिती तथा तालुका प्रतिनिधी, महाबीज, कोल्‍हापूर.
5.
श्री.एस.ए.मगदूम
सदस्‍य सचिव, जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समिती तथा मोहिम अधिकारी, जिल्‍हा परिषद, कोल्‍हापूर.
6.
श्री.एस्.बी.देशमुख
वि.अ.(कृषि), जि.प., कोल्‍हापूर.
7.
श्री.महादेव गणपती बचाटे
तक्रारदार शेतकरी
8.
सौ.अर्चना कारंडे
वि.अ.(कृषि), पं.स.करवीर.

 
(6)        उपरोक्‍त समितीने सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारदारांना ज्‍या लॉटची बियाणे विक्री केलेली त्‍या लॉटची‍ बियाणे इतर शेतक-यांना विक्री केलेबाबतचा मागणी करुन इतर शेतक-यांच्‍या प्‍लॉटच पाहणी केली आहे व सदर प्‍लॉटमध्‍येही भेसळ असलेचे सदर समितीने अहवालात नमूद केले आहे. सदर समितीने काढलेला निष्‍कर्ष हा पुढीलप्रमाणे :-
 
वर्धा सिडस् उत्‍पादित (लॉट क्र.एफ-1) उत्‍पादित व शेती बीज भांडार, शाहुपूरी, कोल्‍हापूर या विक्रेत्‍याकडून खरेदी केलेले भात बियाणे आर-1 पासून घेतलेल्‍या पिकामध्‍ये सरासरी 51 टक्‍के भेसल असल्‍याने बियाण्‍यात दोष असल्‍याचे दिसून आले.
(7)        सामनेवाला कंपनीने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 13(1)(सी) अन्‍वये तज्‍ज्ञ मताचा अहवाल नसलेचे कथन केले आहे. परंतु, सामनेवाला यांनी सदर लॉटचा नमुना दाखल केलेला नाही. तसेच, त्‍यांनी उत्‍पादित केलेल्‍या बियाणांबाबतच्‍या शुध्‍दतेबाबत प्रमाणपत्र दाखल केलेले नाही. तसेच, उत्‍पादित कंपनीने प्रयोगशाळेचे घेतलेले चाचणी अहवाल दाखल नाहीत. अशा परिस्थिती जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समितीने दिलेला अहवाला हा विस्‍तृत स्‍वरुपाचा आहे. त्‍यामुळे सदरचा अहवाल हा निर्णायक पुरावा म्‍हणून वाचणेत यावा या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरचा अहवाला विचारात घेता सामनेवाला क्र.2 ने उत्‍पादिक केले व सामनेवाला क्र.1 यांचेकडून खरेदी केलेले भात बियाणे पॅडी आर 1 (एफ/एस्) या बियाणामध्‍ये भेसळ होती या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(8)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये सदर भात बियाणाची लागवड 40 आर क्षेत्रामध्‍ये केली आहे व त्‍यांना 60 क्विंटल भाताचे उत्‍पन्‍न मिळाले असते असे प्रतिपादन केले आहे. तसेच, स्‍थानिक बाजार भाव रुपये 1,000/- क्विटंल असे तक्रारीत नमूद केले आहे. त्‍या अनुषंगाने शेती उत्‍पन्‍न बाजार समिती, कोल्‍हापूर यांचेकडून बाजारभावाचा दाखला घेतलेला आहे. सदर बाजाजभाव सप्‍टेंबर ते ऑक्‍टोबर 2009 या काळातील असलेचा दिसून येतो. कमीत कमी एक हजार व जास्‍तीत जास्‍त अकराशे असा प्रति क्विंटल भाव दशर्वविलेला आहे व बियाणांमध्‍ये 51 टक्‍के भेसळ असलेचे जिल्‍हा बियाणे तक्रार निवारण समितीने नमूद केले आहे. इत्‍यादीचा विचार करता तसेच सामनेवाला क्र.1 विक्रेत्‍याने केलेला युक्तिवाद विचारात घेता सर्वसाधारण पणे रुपयै 30,000/- इतकी रक्‍कम हे मंच निश्चित करीत आहे. तसेच, तक्रारदांनी अनुषंगित दाद मागितली आहे, याचा विचार सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम द्यावी या निष्‍कर्षाप्रत हे मंचयेत आहे. सदरच्‍या रक्‍कम देणेस सामनेवाला क्र.1 व 2 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार आहेत. उपरोक्‍त विवेचनास हे मंच पुढीलप्रमाणे पूर्वाधार विचारात घेत आहे :
 
 (1) IV (2004) CPJ 87 - Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission, Mumbai - Sasya Seeds Pvt.Ltd. and others vs. Padmakar Dattatray Joshi
     
          Consumer Protection Act, 1986 - Sections 2(1)(g) and 15 - Agriculture - Seeds defective - Seeds supplied were ‘Tolerant’ signifying immunity from any disease, did not come up satisfactorily, entirely accepted with viral disease - Evidence and committee’s report produced in support of claim - Deficiency in service proved - Damaged and compensation awarded.
 
 
(2)     III (2004) CPJ 655 - Punjab State Consumer Disputes Redressal Commission, Chandigarh - Sanjay Agro International Vs. Khazan Singh.
 
          Consumer Protection Act, 1986  - Section 2(1)(g) - Agriculture - Seeds defective - Spot inspection conducted by Horticure Develpment Officer - No germination found - Seeds defective proved - Contention, proper procedure regarding sowing of seeds not followed, not acceptable in absence of evidence on record - Deficiency in service proved - Complaint rightly allowed - Appeal against order dismissed.
 
 
(3)     I (2003) CPJ 241 (NC) - National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - National Seeds Corporation Ltd. Vs. Nemmipati Nagi Reddy.
 
          Consumer Protection Act, 1986 - Sections 13 (1(c), 21 (b) - Agriculture - Defective seeds supplied - Growth of fruits not upto the mark - Heavy losses suffered - District Forum relying on the report of Local Commissioner awarded Rs.22,000/- per acre for loss of crop - Order upheld by State Commission - no interference required in revision.
 
(4)     2003 (2) CPR 15 (NC) - National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - National Seeds Corporation Ltd. Vs. M. Madhusudan Reddy and Anr.
 
          (i)       Consumer Protection Act, 1986 - Sections 12 and 17 - Compensation claim for supply of defective seeds which did not yield promised crop - claim resisted on plea that provisions of Consumer Protection Act could not be invoked in view of Seeds Act, 1966 - No provisions in Seeds Act to compensate a farmer for low quality of seed supplied to him - Only under Consumer Protection Act remedy lies for the farmer to be compensated.
 
          (ii)      Consumer Protection Act, 1986 - Section 13 (1) - Caster seeds purchased by Complainant farmer from petitioner did not yield promised quantity of crop resulting in loss to complainant - District Forum directed petitioner to pay Rs.89,000/- with interest - Appeal dismissed by the State Commission - Revision - Contention that provisions of Section 13(1)(c) of the Act was not followed - Provisions of Section 13(1)(c) became unimplementable and fora below relied upon report of Commissioner, a retired Asstt. Director of Agriculture - No interference was called for in the order. 
 
 
(5)     I (2003) CPJ 263 (NC) - National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - Shayam Beej Bhandar Vs. Daria Singh.
                                      
          (i)       Consumer Protection Act, 1986 - Section 2(1)(g) - Agriculture - Seeds - Carrot seed for red carrots purchased - Germination in the field showd 90 % of black carrot & 10% of red carrot - Compensation of Rs.40,000/- awarded by Forum as per report of Local Commissioner, reduced to Rs.20,000/- by State Commission - Compensation for mental agony waived - No interference required in revision.
 
 
(6)     IV (2008) CPJ 119 (NC) - National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi - Pratham Biotech Pvt. Ltd. Vs. Sayed Javed Sayed Amir.
 
          Consumer Protection Act, 1986 - Sections 2(1)(f), 14(1)(d) - Agriculture - Seeds defective - Inspection carried out by Inquiry Committee - Vast variance in chaacteristics of plants found - Complaint allowed by Forum - Compensation granted - Order upheld in appeal - Hence revision - Procedure prescribed under Seeds Act followed - Necessary inquiry held, report given by Seeds Committee - Report cannot be brushed aside on contention that seeds not sent for testing - Order of lower Fora upheld.
 
(7)     III (2008) CPJ 409 - Andhra Pradesh State Consumer Disputes Redressal Commission, Hyderabad - Dannu Hybrid Cotton Seed Vs. Rayarakula Chandramouli & Anr.
 
          Consumer Protection Act, 1986 - Section 2(1)(g), 14(1)(d) - Agriculture - Seeds defective - Crop gave less than expected yield in spite of following all crop management practices - Contention, proper crop management not followed by farmers, not acceptable in absence of documentary evidence - Improbable that proper crop management not followed by all farmers affected by low yield - All seeds sown by farmers - Provisions of Section 13(1)(c) become un-implementable - Alternative methods like report of Expert due to defective, inferior quality of seed proved by report of Expert Committee - Complaints allowed by Forum - Order upheld in appeals - Rate of interest reduced.
 
 
(9)        उपरोक्‍त वि‍वेचन व पूर्वाधार विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
1.    तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
2.    सामनेवाला यांनी तक्रारदारांना रुपये 30,000/- (रुपये तीस हजार फक्‍त) द्यावेत.
 
3.    सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) द्यावेत.
 
4.    सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्‍त) द्यावेत.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT