Maharashtra

Nagpur

CC/510/2017

SUNIL UTTAMRAO BHUYAR - Complainant(s)

Versus

SHATAYUSHI BUILDERS & DEVELOPERS PVT. LTD. THROUGH DIRECTOR SHRI. MANOJ NEMRAJ DAWRE - Opp.Party(s)

ADV. MANGESH BUTE

09 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/510/2017
( Date of Filing : 18 Nov 2017 )
 
1. SUNIL UTTAMRAO BHUYAR
R/O. PLOT NO. 13, HINDPRASAD NAGAR, GODHANI ROAD, GODHANI RAILWAY, NAGPUR-23
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHATAYUSHI BUILDERS & DEVELOPERS PVT. LTD. THROUGH DIRECTOR SHRI. MANOJ NEMRAJ DAWRE
OFF. AT- PLOT NO. 200, UMASHANKAR APARTMENT, GOKULPETH MARKET, COFFI HOUSE CHOWK, NAGPUR-10
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHAKUNTLA NEMRAJ DAWRE, DIRECTOR- SHATAUSHI BUILDERS AND DEVELOPERS PVT. LTD.
OFF. AT- PLOT NO. 200, UMASHANKAR APARTMENT, GOKULPETH MARKET, COFFI HOUSE CHOWK, NAGPUR-10 R/O. B1, CHINTAMANI NAGAR, SOMALWADA, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MANGESH BUTE, Advocate for the Complainant 1
 ADV. ASHOK REWATKAR, Advocate for the Opp. Party 1
Dated : 09 Dec 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस, यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून गजानन गोल्‍डन हाईटस, गोधनी येथील प्रकल्‍पातील पहिल्‍या मजल्‍यावरील सदनिका क्रं. 105 ही रक्‍कम रुपये 15,11,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार दि. 18.11.2013 रोजी  केला होता.  त्‍यानंतर दिनांक 04.03.2014 पर्यंत  तक्रारकर्त्‍याने रक्‍कमेची जुळवाजुळव करुन विरुध्‍द पक्षाला रुपये 10,11,000/- अदा केले  होते व  त्‍याच्‍या पावत्‍या विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या आहेत. तक्रारकर्त्‍याने सदनिकेची उर्वरित रक्‍कम रुपये 5,00,000/- देण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाच्‍या साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी पतसंस्‍था नागपूर यांच्‍याकडून कर्ज घेतले होते व त्‍याकरिता कर्जाच्‍या प्रक्रियेकरिता लागणारे शुल्‍क म्‍हणून तक्रारकर्त्‍याने एक्सीस बॅंकेचा धनादेश क्रं. 242522 अन्‍वये रुपये 40,150/- दिले होते. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने दि. 22.11.2013 रोजी सदरच्‍या सदनिकेचा विक्रीचा करारनामा तयार केला व दि. 27.11.2013 रोजी नोटराईज करुन सहया केल्‍या. परंतु विरुध्‍द पक्षाने सदरच्‍या करारनाम्‍यात रुपये 7,00,000/- कर्ज व रुपये 40,000/- नगदी दिल्‍याचे नमूद केले आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दि. 04.03.2014 रोजी एक्‍सीस बॅंक, नागपूरचा  धनादेश क्रं. 122003 अन्‍वये रुपये 2,40,000/- दिल्‍याची नोंद घेतलेली नाही याबाबत आक्षेप घेतला असता विरुध्‍द पक्षाने आश्‍वासन दिले की, सदरची चूक ही विक्रीपत्रात दुरुस्‍त करुन घेऊ व सदरचा करारनामा बॅंकेत गहाण ठेवण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याकडून परत घेऊन विरुध्‍द पक्षाने आपल्‍या ताब्‍यात घेतला.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष हे दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे वागले नाही व सदनिकेचा ताबा देण्‍याकरिता अनेक वेळा विनंती करुन ही सदनिकेचा ताबा दिला नाही. ठरल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने सदर कर्जाची वसुली दि. 20.03.2013 पासून करावयाची होती, परंतु विरुध्‍द पक्षाने माहे डिसेंबर 2013 पासून तक्रारकर्त्‍याच्‍या आंध्र बॅंक, उच्‍च न्‍यायालय, शाखा, नागपूर येथे असलेले खाता क्रं. 129710011001693 मधून कर्जाच्‍या रक्‍कमेची वसुली अवैधरित्‍या सुरु केली.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिका खरेदी पोटी असलेली संपूर्ण रक्‍कम अदा करुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने सदरच्‍या सदनिकेचा ताबा न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास भाडयाने राहावे लागत आहे. त्‍यानंतर दि. 18.06.2017 रोजी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे नातेवाईक पुरुषोत्‍तम खोटे यांना बोलावून सदरच्‍या सदनिकेचे विक्रीपत्र करुन घेण्‍याकरिता रक्‍कम रुपये 5,00,000/- जमा करावे लागेल असे सांगितले, अन्‍यथा  विरुध्‍द पक्ष आपली पतपेढी मार्फत तक्रारकर्त्‍या विरुध्‍द कार्यवाही करतील.   याबाबत तक्रारकर्त्‍याने चौकशी केली असता सदरच्‍या गजानन गोल्‍डन हाईटस या इमारतीच्‍या बांधकामास सक्षम प्राधिकरणाकडून मान्‍यता मिळालेली नसल्‍याचे समजले.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 22.06.2017 रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली, सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, उभय पक्षात दि. 27.11.2013 रोजी झालेल्‍या करारापत्राच्‍या माहिती पुस्तिकानुसार सदरच्‍या सदनिकेचे व प्रकल्‍पाचे बांधकाम  विरुध्‍द पक्षाने पूर्ण करुन देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच खरेदीखताकरिता लागणारे सर्व शासकीय व निमशासकीय, मालकी हक्‍क परवाना/ आदेश  दस्‍तावेज उपलब्‍ध करुन द्यावे. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून सदरच्‍या सदनिकेचे विक्रीपत्र करुन घेण्‍यास तयार आहे व त्‍याकरिता शासकीय दरा प्रमाणे मुद्रांक शुल्‍क व नोंदणी शुल्‍क भरण्‍यास तयार आहे. उपरोक्‍त सदनिकेचे विक्रीपत्र नोंदवून देणे शक्‍य नसल्‍यास तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये 15,11,000/- व या रक्‍कमेवर दि. 27.11.2015 पासून तर आजपर्यंत द.सा.द.शे. 20 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम वि.प.ने देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच तक्रारकर्ता दि.17.11.2015 पासून भाडयाच्‍या घरात राहत असल्‍यामुळे त्‍याला दरमहा रुपये 10,000/- देण्‍यात यावे, त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

तक्रारकर्त्‍याने आपल्‍या कथनाच्‍या समर्थनार्थ

  1. सतीश कुमार पांडे व इतर विरुध्‍द युनिटेक लिमिटेड (Reported in SCC  

Online NCDRC -14)

2. (Reported in 2017 SCC Online NCDRC -59)

3. मे. अजित रेवतकर कंपनी विरुध्‍द गिरीश जैन (Reported in 2014 SCC Online NCDRC -858) इत्‍यादी  न्‍यायनिवाडे दाखल केलेले आहेत. 

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 ला मंचामार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते मंचासमक्ष हजर झाले नाही अथवा आपला लेखी जबाब ही दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द दि. 20.06.2018 ला प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.  

 

  1.      तक्रारकर्त्‍याने सदरचा करार विरुध्‍द पक्ष 1 श्री. मनोज नेमराज डवरे यांच्‍या सोबत केला होता, परंतु त्‍यांचे दि. 30.12.2017 रोजी निधन झाले त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 ची आई श्रीमती शकुंतलादेवी नेमराज डवरे या नविन संचालक बनल्‍या व त्‍यांना सदर प्रकरणात विरुध्‍द पक्ष 2 हे बनविण्‍यात आलेले आहे. तसेच श्रीमती शकुंतलादेवी नेमराज डवरे हया साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर या पतसंस्‍थेच्‍या देखील संचालक  आहेत.   

 

  1.      विरुध्‍द पक्ष 2 ने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने  सदरची तक्रार नोंदणीकृत विक्रीपत्र करुन मिळण्‍याकरिता दाखल केलेली आहे व तो विक्रीपत्र करुन देण्‍यास तयार आहे. सदरची सदनिका ही गजानन गोल्‍डन हाईटस, गोधनी, नागपूर येथे आहे. तक्रारकर्त्‍याने सदरची सदनिका रुपये 15,11,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार केला होता व त्‍याप्रमाणे रुपये 10,11,000/- जमा केले होते आणि  साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर या पतसंस्‍था कडून दि. 22.03.2014 रोजी रुपये 5,00,000/- चे कर्ज घेतले होते व त्‍याकरता रुपये 7,615/- चा मासिक हप्‍ता भरावयाचा होता. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 हया  संचालक असलेल्‍या साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर या पतसंस्‍थेत 10 हप्‍ते म्‍हणजेच रुपये 76,150/- नियमितपणे भरले. परंतु त्‍यानंतर पुढील हप्‍त्‍याचा भरणा केला नाही व वि.प. 2  हया संचालक म्‍हणून असलेल्‍या गृहतारण पतसंस्‍थेला रुपये 8,28,229/- देणे शिल्‍लक आहे. तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार दाखल करे पर्यंत विरुध्‍द पक्ष 1 ला रुपये 62,000/- देणे बाकी होते. विरुध्‍द पक्ष हे तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे विक्रीपत्र करुन देण्‍यास तयार असतांना सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 कडे संपर्क साधला नाही व सदनिकेची उर्वरित रक्‍कम अदा केली नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे विक्रीपत्र करुन देऊ शकले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 ला देणे असलेली उर्वरित रक्‍कम रुपये 62,000/- व साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर या संस्‍थेकडे कर्जापोटी देय असलेली रक्‍कम रुपये 8,28,229/- दिल्‍यास विरुध्‍द पक्ष आज ही तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे सदनिकेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन प्रत्‍यक्ष  ताबा देण्‍यास तयार आहे.  विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी सेवेत कुठली ही त्रुटी केलेली नसून त्‍यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.

 

  1.      उभय पक्षाने दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

            मुद्दे                                   उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?          होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?   होय
  3. काय आदेश?                              अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या गजानन गोल्‍डन हाईटस, गोधनी येथील प्रकल्‍पातील पहिल्‍या मजल्‍यावरील सदनिका क्रं. 105 ही रक्‍कम रुपये 15,11,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार दि. 18.11.2013 रोजी  केला होता व दि. 27.11.2013 रोजी सदरचा विक्रीचा करारनामा करण्‍यात आला हे नि.क्रं. 2(2) वरील दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने दिनांक 04.03.2014 पर्यंत विरुध्‍द पक्षाला रुपये 10,11,000/- अदा केले असून त्‍याच्‍या पावत्‍या दिलेल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे उर्वरित रक्‍कम रुपये 5,00,000/- देण्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 2 शकुंतला नेमाजी डवरे, हया साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर या पतसंस्‍थेच संचालक असून त्‍यांच्‍याकडूनच कर्ज घेतले होते. परंतु शतायुषी बिल्‍डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रा.लि. हे सदनिकेचे बांधकाम करण्‍याचा व्‍यवसाय करतात व साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर ही पतसंस्‍था असून ती वित्‍तीय पुरवठा करणारी संस्‍था असून दोन्‍ही संस्‍थेने करणारी कार्यवाही तसेच कार्यप्रणाली  ही वेगवेगळी स्‍वरुपाची आहे. सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर यांना पक्षकार केलेले नाही, त्‍यामुळे  सदरच्‍या पतपेढी संस्‍थेकडून घेतलेल्‍या कर्ज रक्‍कमेबाबत या आयोगाने आदेश देणे योग्‍य व न्‍यायोचित होणार नाही असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.   

       तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सदनिकेच्‍या खरेदी पोटी रक्‍कम रुपये 14,49,000/- अदा केली होती व  तक्रारकर्ता सदनिके पोटी असलेली उर्वरित रक्‍कम रुपये 62,000/- देण्‍यास तयार असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्ष हे करारनाम्‍याप्रमाणे वागले नाही तसेच सदनिकेचा ताबा दिला नाही आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास भाडयाने राहावे लागत आहे हे नि.क्रं. 2 वर दाखल किरायापत्र करारनामावरुन दिसून येते.

तक्रारकर्त्‍याने सदरचा करार विरुध्‍द पक्ष 1 श्री. मनोज नेमराज डवरे यांच्‍या सोबत केला होता, परंतु त्‍यांचे दि. 30.12.2017 रोजी निधन झाले त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष 1 ची आई श्रीमती शकुंतलादेवी नेमराज डवरे या शतायुषी बिल्‍डर्स  अॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रा.लि. च्‍या नविन संचालक बनल्‍या व त्‍यानुसार त्‍यांना सदर प्रकरणात विरुध्‍द पक्ष 2 हे बनविण्‍यात आलेले आहे. तसेच श्रीमती शकुंतलादेवी नेमराज डवरे या साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर या पत संस्‍थेच्‍या देखील संचालक आहेत. तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या पत संस्‍थेकडून दिनांक 22.03.2014 रोजी रुपये 5,00,000/- कर्ज घेतले होते.  त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने साईश्रध्‍दा गृहतारण पत संस्‍थेकडे 10 हप्‍ते म्‍हणजेच रुपये 76,150/- भरले. विरुध्‍द पक्ष 2 ही शतायुषी बिल्‍डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रा.लि. याचे व पतपेढी साईश्रध्‍दा गृहतारण सहकारी संस्‍था मर्या. नागपूर या दोन्‍ही प्रतिष्‍ठानाचे संचालक श्रीमती शंकुतला नेमाजी डवरे हया एकच व्‍यक्‍ती आहेत.  विरुध्‍द पक्ष 2 हे तक्रारकर्त्‍याला सदनिकेचे विक्रीपत्र करुन देण्‍यास तयार असतांना सुध्‍दा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष  2 कडे संपर्क साधला नाही व सदनिका पोटी विरुध्‍द पक्ष 1 ला देय असलेली उर्वरित रक्‍कम रुपये 62,000/- अदा  केली नाही तसेच साईश्रध्‍दा गृहतारण या पत संस्‍थेकडून घेतलेल्‍या कर्जाच्‍या रक्‍कमेची परत फेड केली नसल्‍याचे दिसून येते.  

 

  1.      उभय पक्षात ठरल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याला सदरच्‍या सदनिकेचा ताबा न मिळाल्‍यामुळे कर्जाच्‍या परतफेडीचे पुढील मासिक हप्‍ते भरणे बंद केले व ही बाब साईश्रध्‍दा गृहतारण पतसंस्‍थेला नोटीस पाठवून तसेच सहा. निबंधक कॉ-ऑप. यांना देखील कळविली आहे. साईश्रध्‍दा गृहतारण पतसंस्‍था यांनी रुपये 8,35,362/- च्‍या वसुलीकरिता सहकार न्‍यायलय नागपूर येथे  Dispute No.  7481/2019  अन्‍वये तक्रार दाखल केलेली आहे. विरुध्‍द पक्ष साईश्रध्‍दा गृहतारण पत संस्‍था यांनी तक्रारकर्त्‍याकडून रक्‍कम वसुलीकरिता कायदेशीर कार्यवाही करावी.

 

तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांच्‍या सोबत दि. 27.11.2013 च्‍या नोटराईस करारपत्राप्रमाणे रुपये 62,000/-  देणे लागत असल्‍याचे दिसून येते. विरुध्‍द पक्षाने इमारती मधील व तक्रारकर्त्‍याच्‍या सदनिकेमधील अपूर्ण असलेले बांधकाम पूर्ण करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्षाने अवलंबलेली अनुचित व्‍यापारी प्रथा असल्‍याचे दिसून येते. विरुध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे सदरची सदनिकेचे माहिती पुस्तिकानुसार सदनिकेचे प्रकल्‍पाचे बांधकाम पूर्ण करुन द्यावे व सदरच्‍या सदनिकेचे कायदेशीररित्‍या नोंद‍णीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे करुन प्रत्‍यक्ष ताबा द्यावा व सदनिकेच्‍या विक्रीपत्राकरिता लागणारा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

 

  • सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

 

  1. विरुध्‍द पक्ष 2  ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्ष 2 ने सदर सदनिका संबंधी उभय पक्षात झालेला करार दि. 27.11.2013 व माहिती पुस्तिकाप्रमाणे सदरच्‍या सदनिकेचे व प्रकल्‍पाचे बांधकाम पूर्ण करुन द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 2 ने तक्रारकर्त्‍याकडून करारपत्राप्रमाणे उर्वरित असलेली रक्‍कम रुपये 62,000/- स्‍वीकारावी व सदर‍च्‍या सदनिकेचे कायदेशीररित्‍या नोंदणीकृत विक्रीपत्र करुन प्रत्‍यक्ष ताबा द्यावा व विक्रीपत्र नोंदणीकरिता लागणारा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

 

  1. विरुध्‍द पक्ष 2 ने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष 2 ने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.