Maharashtra

DCF, South Mumbai

MA/21/81

MR NIVRUTTI LAXMAN AVHAD - Complainant(s)

Versus

SHATAKSHI INTERIOR THROUGH ITS PROPRIETOR MR MAYUR DEVIDAS MORE - Opp.Party(s)

POONAM MAKHIJANI

27 Oct 2021

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Miscellaneous Application No. MA/21/81
( Date of Filing : 17 Jun 2021 )
In
Complaint Case No. CC/21/152
 
1. MR NIVRUTTI LAXMAN AVHAD
F 3 BANE COMPOUND SANE GURUJI MARG TARDEO MUMBAI 400034
...........Appellant(s)
Versus
1. SHATAKSHI INTERIOR THROUGH ITS PROPRIETOR MR MAYUR DEVIDAS MORE
SECTOR 8 B 13 PLOT NO 845 CHARKOP KANDIVALI WEST MUMBAI 400067
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Oct 2021
Final Order / Judgement

//तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या अं‍तरिम अर्ज क्रमांक एम.ए.21/81 वरील आदेश//

द्वारा – श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा 

     तक्रारदारातर्फे वकील श्रीमती. पूनम माखिजानी हजर.  प्रस्‍तूत प्रकरणामधील तक्रारदार हे 72 वर्षांचे ज्‍येष्‍ठ नागरिक असून त्‍यांनी सामनेवाला यांना तक्रारदाराच्‍या घरामधील Interior work of living area, kitchen, bedroom, bathrooms, passage इ. करण्‍यासाठी दिले होते. त्‍याबाबत सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.13,51,777/- चे कोटेशन दिले असून तक्रारदाराच्‍या घरातील वर नमूद केल्‍याप्रमाणे नूतनीकरणाचे काम सामनेवाला तक्रारदारांना सप्‍टेंबर 2020 पर्यंत पूर्ण करुन देणार असल्‍याचे उभय पक्षात ठरले होते. तक्रारदारांनी सामनेवाला यांना सदर कामासाठी एकूण रक्‍कम रु.12,00,000/- अदा केली असल्‍याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे, त्‍याबाबत सारस्‍वत बॅंकेचा सामनेवाला यांचे नावे अदा केलेल्‍या रकमेचा तपशिल तक्रारदारांनी तक्रारीच्‍या पान क्रमांक 31 वर दाखल केला आहे. एवढया मोठया प्रमाणात रक्‍कम घेऊनही तसेच सामनेवाला यांना तक्रारदाराच्‍या घरातील वर नमूद काम पूर्ण करण्‍याबाबत संधी देऊनही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या घरामधील नूतनीकरणाचे काम अर्धवट ठेवल्‍याने तक्रारदारांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द वर्तकनगर पोलीस स्‍टेशन येथे दि. 04/11/2020 रोजी तक्रार नोंदविली असून, त्‍याची प्रत तक्रारदारांनी पान क्रमांक 38 (Exh.E) वर दाखल केली आहे. तक्रारीच्‍या Exh.F पान क्र. 42 वर एस.व्‍ही.ढोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे यांचेसमक्ष प्रस्‍तूत तक्रारीत नमूद सामनेवाला मयूर मोरे (शताक्षी इंटीरियर यांचे मालक)  यांचा नोंदविलेला जबाब तक्रारदारांनी सादर केला असून त्‍यामध्‍ये श्री. मयूर मोरे यांनी तक्रारदाराकडून वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदाराच्‍या घराच्‍या नूतनीकरणाच्‍या कामाबाबत रक्‍कम रु. 12,00,000/- त्‍यांना प्राप्‍त झाले व तक्रारदाराचे वर नमूद केल्‍याप्रमाणे तसेच उभय पक्षात  ठरल्‍याप्रमाणे नूतनीकरणाचे काम पूर्ण करुन दयायचे आहे व सध्‍यस्थितीत सामनेवाला यांचेकडून उभय पक्षात ठरलेल्‍या कोटेशनप्रमाणे काम पूर्ण करुन देणे बाकी आहे ही बाब सामनेवाला यांनी मान्‍य केली आहे. त्‍यानंतर देखील आजतागायत सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या घरामधील नूतनीकरणाचे काम अदयाप पूर्ण करुन दिले नसल्‍याने दि. 17/04/2021 रोजीच्‍या तक्रारीच्‍या Exh. G वर जोडलेल्‍या V.S. Enterprises यांनी दिलेल्‍या अहवालानुसार, तक्रारदारांना त्‍यांच्‍या घरामधील सामनेवाला यांनी अर्धवट ठेवलेले काम तक्रारदार ज्‍येष्‍ठ नागरिक असल्‍याने तसेच दीर्घ कालावधीपासून सदर काम अपूर्ण अवस्‍थेत असल्‍यामुळे तक्रारदाराच्‍या स्‍वखर्चाने पूर्ण करण्‍यास परवानगी दयावी असा अंतरिम अर्ज MA/21/81 तक्रारदारांनी दाखल केला असून, त्‍याबाबतची नोटीस सामनेवाला यांना पाठविण्‍यात आली. परंतु ती Refused या शे-याने परत आली असल्‍याने सदर अंतरिम अर्जाबाबत तसेच मुळ तक्रारीवर पाठविलेल्‍या नोटीसलाही सामनेवाला यांनी प्रतिसाद न दिल्‍याने व सदर प्रकरणात ते गैरहजर राहिल्‍याने दि. 04/10/2021 रोजी सामनेवाला यांचेविरुध्‍द अंतरिम अर्जाची सुनावणी व मुळ तक्रार एकतर्फा चालविण्‍याचे आदेश पारीत करण्‍यात आले आहेत. सामनेवाला यांना सदर अंतरिम अर्जावर म्‍हणणे दाखल करण्‍यासाठी संधी देऊनही सामनेवाला यांनी सदर अर्जावर त्‍यांचे म्‍हणणे दाखल न केल्‍याने, तक्रारदाराच्‍या वकीलांचा सदर अर्जावर युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदारांनी अभिलेखावर दाखल केलेली तक्रारदाराच्‍या घराच्‍या नूतनीकरणाचे अर्धवट राहिलेल्‍या कामाबाबतचे फोटोग्राफ्स वर्तकनगर पोलीस ठाणे येथे तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार तसेच सामनेवाला यांचा सदर पोलीस ठाण्‍यामध्‍ये नोंदविलेला जबाब इ.चा विचार करुन तसेच तक्रारदार 72 वर्षांचे ज्‍येष्‍ठ नागरिक असल्‍याने तक्रारदाराचा अंतरिम अर्ज मंजूर करणे संयुक्तिक असल्‍याचे आयोगाचे मत आहे. सबब तक्रारदारांनी सदर प्रकरणामध्‍ये दाखल केलेल्‍या वर नमूद अंतरिम अर्जामधील प्रार्थनेनुसार तक्रारदारांना त्‍यांच्‍या घरामधील नूतनीकरणाचे सामनेवाला यांचेकडून अर्धवट राहिलेले काम स्‍वखर्चाने पूर्ण करण्‍यास परवानगी देण्‍यात येते. तक्रारदारांनी सदर काम पूर्ण झाल्‍यावर त्‍याबाबतचा तपशिल/अहवाल पुढील तारखेस दाखल करावा. त्‍याकामी तक्रारदाराच्‍या वकीलांनी दोन महिन्‍याची मुदत दयावी अशी विनंती केली.  तक्रारदाराच्‍या विनंतीनुसार तक्रारदाराच्‍या घरामधील नूतनीकरणाचे काम तक्रारदारांनी स्‍वखर्चाने केल्‍यावर त्‍याचा अहवाल देण्‍याकामी प्रकरण नेमण्‍यात येते. एम.ए/21/81 निकाली काढण्‍यात येते.

    

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.