विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला न्यूनतापूर्ण सेवा दिल्याचे
दिसून येते काय ? होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मागण्यास पात्र आहे काय ? अंशतः.
3) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
- // कारणमिमांसा // -
5. मुद्दा क्र.1 बाबतः तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन तसेच विरुध्द पक्षांनी दाखल केलेले लेखीउत्तर व दि. 30.12.2015 रोजी दाखल केलेले पत्र तसेच उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकला असता असे दिसुन येते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडून नवीन मशिनची असलेली प्रत्यक्ष किंमत देऊन मशिन खरेदी केलेली होती. तसेच त्यावर 24 महिन्यांची वारंटीही कंपनीकडून देण्यांत आलेली होती. परंतु पहिल्या 6 महिन्यांच्या आतच मशिनमध्ये बिघाड झाल्याचे दिसून येते. तसेच त्यासाठी तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्द पक्षाकडे लेखी तक्रारी केल्याचे अभिलेखावरील कागदपत्रांवरुन दिसुन येते. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत बरेचदा विरुध्द पक्षांनी मशिन दुरुस्त करुन दिल्याचे नमुद केलेले आहे, परंतु विरुध्द पक्षाने वेळोवेळी दुरुस्त करुन दिल्याबाबत कुठलेही पावती दिल्याचे दिसून येत नाही. तसेच प्रत्येकवेळी कोणता पार्ट दुरुस्त करुन दिला याबद्दलचेही कागदपत्र तक्रारकर्ता किंवा विरुध्द पक्षाने दाखल केलेली नाहीत. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी दि.30.12.2015 चे पत्रात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्यास या आधीच स्टॅबेलायझर लावण्या विषयी कळविल्याचे नमुद केले आहे. परंतू त्यादाखल कुठलाही कागदोपत्री पुरावा विरुध्द पक्षाने अभिलेखावर दाखल केलेला दिसून येत नाही. तसेच ही बाब लेखीउत्तरातही नमुद नाही यावरुन हे स्पष्ट होत आहे की, तक्रारकर्त्याच्या मशिनमध्ये वारंटी काळातच बिघाड निर्माण झालेला होता आणि जरी वेळोवेळी विरुध्द पक्षाने मशिन दुरुस्त करुन दिली तरीही ती पूर्णपणे दुरुस्त झालेली नाही. तसेच प्रत्यक्ष वापराचे वेळी तिच्यात वेळोवेळी बिघाड होत आहे, ही बाब विरुध्द पक्षांच्या सेवेतील न्यूनता स्पष्ट करते. केवळ वारंवार मशिन दुरुस्त करुन देणे किंवा तक्रारकर्त्यास व्होल्टेजच्या कारणाने स्टॅबेलायझर लावण्यांस तोंडी सांगितले. तसेच तक्रारीची कार्यवाही मंचासमोर सुरु असतांना सेवेतील त्रुटी लपविण्यासाठी तक्रारकतर्याचे घरी जाऊन मशीन दुरस्त करण्याचे सांगून ती दुरुस्त करण्यांस नकार दिला. म्हणून खोटे प ूरावे दर्शविण्याचा प्रयत्न करणे तसेच त्यासाठी कुठलेही कागदोपत्री पुरावे दाखल न करणे म्हणजेच ग्राहकास सेवा देणे असे होत नाही. त्यासाठी विरुध्द पक्षाने योग्य त्या तंत्रज्ञांचा अहवाल दाखल करणे गरजेचे होते, परंतु तसे अभिलेखावरील कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. म्हणून मंच या निष्कर्षाप्रत पोहचले आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास बिघाड असलेली मशिन देऊन व ती पूर्णतः दुरुस्त न करुन देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविलेले आहे.
6. मुद्दा क्र. 2 बाबतः मुद्दा क्र. 1 च्या निष्कर्षान्वये मुद्दा क्र. 2 नुसार तक्रारकर्ता हा मागणी प्रमाणे अंशतः स्वरुपात दाद मिळण्यांस पात्र आहे. करीता मंच असा आदेश पारित करीत आहे की, विरुध्द पक्षाने सदर नादुरुस्त मशिन परत घेऊन तक्रारकर्त्यास नवीन मशिन बदलवून द्यावी. किंवा मशिनची किंमत रु.21,000/- ही आदेशाचे दिनांकापासुन प्रत्यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9% दराने परत करावी. तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावा.
म्हणून मंच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवज व उपरोक्त निष्कर्षाच्या आधारे खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार विरुध्द पक्षाविरुध्द अंशतः मंजूर करण्यांत येते.
1. विरुध्द पक्षांनी नादुरुस्त वॉशिंग मशिन परत घेऊन तक्रारकर्त्यास नवीन मशिन बदलवून द्यावी. किंवा मशिनची किंमत रु.21,000/- आदेशाचे दिनांकापासुन प्रत्यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 9% दराने परत करावी.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावा.
3. सदर आदेशाचे पालन विरुध्द पक्षानी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत करावे.
4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
5. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.