ग्राहक तक्रार क्रमांकः-63/2008 तक्रार दाखल दिनांकः-30/01/2008 निकाल तारीखः-31/05/2010 कालावधीः-02वर्ष04महिने01दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे 1)श्री.अमरेश चंद्रा ललनजी 2)श्रीमती.रजनी देवी, प्रमोद गुप्ता दोघेही राहणार-फ्लॅट नं.ए-14, श्रीकृष्णा कोऑहौसो.लि.,शहाड (प), रेल्वेस्टेशन जवळ, पो.ऑफिस शहाड.421 103 ता.कल्याण जि.ठाणे ...तक्रारकर्ता विरुध्द 1)शार्पो सर्व्हीसेस(I)प्रा.लि., साटम इस्टेट,तिसरा मजल्यावर, बँक ऑफ बडोदा, कारदिनल ग्राचोहाऊस रोड, छकाला, अंधेरी(पू)मुंबई.400 099 ...वि.प.1 2)ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि., 5/1ए,हंगरफोर्ड स्ट्रीट,कोलकता. 700 017 ... वि.प.2 उपस्थितीः-तक्रारकर्ताः- स्वतः हजर विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.ए.के यादव वि.प.करीता श्री.जी.एस.लुग्गानी वि.प.2करीता गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-31/05/2010) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- 1)तक्रारदार हे ब्रिटानिया इंडिया लि. यांचे शेअर होल्डर्स असून इक्वीटी शेअर्स 109 एकत्रीत खरेदी केलेले आहे. विरुध्दपक्षकार हे रजि.सर्व्हीस एजन्सी असून त्यांचे मार्फत शेअर्स ट्रान्सफर केले जातात ते सिक्युरीटी आणि एक्सचेंज बोर्ड आणि इंडिया यांचे आदेशानुसार कामकाज 2/- पाहतात. तक्रारदार यांचे डिमॅट अकौंट डी.पी.आयसीआयसीआय बँक डिपॉझीट सर्व्हीसेस डी.पी.आयडी. आय-303028 डिमॅट अकौंट नं.50265464 असे असून शेअर्स हे एनसीडीसी लि. बरोबर इलेक्ट्रीक फॉर्ममध्ये ट्रान्सफर केले जातात. तक्रारदार यांना डीआरएम नं.140231 व डीपी सह 5 शेअर्स सर्टीफिकेट (109 शेअर्स) ट्रान्सट्रेशन फॉर्म भरुन दिले आहे. व फॉर्म प्रमाणपत्र देऊन रजि. टेल्को सर्व्हीस यांचेकडे डिमॅट्रेलायझेशनकरता शेअर्स पाडण्यात आले आहे. परंतु विरुध्दपक्षकार यांनी विहीत मुदतीत डिमॅट्रेलायझेशन केले नाही. व तक्रारदार यांनी त्रास होऊन आर्थिक नुकसान करण्याकरीता सर्व कागदपत्रासह परत पाठविले आहे. त्यावेळी सहीकरता होते. याबाबतची कोणतीही कागदपत्रे माहिती करता पाठवले नाहीत. शेल्कोसर्व्हीस यांनी तक्रारदार यांना नॅशनलाईस बँक आयसीआयसीआय बँकेकडून सहीप्रमाणे करुन पुन्हा पाठविले आहे. परंतु विरुध्दपक्षकार यांनी तो स्विकारला नाही. विरुध्दपक्षकार यांनी त्यानंतरही इलेक्ट्रीकसिटी,टेलिफोन बिल व पॅनकार्ड यांचे सर्टीफिकेट कॅब मागणी केल्या त्याप्रमाणे पुर्तता केलेली नाही. या कागदपत्राची विरुध्दपक्षकार यांची मागणी करण्याची कोणताही अधिकार नव्हता व नाही. या शिवाय तक्रारदार यांनी पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स यांचीही प्रतिलिपी पाठविली त्यावर दिनांक01/11/2007 रोजी तक्रारदार यांनी म्हणणे पाठविले व जे आक्षेप घेतले ते बेकायदेशीर आहेत हे कळविले. परंतु तरीही विरुध्दपक्षकार हे तक्रारदार यांचे अर्जाची दखल घेतलेली नाही. म्हणून सदरची तक्रार मंचात दाखल करण्यात आली आहे. व पुन्हा मागणी केली आहे की 1)शेल्को सर्व्हीस यांनी तक्रारदार यांचे शेअर्स त्वरीत डिमॅट्रलायझेशन हे कोणताही विलंब न लावता करुन घ्यावे. 50,000/- रुपये ब्रिटानिया इंडिया लि. यांनी नुकसानीकरता दंड आकारण्यात यावा.2)1,00,000/- रुपये शेल्को सर्व्हीस यांनी नुकसान भरपाई देण्यास भाग पाडावे.3)मानसिक,शारिरीक,आर्थिक छळ त्रास नुकसान केले म्हणून नुकसान मिळावे. सदरच्या अर्जाचा खर्च मिळावा. इतर अनुषंगीक दाद मिळावी अशी मागणी केलेली आहे. 2)विरुध्दपक्षकार नं.1 यांना दिनांक31/07/2008 रोजी लेखी जबाब दाखल केला त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- सदरचे म्हणणे इंद्रप्रसाद करकरे यांनी जनरल मॅनेजर या अधिका-याने वेगळे विरुध्दपक्षकार नं.1व2 यांचेकरता एकत्रात दाखल केलेली आहेत.तक्रारदार यांचेकरता मंचात चालण्यास पात्र नाही. अर्जास 3/- कोणतेही कारण घडलेले नाही. अशी तक्रार चालण्यास अधिकार क्षेत्र नाही. जादा रक्कम मिळण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार यांना सप्टेंबर2007 मध्ये डिमॅट्रेलायझेशन करता 100 शेअर्स इलेक्ट्रीक पध्दतीने पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये तक्रारदार यांची सही माहितीकरीता घेतलेल्या सहीशी मिळती जुळती नसल्याने दिनांक24सप्टेबर2007 रोजी डिमॅट्रेलायझेशनची विनंती नामंजुर करण्यात आली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी पुन्हा 109 शेअर्सकरीता ऑक्टोबर2007मध्ये अर्ज दाखल केला आहे. तीही सही मिळती जुळती नव्हती. म्हणून 17ऑक्टोबर,2007 रोजी सर्व कागदपत्रे तक्रारदार यांना परत पाठविण्यात आली. व्यवहार पडताळून पाहण्याचाही अधिकार विरुध्दपक्षकार यांना आहेत. फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून दखल घेणे भाग पडते. कोणतीही सेवेतील त्रुटी केलेली नाही. नुकसान करण्याचा हेतू नव्हता. अनेक कागदपत्राची पडताळणीकरीता मान्य केले आहे. परंतु तो अधिकारही विरुध्दपक्षकार यांचा अधिकारक्षेत्रात नव्हता. म्हणून दखल घेण्यात आली नाही. तक्रारदार यांची तक्रार चुकीची असल्याने खर्चासह नामंजुर करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे. 3)तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज, विरुध्दपक्षकार यांचा लेखी जबाब, त्यातील कागदत्रे यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केलेअसता पुढील मुद्दा उपस्थित झाले व आदेश पारीत करण्यात आला. विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांची तक्रार मान्य केली आहे. परंतु त्यांचेकडे सही पडताळणी करण्याचा अधिकार का.नव्हता किंवा तक्रारदार यांनी अर्जात नमुद केल्यानंतर सही पडताळणी करता कागद पाठवल्याप्रमाणे विरुध्दपक्षकार यांनी नियमाप्रमाणे दखल का घेतली नाही. किंवा घेता का. नाहीत नव्हते याबाबत कोणताही खुलासा मंचासमोर स्पष्ट केलेला नाही. सहीमध्ये फरक आहे याबाबत कोणताही पुरावा विरुध्दपक्षकार यांना मंचापुढे सादर केलेला नाही. म्हणून विरुध्दपक्षकार यांचे बाजुने त्यांचे नविन लेखी जबाबाप्रमाणे मंचाने दखल घेण्यास कोणतेही कारण नाही. विरुध्दपक्षकार यांनी जाणुन बुजून तक्रारदार यांचे नुकसान केलेले आहे. डिमॅटमध्ये नोंदणी करुन घेण्यास नकार दिलेला आहे ही सेवेतील त्रुटी निष्काळजीपणा व हलगर्जीपणा विरुध्दपक्षकार नं.1व 2 यांनी केलेला आहे. तक्रारदार यांचा अर्ज नामंजुर करुन आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास देऊन नुकसान केलेले आहे हे भरुन देण्यास विरुध्दपक्षकार हे जबाबदार व 4/- बंधनकारक आहेत. हे दाखल कागदत्रावरुन व लेखी जबाबावरुन स्पष्ट झालेले आहे. तक्रारदार यांनी पुराव्याकरीता राष्ट्रीयकृत बँकेचे अटोप्शन करुन सही दिल्यानंतर व विनंती अर्ज दाखल केल्यानंतर दखल घेणे न्यायोचित, विधीयुक्त व संयुक्तीक आहे. परंतु दखल न घेतल्याने नुकसान केले आहे हे सिध्द झाल्याने आदेश. आदेश. 1)तक्रारदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात आला आहे. 2)अर्जात नमुद केल्याप्रमाणे 109 शेअर्स विरुध्दपक्षकार यांनी डिमॅट्रेलायझेशनामध्ये कोणताही विलंब न करता नोंद करुन घ्यावेत. 3)उभय पक्षकारांनी तक्रारदार यांचे आर्थिक, मानसिक त्रास व नुकसान केले असून सदर अर्जाचा खर्च 2,000/-(रुपये दोन हजार फक्त)व नुकसान भरपाई 10,000/-(रुपये दहा हजार फक्त)रुपये दयावे. वरील आदेशाची तामिली 30 दिवसांचे आत सहिशिक्क्याची प्रत मिळाल्या तारखेपासून परस्पर करावी.(डायरेक्ट पेमेंट) अन्यथा वरील रकमेवर जादा दंडात्मक व्याज 3टक्के द.सा.द.शे दराने आदेश पारीत तारखेपासून देय होईल. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 5)तक्रारदार यांनी मा.सदस्यांकरीता तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात.अन्यथा मंच जबाबदार राहणार नाही. म्हणून केले आदेश. दिनांकः-31/05/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे |