Maharashtra

Nagpur

CC/11/189

Sau. Anita Domdev Paunikar - Complainant(s)

Versus

Sharda Housing Agency Through Shri Ashok Anandrao Paunikar - Opp.Party(s)

Adv.V.L.SOMALWAR

10 Jan 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/189
 
1. Sau. Anita Domdev Paunikar
Ladpura, Swaminagar
Nagur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Sharda Housing Agency Through Shri Ashok Anandrao Paunikar
Jagnath Budhwari, Kumbharpura
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv.V.L.SOMALWAR, Advocate for the Complainant 1
 Adv.S.K.SAWAI, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

मंचाचे निर्णयान्‍वये सौ. जयश्री येंडे, सदस्‍या.
 
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 10/01/2012 )
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार, त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍या वर्तमापनपत्रात दिलेल्‍या जाहिरातीला प्रतिसाद देऊन गैरअर्जदारांच्‍या मौजा-डोंगरगाव, ख.क्र.25, प.ह.क्र. 76, एकूण क्षेत्रफळ 1750 चौ.फु. असलेला प्‍लॉट क्र. 25 हा रु.35,000/- मध्‍ये घेण्‍याचा करारनामा दि.10.02.2004 करण्‍यात आला व बयानापत्र करुन घेण्‍यात आले आणि रु.1,275/- गैरअर्जदारास अदा करण्‍यात आले. उर्वरित रक्‍कम 36 मासिक हप्‍त्‍यात अदा करावयाची असे उभय पक्षामध्‍ये ठरलेले होते. तक्रारकर्त्‍याने दि.05.09.2006 पर्यंत रु.27,465/- भरणा गैरअर्जदाराकडे केला. प्‍लॉटची मालकी तक्रारकर्त्‍याचे नावे करण्‍याकरीता आवश्‍यक असलेल्‍या दस्‍तऐवजांची पूर्तता गैरअर्जदार करणार होते. तसेच सदर जमिनीचे अकृषक रुपांतरदेखील गैरअर्जदार करणार होते. परंतू सदर जमिनीबाबत अकृषक आदेश व नगर रचना विभागाकडून परवानगी प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वारंवार विचारणा करतेवेळी गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे. म्‍हणून त्‍यांनी मंचासमोर तक्रार दाखल केलेली असून, प्‍लॉटचे विक्रीपत्र करुन द्यावे, नोटीस खर्च, मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई मिळावी अशा मागण्‍या केलेल्‍या आहे.
2.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले व नमूद केले आहे की, सदर तक्रार ही कालमर्यादेत नाही, म्‍हणून खारीज करण्‍यात यावी. तसेच गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍याचे संपूर्ण कथन नाकारले आहे.
 
3.          सदर तक्रार मंचासमोर युक्‍तीवादाकरीता आल्‍यानंतर मंचाने उभय पक्षांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. तसेच दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंचाचे निष्‍कर्ष खालीलप्रमाणे.
-निष्‍कर्ष-
4.          गैरअर्जदार यांनी कराराप्रमाणे भुखंडाच्‍या मोबदल्‍यापोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुनसुध्‍दा तक्रारकर्त्‍यास अद्यापपावेतो भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिलेले नाही, यावरुन सदर तक्रारीचे कारण सतत सुरु असून तक्रार ही कालमर्यादेत आहे असे मंचाचे मत आहे. त्‍यामुळे गैरअर्जदारांचा तक्रार कालमर्यादेत नसल्‍याचा प्राथमिक आक्षेप खारीज करण्‍यात येतो.
 
5.          प्रकरणातील एकंदर वस्‍तूस्थिती, शपथपत्र व दाखल दस्‍तऐवज करारनाम्‍याची प्रत यांचे अवलोकन करता, गैरअर्जदार यांचा मौजा-डोंगरगाव, ख.क्र.25, प.ह.क्र. 76, एकूण क्षेत्रफळ 1750 चौ.फु. असलेला प्‍लॉट क्र. 25 हा रु.35,000/- मध्‍ये घेण्‍याचा करारनामा दि.10.02.2004 करण्‍यात आला होता व बयानापोटी रु.1,275/- तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांना अदा केलेले होते व उर्वरित रक्‍कम 36 महिन्‍याच्‍या हप्‍त्‍यामध्‍ये प्रतीमाह रु.901/- प्रमाणे अदा करावयाची असे उभय पक्षात ठरलेले होते. पृष्‍ठ क्र. 6 वरील दस्‍तऐवजावरुन असे निदर्शनास येते की, भुखंडाचे विक्रीपत्र करण्‍याची तारीख 10.02.2004 ते 10.02.2007 ठरलेली होती. तक्रारकर्त्‍याचे शपथपत्र व दस्‍तऐवजावरील पुस्तिकेवरुन 05.09.2006 पर्यंत तक्रारकर्त्‍याने सदर रकमेपैकी रु.27,475/- गैरअर्जदार यांना अदा केल्‍याचे दिसून येते. तसेच संबंधित प्राधिकरणाकडून आवश्‍यक परवानगी घेतल्‍यानंतर विक्रीपत्र नोंदविण्‍यात येणार होते. त्‍यामुळे विक्रीपत्राची तारीख निश्चित नव्‍हती हेदेखील दिसून येते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने उर्वरित रक्‍कम दिली नाही व शपथपत्रावरुन उर्वरित रक्‍कम देण्‍यास तो तयार होता हेदेखील दिसून यते.
    
6.          गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍याचे संपूर्ण म्‍हणणे, तसेच सदर सर्व बाबी नाकारलेल्‍या आहेत. परंतू सदर तक्रार खोटी आहे किंवा दाखल दस्‍तऐवज खोटी आहेत असे गैरअर्जदार यांचे कथन नाही किंवा तसा पुरावाही दाखल केला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीत तथ्‍य आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते. तसेच करारनाम्‍यामध्‍ये ठरल्‍याप्रमाणे विक्रीपत्राचा खर्च व विकास खर्च करण्‍याची जबाबदारी तक्रारकर्त्‍याची राहील. तक्रारकर्ते उर्वरित रक्‍कमदेखील देण्‍यास तयार आहेत. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार यांनी भुखंडापोटी जवळपास रक्‍कम स्विकारुनही तक्रारकर्त्‍यास सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन न देण्‍याची कृती गैरअर्जदार यांची सेवेतील त्रुटी दर्शविते. करीता खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून उर्वरित रक्‍कम  स्विकारुन मौजा-डोंगरगाव, ख.क्र.25, प.ह.क्र. 76, एकूण क्षेत्रफळ      1750 चौ.फु. असलेला प्‍लॉट क्र. 25 चे विक्रीपत्र करुन द्यावे. विक्रीपत्राचा खर्च व  शासकीय नियमाप्रमाणे विकास खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.
3)    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रासाबाबत भरपाई म्‍हणून रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30  दिवसाचे आत करावी.
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.