Maharashtra

Nanded

CC/10/181

Dinkar Narharrao Toulapurkar - Complainant(s)

Versus

Sharad Digambar Joshi - Opp.Party(s)

ADV.N.L.kagne

15 Oct 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/181
1. Dinkar Narharrao Toulapurkar R/o.Hiramandini Estate Thane West MumbaiNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Sharad Digambar Joshi Ramanandnagar ,PawadiNaka NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBERHON'BLE MR. Member Mr. S. J. Samte ,MEMBER
PRESENT :

Dated : 15 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/181
                          प्रकरण दाखल तारीख - 17/07/2010
                          प्रकरण निकाल तारीख 15/10/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
प्रशांत दिनकर तुळापुरकर
वय 40 वर्षे, धंदा नौकरी                                 अर्जदार
रा.हिरानंदणी इस्‍टेट ठाणे, पश्चिम मुंबई
यांचे मुखत्‍यार आम नामे दिनकर नरहर तुळापुरकर (वडील)
वय 68 वर्ष धंदा सेवानिवृत्‍त,रा. गणेश नगर, नांदेड
     विरुध्‍द.
1. शरद दिंगाबरराव जोशी
     वय 62 वर्षे, धंदा व्‍यापार/सेवानिवृत्‍त                 
2.   धनंजय दामोधरराव महागांवकर                     गैरअर्जदार वय 60 वर्षे, धंदा व्‍यापार/सेवानिवृत्‍त
     दोघे रा. रामानंद नगर, पावडेवाडी नाका, नांदेड
3.   संतोष रामचंद्र क्षिरसागर
वय 35 वर्षे, धंदा व्‍यापार रा.यशवंत नगर, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.एन.एल.कागणे
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील     -  अड.आर.बी.खवले
गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील        - अड.एम.डी. देशपांडे.
 
                              निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
             गैरअर्जदार यांनी अनूचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला म्‍हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की,गैरअर्जदार क्र.1 व 2 हे सर्व्‍हे क्र.238 असदवन नांदेड चे संयूक्‍त मालक व ताबेदार असून त्‍यांची जयनगर व जय नगर विस्‍तारीत या नांवाने स्‍कीम अंतर्गत
 
 
जाहीरात देऊन हप्‍त्‍याने मासिक सवलतीच्‍या दरात प्‍लॉट खरेदी विक्री योजना सूरु केली. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे त्‍यांच्‍या जय नगर विस्‍तारीत स्‍कीम मध्‍ये त्‍यांच्‍या नियम व अटी प्रमाणे र   .31/- भरुन सभासद झाला व सभासद क्र.28 हा देण्‍यात आला. रु.300/- मासिक हप्‍ता अशा प्रकारे एकूण रु.9000/- एवढी प्‍लॉटची रक्‍क्‍म ठरल्‍याप्रमाणे अर्जदाराने 30 हप्‍त्‍यात भरली व रजिस्‍ट्रीसाठी लागणारा खर्च सुध्‍दा अर्जदाराने रु.1000/- गैरअर्जदार क्र.3 यांच्‍याकडे दिला. जयनगर विस्‍तारित या नांवाने सर्व्‍हे नं.238 मध्‍ये जमिनीमध्‍ये 1200 चौ. फुटाचा एक प्‍लॉट अर्जदाराच्‍या हक्‍कात रजिस्‍ट्रीखत करुन देण्‍यात येईल. सदरील पासबुक व रक्‍कमेच्‍या पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत.ऑगस्‍ट 1995 मधे प्‍लॉटचा तिसावा हप्‍ता जमा केला. अर्जदार जुलै 1998-99 मध्‍ये गैरअर्जदाराकडे स्‍वःताच्‍या नांवाने रजिस्‍ट्री करुन देण्‍याची विनंती केली असता गैरअर्जदार क्र.3 यांची पत्‍नी बिमार होती असे कारण दाखवीले. अर्जदाराने सातत्‍याने तगादा लावला पण काही ना काही कारणे देऊन टाळले. अर्जदार यांचे स्‍वतःच्‍या डोळयाचे काचबिंदुचे ऑपरेशन झाले. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांना प्रत्‍यक्ष भेट घेऊन प्‍लॉटची रजिस्‍ट्री करुन देण्‍याची विनंती केली असता गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एन.ए. झाल्‍यावर रजिस्‍ट्रीखत अर्जदार यांच्‍या हक्‍कात करुन देतो असे सांगितले. परंतु आजपर्यत त्‍यांनी रजिस्‍ट्री खत करुन दिले नाही. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेशी जवळचे संबंध असल्‍यामूळे आज किंवा उदया खरेदीखत करुन देतील अशा आशेवर राहीले. दि.20.4.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी स्‍पष्‍ट सांगितले की,आम्‍ही तुम्‍हाला प्‍लॉट देणार नाही. आजही गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे नांवाने गट नंबर 238 मधील 63 आर जमीन नांवाने शिल्‍लक आहे. गैरअर्जदार क्र.3 यांच्‍याकडे गेले असता फक्‍त गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्‍याकडे मासिक हप्‍ते वसूल करु देत होतो असे सांगितले व ती रक्‍कम कार्यालयात जमा करीत होतो. खरेदीखत करुन देणे हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांची जबाबदारी आहे. दि.23.4.2010 रोजी गैरअर्जदार यांना नोटीस पाठविली.स्‍कीम अंतर्गत मिळणारा प्‍लॉट गैरअर्जदारांस आदेश देऊन अर्जदाराच्‍या मालकी व ताब्‍यात देण्‍यात यावा. अर्जदाराची मागणी आहे की, स्‍कीम अंतर्गत देण्‍यात येणारा 1200 चौ. फुटाचा सर्व्‍हे क्र.238 मधील एक प्‍लॉट अर्जदाराच्‍या मालकी व ताब्‍यात देण्‍यात यावा तसेच मानसिक आर्थीक
शारीरिक ञासाबददल रु.4,00,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.90,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
 
 
 
              गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. प्रकरणातील वाद हा 1995 वर्षा मधील म्‍हणजे आजपासून जवळपास 15 वर्षापूर्वीचे आहे. सदर तक्रार ही वेळ मर्यादत नसल्‍यामूळे फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. पावर ऑफ अटर्नी दिलेल्‍या व्‍यक्‍तीस ग्राहक संरक्षण कायदयानुसार तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार प्राप्‍त होत नाही. असदवन गट नं. 238 ता.जि. नांदेड हया जमिनीचे मालकी केवळ गैरअर्जदार क्र.1 व 2 हेंच नाहीत तर यांच गटाचे मालक इतर 30 व्‍यक्‍ती आहेत हे 7/12 वरुन दिसून येते. या सर्व्‍हे नंबर मध्‍हये काही व्‍यक्‍तीनी आपल्‍या मालकीच्‍या हिश्‍याप्रमाणे काही जमिनी प्‍लॉट पाहून विक्री केल्‍या आहेत. कोण्‍या मालकाने प्‍लॉट विक्रीसाठी कोणती स्‍कीम चालविली हया बददल गैरअरर्जदार क्र.1 व2 यांना माहीती नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अशी कोणतीही जाहीरात देऊन स्‍कीम राबवली नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्‍याकडे तक्रारदाराने कोणतीही रक्‍कम भरलेली नाही. तक्रारदारास प्‍लॉटची रजिस्‍ट्री करुन देण्‍याचा प्रश्‍न उदभवत नाही. दि.20.4.2010 रोजी भेट झालेली नाही व कोणतीही चर्चा झालेली नाही. गैरअर्जदार क्र.3 यांचे कोठे कार्यालय होते व ते कोणाकडे रक्‍कम जमा करत होते या बाबत त्‍यांना माहीती नाही. नूकसान भरपाई व दावा खर्च इ. बाबी अमान्‍य करण्‍यात येतात. जयनगर नांवाने काही प्‍लॉटींग ले आऊट मान्‍यतेप्रमाणे झालेले आहे त्‍यात संजय शिवराम यांची 0.40 जमिन होती त्‍यांचे त्‍यांनी प्‍लॉट पाडून विक्री केले त्‍यांचे शेजारी गैरअज्रदार क्र.1 व 2 यांची जमिनी आहे ही जमिन खरेदी करुन त्‍यातील प्‍लॉट खरेदी करुन विक्री करण्‍याची इच्‍छा संजय शिवराम यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे केली होती. परंतु संजय शिवराम यांचेकंडे एक रक्‍कमी जमिनीची किंमत देण्‍याची तरतूद नसल्‍यामूळे त्‍यांनी त्‍या जमिनीतील काही प्‍लॉट विकले त्‍या प्‍लॉटची गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी रजिस्‍ट्री करुन दिली. अर्जदारास संजय शिवराम यांने कोणता प्‍लॉट दिला त्‍यांचा व्‍यवहार कसा झाला या बाबत त्‍यांना माहीती नाही. संजय शिवराम हे सध्‍या मयत झालेले आहेत. केवळ खोडसाळपणा व ञास देण्‍याची दृष्‍टीने तक्रार दाखल केलेली आहे.अर्जदाराची तक्रार रु.25,000/- खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. हा सन 1995 चा वाद आहे त्‍यामूळै सदर तक्रार मूदतीत येत नाही.  सदरची तक्रार ही प्रशांत तुळापूरकर यांचे
मुखत्‍यार आम म्‍हणून दिनकर तुळापूरकर यांच्‍या मार्फत दाखल केलेली आहे तसेच संपूर्ण तक्रारीमध्‍ये अर्जदाराची कूठेही सही नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2
 
 
हे सर्व्‍हे क्र.238 असदवन नांदेड चे संयूक्‍त मालक आहेत. वादातील जयनगर विस्‍तारित या नांवाने मासिक स्‍कीम अंतर्गत प्‍लॉट विक्री बाबतचा मजकूर बरोबर नसल्‍यामूळे अमान्‍य करण्‍यात येतो. तक्रारीतील परिच्‍छेद क्र.7 मधील मजकूरापैकी शरद जोशी गैरअर्जदार क्र.1 यांचे पुतणे संजय जोशी सन 2001 मध्‍ये वारले याबाबतचा मजकूर काही अंशी खरा आहे. दि.20.4.2010रोजीची कायदेशीर नोटीस बाबतचा मजकूर खरा असल्‍याने मान्‍य आहे. अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक होत नसल्‍यामूळे सेवा देण्‍याचा व सेवेत कमतरता करण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. त्‍यामूळे ते नूकसान भरपाई देण्‍यास पाञ ठरत नाहीत.  अर्जदाराच्‍या तक्रारी बाबत उत्‍तरादाखल गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे की, सदरील तक्रारीतील वादातीत जय नगर विस्‍तारित प्‍लॉट स्‍कीम ही मौजे नांदेड येथील सर्व्‍हे नं.238 असदवन नांदेड येथील प्‍लॉटींग च जमिनीबाब होती. तसेच वादातील स्‍कीम ही मयत संजय शिवराम नांदेड हे चालवित होते. मयत संजय शिवराम सर्व्‍हे नंबर.238 असदवन नांदेड येथील एकूण जमिनीपैकी 00.40 आर इतक्‍या प्‍लॉटींगच्‍या जमिनीचे मालक होते.  तसेच या सर्व्‍हे क्र.238 मध्‍ये मयत संजय यांच्‍या प्‍लॉटींगच्‍या लगत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांची मालकीची ताब्‍याची प्‍लाटींग 00.63.62 आर इतकी जमिनी होती. मयत संजय यांनी त्‍यांच्‍या मालकीच्‍या प्‍लॉटींगच्‍या जमिनी मधे प्‍लॉट पाडून विक्री केले. त्‍यानंतर गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्‍या जमिन खरेदी करुन त्‍यातील प्‍लॉट विक्री करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती.   सदरील मयत संजय यांच्‍याके एकमुस्‍त रक्‍कम देण्‍याची तरतुद नसल्‍यामूळे त्‍यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्‍या जमिनीतील काही प्‍लॉट विकले व ते गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्‍याकडे प्‍लॉटची विक्री केलेली रक्‍कम जमा करत होते. उत्‍तरादाखल गैरअरर्जदार हे मयत संजय यांच्‍याके प्रतिमाह रु.1500/- पगारीवर वसूली अधिकारी म्‍हणून नौकारीस होते. प्‍लॉटींगच्‍या स्‍कीमचे हप्‍ते वसूलीचेच फक्‍त काम करत होते. तक्रारीतील प्रशांत तुळापूरकर हे मयत संजय यांच्‍या स्‍कीम मधील सभासद होते. सदरील प्रशांत हे दरमहा रु.300/- गैरअर्जदारास देत होते व हे जमा झालेले पैसे गैरअर्जदार मयत संजय यांच्‍याके जमा करत होते.    सभासदाकडून हप्‍त्‍याची रक्‍कम स्विकारुन मयत संजय यांच्‍याकडे पैसे जमा करण्‍याच्‍या पलीकडे गैरअर्जदार यांचा या योजनेशी काहीही संबंध नव्‍हता व आताही नाही. या बाबत गैरअर्जदाराचे म्‍हणणे आहे की, दरम्‍यान मयत संजय व तक्रारीतील प्रशांत तुळापूकर यांच्‍यात काही कारणावरुन मतभेद झाले होते व
मयत संजय यांनी प्रशांत यांना रजिस्‍ट्री करुन देण्‍यास नकार दिला व त्‍यांचे जमा असलेली संपूर्ण रक्‍कम परत केली होती. हा सर्व प्रकार तक्रारीतील  
 
 
अर्जदारास मान्‍य होता व सव परिस्थितीची त्‍यांना जाणीव होती. त्‍यांनी मागील 10 ते 15 वर्षापासून प्‍लॉटच्‍या रजिस्‍ट्री बाबत उत्‍तरादाखल गैरअर्जदाराकडे आग्राह धरला नाही व कधीही भेटले नाही. गैरअर्जदारास वाटते की, वादातील प्‍लॉटच्‍या भागातील किंमत प्रमाणाबाहेर  वाढल्‍याने व संजय मयत झाल्‍यामूळे केवळ गैरअर्जदाराच्‍या सहीचा व पावत्‍या वरील सहीचा आधार घेऊन अर्जदार  प्‍लॉट बददल मागणी करीत आहेत हे की गैर आहे. अर्जदाराची तक्रार रु.10,000/- खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. तिन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
1.   अर्जदाराची तक्रार मूदतीत आहे काय  ?                  होय.
2.   गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार
     सिध्‍द होते काय ?                                  होय.
3.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
                  गैरअर्जदार यांनी या तक्रारीला आजपर्यत लेखी इन्‍कार केला नाही,  शेवटी नोटीस काढली त्‍यांला ही जवाब दिला नाही. म्‍हणजे कंटीन्‍यूअस कॉज ऑफ अक्‍शन चालू आहे. म्‍हणून तक्रारीत मूदतीत येते. यावीषयी याबाबत गिरीष मेघराज जैन विरुध्‍द मे.अजित राहेरकर कंपनी व इतर 2008 (1) सीपीआर 40 यांचा आधार घेता येईल. एनऐ झाल्‍यावर रजिस्‍ट्री करुन देऊन असे गैरअर्जदार म्‍हणत राहीले, पासबूकावर नियम नंबर 6 मध्‍ये  प्‍लॉट एनऐ व ले आऊट  रजिस्‍ट्रीच्‍या वेळेस झालेला असेल असे स्‍पष्‍ट लिहीले आहे. त्‍यामूळे रजिस्‍ट्री करुन देण्‍यास त्‍यांचे कारण सांगून अर्जदारास लांबवत ठेवले. त्‍यामूळे कंटीन्‍यूअस कॉज ऑफ अक्‍शन धरुन अर्जदाराचे प्रकरण हे मूदतीमध्‍ये येते.
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार यांनी त्‍यांचे वडील मूखत्‍यार आम दिनकर नरहर तुळापुरकर  यांचेमार्फत प्रकरण दाखल केले आहे, मुखत्‍यार आम हे अर्जदाराचे वडील असल्‍याकारणाने हिंदू एकञित  कूटूंब या कायदया अंतर्गत  आपल्‍या मूलाच्‍या व्‍यवहारासाठी त्‍यांनी दिलेल्‍या अधिकारावरुन तक्रार दाखल
 
 
करु शकतात. अर्जदार यांनी या बाबत मूखत्‍यार आम नं.7871/10 दाखल केला आहे. अर्जदार यांच्‍या तक्रारीतील सारांश  त्‍यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे सर्व्‍हे नंबर 238 असदवन नांदेड मालकी व ताब्‍यानुसार व त्‍यांनी जय नगर विस्‍तारित या नांवाने जी स्‍कीम सूरु केली होती  त्‍या अंतर्गत मासिक हप्‍ता रु.300/- असे एकूण रु.9000/-व रजिस्‍ट्रीसाठी खर्च रु.1000/- गैरअर्जदार क्र.3 यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना अदा केले. परंतु 1993 पासून 1995 पर्यत भरलेली रक्‍कम प्राप्‍त करुन देखील त्‍यांनी कबूल केल्‍याप्रमाणे 1200 चौ. फुटाचा प्‍लॉट दिला नाही. या बाबत अर्जदार यांनी जय नगर विस्‍तारीत शासकीय अभियांञिकी महाविद्यालय प्‍लॉट योजना यात गैरअर्जदार यांनी  अर्जदार यांना सभासद क्र.28 दिला व त्‍यांचे कार्यालय रामानंद नगर प्‍लॉट नंबर 58 नांदेड असे प्रिंट असलेले पासबूक व पैसे भरल्‍याच्‍या पावत्‍या पूरावा म्‍हणून दाखल केलेल्‍या आहेत. पासबूकावर दि.12.3.1993 पासून दि.7.8.1995 पर्यत एकूण रु.300/- चे 30 हप्‍ते गैरअर्जदार क्र.3 यांनी वसूल केलेले असून यावर संतोष, प्राप्‍त केल्‍याची स्‍वाक्षरी केली आहे. आणखी एक पूरावा म्‍हणून अर्जदाराने नि.6 वर 7/12 दाखल केलेली असून यावर गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र.2 यांचे नांवाने 0.63 आर जमिन सव्‍हे नंबर 238 येथे असल्‍याची नोंद आहे. व्‍यवहार हा 1995 चा आहे व अर्जदार म्‍हणतात तेव्‍हापासून ते जवळचे मिञ असल्‍याकारणाने त्‍यांनी नोंदणीकृत विकी खत करुन देण्‍यासाठी वारंवार सांगितले असताना देखील त्‍यांनी रजिस्‍ट्री करुन दिली नाही. या गोष्‍टीस कटाळून दि.23.4.2010 रोजी वकिल श्री.एन.एल.कागणे  यांचे मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. त्‍यास गैरअर्जदार यांनी उत्‍तर दिले नाही. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे हजर झाले व त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले परंतु यात त्‍यांनी अर्जदार यांचा आमचा तिळमाञ संबंध नाही. तसेच जय नगर व जय नगरातील विस्‍तारित या प्‍लॉट योजनेशी देखील काही संबंध नाही असे म्‍हटले आहे. त्‍यांचे म्‍हणणे जर खरे असेल तर जेव्‍हा अर्जदाराने त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठविली त्‍यावेळेस त्‍यांनी त्‍या नोटीसचे उत्‍तर देऊन वरील बाब स्‍पष्‍टपणे नाकारणे आवश्‍यक होते. परंतु त्‍यांनी असे केले नाही. त्‍यामूळे अर्जदार यांची तक्रार त्‍यांना मान्‍य आहे काय ?  गैरअर्जदार
यांनी आपल्‍या बचावात हे ही स्‍पष्‍टपणे सांगितले की गट नंबर 238 मध्‍ये तेच नाही तर इतरही अनेक व्‍यक्‍ती मालक आहेत व यातील काही व्‍यक्‍तीने आपल्‍या मालकी व हिस्‍सा प्रमाणे प्‍लॉट पाडून जमिनी विक्री केलेल्‍या आहेत. अर्जदाराने त्‍यांचेकडे कोणतीही रक्‍कम भरली नाही, अर्जदाराने उल्‍लेख केल्‍याप्रमाणे त्‍या दोघाची भेट ही झालेली नाही, याशिवाय गैरअर्जदार क्र.3
 
 
यांचे कार्यालय कूठे होते व ते कोणाकडे रक्‍कम जमा करीत होते यांचीही माहीती नाही असे सांगितले आहे.जय नगर या नांवाने काही प्‍लॉट व ले आऊट झालेले आहे ते संजय शिवराम यांचे मालकीच जमिन 0.40 प्‍लॉट पाडून विक्री केलेले आहे. शेजारी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे जमिन आहे व ती खरेदी करुन त्‍यातील प्‍लॉट विक्री करण्‍याची इच्‍छा संजय यांनी दाखवलेली होती परंतु त्‍यांचेकडे रक्‍कमेची सोय नसल्‍यामूळे त्‍या जमिनीतील काही प्‍लॉट विकले त्‍या प्‍लॉटची गैरअज्रदार क्र.1 व 2 यांनी रजिस्‍ट्री करुन दिली. हया त्‍यांचे परिच्‍छेद क्र.5 लेखी म्‍हणण्‍यातील जवाबाप्रमाणे हे गैरअज्रदार क्र.1 व 2 यांनी मान्‍यच केले आहे की, संजय नांवाचा व्‍यक्‍ती त्‍यांचे प्‍लॉट विक्री करीत होते व असे प्‍लॉट विक्री करताना त्‍यांने प्रिटेंड पासबूकावर एखादयाचे नांव लिहून व मासिक हप्‍ता घेऊन  विक्री करीत होते व त्‍यांने विकलेला काही प्‍लॉटची त्‍यांने रजिस्‍ट्री पण करुन दिली. म्‍हणजे अर्जदार म्‍हणतात त्‍यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे गैरअर्जदार यांनी निश्चितच स्‍कीम मध्‍ये प्‍लॉट विकले आहेत. गैरअर्जदार यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे संजय नांवायचे व्‍यक्‍तीने हे काम केले असेल तर हयाने स्‍कीम राबविली किंवा रक्‍कम घेतली किंवा त्‍यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे रजिस्‍ट्री करुन दिली असे त्‍यांचेशी संबंध दाखवीणारा एकही कागदपञ ते दाखवू शकलेले नाहीत.उलट  हे स्‍पष्‍ट आहे की,  जय नगर व जय नगर विस्‍तारित या मार्फत झालेल्‍या व्‍यवहारासाठी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा संबंध दिसून येतो. या बाबत अर्जदाराने अनेक पूरावे दाखल केलेले आहेत. त्‍यातील एक पूरावा पासबूकावर प्‍लॉट नंबर 58 रामानंद नगर या योजनेचे कार्यालय आहे. यासाठी पूरावा पाहिला असता प्‍लॉट नंबर 58 हे गैरअर्जदार क्र.1 यांचे घर आहे व त्‍यांचेवर हॉलचे मध्‍ये प्‍लॉटच्‍या लकी ड्रा ची रक्‍कम वसूलीची प्रक्रीया सूरु होती. गैरअर्जदार क्र.3 हा नौकरदार असून त्‍यांने कोणासाठी काम केले हे स्‍पष्‍ट करण्‍यासाठी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी गैरअज्रदार क्र.3 यांचे संजय यांचेशी काही संबंधी होता असाच कोणताच पूरावा ते देऊ शकलेले नाहीत. उलट गैरअर्जदार क्र.3 हे वसूली अधिकारी होते व रक्‍कम गोळा करीत होते व अर्जदार यांचा संबंध गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेशीच होता हे बरेचसे पूरावे देऊन अर्जदाराने सिध्‍द केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी फक्‍त 0.40 आर ही जमिन संजय
यांचे नांवावर होती व त्‍यातून त्‍यांने प्‍लॉटचे व्‍यवहार केला असा कोणताही व्‍यवहार संजयचे नांवावर किंवा स्‍कीम असलेला त्‍यांने रक्‍कम जमा करुन प्‍लॉट विकला असे सिध्‍द केले नाही,  इतर अनेक लोकांची नांवे त्‍या 7/12 वर आहेत, असा कोणताही संबंध दिसून येत नाही. जय नगर हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे वर तर जय नगर विस्‍तारित हे कोणी तिसरा व्‍यक्‍ती  काढू
 
 
शकत नाही, विस्‍तारित हा भाग मूळ जय नगर यांचेशी संबंधीत मालकीचाच असतो. विस्‍तारित असे कोणीही काढले असते तर वेळीच गैरअर्जदार यांचा आक्षेप घेणे आवश्‍यक होते. कारण त्‍यांचे नांवावर दूसरा व्‍यक्‍ती व्‍यवहार करतात हे मूळात मान्‍य करण्‍याजोगे नाही. अर्जदाराने दाखल केलेल्‍या पावत्‍या हया काही जय नगर शी असून त्‍यांचे संबंध गैरअर्जदार क्र.1 व 2 शी आहे हे सिध्‍द करण्‍यासाठी आहे. अर्जदाराने पावती क्र.1 वर पावती नंबर 610 जय नगर विस्‍तारित यावर ञ षीकेश शशीकांत पत्‍की  यांचे नांव आहे व या पावतीच्‍या अनुषंगाने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी ञ षीकेश यांची आई निर्मल शंशीकात पत्‍की यांचे नांवाने रु.6,000/- किंमतीस दि.5.3.1999 रोजी रजिस्‍ट्री करुन दिली आहे व यावर गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्‍या सहया आहेत. दूसरी एक रजिस्‍ट्री दि.2.1.1997 ची असून यातील प्‍लॉट नंबर 53,63,64,65 हे मधूकर रेणूकादासराव कूर्तडीकर   यांना गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना गट नंबर 238 यातील विक्री खत करुन दिलेले आहे. अजून एक स्‍पष्‍ट पूरावा नि.4 वर विक्री खत दि.18.1.1996 या प्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अविनाश भगवानराव बारबिंड  यांस गट नंबर 238 मधील प्‍लॉट नंबर 36 जय नगर यातील विकलेला आहे. या उलट केलेले व्‍यवहार जयनगर म्‍हणजे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेशी संबंध असल्‍याबददल स्‍पष्‍ट पूरावा आहे. गैरअर्जदार क्र.3 त्‍यांचे गैरअर्जदार क्र.1 व 2 शी काही संबंध नसून त्‍यांनी संजय यांची नौकरी करीत होते व त्‍याचेसाठी काम करीत होते परंतु या बददलचा कोणताही पूरावा उपलब्‍ध नाही. आता संजय हे मयत झाले आहेत. गैरअर्जदार क्र.3 हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना वाचविण्‍यासाठी मंचाची दीशाभूल करीत आहेत. हे या रजिस्‍ट्रीवरुन दिसते. कारण या रजिस्‍ट्रीत संजय यांची साक्ष यासाठी राहीली असती पण गैरअर्जदार क्र.3 यांची साक्ष आहे. एक रजिस्‍ट्री नव्‍हे तर अनेक रजिस्‍ट्रया मध्‍ये त्‍यांचे साक्षीदार म्‍हणून सही आहे. संजय यांचेपेक्षा गैरअर्जदार क्र.3 यांचा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेशी त्‍यांचा संबंध होता हे स्‍पष्‍ट होते. नि.5 गट नंबर 238 मधील प्‍लॉट नंबर30 दि.13.4.2000 रोजी डॉ. मूंकूद माधवराव जोशी  यांना गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी विकलेला आहे.  नि.6 मध्‍ये विक्री खत नंबर 2547 दि.19.3.1996 बालासाहेब व्‍यंकटराव कोलंबीकर  यांना
विक्री केलेली असून यावर स्‍वाक्षरी गैरअर्जदार क्र.3 यांनी साक्षीदार म्‍हणून केलेली आहे. आणखी एक पूरावा नि.7 मध्‍ये नंबर 7251 दि.11.1.1996 रोजी गट नंबर 238 मधील जय नगर असा उल्‍लेख असलेला प्‍लॉट नंबर 44 डॉ. ए.एम. जोशी यांना विकलेला आहे. त्‍यावर गैरअर्जदार क्र.3 यांची साक्षीदार म्‍हणून सही आहे. एक दोन नव्‍हते तर असे अनेक विक्री खतावर
 
 
गैरअर्जदार क्र.3 यांची साक्षीदार म्‍हणून सबंध आहेत. यांचा अर्थ गैरअर्जदार क्र.3 हे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेच वसूली अधिकारी म्‍हणून काम करीत होते म्‍हणून ते प्रत्‍येक विक्री खताच्‍या वेळेस गैरअज्रदार क्र.1 व 2 यांचे ते प्रतीनीधी होते. गैरअर्जदार क्र.3 यांची स्‍वाक्षरी असलेले अजून एक दस्‍ताऐवज नि.8 दि.19.3.1996 प्‍लॉट नंबर 25 शुभचंद भारतराव कोंडेकर  यांना दि.19.3.1996 रोजी गैरअर्जदार क्र.3 यांचे साक्षीनेच विकण्‍यात आले आहेत.  नि.0 वर जय नगरचा ले आऊट पाहिला असता यावर प्‍लॉट नंबर 28 वर तुळापूरकर असे नांव लिहीलेले दिसून येते. म्‍हणजे हा प्‍लॉट अर्जदार यांना देण्‍यासाठी ठरविलेला होता. अर्जदारांनी स्‍पष्‍टपणे संजय जोशी यांचे जय नगर विस्‍तारित यांचेशी संबंध होता हे स्‍पष्‍टपणे नाकारलेले आहे व गैरअर्जदार हे त्‍यांचेशी संबंध होता हे दाखवू शकलेले नाहीत. अर्जदारातर्फे आलेल्‍या पूराव्‍यात सौ.निर्मला पत्‍की   यांचे शपथपञ, त्‍यात त्‍यांनी प्‍लॉट नंबर 58 हा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून खरेदी केला अशी साक्ष दिली होती व त्‍यांचे सोबतच जय नगर व जय नगर विस्‍तारित प्‍लॉट स्‍कीम मध्‍ये अर्जदाराने सूध्‍दा रक्‍कम भरली होती व ती रक्‍कम गैरअर्जदार क्र.3 ने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेसाठी वसूल केलेली आहे. अशी साक्ष दिलेली आहे. यासाठी  जय नगर यांचे सभासद नंबर 76 अविनाश बारंबिंड   यांचे पासबूक तसेच जय नगर प्‍लॉटसाठी भरलेल्‍या सभासद शूल्‍काची पावती दाखल केलेली होती.  अरुण नागोराव पत्‍की यांचे शपथपञ त्‍यात त्‍यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे स्‍षष्‍टपणे नांव घेऊन शपथेवरती साक्ष दिली की मासिक हप्‍त्‍याने असदवन नांदेड येथे जय नगर विस्‍तारित या नांवाने स्‍कीम काढलेली होती व त्‍याचंही पासबूक त्‍यांनेच दिले होते व गैरअर्जदार क्र.3 हे वसूली अधिकारी होते. या बाबत साक्षीसह अरुण नागोराव पत्‍की जय नगर येथील पासबूक व रक्‍कमा भरल्‍याच्‍या पावत्‍या पूराव्‍यासाठी दाखल केलेल्‍या आहेत. याशिवाय तुळशीदास बाबुराव वाढोणकर  यांनी देखील या स्‍कीम मध्‍ये प्‍लॉट मागितला होता व गैरअर्जदार क्र.1 यांचे घर प्‍लॉट नंबर 58 रा. जय नगर यांचेकडे दर महिन्‍यास लकी ड्रा काढत असत त्‍यांच ड्रा नंबर 16 प्‍लॉट नंबर लागला व परंतु त्‍यांचेही रजिस्‍ट्री करुन देण्‍यात आलेली नाही अशी शपथपञावर साक्ष नोंदविली आहे. अर्जदार यांनी भरपूर मेहनत
घेऊन सभासद हूडकून हे दस्‍ताऐवज जमा केले व पूरावा म्‍हणून दाखल केले. तक्रारदाराने दाखल केलेले हे सर्व पूरावे पाहून हे स्‍पष्‍ट झाले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे जय नगर व जय नगर विस्‍तारित यातील ले आऊट स्‍कीमशी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे संबंध आहे व त्‍यांनीच या ले आऊट मधून अनेक जणाना रजिस्‍ट्री करुन दिल्‍या आहेत. म्‍हणून अर्जदार
 
 
यांचेकडूनही त्‍यांनीच रक्‍कम स्विकारली त्‍यासाठी त्‍यांनाही प्‍लॉटची रजिस्‍ट्री करुन देणे आवश्‍यक आहे. गैरअर्जदार क्र.1 यांचे घर प्‍लॉट नंबर 58 रामानंद नगर येथे आहे तेथेच या स्‍कीमचे कार्यालय होते यासाठी रामानंद नगर सोसायटी यांनी अर्जदाराच्‍या नांवाने पञ लिहून हे स्‍पष्‍ट केले आहे. व्‍यवहार जूना जरी असला तरी गैरअर्जदार हे आपल्‍या जबाबदारी पासून दूर गेलेले आहे. अर्जदार देखील 1994 पासून आजपर्यत आज जी कारवाई केली तशी कारवाई याआधीही करु शकले असते परंतु त्‍यांनी ती केली नाही यात बददलचा हलगर्जीपणा दिसून येतो. कारण अशा गोष्‍टीसाठी तक्रार करण्‍यास एवढा वेळ लावणे अपेक्षीत नाही. आता बाजारात प्‍लॉटचे रेट खूप वाढले जरी असले व अर्जदाराने घेतलेला प्‍लॉट त्‍यावेळेस कमी किंमतीस जरी घेतला असला तरी वाढलेले भाव लक्षात घेऊन रजिस्‍ट्री करण्‍याचे टाळणे यांला नक्‍कीच अनूचित सेवाच असे म्‍हणावे लागेल. अर्जदार यांनी प्रकरण दाखल करण्‍यास मागितलेला वेळा लक्षात घेता त्‍यांनेही यात बराच निष्‍काळजीपणा दाखविला असे दिसते. म्‍हणून अर्जदाराने मागितलेला मानसिक ञास कमी दिला पाहिजे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे 7/12 वर अजून जमिन असल्‍याचे स्‍पष्‍ट होते त्‍याचमूळे त्‍यांनी जय नगरचा ले आऊट मधील प्‍लाट नंबर 28 किंवा त्‍यांच आकाराचा म्‍हणजे 1200 चौ. फुटाचा दूसरा एखादा प्‍लॉट अर्जदारांना देणे त्‍यांचेवर बंधनकारक राहील.
              एकंदर सर्व बाबीवरुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                                                       आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी जय नगर किंवा जय नगर विस्‍तारित, असदवन, नांदेड गट नंबर 238 मध्‍ये, 30  x 40 चा 1200 चौ. फुटाचा प्‍लॉट नंबर 28 किंवा त्‍या बदल्‍यात त्‍यांच ले आऊट मध्‍ये त्‍यांच आकाराचा दूसरा एखादा प्‍लॉट अर्जदाराच्‍या हक्‍कात रजिस्‍ट्री करुन दयावा.
3.                                         मानसिक ञासाबददल रु.5000/- मंजुर करण्‍यात येतात.
4.                                         दावा खर्च म्‍हणून रु.3000/- मंजूर करण्‍यात येतात.
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील     श्रीमती सुवर्णा देशमूख       श्री.सतीश सामते   
            अध्‍यक्ष                              सदस्‍या                             सदस्‍य.
 
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER