Maharashtra

Nagpur

CC/89/2021

SMT. CHANDA PRAKASH CHALPE - Complainant(s)

Versus

SHANTI NIKETAN EKTA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., WANADONGRI, THROUGH SECRETARY, SHRI. PRAMOD K - Opp.Party(s)

ADV. S.B. CHOURASIA

31 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/89/2021
( Date of Filing : 04 Feb 2021 )
 
1. SMT. CHANDA PRAKASH CHALPE
R/O. ZENDA CHOWK, MAHAL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHANTI NIKETAN EKTA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., WANADONGRI, THROUGH SECRETARY, SHRI. PRAMOD KAJODIMAL AGRAWAL
R/O. GANESHPETH, NAGPUR OFF.AT, RAMDASPETH, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. S.B. CHOURASIA, Advocate for the Complainant 1
 
Dated : 31 Mar 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजने, मासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम ३५(1) नुसार दाखल केलेली आहे.
  2. वि.प. ही रजिस्टर्ड हाऊसिंग सोसायटी असून जमिन खरेदी करुन विकसन करुन भुखंड विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदाराने वि.प.चे मौजा-हिंगणा, खसरा क्रमांक.136, प.ह.न.49,त.जि.नागपूर, या शेतजमिनीवर पाडलेल्या ले-आऊट मधील भुखंड क्रं. 16 एकुण क्षेत्रफळ 2941 चौ.फुट एकुण रुपये 45,000/- इतक्या रक्कमेत विकत घेण्‍याचा नोदंणीकृत करारानामा तक्रारदाराकडुन रुपये 40,000/- एवढा मोबदला स्वीकारुन दिनांक 17.4.2006 रोजी करण्‍यात आला व तक्रारदाराला भुखंड क्रमांक 16 चे कब्जापत्र देण्‍यात आले. करारानुसार सदर जमीन मा.जिल्हाधिकारी नागपूर यांचे आदेश क्रं.766/2004, रा.मा.का.140/एनएपी 34/2003-2004 दिनांक 27.2.2004 चे आदेशान्वये गैरकृषी झालेली आहे. तसेच सदरहू मालमत्ता ही युएलसी च्या हद्दीबाहेर असल्यामूळे याला युएलसीच्या तरतुदी लागू होत नसल्याचे करारात नमुद आहे.
  3. तक्रारदाराने भुखंड खरेदीपोटी अदा करावयाची उर्वरित रककम रुपये 5000/- वि.प.ला माहे ऑगस्ट 2020 मध्‍ये अदा केली. तक्रारदाराने वि.प.ला भुखंड खरेदीपोटी संपूर्ण रक्कम रुपये 45,000/- अदा करुनही वि.प.ने तक्रारदाराला भुखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही म्हणुन तक्रारदाराने वकीलामार्फत वि.प.ला दिनांक 13.12.2020 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु वि.प.ने नोटीस मिळूनही त्यांची दखल घेतली नाही. वि.प.ने मौजा-हिंगणा, खसरा क्रमांक.136, प.ह.न.49,त.जि.नागपूर, या शेतजमिनीवर पाडलेल्या ले-आऊटमधी भुखंड क्रं.15 एकुण क्षेत्रफळ 4800चौ.फुट, भुखंडाचे कायदेशीर विक्रीपत्र दस्तावेज क्रमांक-3366 अन्वये दिनांक 20.5.2016 ला नोंदवुन दिले आहे. त्यामूळे तक्रारदाराने सदर तक्रार आयोगा समक्ष दाखल केली आहे.  वि.प.ने तक्रारदाराला मौजा-हिंगणा,खसरा क्रमांक.136, प.ह.न.49,त.जि.नागपूर, येथील भुखंड क्रमांक- 16 चे कायदेशीर विक्रीपत्र करुन प्रत्यक्ष ताबा द्यावा किंवा वि.प.ला काही तांत्रीक कारणास्तव कायदेशिर विक्रीपत्र करुन देणे शक्य नसल्यास वि.प.ने तक्रारदाराला भुखंडाचे खरेदीपोटी स्वीकारलेली रक्कम 45,000/-,द.सा.द.शे. 24टक्के दराने परत करावी. तसेच तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  4. विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत स्थानिक वर्तमानपत्रातुन दिनांक 02.09.2021 रोजी जाहिर नोटीस प्रसिध्‍द करण्‍यात आली. परंतु सदर नोटीस मिळूनही वि.प. आयोगा समक्ष हजर झाले नाही म्हणुन सदर तक्रार त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 22.10.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता व तोंडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

               मुद्दे                                   उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?            होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिल काय ?    होय
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय? होय
  4. काय आदेश                              अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने वि.प.चे मौजा-हिंगणा, खसरा क्रमांक.136,प.ह.न.49,ता.जि. नागपूर,या शेतजमिनीवर पाडलेल्या ले-आऊटमधी भुखंड क्रं. 16 एकुण क्षेत्रफळ 2941 चौ.फुट, एकुण मोबदला रुपये 45,000/- इतक्या रक्कमेत विकत घेण्‍याचे नोदंणीकृत विक्रीपत्र करारानामा तक्रारदाराकडुन रुपये 40,000/- एवढा मोबदला स्वीकारुन दिनांक 17.4.2006 रोजी करण्‍यात आला व तक्रारदाराला भुखंड क्रमांक 16 चा ताबा देण्‍यात आल्याचे नि.क्रं.2 (एनेक्सर-2) वर दाखल दस्तऐवजांवर स्पष्‍ट होते. तक्रारदाराने भुखंड खरेदीपोटी उर्वरित रक्कम रुपये 5000/- वि.प.ला माहे ऑगस्ट-२०२० रोजी अदा केली.  तक्रारदाराने भुखंडाचे विक्रीपत्र नोदंणी करुन देण्‍याबाबत वारंवार वि.प.ला विनंती केली परंतु वि.प.ने तक्रारदाराला भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. वि.प.ची ही कृती तक्रारदाराचे प्रती त्रुटीपूर्ण सेवा व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब दर्शविते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्द होते. तसेच विरुध्‍द पक्ष यांनी मिळकतीचे विकसन करुन भूखंड तयार करण्याचे वचन दिलेले आहे आणि त्यासाठी प्रस्तावित ले-आऊटचा नकाशा तक्रारदाराला दिलेला आहे. म्हणुन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या M/s. Narne Construction P.Ltd. Etc. Union of India and Ors. II (2012) CPJ 4 (SC) या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे या मंचाला प्रस्तुत प्रकरण चा‍लविण्याचे अधिकार आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मौजा-हिंगणा, खसरा क्रमांक.136, प.ह.न.49 ता.जि.नागपूर, या शेतजमिनीवर पाडलेल्या ले-आऊटमधी भुखंड क्रं. 16 एकुण क्षेत्रफळ 2941 चौ.फुट चे करारानुसार   नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे व प्रत्यक्ष ताबा द्यावा.
    •  
  3. वि.प.ला सदर आदेशाचे पालन करणे कायदेशिरित्या किंवा तांत्रीकदृष्‍टया शक्य नसल्यास वि.प.ने तक्रारदारास भुखंडाचे विक्रीपोटीस्वीकारलेली रक्कम रुपये 45,000/-व सदर रक्कमेवर दिनांक 17.4.2006  पासून द.सा.द.शे. १८ % टक्के व्याजदराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो मिळून येणारी रक्कम तक्रारकर्त्‍याला परत करावी.
  4. तक्रारदाराने भुखंडाचे खरेदीपोटी वि.प.ला दिलेली रक्कम परत मिळताच वि.प.ला भुखंडाचे ताबापत्र करुन द्यावे.
  5. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.
  6. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  7. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  8. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.