जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 87/2010.
तक्रार दाखल दिनांक: 02/03/2010.
आदेश दिनांक : 24/08/2010.
महानंदा रामलिंग शेंडे, वय 55 वर्षे,
व्यवसाय : घरकाम, रा. उभी काडादी चाळ,
टेंभुर्णी रोड, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार
विरुध्द
1. स.म. शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,
बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.
2. श्री. यशवंत किसन शिंदे, (चेअरमन), स.म. शंकरराव
मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी,
शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,
रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.
3. श्री. व्यंकटेश शिवाजी पाटील, (अ.संचालक), स.म. शंकरराव
मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी,
शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,
रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.
4. श्री. पोपट डबरु गुंजाळ, (व्हा. चेअरमन), स.म. शंकरराव
मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी,
शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,
रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.
5. श्री. दिनकर कृष्णा मोरे, (संचालक).
6. श्री. श्रीरंग संभू मोरे, (संचालक).
7. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे, (संचालक).
8. श्री. रामलिंग बाबू ठोंबरे, (संचालक).
9. श्री. सौदागर श्रीपती चव्हाण, (संचालक).
10. श्री. बाबू भवानजी गुंजाळ, (संचालक).
11. सौ. अहिल्यादेवी सदाशिव हनवते, (संचालिका),
विरुध्द पक्ष क्र.5 ते 11 सर्व संचालक, स.म. शंकरराव
मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी,
शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,
रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष
12. श्री. मधुकर भाऊराव गपाटे, (सचिव), स.म. शंकरराव
मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी,
शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,
रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.
13. श्री. चंद्रकांत श्रीरंग मोरे, मॅनेजर, स.म. शंकरराव
मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी,
शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर,
रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर.
14. श्री. खंडागळे, प्रशासक, प्रशासक, रा. करमाळा, ता. करमाळा,
जि. सोलापूर, स.म. शंकरराव
मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी,
शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष
सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य
सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : प्रमोद मो. पलसे
विरुध्द पक्ष गैरहजर
आदेश
सौ. संगिता एस. धायगुडे यांचे द्वारा :-
1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेमध्ये त्यांनी दि.1/1/2008 रोजी ठेव पावती क्र.021069 द्वारे रु.40,000/-, ठेव पावती क्र.021071 द्वारे रु.50,000/-, ठेव पावती क्र.021074 द्वारे रु.25,000/-, ठेव पावती क्र.021075 द्वारे रु.42,000/- व ठेव पावती क्र.021077 द्वारे रु.37,000/- गुंतवणूक केले आहेत. तसेच त्यांचे बचत खाते क्र.411 मध्ये दि.31/3/2009 अखेर रु.61,987/- याप्रमाणे विरुध्द पक्ष पतसंस्थेमध्ये एकूण रु.2,55,987/- जमा आहेत. तक्रारदार यांना बांधकाम करण्यासाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेची नितांत आवश्यकता असल्यामुळे त्यांनी ठेव रकमेची व बचत खात्यावरील रकमेची व्याजासह मागणी केली असता टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी वरीलप्रमाणे नमूद ठेव रक्कम व बचत खात्यावरील रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रास व नुकसान भरपाईपोटी रु.25,000/- व तक्रार खर्चापोटी रु.15,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.
2. सर्व विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते मंचासमोर हजर झाले नाहीत आणि म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
3. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा
दिली आहे काय ? होय.
2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या कुर्डुवाडी शाखेमध्ये मुदत ठेव पावतीद्वारे एकूण रु.1,94,000/- गुंतवणूक केल्याचे ठेव पावत्यावरुन निदर्शनास येते. तसेच ठेवीची मुदत दि.1/2/2009 रोजी संपल्याचे दिसून येते. त्याशिवाय, त्यांचे बचत खाते क्र.411 मध्ये रु.61,987/- शिल्लक असल्याचे पासबुकावरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांना बांधकाम करण्यासाठी मुदत ठेवीमध्ये गुंतविलेल्या व बचत खात्यावरील रकमेची आवश्यकता असल्यामुळे रकमेची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे.
5. तक्रारदार यांनी पतंसंस्थेच्या संचालकाची यादी रेकॉर्डवर दाखल केलेली आहे आणि त्याप्रमाणे संचालकांना प्रस्तुत तक्रारीमध्ये विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ठ करण्यात आलेले आहे. विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत तक्रारीला उत्तर दिलेले नसल्यामुळे आणि मंचासमोर उपस्थित राहून वस्तुस्थिती स्पष्ट करत नसल्यामुळे त्यांना तक्रारदार यांची तक्रार मान्य असल्याचे अनुमानास आम्ही येत आहोत.
6. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेवीद्वारे व बचत खात्यामध्ये रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. असे असताना, तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी मुदतीनंतर ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्था व पतसंस्थेचे संचालक मंडळ तक्रारदार यांची ठेव रक्कम परत करण्यास वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार ठरते.
7. विरुध्द पक्ष क्र.14 हे प्रशासक असून मा. राष्ट्रीय आयोगाचा 'रजिस्ट्रार ऑफ को-ऑप. सोसायटीज् /विरुध्द/ तामीळनाडू कंझ्युमर प्रोटेक्शन कौन्सील, त्रिची', 2 (2007) सी.पी.जे. 175 (एन.सी.) या निवाडयातील तत्वानुसार ठेव रक्कम परत करण्यास केवळ पतसंस्था जबाबदार आहे आणि प्रशासक/निबंधकास वैयक्तिकरित्या जबाबदार धरणे उचित ठरत नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र.12 व 13 हे पतसंस्थेचे कर्मचारी असून त्यांच्या विरुध्द दोष असल्याचे सिध्द झाल्याशिवाय त्यांनाही वैयक्तिक जबाबदार धरता येत नाही. सबब, शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.
ठेवीचा तपशील/प्रकार | पावती व खाते क्रमांक | द्यावयाची ठेव रक्कम (रुपयामध्ये) | या तारखेपासून द्यावयाचे व्याज | देय व्याज दर (द.सा.द.शे.) |
मुदत ठेव पावती | 021071/ 1767 | रु.50,000/- | दि.1/1/2008 | 14 टक्के |
मुदत ठेव पावती | 021077/ 2809 | रु.37,000/- | दि.1/1/2008 | 16 टक्के |
मुदत ठेव पावती | 021069/ 1358 | रु.40,000/- | दि.1/1/2008 | 14 टक्के |
मुदत ठेव पावती | 021074/ 2010 | रु.25,000/- | दि.1/1/2008 | 14 टक्के |
मुदत ठेव पावती | 021075/ 2246 | रु.42,000/- | दि.1/1/2008 | 14 टक्के |
बचत ठेव खाते | 411 | रु.61,987/- | दि.31/3/2009 | बचत खात्याच्या प्रचलित व्याज दराने |
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
(सौ. संगिता एस. धायगुडे÷)
अध्यक्ष
(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/स्व/18810)
|
[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER |