जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 160/2010. तक्रार दाखल दिनांक : 05/04/2010. आदेश पारीत दिनांक : 11/10/2010. 1. दिलीप ज्योतीराम कांबळे, वय 52 वर्षे, व्यवसाय : नोकरी. 2. कु. गायत्री दिलीप कांबळे, वय 11 वर्षे, व्यवसाय : शिक्षण. 3. चि. राज दिलीप कांबळे, वय 9 वर्षे, व्यवसाय : शिक्षण. 4. कु. दिप्ती दिलीप कांबळे, वय 17 वर्षे, व्यवसाय : शिक्षण. सर्व रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर. (तक्रारदार क्र.2 ते 4 चे अ.पा.क. म्हणून वडील नात्याने तक्रारदार क्र.1 दिलीप ज्योतीराम कांबळे) तक्रारदार विरुध्द 1. स.म. शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. (सदरची नोटीस शाखा व्यवस्थापक, बारलोणीला बजवावी.) 2. श्री. यशवंत किसन शिंदे, (चेअरमन), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 3. श्री. व्यंकटेश शिवाजी पाटील, (अ.संचालक), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 4. श्री. पोपट डबरु गुंजाळ, ( व्हा. चेअरमन), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 5. श्री. दिनकर कृष्णा मोरे, (संचालक), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 6. श्री. श्रीरंग संभू मोरे, (संचालक), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 7. श्री. बाबासाहेब सौदागर आवताडे, (संचालक), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष 8. श्री. रामलिंग बाबू ठोंबरे, (संचालक), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 9. श्री. सौदागर श्रीपती चव्हाण, (संचालक), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 10.श्री. बाबू भवानजी गुंजाळ, (संचालक), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 11.सौ. अहिल्यादेवी सदाशिव हनवते, (संचालिका), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 12.श्री. मधुकर भाऊराव गपाटे, (सचिव), स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 13. मॅनेजर, श्री. व्ही.व्ही. गोरे, स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, शाखा माळीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर, रा.माळीनगर, ता.माळशिरस, जि. सोलापूर. 14. प्रशासक, स.म. शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. सहायक निबंधक कार्यालय, माढा, ता. माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष कोरम :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : डी.पी. बागल विरुध्द पक्ष गैरहजर आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या माळीनगर शाखेमध्ये खालील नमूद केल्याप्रमाणे मासिक व्याज प्राप्ती योजना व दाम दुप्पट ठेव पावतीद्वारे गुंतवणूक केलेली आहे. ठेविदाराचे नांव | ठेवीचा तपशील | ठेव रक्कम रुपयामध्ये | पावती क्रमांक | गुंतवणूक केलेली तारीख | रक्कम परतीची तारीख | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 40,000/- | 000478 | 1/2/08 | 1/3/09 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 50,000/- | 000494 | 4/4/08 | 4/5/09 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 30,000/- | 000582 | 1/10/08 | 1/11/09 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 12,000/- | 000597 | 3/2/09 | 3/3/10 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 50,000/- | 000600 | 28/2/09 | 28/3/10 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 50,000/- | 000701 | 28/2/09 | 28/3/10 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 25,000/- | 000702 | 28/2/09 | 28/3/10 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 25,000/- | 000800 | 1/4/08 | 1/5/09 | गायत्री दिलीप कांबळे | दामदुप्पट ठेव | 25,000/- | 011714 | 1/12/07 | 1/11/13 | चि.राज दिलीप कांबळे | दामदुप्पट ठेव | 25,000/- | 011715 | 1/12/07 | 1/11/13 | दिप्ती दिलीप कांबळे | दामदुप्पट ठेव | 33,000/- | 011728 | 18/2/08 | 18/2/14 | दिलीप ज्योतीराम कांबळे | दामदुप्पट ठेव | 30,000/- | 013346 | 15/1/07 | 15/1/13 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 25,000/- | 024591 | 7/10/08 | 7/1/09 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 25,000/- | 024592 | 8/10/08 | 7/1/09 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 25,000/- | 024593 | 8/10/08 | 7/1/09 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 25,000/- | 024594 | 8/10/08 | 7/1/09 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 25,000/- | 0029158 | 3/3/09 | 2/6/09 | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 50,000/- | 0029159 | 3/3/09 | 2/6/09 |
2. वरीलप्रमाणे तक्रारदार यांनी एकूण रु.5,70,000/- गुंतवणूक केलेले आहेत. मुदत ठेव पावती व मासिक प्राप्ती योजनेच्या पावतीची मुदत संपलेली आहे. तक्रारदार यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, उदरनिर्वाहासाठी व मुलीच्या लग्नकार्यासाठी ठेव रकमेची आवश्यकता भासल्याने त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे रकमेची मागणी केली असता रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठविल्या असता त्या प्राप्त होऊनही रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि विरुध्द पक्ष यांच्याकडे गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्चापोटी रु.15,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 3. विरुध्द पक्ष यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले आहेत आणि त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. तक्रारदार यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 5. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या माळीनगर शाखेमध्ये मुदत ठेव, मासिक व्याज प्राप्ती योजना व दामदुप्पट ठेवीमध्ये एकूण रु.5,70,000/- रक्कम गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावत्यांवरुन निदर्शनास येते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, उदरनिर्वाहासाठी व मुलीच्या लग्नकार्यासाठी ठेव रकमेची निकड भासल्यामुळे त्यांनी मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. 6. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतंसंस्थेच्या संचालकाची यादी रेकॉर्डवर दाखल केलेली आहे आणि त्याप्रमाणे संचालकांना प्रस्तुत तक्रारीमध्ये विरुध्द पक्ष म्हणून समाविष्ठ करण्यात आलेले आहे. मंचाने विरुध्द पक्ष यांना मंचाची नोटीस बजावल्यानंतरही ते मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा म्हणणे दाखल केलेले नाही. तसेच तक्रारदार यांनी पाठविलेल्या नोटीसला विरुध्द पक्ष यांनी उत्तर दिले नसल्याचे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या नोटीसीसह प्रस्तुत तक्रारीला उत्तर दिलेले नसल्यामुळे आणि मंचासमोर उपस्थित राहून वस्तुस्थिती स्पष्ट करत नसल्यामुळे त्यांना तक्रारदार यांची तक्रार मान्य असल्याचे अनुमानास आम्ही येत आहोत. 7. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या माळीनगर शाखेमध्ये मुदत ठेव, मासिक व्याज प्राप्ती योजना व दामदुप्पट ठेवीमध्ये एकूण रु.5,70,000/- रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. तक्रारदार यांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च, उदरनिर्वाह खर्च व मुलीच्या लग्नासाठी ठेव रकमेची आवश्यकता असल्यामुळे वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर किंवा मुदतपूर्व परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मासिक व्याज प्राप्ती योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेस माहे मार्च 2009 पासून व्याज मिळत नसल्याचे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे. त्यामुळे मासिक व्याज प्राप्ती योजनेची रक्कम माहे मार्च 2009 पासून व्याजासह मिळविण्यास तक्रारदार पात्र ठरतात. 8. विरुध्द पक्ष क्र.12, 13 व 14 हे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेचे अनुक्रमे सचिव, मॅनेजर व प्रशासक आहेत. ठेव रक्कम परत करण्याची त्यांची जबाबदारी सिध्द झाल्याशिवाय त्यांना जबाबदार धरता येत नाही. 9. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. तक्रारदार यांचे नांव | ठेवीचा तपशील | पावती क्रमांक | ठेव रक्कम (रुपयामध्ये) | व्याज द्यावयाचा तारीख | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 000478 | 40,000/- | 1/3/09 | 13 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 000494 | 50,000/- | 1/3/09 | 13 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 000582 | 30,000/- | 1/3/09 | 13 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 000597 | 12,000/- | 1/3/09 | 13 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 000600 | 50,000/- | 1/3/09 | 13 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 000701 | 50,000/- | 1/3/09 | 13 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 000702 | 25,000/- | 1/3/09 | 13 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मासिक व्याज प्राप्ती | 000800 | 25,000/- | 1/3/09 | 13 टक्के | गायत्री दिलीप कांबळे | दामदुप्पट ठेव | 011714 | 25,000/- | 1/12/07 | 13 टक्के | चि.राज दिलीप कांबळे | दामदुप्पट ठेव | 011715 | 25,000/- | 1/12/07 | 13 टक्के | दिप्ती दिलीप कांबळे | दामदुप्पट ठेव | 011728 | 33,000/- | 18/2/08 | 13 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | दामदुप्पट ठेव | 013346 | 30,000/- | 15/1/07 | 13 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 024591 | 25,000/- | 7/10/08 | 12 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 024592 | 25,000/- | 8/10/08 | 12 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 024593 | 25,000/- | 8/10/08 | 12 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 024594 | 25,000/- | 8/10/08 | 12 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 0029158 | 25,000/- | 3/3/09 | 12 टक्के | दिलीप ज्योतीराम कांबळे | मुदत ठेव पावती | 0029159 | 50,000/- | 3/3/09 | 12 टक्के |
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/111010)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONORABLE Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |