जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ६७/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २५/०४/२०१२
तक्रार निकाली दिनांक – २३/०५/२०१३
१) श्री. गणेश एकनाथ नगरे
उ.वय ५६ वर्षे, धंदा – निवृत्त
२) सौ. संध्या गणेश नगरे
उ.वय ५३ वर्षे, धंदा – घरकाम
३) चि. अमोल गणेश नगरे
उ.वय २२ वर्षे, धंदा – शिक्षण
वरील नं.१ ते ३, राहणारः- ४६४, दत्त कॉलनी
देवपुर धुळे ता.जि. धुळे. ................ तक्रारदार
विरुध्द
१ श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या., धुळे
कुमोदीनी पंचभाई - चेअरमन
श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या., धुळे
मुख्य शाखा – १९९९, श्री. समर्थ भवन नगरपटटी
धुळे – ४२४००१.
२. श्री. सचिन सुरेश कुलकर्णी – मुख्याकार्यकारी सो.
श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या., धुळे
१९९९, श्री.समर्थ भवन, नगरपटटी, धुळे – ४२४००१. ............ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.के.आर. लोहार)
(सामनेवाला तर्फे – अॅड.वाय.बी. जोशी)
निकालपत्र
(दवाराः मा.अध्यक्षा – सौ. व्ही.व्ही. दाणी)
तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला ‘श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या., धुळे.’ (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अंतर्गत एकूण रक्कम रू.१,७८,११८/- गुंतविले होते. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ.नं. |
पावती क्रं. |
ठेव तारीख |
देय तारीख |
व्याज |
ठेव रक्कम |
देय रक्कम |
१. |
०२४७४७ |
१८.०६.०९ |
३०.१२.११ |
११% |
५०,००० |
६०,९९८ |
२. |
०२४७४८ |
१८.०६.०९ |
३०.१२.११ |
११% |
५०,००० |
६०,९९८ |
३. |
०२४७४९ |
१८.०६.०९ |
३०.१२.११ |
११% |
२५,००० |
३०,५०० |
४. |
बचत खाते क्रं.४०/१०७० वरील दि.१२/२/११ अखेर शिल्लक |
२५,६२२ |
एकुण रक्कम रूपये |
१,७८,११८/- |
२. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे वरील देय रक्कमेची वेळोवेळी मागणी केली असता सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना दिली नाही. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून मुदत ठेव पावतींतील व बचत खात्यात असेलेली एकूण रक्कम रू.१,७८,११८/-, तसेच मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी रू.२५,०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चासहीत वरील सर्व एकूण रकमेवर १८% द.सा.द.शे. दराने व्याज सामनेवाला यांचेकडून मिळावेत, याकामी सदरचा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.४/१ ते ४/४ वर मुदत ठेव पावत्या व बचत खाते पासबुकच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत.
३. सामनेवाला नं.१ तर्फे चेअरमन यांनी लेखी खुलासा दाखल केलेला आहे. त्यांनी आपल्या लेखी खुलाश्यात असे म्हटले आहे की, तक्रारदार यांचा अर्ज चुकीचा व खोटा असुन तो मान्य नाही. सामनेवाला नं.१ हे सदरील पतसंस्थेचे चेअरमन असुन तक्रारदार यांची रक्कम देण्यास ते व्यक्तिशः जबाबदार नाहीत.
४. सामनेवाला नं.२ यांनी लेखी खुलासा दाखल केलेला आहे. त्यांनी आपल्या लेखी खुलाश्यात असे म्हटले आहे की, तक्रारदार यांचा अर्ज चुकीचा व खोटा असुन तो मान्य नाही. सामनेवाला नं.२ हे सदरील पतसंस्थेचे कर्मचारी असुन तक्रारदार यांची रक्कम देण्यास ते व्यक्तिशः जबाबदार नाहीत.
तसेच सामनेवाला यांनी पुढे असे म्हटले आहे की, पतसंस्थेतर्फे ठेवीदारांना दिल्याजाणा-या तडजोडीच्या प्रमाणात दरमहा रककम रू.५०००/- तक्रारदार यांस देण्यांस तयार होती, परंतु तक्रादारांनी रक्कम स्विकारण्यांस नकार दिल्यामुळे सदरची रककम हि पतसंस्थेत शिल्लक पडुन आहे. सदरील बाब तक्रारदार यांनी न्यायमंचापासुन लपवुन ठेवलेली आहे.
५. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता, तसेच सामनेवाला यांचा खुलासा आणि दोन्ही पक्षांच्या विदवान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
२. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
३. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून देय रक्कम
व त्यावरील व्याज मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
४. तक्रारदार हे सामनेवाला यांच्याकडून मानसिक
त्रास व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम वसुल होऊन
मिळण्यास पात्र आहेत काय ? होय
५. अंतिम आदेश ? आदेशाप्रमाणे
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.४/१ ते ४/४ वर मुदत ठेव पावत्या व बचत खाते पासबुकच्या छायांकित प्रती दाखल केलेल्या आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव पावतीतील व बचत खात्यामधील रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावतीतील व बचत खातेमधील असलेली रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावती व बचत खाते अन्वये रक्कम गुंतविली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडे गुंतवलेली रक्कम परत करणे हे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही सामनेवाला यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतीतील व बचत खात्यामधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला ‘चेअरमन/ मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या., धुळे’ यांच्याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू या संदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceededagainst and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain ableagainst the society, the Directors of members of the managing committee cannot be heldresponsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To holdthe Directors of the banks/members of the managing committee of the societiesresponsible, without observing the procedure prescribed under the Act, would also beagainst the principles of co-operation, which is the very foundation of establishment oftheco-operative societies.
वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे सामनेवाला नं.१ व २ यांना वैयक्तिकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाला ‘श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या., धुळे’ यांचेकडून मुदत ठेव पावतीतील व बचत खातेमधील एकूण रक्कम रू.१,७८,११८/- सदर आदेश तारखे पासून रक्कम फीटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्के दरा प्रमाणे व्याजासह, अशी एकूण रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.३ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
९. मुद्दा क्र.४- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खातेमधील व्याजासह होणारी रक्कम सामनेवाला यांच्याकडुन परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना सामनेवाला यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे सामनेवाला यांच्या कडून मानसिक त्रासापोटी रु.१०००/- व अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुदद क्रं.४ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा क्र.५- तक्रारदार व सामनेवाले यांचे अर्ज, प्रतिज्ञापत्र व दाखल केलेली सर्व कागदपत्रे व दोन्ही वकीलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला यांनी, सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे
आत, तक्रारदारांना खालील प्रमाणे रक्कमा दयाव्यात.
(१) मुदत ठेव पावतींतील व बचत खात्यामधील असलेली एकूण देय रक्कम रू.१,७८,११८/- (अक्षरी रूपये एक लाख अठठयाहत्तर हजार एकशे अठरा मात्र) व या रकमेवर आदेश दिनांकापासुन द.सा.द.शे. ६ टक्के दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत व्याज दयावे.
(२) मानसिक त्रासापोटी रक्कम रू.१,०००/- (अक्षरी रू. एक हजार मात्र) व
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रू.५००/- (अक्षरी रू. पाचशे मात्र) दयावेत.
३. वर नमुद आदेशाची अमंलबजावणी (अध्यक्ष/संचालक/व्यवस्थापक/ अवसायक) यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्थेचा कारभार पाहात असतील त्यांनी करावी. तसेचक्र.२मधीलरकमेपैकीकाहीरक्कम अगर व्याज दिले असल्यास, त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.