Maharashtra

Satara

CC/11/10

Sou.Kusum Wamanrao Gundge - Complainant(s)

Versus

Shambhaji Sampatrao Shinde,Manager - Opp.Party(s)

Balip

14 Nov 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 11 of 10
1. Sou.Kusum Wamanrao GundgeDhauwadui Tal Man Dist SataraSataraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Shambhaji Sampatrao Shinde,ManagerKasabapeth, Phaltan Dist SatarasataraMaharashtra2. Shantanu Doryodhan Rananavare,Chairman Katraj Dudh Dairy Opp katraj PuneMaharashtra3. Devraj V.Jahave, Sanchalak Phaltan Dist SataraSataraMaharashtra4. P.P. Jadhav, SanchalakPhaltan Dist SatarasataraMaharashtra5. P.L.Bakshi, SanchalakPhaltan Dsit SataraSataraMaha6. J.M.Gore,SanchalakPhaltan Dist SataraSataraMaha7. R.R.Taware,SanchalakPhaltan, Dist SataraSataraMaha8. P.G.Gholap,SanchalakPhaltan Dist SataraSataraMaha9. Sou.S.D.Rananavre,SanchalakKatraj DudhDiare Opp,PunePuneMaha10. B.B.Chawan,SanchalakPhaltan, Dist SataraSataraMaha11. Y.G.Kamble,SanchalakPhaltan, Dist SataraSataraMaha12. K.R.Jadhav,SanchalakPhaltan, Dist SataraSataraMaha ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 14 Nov 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

                                           नि.48

मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर

                               तक्रार क्र. 10/2011                                          नोंदणी तारीख 18/01/2011                                    निकाल तारीख 14/11/2011                                    निकाल कालावधी 300 दिवस

 

श्री  महेंद्र एम गोस्‍वामी, अध्‍यक्ष

श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या

(श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या. यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)

---------------------------------------------------------------

1.श्री. कुसुम वामनराव गुंडगे,

तर्फे मुखत्‍यार व स्‍वतःसाठी

विवेक वामनराव गुंडगे

रा. दहिवडी, ता.माण, जि.सातारा                  --- अर्जदार

                                   (अभियोक्‍ता श्री.दादासो एस बळीप)

      विरुध्‍द

1. श्री संभाजीराव संपतराव शिंदे,व्‍यवस्‍थापक

रा.5-4, रॉयल रेसिडेन्सि, दादा महाराज मठासमोर,

कसबा पेठ, फलटण, ता.फलटण जि.सातारा,

2. श्री. शंतनु दुर्योधन रणनवरे,

रा. रणवरेसर रॉयल हॉस्पिटल, कात्रज,

कात्रंज दुध डेअरी समोर, पुणे.

3. श्री. देवेराज विश्‍वासराव जाधव,

रा. संजीवराजे नगर, फलटण, ता.फलटण, जि.सातारा

4. श्री. प्रकाश प्रतापराव जाधव,

रा. संजीवराजे नगर, फलटण, ता.फलटण, जि.सातारा

5. श्री.पुरुषोत्‍तम लक्ष्‍मण बक्षी,

रा. रेस्डिन्सि, फलटण, जा.फलटण, जि.सातारा

6. श्री. जोतीराव महादेव गोरे

रा. अयोध्‍या प्रेस, फलटण, ता.फलटण जि. सातारा

7.  श्री. राजेंद्र रामचंद्र तावरे,

रा.गोळीबार मैदान, फलटण, ता.फलटण, जि. सातारा

8.  श्री. पोपट गोविंद घोलप,

रा. ठाकुरसी, फलटण, ता. फलटण,जि. सातारा

9.  सौ. शारदादेवी दुर्योधन रणनवरे,

रा. रणवरेसर रॉयल हॉस्पिटल कात्रज,

कात्रज दूध डेअरी समोर, पुणे 411 048

10. श्री. बबन भिकु चव्‍हाण

रा.गोळीबार मैदान, फलटण, ता.फलटण, जि. सातारा

11. श्री. यशवंत गजानन कांबळे,

रा. धुमाळवाडी, फलटण, ता.फलटण, जि. सातारा

12. सौ. कांचनमाला रंगराव जाधव

रा. गोळीबार मैदान, फलटण, ता.फलटण, जि. सातारा

13. श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्‍था मर्यादित,फलटण

जि.सातारा तर्फे चेअरमन श्री. शंतनु दुर्योधन रणवरे,

रा. रणवरेसर रॉयल हॉस्पिटल कात्रज,

कात्रज दूध डेअरी समोर, पुणे 411 048        ------ जाबदार नं.1 ते 13

                                                 (एकतर्फा)        

 

न्‍यायनिर्णय

 

      अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे.  अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे –

 

1.     अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत.  सदरच्‍या ठेवींची मुदत संपलेली आहे.  मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली.  तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्‍याजसहित देय झालेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली.  थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे.  अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत.  त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे.  सदरचे अर्जामधील अर्जदार यांनी  कलम 3 मधील अ.नं. 1 ते 14 ठेवपावत्‍यांची एकूण रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज, झालेल्‍या मनःस्‍तापाबद्दल नुकसानभरपाई रक्‍कम रु.1,00,000/- इ. ची मागणी केलेली आहे.

 

2.    प्रस्‍तुत तक्रारअर्ज प्रकरणी जाबदार क्र. 1 ते 13 यांना जाहीर नोटीस काढण्‍यात आली.  परंतु तरीही जाबदार क्र. 1 ते 13 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब प्रस्‍तुत जाबदारांविरुध्‍द एकतर्फा चा आदेश नि.1 वर पारीत केला  व प्रकरण निकालासाठी ठेवणेत आले.

 

3.    अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्‍दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले.  अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेल्‍या 5/1 कडील अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस व नि. 6 ते 12 कडील  दाखल केलेल्‍या मूळ ठेवपावत्‍या पाहिल्‍या तसेच नि. 47 कडील पुरसीस पाहीली. 

 

4.    अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या होत्‍या व आहेत.  सदरच्‍या ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्‍कम व त्‍यावर ठेव पावतीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे होणा-या व्‍याजाची रक्‍कम देण्‍याची होती.  तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली  आहे.  अर्जदार यांनी  शपथपत्राने जाबदाराकडे वेळोवेळी ठेवीच्‍या रकमेची मागणी केली होती असे कथन करतात तसेच अर्जदारांनी जाबदार यांना रक्‍कम मागणीची नोटीसही पाठविली आहे हे नि. 5/1 वरुन दिसून येते.  थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्‍कम न देवून सेवेत त्रुटी केलेली आहे हे शाबीत होत आहे.   सबब दाखल कागदपत्रांवरुन अर्जदार हे जाबदार क्र. 1 ते 13 यांचेकडून  रक्‍कम मिळणेस पात्र आहेत या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 

 

5.    एक गोष्‍ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र. 2 जे श्रीमंत मालोजीराजे सह.गृहतारण संस्‍था मर्या. फलटण या संस्‍थेचे चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्‍या पदावर काम करणा-या व्‍यक्‍तीने प्रस्‍तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्‍वीकारणे व नेमलेल्‍या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते.  तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 2 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत.  जाबदार क्र.1 ते 13 यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही.  सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्‍ये केलेली विनंती अंशतः मान्‍य करणे जरुरीचे आहे. पावती क्र. 025598 सदर ठेवपावतीची झेरॉक्‍स प्रत दाखल असल्‍याने सदर पावतीबाबत निर्णय देणे न्‍याय होणार नाही.   जाबदार क्र. 1 मॅनेजर, श्री.संभाजी संपतराव शिंदे हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍यामुळे त्‍यांना अर्जदारांची रक्‍कम देणेस वैयक्तिकपणे जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.        

7.    या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.

 

आदेश

 

1.  अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.

2.  जाबदार क्र. 2  ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तरित्‍या तसेच संस्‍थेकरीता

    जाबदार क्र. 1 यांनी संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.

अ.     ठेवपावती क्र. 026180, 026082, 026179, 026083, 025009,

024803, 023811, 023807, 023808, 028604, 028605, 023810 व 024446 वरील मूळ रक्‍कम  ठेवपावत्‍यांमध्‍ये नमूद  केल्‍याप्रमाणे देय होणा-या व्‍याजासह रक्‍कम द्यावी  तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्‍कम पदरी  पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍केंप्रमाणे व्‍याजासह द्यावी.

    ब.    मानसिक त्रासापोटी व खर्चापोटी एकूण रक्‍कम रु. 5,000/- द्यावेत.

3.  जाबदार क्र.1 ते 13 यांनी या निर्णयाची अंमलबजावणी आदेशाची प्रत

    मिळालेपासून  30 दिवसांचे आत करावी.

4.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.

 

सातारा

दि. 14/11/2011

 

 

           (श्री.महेंद्र एम गोस्‍वामी)              (श्रीमती.सुचेता मलवाडे)     

                 अध्‍यक्ष                             सदस्‍या                    

 

 

 

 

 

 

                            

 

 

 


Smt.Sucheta A. Malwade, MEMBERHONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT ,