जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/78. प्रकरण दाखल तारीख - 06/03/2010 प्रकरण निकाल तारीख – 05/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य विनोद राजेंद्र सिंगेवार वय 50 वर्षे, धंदा नौकरी अर्जदार रा. गुरुद्वारा रोड गेट नं.1, नांदेड. विरुध्द. 1. मा. व्यवस्थापक गैरअर्जदार शमा इंण्डेन सव्हीसेंस, इंडेण डिस्ट्रीब्यूटर, 19,स्टेडीयम कॉम्प्लेक्स, नांदेड. 2. एरिया मॅनेजर, इंडियन ऑईल कापोरेशन लि. इंडियन एरिया ऑफीस आक्रशन, बीजी प्लेक्स, पहिला मजला, 26, सेन्टर बाजार रोड, रामदास पेठ, नागपूर 440 010. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार 1 व 2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार शमा इंडियन सर्व्हिसेस यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत ते म्ळणतात की, त्यांच्याकडे 1992 पासुन गैरअर्जदार यांनी ग्राहक उपभोक्ता नंबर 3127 नुसार गॅसचे कनेक्शन दिलेले असून त्या वेळेस एक गॅसची टाकी व रेग्युलेटर त्यांना दिलेले होते तशी त्याची नोंद आहे. सध्य परिस्थितीत अर्जदार यांना गॅसचे कनेक्शन बॅगलोर येथे ट्रान्सफर करावयाचे असल्याने त्यांनी त्याच्याकडे असलेले गॅस टाकी व रेग्युलेटर जमा करुन ट्रान्सफर प्रमाणपत्र देणे वीषयी विनंती केली असता, गैरअर्जदार यांनी अर्जदार याचेकडे दुसरे सिलेंडर नव्हतेच त्यामुळे त्यांना ते वापस करण्याचा प्रश्नच येत नाही. गैरअर्जदार यांनी संगणकाच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंद घेऊन रेकॉर्ड तयार केलेले आहे त्यामुळे अर्जदाराची विनंती आहे की, त्यांचे गॅस कनेक्शनमध्ये एकच सिलेंडरची नोंद घ्यावी असे आदेश गैरअर्जदार यांना करावे. शिवाय मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडुन मिळावे म्हणुन ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांना नोटीस पाठविण्यात आली त्यांना मिळुनही ते गैरहजर राहीले म्हणुन त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्ररकण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे, दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी त्यांचे गॅस पूरवठा पासबूक उपभोक्ता नंबर 3127 कार्ड सिरियल नंबर 5708329 दाखल केलेले असून हे शमा इंडेन सर्व्हीसेस या वितरकाचे कार्ड असून यावर सिंलेंडर संख्या 1 (एक) अशी दाखवलेली आहे. त्यांवर अर्जदाराचे नांव आहे, तसेच डिपॉझीट म्हणून रु.450/- दाखविण्यात आलेले आहे. अर्जदाराचे सरळ म्हणणे असे आहे की, त्यांचेकडे गॅसचे एकच सिलेंडर आहे. त्यांची बँगलोर येथे बदली झाल्यामूळे त्यांना बँगलोर येथे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करुन पाहिजे. हे मागत असताना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडे दोन सिलेंडर असल्याची नोंद आहे म्हणून दोन सिलेंडर जमा करण्याचे सांगितले. त्यांचेकडे विचारणा केली असता संगणकामध्ये दोन सिलेंडरची नोंद झालेली आहे असे त्यांना गैरअर्जदार यांनी सांगितले. यावीषयी गैरअर्जदार यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिलेली असताना ते गैरहजर राहीले, यांचा अर्थ त्यांना ग्राहकाचे म्हणणे मान्य आहे असा घेण्यास हरकत नाही. यासाठी पूरक म्हणून शमा इंडेन सर्व्हीसेसचे पञ दि.24.04.2010 रोजीचे जे की, अर्जदार यांचे नांवावर दिलेले आहे त्यामध्ये सरळ त्यांनी सिंगल कनेक्शनचे चूकून डबल कनेक्शन झाले व चूकून दोन सिंलेंडरची नोंद आहे. त्यामूळे ग्राहकास झालेल्या ञासाबददल आम्ही क्षमस्व आहोत असे पञ असताना व आपली चूक कबूल केलेली असताना गैरअर्जदार यांना त्यांचेकडील झालेली चूक दूरुस्त करुन दयावयास पाहिजे होती परंतु असे न केल्यामूळे अर्जदार यांना मंचामध्ये यावे लागले. यात गैरअर्जदार यांची चूक स्पष्टपणे आहे व त्यांनी चूक कबूल करुनही सेवा न दिल्यामूळे सेवेतील ञूटी ही सिध्द होते. अर्जदारांचा तक्रार अर्ज मान्य करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे गॅस उपभोक्ता पासबूकामध्ये जी नोंद आहे तिच ग्राहय धरावी व त्यांचे संगणकामध्ये चूकून जी डबल इंन्ट्री झालेली आहे ती डिलिट करावी, तसे पञ सिंगल सिलेंडरचे ग्राहकांचे नांवाने दयावे. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक ञासापोटी रु.2,000/- व दावा खर्च म्हणून रु.500/- मंजूर करण्यात येतात. 4. निकालाच्या प्रति पक्षकारांना देण्यात याव्यात. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |