निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराने दि. 24/10/2011 रोजी गैरअर्जदारामार्फत दोन पार्सल पुणे येथे पाठविण्यास दिले होते. त्यासाठी लागणारे चार्जेस अर्जदाराने गैरअर्जदारास दिले. गैरअर्जदाराने अर्जदारास सदरचे पार्सल नर्मदा सर्व्हीस पावती क्र. 747033 आणि नायटेक इंजिनिअर्स पुणे यांचा पावती क्र. 747034 पाठविण्यास दिले होते 3 दिवसाच्या आत पाठविण्याची आश्वासन दिले. गैरअर्जदार सदरचे पार्सल एक महिना एक आठवडा होऊन सुध्दा दिले आहे. सदरील कार्यालयाने पार्सल न मिळाल्याबद्दल अर्जदारास दि; 21/11/11 रोजी पत्राद्वारे कळविले. अर्जदाराने सदरची माहिती गैरअर्जदारास दिली. सदरच्या पार्सल मालाची किंवा ही रक्कम रु. 2,23,462.13 पैसे होती. अर्जदाराने दि. 19/03/2012 रोजी गैरअर्जदारास नोटीस दिली.
अर्जदाराने तक्रारी अर्जात एकुण रक्कम रु. 2,75,622.13 पैसे 18 टक्के व्याजासह तसेच तक्रारीचा खर्च रु. 25,000/- मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जा सोबत पुरावा म्हणुन शपथपत्र व त्या सोबत 10 कागदपत्रे दिली आहेत.
गैरअर्जदाराविरुध्द दि. 26/06/2014 रोजी म्हणणे नाही आदेश पारीत केला आहे. अर्जदाराने पुरावा म्हणून दाखल केलेले शपथपत्र व त्यासोबत दाखल केलेले कागदपत्रांचे अवलोकन केले असता.
अर्जदाराने सदरचे पार्सल पाठविण्याकरीता प्रोफेशनल कुरिअरकडे योग्य तो मोबदला दिला होता. सदरचा मोबदला प्रोफेशनल कुरिअर स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो. अर्जदाराने दि. 24/10/11 रोजी प्रोफेशनल कुरिअरचा पावती क्र. 747033 व 747034 दाखल केली आहे. यावरुन असे दिसुन येते की, अनुक्रमे अर्जदाराने पुणे येथील नर्मदा सर्व्हीसेसला व नायटेक इंजिनिअरींग यांना सदर पार्सल पाठविण्यासाठी दिले असल्याचे व त्यासाठी अर्जदाराने अनुक्रमे प्रत्येकी 80 रुपये व 120 रुपये दिल्याचे दिसते. सदरच्या मुळे पावत्या दाखल आहेत. अर्जदाराने दि. 21/11/11 रोजी सदरचे दोन्ही पार्सल वरिल दिलेल्या पत्यावर पोहचले नसल्याबद्दल प्रोफेशनल कुरिअरला पत्र दिले आहे, सदरचे पत्र दाखल आहे. अर्जदाराचे नर्मदा सर्व्हिसेस पुणे यांना पावती क्र. 747033 यांचे किर्लोस्कर मेक कंट्रोल कार्डचे दर खरेदी करते वेळेस रु. 37,274.63 व पावती क्र. 747034 यांचे नायटेक इंजिनिअर्स यांचे सिमेंन्स मेक कंट्रोल कार्डची किंमत रु. 1,86,187.50 सदर प्रोफेशनल कुरिअर मार्फत पुणे येथे अर्जदाराने पाठविले होते. सदरचे कार्डस पार्सल केलेल्या कुरिअर मार्फत नर्मदा सर्व्हीसेस व नायटेक इंजिनिअर्स यांना मिळाले नसल्याचे दिसुन येते सदरील कार्डचे अर्जदाराने प्रोफेशनल कुरिअरला दिलेल्या पार्सलची दर पत्रक दाखल केले आहे. यावरुन सदरचे दरपत्रक एकुण 2,23,462.13 रुपयाचे असल्याचे सिध्द होते. अर्जदारास नायटेक इंजिनिअर्सने सदरील पार्सल वेळेत न मिळाल्यामुळे दि. 06/01/12 रोजी पत्र पाठवून त्यावरती 12.5 टक्के जास्तीचे व्याज आकारले आहे असे दाखल केलेल्या पत्रावरुन दिसते. अर्जदाराने गैरअर्जदारास दि. 19/03/2012 रोजी नोटीस दिली आहे. सदरची नोटीस गैरअर्जदारास मिळाल्याची दाखल केलेल्या पावती वरुन दिसुन येते. अर्जदाराने दि. 21/11/11 रोजी पत्र दिले आहे. सदरील पत्राचे गैरअर्जदाराने दि. 25/11/11 रोजी उत्तर दिले आहे, त्यात 7 दिवसाचा वेळ दयावा, सदरील मुदतीत आपल्या तक्रारीचे निवारण करुन देतो, असे म्हणले आहे. सदरचे पत्र दाखल आहे. यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे दोन्ही पार्सल दिलेल्या पत्त्यावर मुदतीत दिले नाहीत व सदरची तक्रार दाखल करेपर्यंत 1 वर्षे होऊन सुध्दा सदरील पार्सल बाबत कोणतीही कार्यवाही प्रोफेशनल कुरिअरने केली नाही. सदरचे प्रकरण प्रोफेशनल कुरिअर विरुध्द म्हणणे नाही आदेश पारित झाल्यामुळे त्यांचा उजर असल्याचे दिसत नाही. अर्जदार व प्रोफेशनल कुरिअर यांच्यात झालेल्या कराराचे पालन कुरिअर कंपनीने केले नसल्यामुळे व अनुचित प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होते. अर्जदार हा रक्कम रु. 2,23,462.13 व मानसिक,शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 6,000/- अनुतोष मिळण्यास पात्र असल्याचे सदर न्यायमंचाचे मत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे..
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 2,23,462.13
आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास दि. 24/10/2011 पासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 3,000/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन
30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.