जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/101 प्रकरण दाखल तारीख - 03/04/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य डॉ.मधुकरराव पि.बालाजीराव टप्पे, वय वर्षे 55, धंदा वैद्यकिय व्यवसाय, अर्जदार. रा. भोकर ता.भोकर जि. नांदेड. विरुध्द. 1. श्याम जोशी, गैरअर्जदार. वय वर्षे सज्ञान, धंदा व्यापार, प्रो.प्रा.सुश्रुता डायग्नोस्टीक कंपनी, परांजपे लेआऊट कॅम्प, अमरावती. 2. अनिरुध्द जोशी, वय सज्ञान धंदा, मॅनेजर, सुश्रुता डायग्नोस्टी कंपनी, रा.वरील प्रमाणे. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.बी.कदम. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्य) सदर प्रकरणांती अर्जदारांची थोडक्यात तक्रार अशी की, त्यांनी गैरअर्जदारांच्या दि.04/08/2008 रोजीच्या पत्रानुसार संपुर्ण नांदेड जिल्हयासाठी गैरअर्जदार यांची कंपनी सुश्रुता डायग्नोस्टीक कंपनीचे उत्पादन एच.सी.जी.स्ट्रीप,एच.एस.जी.कार्ड ओव्हॅल्युशन संच,एच,आय.व्ही.किट टी.बी.टेस्ट किट इत्यादी विकण्यासाठी एजन्सी दिली. गैरअर्जदार यांनी अर्जदारास नांदेड जिल्हयाची एजन्सी दिल्यानंतर नांदेड जिल्हयास लागणारे वेगवेगळया औषधाची विक्री करण्यासाठी अर्जदारास रु.1,28,000/- भरण्यास सांगीतले त्याप्रमाणे अर्जदाराने दि.04/08/2008 रोजी कंपनीकडे भरलेले आहेत. गैरअर्जदारांनी माल एक महिन्यात पुरवठा करतो असे आश्वासन दिले होते. परंतु ते आश्वासन एक महिन्यात पाळले नाही. या उलट गैरअर्जदाराने करारात उल्लेख नसलेले टाकाऊ माल पाठविले आहे. त्याबाबत विचारणा केल्यावर गैरअर्जदाराने दुसरा माल पाठवितो म्हणुन ते माल घेऊन गेले व माल पाठविला नाही. गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराची नेमणुक करते वेळेस व नांदेड जिल्हयात दर महिन्याला रु.1,28,000/- चा माल नांदेड मध्ये वेगवेगळया डॉक्टरकडे विकतो असे खोटे आश्वासन सांगुन अर्जदाराकडुन पैसे जमा करुन घेतले. गैरअर्जदारांनी पैसे घेऊन माल पाठवितो म्हणुन माल न पाठवुन सेवेत त्रुटी केली म्हणुन ही तक्रार दाखल करावी लागली. अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदार करार भंग केल्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराकडुन रु.74,500/- परत मिळण्याचे आदेश व्हावेत आणि मानसीक व शारीरीक त्रासापोटी रु.2,00,000/- व्याजासह परत मिळण्याचे आदेश अर्जदाराच्या हक्कामध्ये दयावेत अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी दाखल तक्रारीवर एक मुद्या उपस्थित होते. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदाराची तक्रार सदर मंचात चालण्यास योग्य आहे काय? नाही कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदारांनी गैरअर्जदार यांचे दि.04/08/2008 रोजीच्या पत्रानुसार नांदेड जिल्हयासाठी गैरअर्जदाराची कंपनी सुश्रुता डायग्नोस्टीक कंपनीचे उत्पादन एच.सी.जी.स्ट्रीप, एच.एस.जी.कार्ड ओव्हॅल्युशन संच, एच.आय.व्ही.किट, टी.बी.टेस्ट किट इत्यादी विक्रीसाठी एजन्सी दिलेली होती. अर्जदार हे गेल्या 15 वर्षापासुन भोकर येथे वैद्यकिय व्यवसाय करतात. अर्जदार यांना नांदेड जिल्हयाची एजन्स देण्यात आली होती व वेगवेगळया औषधाची विक्री करण्यासाठी रु.1,28,000/- गैरअर्जदार यांनी भरण्यास सांगीतले होते त्याप्रमाणे दि.24/08/2008 रोजी रु.1,28,000/- रोजी अर्जदाराने कंपनीकडे जमा केले. त्याबद्यलची पावती अर्जदार यांना गैरअर्जदारांनी दिली व त्यानंतर एक महिन्यात मालाचा पुरवठा करतो असे अश्वासन दिले ते अश्वासन त्यांनी पाळले नाही व 5-6 महिन्यानंतर टाकाऊ माल अर्जदारास पाठविला जे की, त्यांच्या करारात नाही. त्यांनतर अद्यापपर्यंत अर्जदारास माल दिला नाही व पैसे वापस दिले नाही, अशा पध्दतीची तक्रार अर्जदाराने केलेली आहे. वर उपस्थित झालेल्या मुद्याचा विचार करता अर्जदाराची तक्रार ही ग्राहक या सदरात मोडत नसुन व्यापार पध्दतीवर आधरलेले वाटते, या शिवाय अर्जदार हा एजंशीच्या रुपाने व्यापार करीत आहे व ग्राहक संरक्षण कायदयानुसार व्यापा-यास या मंचात तक्रार करण्याचा अधिकार नाही, या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. म्हणुन अर्जदाराच तक्रारअर्ज फेटाळण्यात येतो. वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती पाठविण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER | |