ग्राहक तक्रार क्र. 25/2014
अर्ज दाखल तारीख : 27/01/2014
अर्ज निकाल तारीख: 29/05/2015
कालावधी: 01 वर्षे 04 महिने 02 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. प्रमोद अंबन भिसे,
वय – 37 वर्षे, धंदा – शेती,
रा.शिरढोण, ता.तुळजापूर, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक,
शक्ती पंप्स (इंडिया) लि.,
प्लॉट क्र.401, सेक्टर -3, पिथमपुर – 454774,
जि. धार ( मध्य प्रदेश).
2. प्रकाश अॅग्रो प्रोडक्टस,
व्दारा सावंत बंधू, जाधव कॉम्पलेक्स ,
बाबा पेट्रोल पंपाजवळ, बस स्टँड शेजारी,
उस्मानाबाद रोड, तळजापुर ता. तुळजापूर,
जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.व्ही.देशमूख.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.अजय मौर्य.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे : श्री.पी.बी.कोळेकर/पी.आर.अत्रे.
न्यायनिर्णय
मा. सदस्या, श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य यांचे व्दारा:
अ) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
1. तक्रारकर्ता (तक) यांची शिराढोण ता. तुळापूर जि. उस्मानाबाद येथे गट क्र.24 क्षे 20 आर. आईचे नावावर असलेली, गट क्र.58 क्षेत्र 60 आर चुलते यांचे नावे व गट क्र.24 क्षेत्र 20 अर्जदार यांचे नावे जमीन असून एकत्रीतपणे वहीवाट करतात. तक यांनी स्वत:च्या जमीनीत बोअर घेतले व सदर बोअरवेलला अडीच ते तीन इंच पाणी लागले व विरुध्द पक्षकार (विप) कडून दि.23/03/2013 रोजी अ.क्र.2037639926 रक्कम रु.34,000/- मध्ये खरेदी घेतली व त्याची विप यांनी रितसर पावती देऊन अडचण आल्यास विनामुल्य दुरुस्त करुन किंवा बदलून देण्याची हमी दिली. मात्र सदर मोटार 5 दिवसानंतर अचानकपणे बंद पडली. म्हणून विप यांच्या सांगण्यानुसार सदर मोटार काढून विप कडे घेऊन गेले असता उत्पदानातील दोष असल्याचे सांगण्यात आले. सदर मोटार 15 दिवसांनी दुरस्त करुन देतो असे सांगितले त्यानंतर वारंवार विचारणा केली असतांना दुरुस्त करुन दिली नाही त्यामूळे तक यांचे 40 आर. क्षेत्रातील द्राक्ष व व 60 आर. क्षेत्रामधील ऊसाची लागवड केली होती ती जळून गेली. यात तक यांचे रु.6,40,000/- चे नुकसान झाले आहे व त्याबाबत तलाठी सज्जा ढेकरी यांनी दि.03/05/2013 रोजी तसा पंचनामा केला आहे. तक यांनी विप क्र. 2 यांना सदर नुकसान भरपाई मागितली असता त्यांनी साफ नकार दिला व अर्वाच्च भाषा वापरली तसेच हाकलून दिले म्हणून तक यांनी दि.31/05/2013 रोजी नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली मात्र विप यांनी त्याकडे दूर्लक्ष केले म्हणून सदर तक्रार दाखल करणे भाग पडले असून विप क्र. 1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या पिकाच्या नुकसान भरपाईपोटी रु.6,40,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी विप क्र. 1 व 2 यांचेकडून रक्कम रु.50,000/- व मोटारीचा खर्च रु.34,000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु.6,000/- द.सा.द.शे 15 दराने देण्याचा हुकूम व्हावा अशी विंनती केली आहे.
ब) विप क्र.1 हे तक्रार दाखल केल्याबरोबर हजर होऊन विप हा परप्रांतातील असल्याने त्याला हिंदीमधून तक्रार पाहिजे आहे असा अर्ज दिला त्यानुसार तक यांना पुर्तता करण्याविषयी आदेश करण्यात आले परंतु तक ने आदेश देऊनही पुर्तता न केल्याने विप क्र.1 विरुध्द तक्रार रद्द करण्यात आली.
क) सदर प्रकरणी विप यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आली असता त्यांनी नोटीस मिळूनही व अनेकदा संधी देऊनही आपले म्हणणे दाखल न केल्याने त्यांच्या विरुध्द दि.12/05/2014 रोजी नो से चा आदेश पारीत करण्यात आला.
ड) तक्रारदाराची तक्रार, सोबत दाखल केलेले कागदपत्रे व युक्तिवाद इ. चे सुक्ष्म अवलोकन केले असता आमचे विचारार्थ सदर प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात. त्यांची उत्तरे त्यांचे समोर खाली दिलेल्या कारणासाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तर
1) तक हा विप चा ग्राहक आहे काय ? होय.
2) विप ने सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक हा अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
इ) कारणमीमांसा
मुद्दा क्र. 1 व 2 :
1. तक्रारदाराने विप क्र.1 चा पंप विप क्र.2 व्दारे खरेदी केलेला असून, रेकॉर्डवरील कागदपत्रानुसार ही बाब स्पष्ट होते त्यामुळे विप क्र. 1 व 2 हे उत्पादक व विक्रेते यानुसार सेवा पुरवठादार व तक हा खरेदीदार / ग्राहक असल्याने तक व विप मधील नाते स्पष्ट होते.
2) विप क्र.1 हे तक्रार दाखल केल्याबरोबर हजर होऊन विप हा परराज्यातील कार्यक्षेत्राबाहेरील असल्याने त्याला हिंदीमधून तक्रार पाहिजे आहे असा अर्ज दिला परंतु तक ने आदेश देऊनही पुर्तता न केल्याने विप क्र.1 विरुध्द तक्रार रद्द करण्यात आली.
3) विप क्र. 2 ला हजर राहून म्हणणे देण्यासाठी संधी दिली असता बराच काळ से न दिल्याने अंतिमता त्याच्या विरुध्द ही नो से आदेश दि.12/05/2014 रोजी करण्यात आला.
4) तक्रारदाराने घेतलेल्या बोअरवर टाकणेसाठी पंप विप क्र.2 कडून खरेदी केला असून त्यासाठी लागणारे इतर साहीत्य ही विप क्र.2 कडून घेतले आहे त्याच्या पावत्या सोबत जोडल्या आहेत. तक च्या म्हणण्यानुसार त्याला मोटार दुरुस्तीसाठी गेल्यानंतर दुरुस्त न करता अनावश्यक भांडण करुन परत पाठवण्यात आले. सध्या मोटार कुणाच्या ताब्यात आहे हे तक ने स्पष्ट केले नाही तथापि मोटार दुरुस्ती ही करुन दिली नाही अथवा दुसरी बदलूनही दिली नाही यावरुन ती विप क्र.2 च्या ताब्यात असावी असे दिसते. विप चा से नसल्याने ती गोष्ट स्पष्ट झालेली नाही. ही गोष्ट खरी की विप चा पंप नादुरुस्त झाल्यानंतर warranty period मध्ये म्हणजे 12 महिने सर्व्हीस व 18 महिने दोन दुरुस्ती जी तक ने दाखल केलेल्या warranty card वर आहे अर्थात warranty card वर सही शिक्का नाही पंरतु सदरचे कोड हे तक च्या कस्टडीत आहे. त्यामुळे presumtion वर ही warranty तक ला विप ने दिली आहे असे म्हणता येईल. खरेदी दि.23/03/2013 असतांना अजून warranty period शिल्लक आहे तेव्हा सदरच्या बोअरवेलतील दोष दुरुस्ती अथवा आवश्यक ती सेवा तक ला पुरवणे ही विप क्र. 2 ची जबाबदारी असतांना पार पाडली नाही याच सोबत तक ने पंप बंद असल्यामुळे शेतातील पीकांची झालेल्या नुकसान भरपाईबाबत अनुषंगीक पुरावे देउन मागणी केली आहे ती मान्य करता येणार नाही कारण त्याचा पंपाच्या दोष दुरुस्ती व सेवेशी थेट संबंध नाही व त्याचसोबत त्याला नुकसान टाळण्यासाठी त्याला इतर पर्याय उपलब्ध होते / आहेत. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देऊन खालील आदेश करीत आहोत.
आदेश
तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) जर पंप विप क्र. 2 च्या ताब्यात किंवा विप क्र. 2 मार्फत विप क्र. 1 कडे गेला असल्यास विप क्र. 2 ने सदरचापंप दोषदुरुस्तीसह / सुस्थीतीत तक ला द्यावा किंवा हे शक्य नसल्यास दुसरा नवीन पंप दयावा.
2) विप क्र. 2 ने तक ला तक्रारीचा खर्च रु.4,000/- दयावा.
3) वरील आदेशाची पुर्तता तक यांनी केल्यास विप क्र.2 यांनी पुढील योग्य ती कार्यवाही करुन 45 दिवसात तसा अहवाल मा. मंचासमोर सादर करावा. सदर कामी उभय पक्षकारांनी
मंचासमोर हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न केल्यास तक्रारदार यांनी
सदरबाबत मंचात अर्ज दयावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.