तक्रारदारातर्फे – वकील – ए.व्ही.कुलकर्णी,
सामनेवालेतर्फे – वकील – ए.पी.गंडले,
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी 50 एच.पी.चा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर 750 III क्रमांक एमचएच-23 बी-4397, इंजिन क्रमांक चेसीज क्रमांक चा ता.22.11.2010 रोजी द्वारकादास मंत्री सहकारी बँक मर्यादीत बीड यांचेकडून कर्ज घेवून विकत घेतली. सदर ट्रॅक्टरचा विमा सामनेवाले यांचेकडे सन 2006-2007 या कालावधीचा घेतला असुन विमा पॉलीसी क्रमंक.230703/47/5/01053 असा आहे.
सदर ट्रॅक्टर दाने ट्रॉल्यासह अधिकारपत्र देवून स्वामी विश्वकुमार सहकारी कारखाना यांचेकडे उसतोड हंगामाचे कामासाठी इंडि, जि.विजापूर (कर्नाटक राज्य) येथे देण्यात आले. दुर्दैवाने ता.24.3.2006 रोजी सदर ट्रॅक्टरची इंडीअलमेर या रस्त्यावर चोरी झाली. इंडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली त्याप्रमाणे एफ.आय.आर संबधीत न्यायातात दाखल करण्यात आले.
सामनेवाले यांना ट्रॅक्टर चोरी बाबतची माहिती दिली तसेच ट्रॅक्टरचा क्लेम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु ता.2.2.2010 रोजी तक्रारदारांचा क्लेम ट्रॅक्टर व्यवसायासाठी वापरण्यात आल्यामूळे नाकारण्यात आल्या बाबत कळविले. तक्रारदारांनी सदरचा ट्रॅक्टर कारखान्याचा ऊस हंगामाला कर्ज परतफेडीसाठी व कुटूंबाच्या उपजिविकेसाठी वापरण्यात आला सून व्यवसायासाठी वापरण्यात आलेला नाही, तरी तक्रारदारांची विंनती की,
अ. ट्रॅक्टरची किंमत :- रु. 3,39,000/-
ब. ट्रॅक्टर नसल्यामुळे झालेले शेतीतील नुकसान :- रु. 1,00,000/-
क. गैरअर्जदाराचे निष्काळजीपणा व सेवेत कसूर
केल्यामुळे जो तक्रारदारास झालेला मानसिक
त्रासाबद्दल रक्कम :- रु. 50,000/-
ड; प्रस्तुत तक्रार अर्जाचा खर्च :- रु. 5,000/-
--------------------------
एकूण :- रु. 4,44,000/-
एकुण रक्कम रु.4,44,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजदाराने सामनेवाले यांचेकडून वसूल होवून मिळावे.
सदर प्रकरणात सामनेवाले विमा कंपनी हजर झालेली असुन ता.8.7.2010 रोजी खुलासा न्यायमंचात दाखल केला आहे. थोडक्यात खुलासा खालील प्रमाणे.
सामनेवाले यांना तक्रारदारांची विमा पॉलीसी मान्य आहे. परंतु इतर मजकूर मान्य नाही. तक्रारदारांची विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीचे, नियमाचे पालन केलेले नसल्यामूळे कोणत्याही प्रकारची नूकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत. तक्रारदारांनी सदरचा ट्रॅक्टर भाडे तत्वावर दिलेला आहे. तक्रारदारांनी आसाराम शामराव बडे यांना सदर ट्रॅक्टर बाबतचे मुखत्यारपत्र दिलेले असून या बाबतची माहिती सामनेवाले विमा कंपनीला दिलेली नाही.
तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे सदरचा ट्रॅक्टर 7 ते 8 माणसांनी चोरी केली. परंतु ड्रायव्हरने या बाबत पोलीस स्टेशनला तक्रार केली नाही. सदर ट्रॅक्टर चोरी झाला त्यावेळी तो तक्रारदारांचे ताब्यात नव्हता. परंतु तक्रारदारांनी चोरी बाबतची तक्रार दिलेली आहे. तक्रारदाराचे मुखत्यार आसाराम श्यामराव बेडे यांनी तसेच ड्रायव्हरने सुध्दा तक्रार दाखल केली नाही. तक्रारदारांनी ट्रॅक्टरच्या चोरी बाबत कथन केलेला मजकूर संशयासपद आहे. तक्रारदारांनी सदरची प्रायवहेट कंप्लेंट चोरी झाल्यानंतर 14 दिवसांनी उशीरा दाखल केली आहे. तसेच सदर विलंबा बाबतचे कोणतेही कारण दिलेले नाही. चोरीची घटनास्थळ हे रहदारीचे गजबजलेल्या ठिकाणचे दाखवलेले असून त्या ठिकाणी बरीच वाहने व माणसांची ये-जा चालू असते. अशा ठिकाणी चोरांना चोरी करणे अशक्य आहे. तसेच चोरीच्या वेळी ट्रॅक्टर ड्रायव्हरला मारहाण केल्या बाबत तक्रारीत नमूद केले आहे. पंरतु ड्रायव्हरचे एम.एल.सी. प्रमाणपत्र दाखल नाही, जखमा झाल्याबाबतचे प्रमाणपत्र (Injury Certificate) दाखल नाही. तक्रारदारांनी एफ.आय.आर व इतर कागदपत्रांचे भाषांतर करुन दिलेले नसल्यामूळे सदरची कागदपत्रे वाचता येत नाहीत. संबधीत पोलीस आधिका-यांनी चार्जशिट सी समरी दाख्ंल केलेले आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र, लेखली युक्तीवाद. सामनेवाले यांचा लेखी खुलासा, शपथपत्र, कागदपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पहाता, तक्रारदारांनी 50 एचपी चा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर द्वारकादास मंत्री सहकारी बँक मर्यादीत, बीड यांचेकडून कर्ज घेवून विकत घेतला. सदर ट्रॅक्टरचा विमा सामनेवाले यांचेकडे घेतला असुन विमा पॉलीसी क्र.230703/47/5/01053 असा आहे. दुर्दैवाने ता.23.3.2006 रोजी सदर ट्रॅक्टर इंडी अलमेर या रस्त्यावर चोरी झाली. तक्रारदारांनी सदरचा ट्रॅक्टर अधिकारपत्र देवून स्वामी विश्वकुमार सहकाकरी कारखाना याचेकडे उसतोड हंगमाचे कामासाठी इंडी,अलमेर जि.विजापूर (कर्नाटक) येथे देण्यात आले आहे.
तक्रारदारांनी विमा कंपनीकडून विमा पॉलीसी क्र.230703/47/5/01053 घेतल्याची बाब सामनेवाले यांना मान्य आहे. परंतु तक्रारदारांनी ट्रॅक्टर भाडे तत्वावर दिले, सदर ट्रॅक्टर चोरी झाला त्यामुळे ट्रॅक्टर तक्रारदाराच्या ताब्यात नव्हता. तक्रारदारांनी चोरीची प्रायव्हेट तक्रार 14 दिवस उशिराने दाखल केली. त्याप्रमाणे ट्रॅक्टर चोरी बाबत कथन केलेला मजकुर संशयास्पद आहे. त्याच प्रमाणे संबधीत पोलीस अधिका-यांनी जेएमएफसी (सी) समरी रिपोर्ट दाखल केल्यानुसार चोरीची तक्रार खरी किंवा खोटी आहे या बाबत खुलासा होत नाही. अशा परिस्थितीत सदरचा ट्रॅक्टर चोरी झाल्याची बाब संबंधीत पोलीस व कोर्टाच्या कागदपत्रावरुन दिवून येत नसल्यामुळे तक्रारदारांचा विमा दावा मंजूर करता येत नाही असे ता.5.2.2010 चे पत्रानुसार कळविले आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांनी सदरचा ट्रॅक्टर ऊस तोड हंगामासाठी स्वामी विश्वकुमार सहकारी साखर कारखाना लि.इंडी यांचेकडे देण्यात आल्या बाबत मान्य आहे. सदर ट्रॅक्टरचे परमिट हे व्यवसाया करीता वेगळे घेता येत नाही, त्यामुळे तक्रारदारांना सदरचा ट्रॅक्टर उपजीवीकेसाठी व्यवसाय करण्या करीता वापर करण्यासाठी सामनेवाले विमा कंपनीची परवानगी घेण्याची आवश्यकता दिसून येत नाही. तसेच सदर प्रकरणात ट्रॅक्टर चोरी झाल्यानंतर कर्नाटक राज्यातील पोलीसानी ट्रॅक्टर चोरीची फिर्याद दाखल करुन घेतली नसल्यामुळे सदरची प्रायव्हेट तक्रार दाखल झाल्यानंतर फौजदारी कायदा कलम 173 नुसार चार्जशिट दाखल झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत सदरचा ट्रॅक्टर चोरी झाल्याची बाब सिध्द होते. तक्रारदारांनी सदर ट्रॅक्टर बँकेकडून कर्ज घेवून विकत घेतले होते. तक्रारदाराच्या कुटूंबाची उपजीवीका सदर ट्रॅक्टर स्वत:च्या शेताची कामे तसेच भाडयाने देवून मिळणारे उत्पन्नावर करण्यात येते.
वरील परिस्थितीची अवलोकन केले असता सामनेवाले यांनी तक्रारदारांना चोरी दाव्याची रक्क्म देणे बंधनकारक होते. तक्रारदारांनी आवश्यकती कागदपत्राची पुर्तता करुनही विमा दावा मंजूर केला नाही. सामनेवाले यांची सदरची कृती सेवेत कसूरीची असल्याचे स्पष्ट होते, असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाले यांची सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्यामुळे तक्रारदारांना नियमाप्रमाणे चोरी दाव्याची रक्कम रु.2,54,800/- देणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे. तक्रारदारांचा ट्रॅक्टर चोरी झाल्यामुळे शेतीतील झालेल्या नुकसानी बाबत तसेच मानसिक त्रासाबद्दल व तक्रारीचे खर्चा बाबतची मागणी केली आहे. तक्रारदारांना चोरी दाव्याची रक्कम मिळणार असल्यामुळे सदरची रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येते की, तक्रारदारांचा ट्रॅक्टर क्रं. 750 III क्रमांक एमचएच-23 बी-4397 ची चोरी विमा दाव्याची रक्कम रु.2,54,800/- ( अक्षरी रुपये दोन लाख चौपन्न हजार आठशे फक्त ) आदेश मिळाल्या पासुन 30 दिवसाचे आत देण्यात यावी.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येते की, वरील रक्कम विहित मुदतीत न दिल्यास त्यावर द.सा.द.शे. 6 टक्के तक्रार दाखल तारेखेपासुन व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4. सामनेवाले खर्चा बाबत कोणतेही आदेश नाहीत.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्याचे संच तक्रारदारांना परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि. बीड