जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –136/2010 तक्रार दाखल तारीख –01/09/2010
विजयकुमार पि.चांदमल जांगिड
वय 27 वर्षे,धंदा व्यापार ..तक्रारदार रा.गढी रोड, माजलगांव ता.माजलगांव जि.बीड
विरुध्द
1. मा.शाखाधिकारी,
दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
कार्यालय जालना रोड, बीड
2. दिंगाबर नारायण महाजन,
एंजट दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
कार्यालय साठे चौक,बीड, (ता.28.02.2011 चे आदेशाप्रमाणे
ह.मु.झेंडा चौक, माजलगांव सामनेवाला नं.1,2 यांना
ता.माजलगांव जि.बीड. वगळण्यात आले.) .
3. दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
मार्फत शाखा व्यवस्थापक, मथुरा कॉम्प्लेक्स, ...सामनेवाला
जालना रोड, बीड.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.एम.देशपांडे
सामनेवाले क्र.1 तर्फे :- अँड व्ही.एस.जाधव
सामनेवाले क्र.2 तर्फे ः- कोणीही हजर नाही.
सामनेवाले क्र. 3 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकणी.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे माजलगांव येथील रहिवासी असून माजलगांव गढी रोडवर माऊली फर्निचरचे दुकान सर्व्हे नंबर 384 मध्ये स्वतःचे मालकीचे वडिलांचे लाकडी सॉ मिलच्या शेजारी होते. तक्रारदार हा त्यांचा कारभार पाहत होते.
गेल्यावर्षी दि..11.2.2009 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास अर्जदाराचे वडिलांचे सॉ मिलला शॉटसर्किटमुळे आग लागली व त्या लगत अर्जदाराचे माऊली फर्निचरचे दूकान असल्याने दोन्ही दूकाने एकाचवेळी जळून खाक झाली. त्यावेळी तक्रारदाराने त्यांची फिर्याद पोलिस स्टेशन माजलगांव दिलेली आहे.
तहसिलदार माजलगांव मार्फत मंडळ अधिकारी माजलगांव यांनी दि.13.2.2009 रोजीला पंचनामा केला. तक्रारदारांनी माऊली फर्मचा विमा सामनेवालाकडून घेतलेला होता. सर्व कागदपत्राची पूर्तता त्रकारदाराने सामनेवाला यांचेकडे केलेली आहे.
माऊली फर्निचरचे दूकान शॉर्टसर्किटमूळे जळाले असल्याचा रिपोर्ट दि.16.3.2009 रोजी विघूत निरीक्षक विघूत निरिक्षण विभाग बीड यांनी अहवाल दिलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांनी अचानक असंबध्द व उडवाउडवीची उत्तरे देण्यास सूरुवात केली तक्रारदाराने बीड येथे त्यांचे कार्यालयात येऊन चौकशी केली असता त्यांनी योग्य माहीती दिली नाही.
दूकानाचे जवळपास रु.9,84,700/- चे नूकसान झाले आहे त्यामुळे तक्रारदाराची मानसिकता खचलेली आहे. वरील रक्कम तक्रारदारांना लवकरात लवकर देण्या बाबत सामनेवाला यांना आदेश देण्यात यावेत नसता तक्रारदाराचे कधी न भरुन येणारे नुकसान होईल. तसेच या प्रकरणी झालेला खर्च, मानसिक त्रासाबददल व खर्चाची रक्कम रु,5,000/- ची मागणी करीत आहेत.विनंती की, सामनेवाला यांनी रु.9,84,700/- व मानसिक त्रासाबददल व खर्चाबददल रु.5,000/-देण्यात यावेत.
तक्रारदारानी सदर प्रकरणात यापूर्वी यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.बीड कार्यालय आणि त्यांचे विमाप्रतिनिधी यांना पार्टी केलेले होते, सामनेवाला नंबर 1 यांनी खूलासा दि.30.11.2010 रोजी नि.10 वर दाखल केला आहे व सामनेवाला नंबर 2 हा त्यांचा एंजट नाही.तक्रारदारांनी सामनेवाला नं. 1 कडून विमा घेतल्या बाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.त्यामुळे सामनेवाला यांचा तक्रारदाराशी व प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. केवळ सामनेवाला यांना त्रास देण्यासाठी व मोठया रक्कमेची तक्रार केलेली आहे. ती रदद व्हावी,सामनेवाला यांना खर्च देण्याबाबतचे आदेश व्हावेत.
तक्रारदारानी दि.28.2.2011 रोजी सदर प्रकरणातील सामनेवाला नं.1 दि यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी बीड शाखा व एंजट दिंगाबर महाजन, दि यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. बीड यांना तक्रारीतून कमी केले आहे व दि ओरिएटंल इन्शुरन्स कंपनी लि. बीड यांना सदर तक्रारीत पक्षकार केले आहे.
सामनेवाला नं.1 यांनी त्यांचा खुलासा जिल्हा मंचात दि.8.6.2011 रोजी दाखल केला. खुलासा थोडक्यात की, तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवाला यांनी नाकारलेले आहेत. विमा पत्र, विमा कालावधी मान्य केलेले आहे. तक्रारदारांनी सदरचे विमा पत्र घेतेवेळेस विमा जोखीम सदर विमा पत्रा अंतर्गत फर्निचर, फिटींग, फिक्चर यांची रु.10,00,000/- आणि प्लॅट आणि मशिनरी यांची रु.5,00,000/- अशी एकूण रु.15,00,000/- लाखाचा विमा घेतलेला आहे परंतु तक्रारदारांनी विशेष हप्ता फर्म मधील स्टॉकच्या जोखमीचा घेतलेला नाही.
घटनेची माहीती मिळाल्यानंतर विमा कंपनीने सर्व्हेअर श्री.एस.एम.मठ यांची नेमणूक सामनेवाले यांनी केली होती. त्यांनी त्यांचा अहवाल दि.24.4.2009 रोजी दिला.
त्यानंतर श्री. बिराजदार सर्व्हेअर यांची नेमणूक सामनेवाले यांनी केली होती. त्यांनी त्यांचा अहवाल दि.14.09.2009 रोजी विमा कंपनीसदिले आहे. सदर अहवालानुसार विमा कंपनीने रक्कम रु.1,15,000/- चा फर्निचर फिटींग, फिक्चर्स आणि प्लॅट आणि मशिनरीचे नूकसानी बाबत मंजूर केले.
दि.3.8.2010 रोजीच्या पत्राअन्वये तक्रार यांना कळविण्यात आले की, तक्रारदाराकडून डिसचार्ज व्हाऊचर सही करुन मागण्यात आले व त्यानंतर पून्हा दि.13.09.2010 आणि दि.7.10.2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदार यांना पोहच देय टपालाचे पत्र पाठविले आहे. तक्रारदारांना सदरचे पत्र मिळाले आहे परंतु तक्रारदारांनी डिसचार्ज व्हाऊचर सही करुन पाठविले नाही. त्यामुळे शेवटी दि.25.10.2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना पोहच देय पत्राने कळविले की, तक्रारदाराचा दावा नो क्लेम म्हणून बंद करण्यात आलेला आहे.
यासर्व कार्यवाही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या दयावयाच्या सेवेत कसूर केला नाही. सदरची तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी असे म्हटले आहे.
तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे,सामनेवाला नंबर 1 यांचा खुलासा , शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले.
सामनेवाला नंबर 1 चे वकील अँड ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला. तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर, त्यांचा यूक्तीवाद नाही.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी निश्चितपणे कोणत्या विमा कंपनीकडून विमा घेतला व दूकानाच्या जळीताच्या घटनेनंतर कूठे कागदपत्रे सादर केली यांचा जाणीव मूळातच तक्रारदारांना नाही. ही बाब तक्रारदारांनी तक्रारीत दि यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. बीड कार्यालयास पार्टी केल्यावरुन स्पष्ट होते.
तक्रारदारांनी त्यांना तक्रारीतून कमी केलेले आहे.
तक्रारदारांनी दि ओरिएटल इन्शुरन्स कंपनी लि. बीड कडून विमा घेतला आहे. सदरचा विमा व त्यांचा कालावधी सामनेवाला यांना मान्य आहे परंतु तक्रारदारांनी सदर विमा घेते वेळी फक्त फर्निचर, फिटींग,फिक्चर यांचा रु.10,00,000/- आणि प्लॅट व मशीनरी यांचा रु.5,00,000/- चा विमा घेतलेला असल्याचे दाखल कागदपत्रावरुन दिसते. तक्रारदाराचा माऊली फर्निचर नांवाचे फर्निचर विक्रीचा व्यवसाय आहे. सदर दूकानाला दि.11.2.2009 रोजी शॉर्टसर्कीट ने आग लागली होती व त्या आगीत दूकानाचे नूकसान झालेले आहे.
या बाबतची तक्रारदारांनी पोलिस स्टेशनला कळवलेले आहे व त्यांनी त्या बाबतची नोंद अपघात नंबर 03/2009 ने घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे, तसेच सदर घटनेची माहीती तहसिलदार माजलगांव यांनी दिल्यावरुन मंडळ अधिकारी माजलगांव यांनी दि.13.2.2009 रोजी पंचनामा केलेला आहे.
तसेच आग शॉर्टसर्कीटने लागली असल्याने विद्युत निरिक्षक विद्युत निरीक्षण विभाग बीड यांनी त्यांचा अहवाल दि.16.3.2009 रोजी तक्रारदार यांना दिलेला आहे.
तक्रारदारांनी सदर घटनेची सूचना दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला दिलेली आहे.त्यानुसार त्यांनी श्री. मठ यांची सर्व्हेअर म्हणून नेमणूक केली असून त्यांनी त्यांचा अहवाल दि.24.4.2009 रोजी दिलेला आहे. तसेच त्यानंतर श्री. मठ सर्व्हेअर यांनी पाहणी केलेली असून त्यांचा अहवाल दि.14.9.2009 रोजी दिलेला आहे. विमा पत्रातील अटी व शर्तीनुसार तक्रारदाराचा विमा हा ज्या शिर्षकाखाली आहे त्यां शिर्षकाखाली नूकसानी बाबत रक्कम रु.1,15,000/- चे नूकसान भरपाई तक्रारदारांना मंजूर करण्यात आली व त्या बाबत दि.3.8.2010 रोजी पत्राने कळविण्यात आले. तक्रारदारांनी सदरची रक्कम स्विकारण्यास नकार दिलेला आहे. त्यानंतरही सामनेवाला यांनी दि.13.9.2010 रोजी आणि दि.7.10.2010 रोजी तक्रारदारांना पत्र दिल्याचे दिसते. तसेच शेवटी तक्रारदार रक्कम स्विकारत नसल्याने दि.25.10.2010 रोजी विमा दावा बंद करण्यात आला.सामनेवाला यांनी सदर दावा मंजूर केलेला असतांनाही तक्रारदारांनी सदरचा दावा स्विकारला नाही. यात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाबत स्पष्ट होत नाही तसेच तक्रारदाराने ज्या कारणासाठी दावा स्विकारला नाही त्या कारणाचा विचार करता तक्रारदाराच्या दूकानातील स्टॉकचे नूकसान झाल्याचे सर्व्हे अहवालावरुन दिसते परंतु स्टॉकच्या जोखीमसाठी तक्रारदाराने विमा घेतल्याचे विमा पत्रात दिसत नाही. त्यामुळे त्यात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. तथापि, दावा मंजुर केलेला असल्याने रक्कम रु.1,15,000/- स्विकारणेचा तक्रारदारांचा हक्क अबाधित ठेवून तक्रार रद्य करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. विमा नुकसान भरपाई रक्कम रु.1,15,000/- घेण्याचा तक्रारदारांचा हक्क अबाधित ठेऊन तक्रार रदद करण्यात येते.
1.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड