तक्रारदारातर्फे :- वकील -अँड. आर. व्ही. देशमुख.
सामनेवालेतर्फे :- वकील –अँड. ए.पी.कुलकर्णी.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हिची मारुती एस्टीम एएक्ससी, गाडी जिचा नोंदणी क्रं. एमएच-24- सी – 6195 ही गाडी असून सदर गाडीचा तक्रारदाराने सामनेवालेकडून रक्कम रुपये 3,20,000/- चा विमा घेतलेला आहे.
तारीख 19/08/2009 रोजी अपघात झालेला आहे. त्याबाबतचे पत्र तक्रारदाराने तारीख 07/12/2009 रोजी सामनेवालेंना दिले. त्यासंदर्भात तक्रारदारांने काही वैयक्तीक अडचणीमुळे व नाराजीने सामनेवाले यांना कॅश लॉस बेसीसवर रक्कम रुपये 1,60,000/- वरती संमती देवून दावा निश्चित करण्याविषयी सहमती दर्शविलेली आहे.
तक्रारदाराने गाडी दुरुस्ती करण्यासाठी विलंब लागू नये व इतर व्यक्तीगत अडचणीमुळे वरील रक्कमेची संमती देवून तारीख 29/12/2009 रोजी पत्र पाठवून अपघातग्रस्त वाहन दुरुस्त करण्यासंदर्भात परवानगी देखील मागितलेली होती. सामनेवालेंनी तारीख 31/12/2009 रोजी पत्र पाठवून सदरची मागणी फेटाळून लावली व तक्रारदारांना सुचित केले की, जोपर्यंत सामनेवालेकडून तक्रारदारांना वाहनाची नुकसान भरपाई कॅश लॉस या तत्वावर होऊन तक्रारदारास धनादेश मिळत नाही, तो पर्यंत तक्रारदाराने सदरचे अपघातग्रस्त वाहन दुरुस्त करु नये किंवा त्याची परस्पर विल्हेवाट लावू शकत नाही. तक्रारदाराने सदर सुचनेचे पालन केलेले असून उल्लंघन केलेले नाही. तक्रारदाराने सामनेवालेच्या प्रस्तावास संमती देवून नियमानुसार अपघातग्रस्त वाहन 7 ते 8 महिन्यापासून एकाच ठिकाणी उभे असल्याकारणाने वाहनाचे जास्त नुकसान होवू लागले. सामनेवाले नाहक विलंब करीत आहेत. तसेच तक्रारदारांना विम्याची रक्कम लवकरात लवकर देणे सुलभ होण्यापेक्षा सामनेवाले हे तक्रारदाराने घेतलेल्या गाडीचे पार्ट मिळणे दुरापास्त असल्याने वाहन दुरुस्ती करणे अशक्य आहे, असे सांगत आहेत. तक्रारदाराने तारीख 23/04/2010 रोजी पत्र पाठवून नुकसान भरपाईची रक्कम देण्याची मागणी केली.
तक्रारदाराचे झालेले नुकसान व खर्च पुढील प्रमाणे आहे.
1. नुकसानीपोटी तक्रारदार यांना मिळणारी पूर्ण
विमा रक्कम. रु. 3,20,000/-
2. मानसिक त्रासापोटीची रक्कम. रु. 20,000/-
3. शारिरीक त्रासापोटीची रक्कम. रु. 20,000/-
4. आर्थिक त्रासापोटीची रक्कम. रु. 30,000/-
5. तक्रार खर्चापोटीची रक्कम. रु. 10,000/-
-----------------------------
एकूण :- रु. 4,00,000/-
तारीख 19/5/2010 रोजी तक्रारदाराने सामनेवालेंना सेवेत कसूर करीत असल्याबाबत नोटीस पाठविली. त्यासंदर्भात तारीख 29/5/2010 रोजी सामनेवालेंनी नोटीसीचे उत्तर दिले. विलंबाबत कोणताही खेद व्यक्त न करता तक्रारदाराची नोटीस ही खोडसाळपणाची असल्याबाबत म्हटलेले आहे. यावरुन सामनेवालेंना तात्काळ तक्रारदाराच्या मागणीचा विचार होण्याविषयी कोणतीही उत्सुकता दिसून येत नाही.
विनंती की, तक्रारदारांना सामनेवालेकडून रक्कम रु. 4,00,000/- नुकसान भरपाई द.सा.द.शे. 12 टक्के व्याजदराने तक्रार दाखल केल्यापासून देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवालेने तारीख 09/11/2011 रोजी त्यांचा खुलासा दाखल करुन तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रारदाराने वाहन दुरुस्ती करण्याबाबत अर्ज दिला ही बाब चुकीची आहे आणि ती विमापत्रातील अटी व शर्तीच्या विसंगत आहे. तारीख 31/12/2009 रोजी सामनेवालेने विमापत्रातील शर्ती व अटीनुसार सदरची परवानगी नाकारल्याचे पत्र दिले. यात सामनेवालेच्या सेवेत कोठेही कसूर नाही. तक्रारदाराचा दावा सामनेवालेंना तारीख 18/9/2009 रोजी प्राप्त झाला. तक्रारदाराच्या इच्छेप्रमाणे श्री जेथले यांना घटनास्थळावरील वाहन पाहणीसाठी नेमले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तारीख 20/10/2009 रोजी तक्रारदाराने अर्ज देवून कॅशलॉस तत्वावर रक्कम स्विकारण्याची इच्छा प्रदर्शीत केली. त्यानंतर श्री ए.टी.कुलकर्णी, सर्व्हेअर व लॉसअसेसर यांनी वाहनाची तपासणी करुन कॅशलॉस तत्वावर वाहनाच्या नुकसानीची आकारणी केली. त्यानुसार सदरची आकारणी रु. 1,60,000/- ची सर्व्हेअर यांनी केली. मारुती इस्टीम मॉडेलचे उत्पादन बंद झालेले असल्याने सदर वाहनाचे सुटे भाग बाजारात उपलब्ध नाहीत, याची माहिती तक्रारदारांना आहे. त्यानुसारच तक्रारदाराने तारीख 20/10/2009 रोजी कॅशलॉस तत्वास दावा मंजूर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार तक्रारदाराचा दावा कंपनीने मंजूरीसाठी त्यांचे विभागीय कार्यालय पूणे येथे पाठवला. त्यांच्याकडून मंजूरी तारीख 02/07/2010 ला आली. सदरचे वाहन हे तक्रारदाराने कर्जाने घेतलेले असल्याने ते कर्ज देणा-या संस्थेकडे गहाण असल्याने सदर संस्थेला दाव्याची रक्कम देण्यात आली. यासंदर्भात कर्ज देणारी संस्था व तक्रारदार यांच्या सहया डिस्चार्ज व्हाऊचरवर घेण्यात आलेल्या आहेत. सदरची रक्कम ही पूर्ण आणि अंतिम समाधानाने तक्रारदाराने स्विकारलेली आहे, त्यामळे तक्रारदारांना तक्रार करण्यास कोणतेही कारण नाही, सामनेवालेच्या सेवेत कसूर नाही. तक्रार रद्द करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवालेचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. आर. व्ही. देशमुख व सामनेवालेचे विद्वान अँड. ए. पी. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराच्या मालकीच्या मारुती इस्टीम या गाडीचा विमा सामनेवालेंनी घेतलेला आहे. सदर गाडीचा अपघात ता. 19/08/2009 रोजी झालेला आहे. त्याबाबतची सुचना तक्रारदाराकडून सामनेवालेंना देण्यात आलेली आहे व सामनेवालेंनी त्या सुचनेप्रमाणे श्री जेथले सर्व्हेअर यांची नेमणूक अपघातग्रस्त वाहनाच्या पाहणीसाठी केलेली आहे. त्यांनी त्यांचा पाहणी अहवाल कार्यालयाकडे पाठवल्यानंतर तक्रारदाराने तारीख 20/10/2009 रोजी कॅश लॉस तत्वावर रक्कम स्विकारण्याची इच्छा लेखी अर्जाने प्रदर्शीत केलेली आहे. त्यानंतर श्री ए.टी.कुलकर्णी सर्व्हेअर व लॉस असेसर यांची नेमणूक सदर वाहनाच्या तपासणीसाठी व वाहनाच्या नुकसान भरपाईच्या आकारणीसाठी करण्यात आलेली आहे. त्यांनी वाहनाची तपासणी करुन त्यांचा अहवाल कार्यालयाला सादर केला. त्यानंतर सदरचे प्रकरण हे विभागीय कार्यालय पुणे येथे मंजूरीसाठी पाठवण्यात आले. त्याची मंजूरी तारीख 02/07/2010 रोजी आल्यानंतर लगेचच तारीख 07/07/2010 रोजी सदर वाहन गहाण असलेल्या प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक मर्यादित बीड यांच्या पत्रानुसार तक्रारदाराच्या व त्यांच्या डिस्चार्ज व्हाऊचरवर सहया झाल्यावर सदर रक्कमेचा चेक रक्कम रुपये 1,59,400/- चा प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक बीड यांच्या नावाने तक्रारदाराच्या संमतीने देण्यात आला.
सदर प्रकरणात अपघात तारीख 19/8/2009 रोजी झाला व तक्रारदारांना रक्कम तारीख 07/07/2010 रोजी देण्यात आलेली आहे. यात सामनेवालेकडून हेतुत: कोठे विलंब झालेला नाही. कार्यालयीन प्रक्रिया करण्यास फक्त तेवढा वेळ गेला. परंतू वेळेत सदर प्रकरण निकाली करण्याचा विमा कंपनीने प्रयत्न केलेला आहे. यात सामनेवालेचा कसूर असल्याची बाब कोठेही स्पष्ट होत नाही. तथापि, तक्रारदाराने तक्रारीत वरील सर्व बाबी नमूद केलेल्या आहेत. सदरची रक्कम तक्रारदाराने वैयक्तीक अडचणीमुळे व नाराजीने स्विकारल्याचे म्हटलेले आहे परंतू सदरची बाब ही दाखल असलेल्या कागदपत्रावरुन कोठेही स्पष्ट होत नाही. तसेच विमा कंपनीचे अधिकारी यांच्या दवावामुळे सदरची रक्कम स्विकारली, असा आक्षेप तक्रारदाराचा नाही. तसेच सर्व्हेअर यांच्या अहवालाबाबतही तक्रारदाराचा आक्षेप नाही. तक्रारदाराने विमा रक्कम रु. 3,20,000/- चा घेतलेला असतांना तक्रारदाराचा दावा कॅश लॉस तत्वावर रक्कम रु. 1,59,400/- वर बंद करण्यात आलेला आहे. याबाबत तक्रारदाराची हरकत दिसते. परंतू सदरची हरकत कायदयाच्या चौकटीवर कशी योग्य आहे, याबाबत तक्रारीत कोणत्याही बाबी स्पष्ट केलेल्या नाहीत. यासंदर्भात तक्रारदाराने खालील न्याय निवाडयाचा आधार घेतलेला आहे.
1. मा. हिमाचल प्रदेश राज्य आयोग, सिमला, अपील क्रं. 518/2007.
रामानंद ठाकूर विरुध्द शाखाधिकारी, ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि.
सदर न्याय निवाडयाच्या निकालाची प्रत दाखल केलेली आहे. तिचे सखोल वाचन केले असता सदरचा न्याय निवाडा हा तक्रारदाराच्या तक्रारीस लागू होत नाही, असे न्याय मंच नम्रपणे नमूद करीत आहे.
सेवेत कसूरीची बाब स्पष्ट न झाल्याने तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे तक्रारदारांना रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2. सामनेवलेंच्या खर्चाबाबत आदेश नाही.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
चुनडे/- स्टेनो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड