जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –146/2010 तक्रार दाखल तारीख –18/09/2010
निकाल तारीख – 05/07/2011
-------------------------------------------------------------
संतोष पि. सुभाष खोले
वय- 30 वर्षे, धंदा- नोकरी,
रा.रस्ता गल्ली, पाटोदा ता.पाटोदा जि. बीड. ... तक्रारदार
विरुध्द
शाखाधिकारी
आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जन. इन्शुअरन्स.
झेनिथ हाऊस, केशवराव खाडे मार्ग,
महालक्ष्मी मुंबई ... सामनेवाला
जि. मुंबई (महाराष्ट)400 034
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अँड. अरविंद दि.काळे
सामनेवालेतर्फे :- अँड. राजेश व्ही.देशपांडे
नि. 1 वरील आदेश
अर्जदार व सामनेवाले यांचेत तडजोड झालेली आहे व त्याप्रमाणे सामनेवालेनी न्यायमंचात रक्कम रु.2,95,000/- चा धनादेश जमा केलेला आहे. त्यामुळे अर्जदार व सामनेवाले यांनी सदरची तक्रार चालवणे नाही अशी पुरशीस त्यांनी दाखल केलेली आहे.
तक्रारदार व सामनेवाले हजर, व त्यांचे वकील हजर. तक्रारदार व सामनेवाले यांच्यात तडजोड झाल्याने अर्जदारांना प्रकरण चालवावयाचे नसल्याने तक्रार निकालात काढणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
पुरशीस प्रमाणे तक्रार निकाली.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड