जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 04/2013 तक्रार दाखल तारीख – 07/01/2013
निकाल तारीख - 27/03/2015
कालावधी - 02 वर्ष , 02 म. 20 दिवस.
विठ्ठल यशवंतराव पाटील,
प्रो.प्रा.सिध्देश्वर फर्टीलायझर्स,
शिवाजी चौक, उदगीर, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) शाखाधिकारी/व्यवस्थापक,
आय.डी.बी.आय बँक,
शाखा – उदगीर, जि. लातुर.
2) शाखाधिकारी/व्यवस्थापक,
आय.सी.आय.सी.आय.बँक,
शाखा कोड-0000250,
द्वारका शाखा नवी दिल्ली- 110075.
3) सुरेंद्र पाजी,
मोटीव्ह क्रिएशन अॅडव्हरटाईज
अे-34, भगवती गार्डन, एक्सटेंशन द्वारका समोर,
उत्तम नगर, नवी दिल्ली – 110059. ...गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.एम.मान्नीकर.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- अॅड. आर.बी.जानते.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे :- अॅड. एन.आर.माने.
निकालपत्र
(घोषितव्दारा – श्रीमती रेखा जाधव,मा.सदस्या )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदाराचे गैरअर्जदार क्र. 1 यांच्या बॅंकेत व्यवसायाच्या नावाने खाते क्र. 538102000002707 असुन, अर्जदाराने दि. 30/11/2011 रोजी सदरील खात्यावरील रक्कम रु. 1,00,000/- चेक क्र. 162567 द्वारे रामके को – ऑप सायन्स प्रा.लि., द्वारका नवी दिल्ली येथे गैरअर्जदार क्र. 2 यांच्या शाखा कोड- 0000250 येथील खाते क्र. 025005003566 यांना वर्ग करण्यासाठी आर.टी.जी.एस. फॉर्म भरुन सदरचा चेक गैरअर्जदार क्र. 1 यांना दिला. अर्जदाराने पाठविलेली रक्कम रामके क्रॉप सायन्स प्रा.लि. यांच्या खात्यावर जमा झाली नाही, त्यामुळे अर्जदाराचा माल आला नाही. सदर कंपनीचे प्रतिनिधी ऑक्टोंबर 2012 मध्ये उदगीर येथे आले असता त्यांना खाते काढुन दाखविले असता, पार्टीचे नाव UTR नंबर जुळुन आला पण सदर रक्कम जमा झाल्याची नोंद नव्हती. अर्जदाराने दि. 20/10/2012 रोजी सदर घटनेची माहिती गैरअर्जदार क्र. 1 ला पत्राद्वारे दिली. गैरअर्जदार क्र. 1 ने दि. 23/10/2012 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे दि. 14 ऑक्टोंबर 2010 चे परीपत्रक देवून तुम्ही संबंधित पार्टीशी पैसे मिळविण्याचा संपर्क करा, अर्जदाराने दि. 11/12/2012 रोजी गैरअर्जदाराना नोटीस दिली. अर्जदाराने तक्रारी अर्जात रक्कम रु. 1,00,000/- त्यावर 18 टक्के व्याज, वार्षिक उत्पन्न रु. 40,000/- व मानसिक, शारीरीक त्रास व तक्रारी अर्जाचा खर्च रु. 25,000/- मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत पुरावा म्हणून शपथपत्र दिले आहे, व त्यासोबत एकुण – 08 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 ने लेखी म्हणणे दिले आहे. गैरअर्जदार यांना त्रास देण्यासाठी सदरची तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदाराने दि. 30/11/2014 रोजी रक्कम रु. 1,00,000/- आर.टी.जी.एस फॉर्म भरुन रामके क्रॉप सायन्स प्रा.लि., द्वारका नवी दिल्ली येथील आय.सी.आय.सी.आय बॅंकेला दिली आहेत. अर्जदाराने खाते क्र. 025005003560 चुकीचा लिहुन दिला होता. गैरअर्जदाराने अर्जदाराने दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे वर्ग केले होते. गैरअर्जदाराने रिझर्व्ह बँक इंडिया दि. 14 ऑक्टोंबर 2010 च्या परिपत्रकानुसार आर.टी.जी.एस हा शाखा कोड व खाते क्रमांक यानुसार जमा होते. खातेधारकाच्या नावास महत्व नसते. खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी कोड, आर.टी.जी.एस फॉर्म भरुन देणा-याची जबाबदारी असते. गैरअर्जदार क्र. 1 ने व गैरअर्जदार क्र. 2 शी बोलणी करुन चुकीचे खाते नंबरवर रु. 1,00,000/- बोजा नोंदविण्याचे काम केले आहे. अर्जदाराचा तक्रारी अर्ज गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्दचा दंडासह खारीज करण्यात यावा.
गैरअर्जदार क्र.2 ने लेखी म्हणणे दिले आहे. सदरची रक्कम दुस-याच्या खात्यावर जमा झाली, हे गैरअर्जदार क्र. 2 ला मान्य नाही. अर्जदाराने गैरअर्जदारास दि. 11/12/2012 रोजी नोटीस दिली नाही. अर्जदार हा गैरअर्जदार क्र.2 चा ग्राहक नाही. अर्जदारास कायदेशीररित्या नुकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार जबाबदार नाही. अर्जदाराचा तक्रारी अर्ज गैरअर्जदार क्र. 2 यांचे विरुध्दचा खारीज करण्यात यावा.
अर्जदाराचा तक्रारी अर्ज व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, व पुरावा म्हणून दिलेले शपथपत्र तसेच गैरअर्जदाराचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद याचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर :- अर्जदाराने गैरअर्जदारास मोबदला देवून सदरची सेवा घेतली आहे. गैरअर्जदाराने सदरचा मोबदला स्विकारल्यामुळे, अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो. म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर :- अर्जदाराचा खाते क्र. 538102000002707 असून, त्याचे गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे व्यवसायिक खाते आहे. गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द अर्जदाराने स्टेप्स घेतली नाही. अर्जदाराने दि. 30/11/2011 रोजी चेक क्र. 162567 द्वारे रु. 1,00,000/- NEFT रामके क्रॉप सायन्स प्रा. लि., यांच्याकडे वर्ग केल्याचे खाते उता-यावरुन दिसुन येते. अर्जदाराने दि. 30/11/2011 रोजी आर.टी.जी.एस फॉर्म भरुन दिला आहे. त्यात बेनिफीशरी डिटेल्स मध्ये खाते क्र. 025005003566 असून रामके क्रॉप सायन्स प्रा. लि., या नावाने आहे. सदर खाते नंबरमध्ये शेवटचा अंक छोटा लिहील्याचे स्पष्ट दिसुन येते, त्याठिकाणी शुन्य लिहिल्याचे दिसुन येत नाही. गैरअर्जदार क्र. 1 चे म्हणणे अर्जदाराने खाते क्र. 025005003560 हा चुकीचा लिहून दिल्याचे दिसुन येत नाही. अर्जदाराने दि. 14/10/2010 रोजीचे आर.बी.आय चे परिपत्रक दाखल केले आहे, त्यातील मुद्दा क्र. 5(i) मध्ये While the beneficiary’s name shall be compulsorily mentioned in the instruction request and carried as part of the funds यावरुन असे दिसुन येते की गैरअर्जदाराने आर.बी.आय च्या परिपत्रकानुसार नियमाचे पालन केले नाही. अर्जदाराने आर.टी.जी.एस फॉर्म भरुन देताना बेनिफिशीरी डिटेल्समध्ये नाव, खाते क्रमांक हा योग्य तो भरलेला होता. गैरअर्जदाराने अर्जदाराची रक्कम रु. 1,00,000/- आर.टी.जी.एस द्वारे ट्रान्सफर करताना योग्य ती काळजी घेतली नसल्याचे सिध्द होते. गैरअर्जदारास अर्जदाराने आर.टी.जी.एस. द्वारे दिलेली रक्कम दुस-याच्या खात्यावर पाठवून अकार्यक्षम अशी सेवा दिल्याचे दिसुन येते. अर्जदाराने ज्या व्यक्तीच्या नावे आर.टी.जी.एस द्वारे रक्कम पाठविली होती, ती रक्कम त्या व्यक्तीस मिळाली नसून, खाते क्र. 025005003560 या खातेदारास मिळाल्याचे मिळाल्याचे दिसुन येते. गैरअर्जदाराने अर्जदारात व त्याच्यात झालेल्या कराराचे पालन केले नसल्यामुळे गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असे आहे.
मुद्दा क्र. 3 चे उत्तर :- अर्जदाराने कागदोपत्री पुरावा देवून सदरची तक्रार सिध्द केल्यामुळे अर्जदार हा रक्कम रु. 1,00,000/- व मानसिक, शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रारी अर्जाच्या खर्चापोटी रु. 10,000/- अनुतोष मिळण्यास पात्र आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु.
1,00,000/-(अक्षरी एक लाख रुपये फक्त) अर्जदाराने जमा केलेल्या तारखेपासुन 9
टक्के व्याज आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत
न केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर अतिरिक्त द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 5,000/-(अक्षरी पाच हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी
रु. 5,000/-(अक्षरी पाच हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.